हा लेखनाचा प्रयत्न, उद्या इंटरनॅशनल लेफ्ट हॅन्डर्स डे आहे त्या निमित्त.
१३ ऑगस्टलाच का याबद्दल मला तरी काही माहिती सापडली नाही. (https://www.lefthandersday.com) पण बऱ्याचदा १३ ऑगस्ट ला फेसबूक, Wats App वर कोणी तरी आठवण काढत आणि स्वतः च त्यात काहीही कर्तृत्व नसताना पण उगाच थोडंस स्पेशल वालं फीलिंग येत.
वामांगी लोकांच्या काही वेगळ्या मजा/अडचणी असतात.
शाळेत असताना -
शाळेतल्या बाकांवर उजवीकडे बसले की लिहिताना शेजारच्याचे आणि आपले हात धक्काबुक्की करतात.
डावीकडे बसले की ओळींमधून फिरणाऱ्या बाईंना कोपरखळ्या बसतात.
शाईपेन ने लिहिताना आधीचे लिहिलेले शब्द पुसले जातात.
प्रसाद घेताना, देवाला फुलं वहातांना पटकन डावा हात पुढे आला की एखादे आजी -आजोबा डोळे वटारून बघतात.
शाळेच्या स्कर्ट चे बक्कल उजव्या हाताने डावीकडे लावावे लागते आणि खिसा नेमका उजवीकडे असतो आणि जो एकच असतो.
कॉलेजमध्ये गेल्यावर -
डावखोऱ्या लोकांच्या मागे बसणाऱ्यांना त्यांचा सगळा पेपर दिसतो आणि कॉपी चालू आहे का म्हणून बोलणी पण खावी लागतात, जर तुम्ही थोडेफार हुशार असाल तर मात्र तुमचा भाव वाढतो
क्लासेस मधले सिंगल सीट बेंचेस आणि उजवीकडे असेलेले डेस्क तर खूप वैताग आणतात.
माउस, कॅमेरा,Latch अशा वस्तू मजा बघतात.
हॉटेल मध्ये प्लेट्स,ग्लास ,चमचे उलटीकडे ठेवले जाऊन सांडलवण होते.
संसाराला लागल्यावर -
लहानपणी डोळे वटारून बघणाऱ्या आजी आजोबांची जागा चुलत,मावस सासवा, सत्यनारायण, मंगळागौर प्रकारांना येणारे गुरुजी घेतात.
गॅस,मिक्सर,लाच यांची बटण घाबरवून सोडतात.
साडीच्या निऱ्या उलट्या घेतल्या जातात.
कितीही आतून वाटलं तरी त्यांची मुलं राईट हॅन्डर्स होतात.
इत्यादी, इत्यादी
मंडळी तुमचे अनुभव, किस्से माहिती वाचायला नक्की आवडेल
ताजा अनुभव -
स्पायरल बाइंडिंग असलेल्या वहीमध्ये उजव्या पानावर लिहिताना त्रास होतो, जो उजव्या हाताने लिहिणार्यांना डाव्या पानावर होत असेल
मी डाव्या हाताने लिहीते आणि
मी डाव्या हाताने लिहीते आणि उजव्या हाताने जेवते.
ओह, असा आंतरराष्ट्रीय दिवस
ओह, असा आंतरराष्ट्रीय दिवस आहे हे माहीत नव्हते, आणि डावखुऱ्या लोकांच्या एवढ्या समस्या असू शकतात हे देखील.
कधी विचारच नव्हता केला याबद्दल. म्हणतात ना जावे त्यांच्या वंशा...
छान लिहिलंय.
@मोहिनी १२३ - मी पण. आई चं
@मोहिनी १२३ - मी पण. आई चं म्हणणं आहे मी लहानपणी डाव्या हातानेच जेवायचे, शाळेत बाकीच्यांचं पाहून उजव्या हाताने जेवायला लागले. आणि आता अर्धवट काहीतरी होऊन बसलंय. चमचा वापरताना डावा हात, हाताने जेवताना उजवा
@मानव - धन्यवाद!
लहानपणी आईने जबरस्तीने उजव्या
लहानपणी आईने जबरदस्तीने उजव्या हाताने खायची सवय लावली म्हणून मी पण हाताने जेवताना उजवा हात पण चमचा वापरताना डावा हात. बाकी सगळी कामे डाव्या हाताने.
लेखात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीला अगदी अगदी झाले. फक्त मुलगीही डावखरी असल्याने तेवढंच बरं वाटतं. तिला नाही मी काही बंधनं घातली.
