Submitted by सई केसकर on 28 July, 2020 - 01:06
माझ्या बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये खत घालायचे आहे.
काही झाडं आहेत ज्यांना फुलं येतच नाहीत. झाडं मात्र वाढताहेत.
सोनटक्का, एक गुलाबाचं झाड आहे आणि जुई. तर कुंडीत खत घालताना त्याचं डायल्युशन कसं करायचं?
मी एनपीके १९:१९:१९ असं मागवलं आहे. आणि गुलाबासाठी काहीतरी फ्लॉवरिंग बूस्टर का काय.
माझ्या मते प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये पॅक्लोब्युट्राझोल वगैरे वापरतात नियमित. पण तो पुढचा प्रश्न आहे. आधी खत कसं घालावं याबद्दल सल्ला हवा आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान माहिती मिळतीय
खूप छान माहिती मिळतीय सगळ्ञांकडून.
कांद्याच्या सालींबद्दल ऐकून होते. वापर केला नव्हता. आता सुरुवात करीन.
सुनिधी, मी करते कंपोस्ट , घरच्या घरी. गांडुळांशिवाय. फोन कर जमेल तेव्हा, माहिती हवी असेल तर.
टोमॅटोचं झाड लावलंय तर
टोमॅटोचं झाड लावलंय तर त्यातली माती जाऊन लगेच त्याची मूळे एक्स्पोज होतात.
कुंडी इतर कुंड्यांसारखीच आहे. पण टोमॅटोला मी आत्तापर्यंत २ वेळा माती पुन्हा भरली आहे. तसंच पाणी घातल्यावर या एकाच झाडाची माती लगेच कोरडी दिसते. आणि खालच्या बाजूची पाने पिवळी होतात. फारच गौडबंगाल आहे.>>
पाणि जास्त होत आहे. भारतात सध्याच्या पावसाळी वातावरणात एकदा पाणी आठवड्यातून बास आहे. खालची पिवळी पाने काढून टाका आणि खाली फांद्या आल्या असतील तर त्याही काढा.
पाने भरपुर असतील आणि झाड वरच्या बाजूला हिर्वेगार दिसत असेल तर आता नायट्रोजनचे प्रमाण कमी करा. कारण नाहीतरे सगळी एनर्जी पानाना खर्च होईल. फुल भरपुर येण्यासाठी आणि फळांसाठी फॉस्फरस जास्त असलेल खत आता दिल पाहिजे.
कांद्याचे पाणी पंधरा दिवसांत
कांद्याचे पाणी पंधरा दिवसांत एकदा घालावे.
रोपं अगदी लहान, नवीन लावलेली असतील तर कांद्याचे पाणी घालू नकोस. रोपं जळतात. मी ही चूक केली होती.
पण, कांद्याचे पाणी दिल्यानंतर पॉझिटिव्ह फरक पडतो हा स्वानुभव आहे.
उकडलेल्या अंड्याची टरफलं पण
उकडलेल्या अंड्याची टरफलं पण वापरता येतात का? दिवसाला कमीत कमी दोन तरी अंडी उकडली जातात आमच्या कडे.
मी केळ्याची साल बारीक चिरून तशीच कुंडीत टाकते.
प्राची - हो. उकडलेल्या
प्राची - हो. उकडलेल्या अंड्यांची टरफलंही मी वर दिलेय तशी सुकवून बारीक चुरा करुन घालते. हे पण अर्थात यूट्यूबवर बघितले होते
@सुनिधी, मी ज्या पद्धतीचे
@सुनिधी, मी ज्या पद्धतीचे कंपोस्ट करायला सुरुवात केलेय त्यातही गांडूळ वापर नाही सांगितलेला. हवे असेल तर तुला सचित्र माहिती व्हॉट्स ॲप करते
धन्यवाद कविन.
धन्यवाद कविन.
सुनिधी, मी ज्या पद्धतीचे कंपोस्ट करायला सुरुवात केलेय त्यातही गांडूळ वापर नाही सांगितलेला. हवे असेल तर तुला सचित्र माहिती व्हॉट्स ॲप करते>>>
मला पण प्लीज.
कांद्याच्या सालीचे पाणी
कांद्याच्या सालीचे पाणी वापरून पाहिले आहे. फुलांची संख्या जास्त आणि तुकतुकीत दिसतात. कम्पोस्ट करण्याचा प्रयत्न दोनदा फसलाय. बहुतेक ज्याच्यात करतेय ते प्लास्टिक असल्याने असेल.. दुसरं काही सध्या उपलब्ध ही नाहीय. धागा खूप उपयुक्त.
दिवसाला कमीत कमी दोन तरी अंडी
दिवसाला कमीत कमी दोन तरी अंडी उकडली जातात आमच्या कडे. >> इथे बरेच लोक अंडी उकळलेलं पाणी देखील घरातल्या झाडांना घालतात.
मी कधी करुन पाहिलं नाही. कांद्याच्या सालींचा प्रयोग करायला हवा.
