एन पी के

Submitted by सई केसकर on 28 July, 2020 - 01:06

माझ्या बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये खत घालायचे आहे.
काही झाडं आहेत ज्यांना फुलं येतच नाहीत. झाडं मात्र वाढताहेत.
सोनटक्का, एक गुलाबाचं झाड आहे आणि जुई. तर कुंडीत खत घालताना त्याचं डायल्युशन कसं करायचं?
मी एनपीके १९:१९:१९ असं मागवलं आहे. आणि गुलाबासाठी काहीतरी फ्लॉवरिंग बूस्टर का काय.
माझ्या मते प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये पॅक्लोब्युट्राझोल वगैरे वापरतात नियमित. पण तो पुढचा प्रश्न आहे. आधी खत कसं घालावं याबद्दल सल्ला हवा आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीवामृत नावाचा प्रकार मिळतो जो गोमुत्र, गायीचे शेण, ताक, चण्याच्या डाळीचे पीठ वगैरे मिश्रित करून बनवलेले असते (मी स्वतः कधी बनवलेले नाही पण विकतचे वापरल्यावर) ह्याच्या उपयोगाने मिरचीच्या झाडाला फुलं लागण्याचे आणि नंतर फलधारणा होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. हे जीवामृत पाण्यात मिसळून मग झाडांना द्यायचे असते.

दुसरा घरगुती उपाय जो देखील कामी येतो तो म्हणजे कांद्याच्या सालांना पाण्यात (निदान) रात्रभर बुडवून ठेवायचे आणि ते पाणी झाडांना घातले असता फुले येतात. म्हणजे समजा आज दुपारी भाजी करता कांदे चिरले / कापले असतील तर तेव्हा पाण्यात बुडवून ठेवलेली साले दुसर्‍या दिवशीपाण्यातून काढून टाकणे व ते पाणी झाडांना घालण्याकरता वापरणे.

ह्या दोन्ही गोष्टी द्रव स्वरुपात असल्याने जेव्हा पाणी घालायचे असते तेव्हा नुसते पाणी न घालता हेच घालावे.

माहितीचा स्त्रोत - गच्चीवरील बाग नामक युट्युब चॅनल https://www.youtube.com/watch?v=euVNnqs_wMQ

आता ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून त्यात कोणकोणते घटक वगैरे आहेत ते (शास्त्रीय परिभाषेतील शब्द वापरून तूच सांग )
तेवढेच आपल्याला नक्की कशाचा फायदा होतो आहे हे कळल्याचे समाधान Proud

एका मोठ्या कुंडीत झाडांचा कचरा व थोडे गांडुळ सोडावे.काही दिवसांनी गांडुळखत तयार होते.मी मोगर्याचे रोप लावल्यानंतर त्याला टाकल्याने चांगला वाढला व फुलला.

कांद्याच्या सालांना पाण्यात (निदान) रात्रभर बुडवून ठेवायचे आणि ते पाणी झाडांना घातले असता फुले येतात. >>> हा उपाय मी फेसबुकवर एका बागकामाच्या पेजवर वाचून वापरला आणि माझ्या दोन वर्षे फुलं न देणाऱ्या जास्वंदीला भरपूर फुलं आली. योगायोग नसावा. कारण बऱ्याच हौशी बागकाम करणाऱ्या लोकांनी हा उपाय खात्रीशीर आहे असं लिहिलं होतं.

NPK १९:१९:१९ हे प्रमाण जास्त आहे. अशी खते सीझनच्या सुरुवातीला देतात आणि ती हळूहळू मातीत विरघळतात. पूर्ण सीझनभर पुरतात.
फुले येण्यासाठी पोटॅशियम आवश्यक असते. कांद्याच्या सालीबरोबर केळाच्या सालीपण खूप उपयोगी आहेत. त्या दोन दिवस पाण्यात भिजवून ते पाणी किंवा सालींची पेस्ट करून, पाण्यत मिसळून, गाळून ते पाणी देता येते. साली वाळवून पावडर देता येते. गुलाब, मोगरा यांच्या मुळाशी केळाची साल पुरली तरी चालतं. पण साल पूर्ण नीट झाकावी नाहीतर चिलटे येतात.

>>>कांद्याच्या सालांना पाण्यात (निदान) रात्रभर बुडवून ठेवायचे आणि ते पाणी झाडांना घातले असता फुले येतात

हे असं रोज घालायचं का की एकदाच?

