निखारे

Submitted by तो मी नव्हेच on 28 July, 2020 - 01:45

न जाणें कशी सामसूम झाली चोहीकडे आज शांत आहे
जरी पेटले ना चुलीचे निखारे जठरी ना त्यांची भ्रांत आहे

तो तसा न ऐकू जाई कुणाला, ते तसे ना कोणास दिसते
डोळ्यांत स्वप्ने जळतात आणि पोटांमध्ये आक्रांत आहे

खाजगीत रडणे असते कुठे अन् कुठे असे जाहिरातबाजी
निःशब्द रडणे रंध्रात येथे धमन्यात लाव्हा अशांत आहे

शाब्दिक पाऊस, फुसके फटाके पक्वान्न केवळ आश्वासनांचे
येथे ना येई दसरा दिवाळी पाचवीस पुजली संक्रांत आहे

छातीतला श्वास भात्याप्रमाणे फुलवीत जाई ह्रदयी निखारे
तरीही निखारे वणवे न होती डोळ्यांत पाणी प्रशांत आहे

-रोहन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहन सा खूपच सुंदर
फारच भारी वाटलं वाचून
फक्त खाजगी - खासगी असेल बहुदा
अनेक शुभेच्छा
अजून येऊ द्या Happy

ते काहीही असो रोहित सर
बट तुम्ही ९ वर्षांनी परत आलेले आहात
इट seems like Shri Ram came back return after 14 years from his वनवास.
Happy Happy Happy
मायबोली चा राम !

प्रगल्भ जी, तुमची भावना वाचून आनंद झाला...धन्यवाद. परंतु या उपमेला लायक चराचरात कोणीही नाही.. मी तर नाहीच नाही.