शाळेतल्या बाकांवर उजवीकडे
शाळेतल्या बाकांवर उजवीकडे बसले की लिहिताना शेजारच्याचे आणि आपले हात धक्काबुक्की करतात. >> हॉटेल वा घरी डायनिंग टेबल वर शेजारच्या (ऊजव्या हाताच्या) माणसाच्या (मोस्टली नवरा) नेहमी डाव्या बाजुलाच बसायला लागते. आधी बसतांना असे बसलो नाही तर जेवण सर्व केल्यावर ऊठून पुन्हा ही अॅडजस्टमेंट करावी लागते. जेवायला बरोबर असणारे लोक मात्र ह्याचा अनुभव नसल्यास काहीही मजेशीर अर्थ काढतात....भांडण झाले आहे का ते किंवा देवाचे काही तरी आहे का अशा अर्थाचे प्रश्न आम्हाला विचारले गेले आहेत.
ऊजव्या हाताच्या माण्साकडून गाडी शिकतांना होणारी डाव्या ऊजव्याची तारांबळ, हा अजून एक भन्नाट मजेशीर प्रकार.
मला सुईत दोरा ओवताना
मला सुईत दोरा ओवताना प्रॅाल्बेम येतो नेहमी.
आमच्या ऑफिसमधल्या डावऱ्या
आमच्या ऑफिसमधल्या डावऱ्या अकांउंटंटने टाचणी लावलेली पानं नेहमी टोचतात..
तिला सांगितलं तेव्हा कळलं की यांना Right Handed माणसांसारखी टाचणी लावता येत नाही..
मी स्वतः डावखुरा आहे, मोठी
मी स्वतः डावखुरा आहे, मोठी कात्री वापरताना, शर्ट चा खिसा वापरताना थोडं uneasy होतं. कारण या वस्तू उजव्या हाताचा वापर करण्यासाठी बनवल्या गेल्या आहेत.
डाव्या हातावर बांधल्या जाण्याऱ्या घड्याळ्याचं पण तसंच! घाईत वेळ बघायची असते पण (डाव्या) हातात काहीतरी काम असल्याने अवघड होतं.
माझा मुलगा वय वर्ष ३, सगळ्या
माझा मुलगा वय वर्ष ३, सगळ्या गोष्टी डाव्या हातानेच करतो आहे. पेन्सिल खडू वगैरे उजव्या हातात दिले तरी परत डाव्या हातात घेतो. उजव्या हाताने काहीही जमत नाही. त्याच्यावर जबरदस्ती नाही केली पण उजवा हात वापरण्याची सवय लावावी वाटते कारण वर दिलेले सगळे कारणं माहीत आहेत सो, त्याची अशी गैरसोय होऊ नये असं वाटतं.
<<माझा मुलगा वय वर्ष ३,
<<माझा मुलगा वय वर्ष ३, सगळ्या गोष्टी डाव्या हातानेच करतो आहे. पेन्सिल खडू वगैरे उजव्या हातात दिले तरी परत डाव्या हातात घेतो. उजव्या हाताने काहीही जमत नाही. त्याच्यावर जबरदस्ती नाही केली पण उजवा हात वापरण्याची सवय लावावी वाटते कारण वर दिलेले सगळे कारणं माहीत आहेत सो, त्याची अशी गैरसोय होऊ नये असं वाटतं.>>
असं अजिबात करु नका.
डावरे कि उजवे हे मेंदुचा कोणता अर्धगोल (उजवा/डावा) Dominant आहे ह्यावर अवलंबून असतं.
असा बदलण्याचा प्रयत्न करुन ह्या सिस्टीम मधे आपण बदल करतो ते व्यवहार्य नाही.
रहाता राहिली वर उल्लेख केलेल्या त्रासाची.
आजच्या जगात डावऱ्या व्यक्तींसाठी त्यांच्या सोयीच्या, त्यांच्या वापराशी सुसंगत अनेक वस्तू उपलब्ध आहेत..
त्या संपूर्ण गरज जरी भागवू शकत नसतील तरी असे हाताची सवय बदलण्याचा प्रयत्न करु नका. वाटल्यास तज्ज्ञांकडून माहिती घ्या.
मी रॅकेटबॉल आणि कॅरम डाव्या
मी रॅकेटबॉल आणि कॅरम डाव्या हाताने खेळतो...
टेनिस आणि बॅडमिंटन उजव्या हाताने..
ओह, असा आंतरराष्ट्रीय दिवस
ओह, असा आंतरराष्ट्रीय दिवस आहे हे माहीत नव्हते, आणि डावखुऱ्या लोकांच्या एवढ्या समस्या असू शकतात हे देखील.