अजून एक असा प्रश्न आहे की मी टोमॅटोचं झाड लावलंय तर त्यातली माती जाऊन लगेच त्याची मूळे एक्स्पोज होतात.
कुंडी इतर कुंड्यांसारखीच आहे. पण टोमॅटोला मी आत्तापर्यंत २ वेळा माती पुन्हा भरली आहे. तसंच पाणी घातल्यावर या एकाच झाडाची माती लगेच कोरडी दिसते. आणि खालच्या बाजूची पाने पिवळी होतात. फारच गौडबंगाल आहे.

सई, माझा अनुभव यंदाचा आहे म्हणून अधिकारवाणीने असच असतं सांगायला तोकडा आहे. पण बरेच यूट्यूब व्हिडीओ बघून मी आणि बेटर हाफने घरी या काही महिन्यात केलेले प्रयोग लिहीते

१) कांद्याचे पाणी - आम्ही साले एका जुन्या पाण्याच्या बाटलीत साठवतो. बाटली भरली की पाणी भरुन ठेवतो दोन तीन दिवस. ते पाणी डायल्युट करुन फुलझाडांना घालतो. (जास्वंदी आणि तगरीवर चांगले रिझल्ट दिसले - प्रयोग सुरु करुन झालेला कालावधी ३ महिने)

२) NPK बद्दल - नुकतेच गेल्या महिन्यात मागवले आहे. त्यासोबत पोटॅशही मागवले वेगळे - NPK 1 चमचा अर्धा चमचा पोटॅश आणि १ लिटर पाणी असे मिश्रण घातले खाऊ झाडांना. (रिझल्ट कळायला किंवा ठामपणे यानेच अमुक झाले म्हणता यायला पुरेसे प्रयोग झाले नाहीत)

३) मोगऱ्याला पाणी गच्च धरुन न ठेवणारी माती (रेती) मिक्स करावी असे कळले तोपर्यंत आमचे नेहमीच्या पद्धतीने लावून मोगऱ्याला त्रास देऊन झाले होते. रिपॉटिन्ग करुन कोकोपीट, cow dung manure, रेती आणि माती अस मिक्स करुन झाड लावल्यापासून झाड परत तरारले आहे. एक हत्या वाचली म्हणून आम्हीही हुश्श! केलेय Proud

४) मी महिन्याभरापासून ओला कचरा बोकाशी बीन आणून त्यात कुजवायला (पिकलिंग) सुरुवात केली आहे. मातीसारखे खत व्हायला अजून वेळ आहे. झाले की त्याबद्दल लिहेन. पण मला आता २०-२२ दिवसांनी त्यातून लिक्विड खत मिळाले आहे. ते डायल्यूट करुन वापरले तेव्हा टोमॅटोचे झाड झपकन वाढले आणि तगरीला फुले वाढली असे आढळले (हा प्रयोग करायचा म्हणून तगरीला २० दिवस कांदापाण्याविना ठेवले होते)

मी एक्सपर्ट नाही. फार अभ्यासही नाही. सध्या वेळ आहे. झाडे लावायला जागा आहे. उत्साह अजूनही टिकून आहे म्हणून यूट्यूबवर माहिती घेऊन प्रयोग करुन पहातेय

सई हो टोमॅटोची मुळे दिसण्याचा प्रॉब्लेम मलाही जाणवला. इथे खूप पाऊस लागतोय सारखा. मी आता जरा शेड बांधून तिथे शिफ्ट केल्यात कुंड्या. आता काय रिझल्ट ते ऑब्झर्व्ह करुन सांगते

सगळ्यांचे मनापासून आभार.
@कविन
मी पण करून पाहीन असं.
गुलाबाला शेणखत लागतंच का? मला सगळे सांगतात की गुलाबाला त्यानंच चांगले रिझल्ट मिळतात.
मी अजून आणलं नाही पण एवढं चांगलं असेल तर आणीन.

>>>कांद्याच्या सालांना पाण्यात (निदान) रात्रभर बुडवून ठेवायचे आणि ते पाणी झाडांना घातले असता फुले येतात
हे असं रोज घालायचं का की एकदाच?
>>>

नीट बघावे लागतील ते व्हिडियोज परत पण तसेही सातत्याच्या अभावामुळे आम्ही असे अधून मधूनच करू शकतो Happy
पण त्याचाही परिणाम छान दिसून आला.

