दीपस्तंभ

Submitted by तो मी नव्हेच on 6 August, 2020 - 02:12

तो वादळात आहे उभा दीपस्तंभासारखा
आणि करतो आहे प्रतिक्षा युगायुगांपासून
त्याच्यापर्यंत पोहचणार्या माणसाची
पण काळोख ही होतो कधीकधी वरचढ
अन् झाकू पाहतो प्रकाशास धुके पांघरून
पण कालातीत असणारा तो दीपस्तंभ
तळपतो, देत राहतो प्रकाश नेहमीसारखाच
करीत राहतो बिकट वाट सोपी पामरांसाठी
आणि एक दिवस मानवीय प्रयत्नांना येते यश
दिसू लागतो दीपस्तंभ अन् त्याच्या प्रकाश पुन्हा
माणूस वाजवेल तुतारी काळोखावरील विजयाची
आनंद होताच, आहेच अन् द्विगुणित ही झालाय
अन् सजवेल दीपस्तंभ स्वतःच्या मगदुराप्रमाणे
पण त्यातील प्रकाश करीत राहील प्रतिक्षा
त्याच्यापर्यंत पोहचणार्या माणसाची कायमच
ती चालूच होती जमिनीखाली, तंबूत अन् हृदयात ही

-रोहन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users