कधी विचारच नव्हता केला याबद्दल. म्हणतात ना जावे त्यांच्या वंशा...
छान लिहिलंय.>>>>++++११११११ हो मलाही नव्यानेच कळतय अशा दिवसाबद्दल. माझ्या एका भाच्याच्या बाबतीत हे झालंय कि तो डावरा आहे हे आधी कळलंच नाही. शाळेत, घरी त्याला उजवा हात वापरण्यासाठी सक्ती झाली सुरुवातीला पण जेव्हा लक्षात आलं कि हा डावरा आहे मग सगळ्यांनी उजव्या चा आग्रह सोडला.
मस्त लेख,
मस्त लेख,
धाकटी मुलगी डावखुरी आहे , अजून 4 वर्षाचीच आहे म्हणून अजून तितका स्ट्रॉंग प्रेफ समोर येत नाहीये, पण बऱ्याचदा डावा हातच पुढे येतो. तोच तिचा स्ट्रॉंग हॅन्ड आहे
कित्येक ऍक्शन्स उजव्या लोकांपेक्षा एक्झाक्ट उलट असतात,
-लिहायला उर्दू सारखी सुरवात करत होती, खूप सांगून ते बदलले.
- आपण "संपले" ची खुण करताना हाताचे तळवे आतुन बाहेरच्या बाजूस हलवतो, ती बाहेरून आतल्या बाजूस आणते.
- मराठी इंग्रजी मुळाक्षरे मिरर इमेज काढते,
@चैत्रगंधा : धन्यवाद आणि सेम
@चैत्रगंधा : धन्यवाद आणि सेम पिंच
@मी अश्विनी : देवाचं काही आहे का, हे भारी होतं
@मोहिनी १२३ : हो का ? मला नाही जाणवलं कधी
@निरू : त्यांना आपलं म्हणा वाण सामानाच्या पिशव्यांना मारलेल्या गाठी पण उजवा हात वापरणाऱ्या लोकांना काढताना अवघड जातात.
@इंडियन१ : अरेच्या, मी कात्री मिस केली घड्याळ मी उजव्या हातात घालते.
@सान्वी : खूपच काही त्रास असतो असा मला वाटत नाही , गैरसोय होते हे खरं आहे पण नंतर आपोआप सवय पण होते
@च्रप्स : मी पण कॅरम डाव्या हाताने आणि गल्ली बॅडमिंटन उजव्या हाताने खेळते , Doubles मध्ये मात्र एक जण डाव्या हाताने खेळणारा असेल तर फायदा होतो असं ऐकलंय
@धनुडी :
मलाही आई डावा हात बांधून
मलाही आई डावा हात बांधून ठेवायची जेवताना म्हणून उजव्या हाताने जेवायची सवय लागली
पण चमचा मला डाव्या हातानेच पकडता येतो
लहानपणी डाव्या बाजूने खेळलो तर आउट व्हायचा धोका असे म्हणून उजव्या हाताने बॅटिंग करायला शिकलो
आता दोन्ही हातांनी करू शकतो
सगळ्यात त्रास व्हायचा तो कात्री पकडताना
पूर्वीच्या कातऱ्या वेगळ्या मुठीच्या असत
एकदा खास डावखुऱ्या लोकांसाठी बटणे असलेला शर्ट आणला होता पण लहानपणापासून सवय नेहमीच्या बटनाची असल्याने कटकट वाटली
डावखुर्या डेंटीस्टची तर वाट
डावखुर्या डेंटीस्टची तर वाट लागते.
अच्छा, धन्यवाद निरु आणि
अच्छा, धन्यवाद निरु आणि श्रद्धा, आता त्याला उजव्या हाताच्या वापराचा आग्रह करणार नाही.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
आम्हाला शाळेत इंग्लिशला Left is Right नावाचा एक धडा होता. त्यात डावखुऱ्या लोकांचे असेच प्रॉब्लेम्स आणि काही गमतीजमतीपण होत्या. प्रसिद्ध डावखुऱ्या व्यक्तींंची माहितीही होती.
@सिम्बा -
@सिम्बा -
आपण "संपले" ची खुण करताना हाताचे तळवे आतुन बाहेरच्या बाजूस हलवतो, ती बाहेरून आतल्या बाजूस आणते >> लगेच करून बघितलं
@आशुचॅम्प : हो ती अँटिक लोखंडी कात्री आमच्या कडे पण आहे
@मास्टर योडा : डावखोरा डेंटिस्ट, हा विचार नव्हता केला कधी
bdw , कोणाला डाव्या हाताने काड्यापेटीची काडी पेटवताना त्रास होतो का ? तिथे डाव्या -उजव्याचा संबंध आहे असे वाटत नाही, पण मला अवघड जातं.