कुंडीतील रोपांची मुळे उघडी पडत असतील आणि माती कोरडी पडत असेल तर त्या मातीवर वर्तमानपत्राच्या तुकड्यांचा थर टाका व पाणी घाला, बाष्पीभवन कमी होऊन माती सुकत नाही आणि पाणी पूर्ण कुंडीत पसरल्याने मधे खड्डा पडत नाही.

फुले येण्यासाठी पोटॅशियम आवश्यक असते >>> फुलं येण्यासाठी फॉस्फरस आवश्यक असते हे काही दिवसांपुर्वीच एका तज्ञ माळ्याकडून समजले आहे.

कांद्याचे पाणी मी पेस्टिसाइड म्हणून वापरते आहे, काही झाडांची कीड गेली पण काही झाडांची पानं रोजच कुरतडलेली दिसतात तेव्हा आता नीम ऑइल आणणार आहे. कांद्याच्या सालीतल्या पिगमेन्ट्समुळे रंगीत फुलं एकदमच चकाततात.

मी दुसर्‍या बागकाम धाग्यावर लिहिल्याप्रमाणे चहाचा चोथा (एन), अंड्याची टरफलं (पी) आणि केळ्याची सालं (के) वाळवून त्याची पूड करून घरगुती खत बनवते आहे. फुलझाडं असतील तर एका मध्यम आकाराच्या कुंडीसाठी १-२-१ टेबलस्पून असं प्रमाण आणि फुलझाडं नसणार्‍या इतर सर्व झाडांसाठी २-१-२ असं प्रमाण मातीत मिक्स करून वरून थोडं पाणी घालायचं. मी सुरुवातीला सगळं एकत्रच दळून पाण्यात मिसळून खत घातलं होतं पण आता वेगवेगळं करते. कुंडी मोठी असेल तर प्रमाण अर्थातच वाढवायचं. हे त्या गच्चीवरची बाग सारखे व्हिडिओ बघूनच.

सई, खताच्या पाकिटावर दिलेल्या सूचनांप्रमाणे खत घाल. खतांच्या बाबतीत 'लेस इज मोअर' हा नियम पाळायचा. पहिल्यांदाच घालत असशील आणि धाकधूक असेल तर बेतानं खत घाल, झाडाची रिअ‍ॅक्शन बघ आणि २ आठवड्यांनी पुन्हा कमी-जास्त करून घाल. गुलाबाला केळी फार आवडतात Happy आता पावसाळ्यात सालं सुकवणं अवघड आहे तर कात्रीनं तुकडे करून नुसतेच पुरले तरी चालतात.

हे असं रोज घालायचं का की एकदाच? >>> रोज नाही, दर २ आठवड्यांनी.

ONION PEEL FERTILZIER: There are two methods to make onion peel fertilizer, one is to boil the onion peels for few hours in water and the other method is to soak the onion peels in water for 24 hours. Some do not recommend boiling.
So, take 2 to 3 handfuls of onion peels and drop in 1 litre of water and allow it to soak for 24 hours.
After 24 hours, strain out the liquid and use it as a liquid fertilizer. You can use it without dilution or with further dilution of 1:1 in water if you regularly fertilize your plants. Use it once in 15 days to see the effect in about 3 months.

फुलं येण्यासाठी फॉस्फरस आवश्यक असते हे काही दिवसांपुर्वीच एका तज्ञ माळ्याकडून समजले आहे. >>> मग माझी फॉस्फरस - पोटॅशियममधे गडबड झाली.

मी कांद्याची साले आणि केळांच्या सालीचे तुकडे एकत्रच भिजवते. २४-३० तासांनी १:४ प्रमाणात डायल्यूट करून देते. मोगरा आणि अनंत मरायला टेकले होते ते तरारले. घेवड्याला भरपूर फूट आणि फुले आली. काकडी, कारले, मिर्ची यांनापण भरपूर फुले आली. हरभरा मात्र पिवळा पडायला लागला म्हणून त्याला हे पाणी बंद केले.

भुईमुगाच्या टरफलांची पूड करून टाकली आहे माती मध्ये, पुदिन्याच्या रोपाला फरक दिसला, अजून इतर झाडांवर काही फरक दिसला नाही. कांद्याच्या सालीचा उपयोग करून बघतो.

काही झाडांवर कीड येते, विषेशतः तुळशी आणि जास्वंदाला पांढरा चिकटा . नीम तेलाचा प्रयोग करून पाहिला जास्वंदावर पण काही उपयोग झाला नाही, कदाचित खूप उशीर झाला होता. या करता घरच्या घरी करता येइल असे उपाय आहेत का, कारण लॉकडाऊन मध्ये बाहेर काही लगेच मिळेल अशी शक्यता कमी आहे.