सेंद्रीय एनपीके सुदधा उपलब्ध
सेंद्रीय एनपीके सुदधा उपलब्ध असते. ते वापरू शकता.
@सुनिधी
@सुनिधी
कंपोस्ट म्हणजे नुसताच कुजवलेला काडी-कचरा, पाला पाचोळा. यासाठी गांडूळं लागत नाहीत.
याच कंपोस्टमध्ये गांडूळं सोडली की व्हर्मीकंपोस्ट होतं.
शुगोल फोन करते.
शुगोल फोन करते.
कवीन, छान माहिती दिलीस. ते प्रकार आमच्या गावात मिळतात का हे ही पहाते.
अ.नेमी, धन्यवाद. सध्या एका पाटीत ओली साले वगैरे जमवते व ५-६ दिवसांनी पाटी भरली की बागेतल्या मातीत खड्डा करुन त्यात तो टाकुन बुजवते व रोज पाण्याने तो भाग ओला करतो. निदान मातीत तरी जात आहे.
आमच्या कडे वाईट माती आहे किंवा काहीतरी वाईट आहे. काहीही उगवत नाही. आशा आहे एक दिवस कचर्यातल्या बिया उगवतील.
कांद्याची साले काल भिजत टाकली. उद्या सर्व अस्तित्वात असलेल्या झाडांना थोडेथोडे पाणी टाकते.
उन्हाचा काहीही प्रॉबलेम नाही
उन्हाचा काहीही प्रॉबलेम नाही कारण सगळ्या बाल्कन्या पूर्वेकडे आहेत.
पण किती वेळ ऊन येतं. म्हणजे असं की साडेसात ते बारा वाजेपर्यंत?

माझीही बाल्कनी पूर्वेलाच आहे व असे ऊन येतं. काहीही खत न घालता भरपूर फुले येत असतात. आता पोर्चुलका उर्फ ओफिस टाइम आहे कठड्यावर.
Srd , मस्त फुलली आहेत फुलं,
Srd , मस्त फुलली आहेत फुलं, हा कलर माझ्याकडे नाहीये. फोटो झूम करून एक कांडी तोडून लावावी वाटतेय. या वेळी बार्टरी सिस्टमने मी 5,6 रंगांचे ऑफिस्टाईम लावलेत.
@srd
@srd
ज्या झाडांना फुलं येत नाहीत त्यांना मागच्या वर्षीपर्यंत यायची. त्यामुळे वाटतं की माती बदलली पाहिजे किंवा खत घातलं पाहिजे
येतीँल फुले. आताच्या झाडांचे
येतीँल फुले. आताच्या झाडांचे शेंडे पाच सहा इंचांचे कापून जरासे भिजवून एका प्लास्टिकच्या पिशवीत घाला. पिशवी फुगवून तोंड बांधून सावलीत ठेवा. रोज उघडून झटकून परत बांधून ठेवा. आठवड्याने काढून कुंडीत लावून त्यावर प्लास्टिक पिशवी उलटी झाकायची. रोपे तयार होऊन वाढू लागली की पिशवी काढून टाका. आणि जुनी झाडे फेकून द्या.
मी कांद्याचं पाणी आज तुळशीला
मी कांद्याचं पाणी आज तुळशीला घातलं,एकतर ते एकच रोप आहे माझ्याकडे,बाकी कोणतीच फूल/फळझाडे नाहीत
आणि तशीही साधी तुळस पण जगत नाही माझ्याकडे,बघू आता तरारली तर इथे सांगते
आदू माझ्याकडेही तुळस जगत
आदू माझ्याकडेही तुळस जगत नाही.. कारण ऊन येताच नाही...उनशिवाय जगणारी झाड असतील का ग ? म्हणजे इनडोअर प्लांट्स नाही.आपली पारंपरिक kitchen गार्डन मधली..पुदिना लावायचा खूप प्रयत्न चालू आहे.. म्हणजे पाऊस चालू झाल्यापासून..पण २ दिवसातच बिचारी मान टाकतात.
मी इथलं वाचून कांद्याच्या
मी इथलं वाचून कांद्याच्या सालीचं पाणी घातलं कुंड्यात. अंड्याची टरफलं पण बारीक तुकडे करून घातली. केळीची साल पण पाण्यात बुदवून ठेवून ते पाणी पण घातलं. हे सगळ एकाच दिवशी नाहे घातलं.
हॅलपिनो ला फुलं येत आहेत पण ती सुकून जातात पण मिरच्या एकदाच ४ येउन गेल्या त्यानंतर मिरच्याच नाहीत धरत झाडावर. मा का चु?
माझ्या मिरचीच्या रोपाला भरपूर
माझ्या मिरचीच्या रोपाला भरपूर फुल येतायत पण 2 दिवसात सुकून गळून जातात . पुढे काही च नाही.