@वावे : धन्यवाद! बरोबर
@वावे : धन्यवाद! बरोबर आम्हाला पण होता हा धडा
डावरे लोक इतरांच्या मानाने
डावरे लोक इतरांच्या मानाने थोडे जास्त clumsy आणि स्वयंशिस्ती च्या बाबतीत उदासीन असतात का असा प्रश्न मला माझ्या मैत्रिणीने हल्लीच विचारला होता. तिचा मुलगा डावरा आहे असे लक्षात येत असल्याने तिला टेन्शन आले होते.
सालकाढणीनं काकडीचं साल
सालकाढणीनं काकडीचं साल काढताना खालून वर जावं लागतं. बाकी जनता वरून खाली येते.
सतार वाजवताना कशी धरावी तेच कळत नाही. कम्प्लीट उलटं वाटतं.
माऊस सेटींग बदलावं लागतं. तोच दुरुस्तीवाला आला की लक्षात ठेऊन परत चेंज करावं लागतं.
छान लिहिलयं श्रद्धा,
छान लिहिलयं श्रद्धा,
मला पण तो धडा आठवतोय. मला समहाऊ डावखुरी लोकं हुशार वाटतात. आतेभावाला डावा हात अशुभ म्हणून उजव्या हाताने मारून मारून(त्याच्या आत्याने) लिहायला शिकवले होते. नंतर दोन्ही हाताने लिहू लागला. परीक्षेत एक हात थकला की दुसरा वापरायचा . मला फार कूल वाटायचं ते.
मी बरीच कामं दोन्ही हाताने करते, हे कुणीतरी लक्षात आणून दिले. अर्ध डावं अर्ध उजवं काही आहे का .
bdw , कोणाला डाव्या हाताने
bdw , कोणाला डाव्या हाताने काड्यापेटीची काडी पेटवताना त्रास होतो का ? तिथे डाव्या -उजव्याचा संबंध आहे असे वाटत नाही, पण मला अवघड जातं.
नवीन Submitted by ए_श्रद्धा on 13 August, 2020 - 16:12
>>>>>
मी डावखुरा आहे.
मला त्रास होतो. देवासमोर दिवा डाव्या हाताने लावतो. आणि बोलणे खातो.
@मेधावि :
@मेधावि : सतार वाजवता, भारीच
@मी _अस्मिता : धन्यवाद ! मला समहाऊ डावखुरी लोकं हुशार वाटतात. >>
तो मारून उजव्या हाताने लिहायला लावायचा प्रकार आता बंद झालाय बहुतेक, लहानपणी खूप उदाहरणं पाहिली आहेत.
@पाथफाईंडर : हुश्श ..आहे कोणीतरी, माझ्याकडून खालून वर काडी ओढली जाते आणि काड्या तुटतात. कोणी बघत असेल कि जास्तच
मला सगळ्यात त्रास व्हायचा तो
मला सगळ्यात त्रास व्हायचा तो क्लास मध्ये
तिथे खुर्चीला उजव्या बाजूला फोल्ड करता येईल असे डेस्क असे
उजव्या लोकांसाठी अतिशय मस्त सोय
पण डावखुऱ्या साठी अत्यंत त्रासदायक
कारण वही आडवी करून लिहावलागत असे
त्यातून हात अंगाजवळ आला की अजून वैताग
@आशुचॅम्प : करेक्ट . शाळेत
@आशुचॅम्प : करेक्ट . शाळेत नव्हता हा प्रकार, पण ११ वी , १२वी च्या क्लास मध्ये असायचे. किंवा कुठल्या बाहेरच्या परीक्षेला
या फोटो मध्ये काही टडोपा बेंचेस आहेत
हायला कुठं आहे हे
हायला कुठं आहे हे
आमच्या लहानपणी का नव्हतं म्हणे हे
माझा नवरा डावखुरा आहे.
माझा नवरा डावखुरा आहे. त्यामुळे जेवताना माझ्या डाव्याबाजूला बसावे लागते. नाहीतर धक्काबुक्की होतेच.
इंग्रजी मुळाक्षरे मिरर इमेज काढते, >>+१ माझा मुलगाही(वय वर्ष३) डावखुरा.
मराठी इंग्रजी मुळाक्षरे मिरर
मराठी इंग्रजी मुळाक्षरे मिरर इमेज काढते,
>>> हे कॉमन आहे टॉडलर मध्ये... लेफ्टी रायटी चा संबंध नसावा..
Pages