निसर्गलाच प्रश्न

Submitted by Santosh zond on 29 July, 2020 - 20:38

निसर्गलाच प्रश्न
एका ठिकाणी एक लहान मुलगा खूप रडत होता कारण त्याने लावलेल एक रोपट पावसामुळे खाली जमिनीतून उद्वस्त होऊन पडल होत, आणखी एक लहान मुल,त्याला पण त्याच गायीच वासरु दिसत नव्हत म्हणुन गायी पेक्षा जास्त कावीलवान आणि निरागस होऊन ते वासरू कुठ दिसत का ते तो शोधत होत........
आणि हे अस फक्त लहान मुलंच करू शकतात,
लहान मुलांची मन खरच फुलासारखी सुंदर आणि पवित्र असतात कोणीतरी म्हटलेलंच आहे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असतात त्यांना जस सांगीतलेल शिकवलेल असत ते तसच वागतात व बोलतात ( maturity comes from childhood )
आणि आपणच कधीकधी त्यांच्याशी कस वागाव हे विसरतो ,कुठेतरी एका जाहरा नावाच्या मुलीकडून पिंजरयातले पोपट चुकीने ऊडुन जातात आणी घरमालकांकडुन तीला खुप मार भेटतो त्याच्यातच त्या निरागस मुलीचा मृत्यू होतो 'ती त्याच्यांकड घरकामासाठी जायची पण त्या घरमालकाला त्या मुलीवर थोडीही दया येऊ नये!ऐवढी निकृष्ट आणि भयावह मानववृत्ती आज होत चालली आहे, कदाचीत त्या मुलीने त्या बंद पिंजर्‍यातल्या पोपटांमधे स्वतःला बघितल असाव आणी तीलापण त्यांच्यासारख आझाद जीवनाचा आशेचा किरण दिसला असावा म्हणून तीने ते केले पण ते अशा निर्दयी व्यक्तींना कधी कळणार...........
अशीच एक गोष्ट साक्षरतेचे घोडे मिरवणाऱ्या केरळ राज्यातली ‘एक गर्भवती हत्तीन मानवी कौर्याची शिकार ठरली ’एका निर्दयी व्यक्तिने तीला फटाक्यांनी भरलेल अननस खायला दिलं, ते खाल्यानंतर तोडांमध्ये फटाक्यांचा
स्फोट झाल्याने तीचा मृत्यु झाला हे ऐकूनच कुनाचही रक्त सळसळुन निघाव अशी घटना तिथल्या सायलंट व्हॅली जंगलात घडली, त्या निर्दोषी हत्तीनीचा आणि तिच्या पोटातल्या पिल्लाचा दोष काय, तीने कधीही कोणाही माणसाचे कधीच काही नुकसान केले नाही स्वतःचा त्रास सहन करत ती मरणाशी अखेरपर्यंत लढत राहीली आणी शेवटी तीला मानवी वृत्तीसमोर हार मानावी लागली आणि जीथ ती वाढली, खेळली तीथच तिने जगाचा अखेरचा निरोप घेतला.......
"तिच्या पोटातलं पिल्लू जणु म्हणत असाव आई!वरुन तर ते मला अननसच दिसत होत आणि आई म्हणाली :हो बाळ वरुन तर तो पण मला माणूसच दिसत होता ! ” ऐवढया निर्दयी जगापुढे त्यांचे हे शब्द मन हेलावून सोडतात आणी हाताने मानसे अप्रत्यक्षपणे स्वतःच मरण ओढावून आणतात आणी पुन्हा उलट निसर्गालाच प्रश्न करतात

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users