मी कांद्याचं पाणी आज तुळशीला
मी कांद्याचं पाणी आज तुळशीला घातलं,एकतर ते एकच रोप आहे माझ्याकडे,बाकी कोणतीच फूल/फळझाडे नाहीत
आणि तशीही साधी तुळस पण जगत नाही माझ्याकडे,बघू आता तरारली तर इथे सांगते>>>>
किमान 8दिवसांनी सुकू शकणारी तुळस कांद्याच पाणी घालून 2च दिवसात सुकली,
मा पण काचू
मिरचीची फुलगळ थांबवण्यासाठी
मिरचीची फुलगळ थांबवण्यासाठी एन ए ए संजीवक मिळते, पण एक दोन झाडांसाठी विकत घ्यायला परवडणार नाही. प्लॅनोफिक्स असंच काहीसं नाव आहे.
म्हणजे पाऊस चालू झाल्यापासून.
म्हणजे पाऊस चालू झाल्यापासून..पण २ दिवसातच बिचारी मान टाकतात. >> दुपारी शक्य असल्यास कुंड्या टेरेसवर काही तास नेवून ठेवायच्या. कोरफड येऊ शकेल असे वाटते.
आदू, कांद्याचे पाणी सर्वच
आदू, कांद्याचे पाणी सर्वच झाडांना सूट होत नाही. पालेभाज्यांच्या रोपांना घालू नये असे वाचले आहे. शिवाय रोप लहान असेल तर करपून जाते. साधारण १:६ प्रमाणात साध्या पाण्यात मिक्स करुन घाला.
कांद्याचे पाणी दिल्यानंतर
कांद्याचे पाणी दिल्यानंतर माझी सदाफुली कोमेजून गेली आहे. पाने मिटून घेतली आहेत. ::(:
चांगली माहिती मिळते आहे ह्या
चांगली माहिती मिळते आहे ह्या धाग्यात .
कांद्याचे पाणी प्रयोग करून बघते मी .
गांडूळ खात . कंपोस्ट - मी बऱ्याचदा फेल गेलीये यात . हवा तितका वेळ देता न येणे हाच त्यामागचे कारण आहे आणि त्यात आत्ता तरी काहीही करणे शक्य नाहीये .
त्यामुळे पुण्यात गांडूळ खत कुठं रेडी मिळु शकेल का ?
मी एनपीके डायल्यूटेड आणि
मी एनपीके डायल्यूटेड आणि कांद्याचं पाणी असं सगळं थोडं थोडं दिलं झाडांना.
ते केल्यावर लगेचच माझ्या सोनटक्क्याच्या झाडाला कळीची पहिली पायरी दिसू लागली.
पण हा योगायोग असावा. बाकी फुलांच्या झाडांनासुद्धा जास्त फुलं येतायत असं उगाचच वाटायला लागलं आहे.
मी खालील पद्धतीने घरातील कचरा
मी खालील पद्धतीने घरातील कचरा शेतात आणि कुंड्यांसाठी वापरतो.
- रोजचा स्वयंपाकघरात निघणारा कचरा संध्याकाळी १५ लिटरच्या तेलाच्या डब्यात टाकतो. त्याच डब्यात अधूनमधून गुळाचे पाणी टाकतो.
- त्या डब्याला खाली तोटी आहे. दर दोन दिवसांनी त्या तोटीतून पाणी काढतो आणि दुसर्या बाटलीत भरून ठेवतो.
- बाटलीतील पाणी आठवडाभर आंबवतो आणि मग १ लिटर पाण्यात २० ते मिक्स करुन कुंड्यांसाठी कंपोस्ट लिक्विडसारखे वापरतो.
यात मला आठवड्याला ४ लिटर लिक्विड मिळते. जास्तीचे लिक्विड शेतावर वापरतो.
मावा उर्फ मिलिबग्स चा नायनाट करायचा असेल तर गुळाचे खडे बाधित रोपाच्या बुंध्याशी ठेवायचे. त्यावर मुंगळे आकर्षित होतात आणि मिलिबग्जचा फडशा पाडतात.
मावा उर्फ मिलिबग्स चा नायनाट
मावा उर्फ मिलिबग्स चा नायनाट करायचा असेल तर गुळाचे खडे बाधित रोपाच्या बुंध्याशी ठेवायचे. त्यावर मुंगळे आकर्षित होतात आणि मिलिबग्जचा फडशा पाडतात.>>
हे रोचक आहे. पण मग त्या मुंगळ्यांचं काय करायचं?
विनोद नाही, खरंच माझ्याकडच्या अंबाडीच्या भाजीच्या रोपांवर भरपूर मुंगळे झालेत. ( कशामुळे आले ते माहिती नाही. मी गूळ वगैरे ठेवला नव्हता.) भाजीसाठी एकदा पानं काढून झाली होती म्हणून मी आधी दुर्लक्ष केलं. पण त्यांनी पांढऱ्या रंगाची घरं (?) बांधली रोपांवर. शेजारच्या कुंडीत बटाटे लावले होते तिथेही हे मुंगळे गेले. माझं दुर्लक्षच झालं हे खरं आहे. पण फार झालेत मुंगळे.
@वावे मुंगळे जास्तच झाले
@वावे मुंगळे जास्तच झाले असतील लसूण, मिरचीचे सौम्य द्रावण फवारावे.
Pages