घरी किटकनाशक बनवण्यासाठी-

  • Steep a 1/2 cup of orange peels in 3. 5 cups of boiling water for 15 mins. After the 15 minutes of steeping allow the mixture to cool completely. Once cooled remove the peels and put the liquid in a spray bottle; spray aphids, whiteflies, slugs or any other soft-body garden pest. Do this weekly until they are gone.
  • ***************************************************

  • If you do organic vegetable gardening without using any chemical pesticides and fertilizer, you will certainly realise the importance of these organic recipes, especially if you do not have the universal organic pesticide like the great neem oil. Do not worry!, you can make a potent organic pesticide using onion and other stuff.
  • – Take a Large Onion and drop it into a kitchen blender
  • – Add 4 fresh cloves of garlic into this.
  • – Add 2 teaspoons of Red Chilli Powder.
  • – Add 1 teaspoon of Cinnamon Powder.
  • – Blend this into a fine paste by adding some water.
  • – Now Add about 2 Cups of Water to this and mix well and allow it to steep overnight.
  • – Then in the morning, strain out the liquid using a nylon cloth or a fine sieve to get your pesticide concentrate. You can store this concentrate in refrigerator.
  • – To Apply as pesticide, Use it in 1:5 dilution in water. That is to one cup of this pesticide add 5 cups of water and most importantly do not forget to add some 10 drops of liquid detergent soap for the surfactant effect and to coat the leaves and retain the pesticide effect for longer time. Use this twice weekly until all pests are eradicated. This will successfully kill common pests like aphids, mealybugs, whiteflies and many others.

चुकून दोन वेळा पडली पोस्ट. गूगल केलेली माहिती आहे, कॉपी-पेस्ट केली आहे. मूळ वेबसाइट लक्षात नाही आता.

१९:१९:१९: फार जास्त रेशो आहे . टॉमेटो सगळ्यात 'नीडी' रोप मानतात . त्याला देखील महिन्यातून एकदा १०:१०:१० या प्रमाणात खत घालावे म्हणतात.

सोनट्क्क्याला फुलं बहुतेक पावसाळ्याच्या दिवसातच येतात. इतर वेळेस जास्त फर्टिलायझर देऊनही फारसा फायदा होणार नाही. गुलाबाला पाण्याचा नीट निचरा होणारी आणि भरपूर ऑरगॅनिक मॅटर असलेली माती लागते. पानांमधून / फांद्यांमधून हवा खेळती रहावी. पाणी देताना पानांवर फवारू नये असे बरेच लाड आहेत.
कुंड्यांमधील झाडांना नियमित वापरणार असाल तर ३:३:३ किंवा ५:५:५ पुरेल बहुतेक. - ग्रोइंग सीझन असेल तेंव्हा दर आठवड्याला किंवा १५ दिवसांनी एकदा फर्टीलाइझ करू शकता
हे यू कॉन मास्टर गार्डनर साईट वरुन. बर्‍याच युनिव्हर्सिटी एक्स्टेंशन अशाच गाईडलाइन्स सांगतात.
In general, foliage houseplants appreciate fertilizers high in nitrogen while flowering plants respond best to those with higher phosphorus analysis. There are plenty of specialty houseplant fertilizers out there but do examine their labels. Often the difference is more in the packaging than in the amounts or proportions of nutrients supplied.

Purchase a water-soluble powder or liquid concentrate if plants are to be fertilized on a weekly, biweekly or monthly basis. If there will be long intervals between fertilizer applications, select time release formulations in either pelleted or spike forms. These can be applied at intervals from 2 to 9 months and will provide houseplants with a steady supply of nutrients.

The labels on most water-soluble fertilizers recommend monthly applications. Since these nutrients are easily leached from the potting mix, your plants may benefit from more frequent dilute applications. If one teaspoon per quart of water is recommended for monthly feedings, you could feed bimonthly using only one-half a teaspoon per quart or weekly using a quarter teaspoon per quart. This gives the plant a steady, continuous supply of nutrients.

चांगली माहिती मिळतेय. मलाही उपयोग होईल Happy

जास्वंदीकरता माझ्याकडे लागू पडलेले उपाय नोंदवून ठेवते

१) माझ्याकडे नीम तेल आणि plant shampoo आणले होते मी नर्सरीमधून लॉकडाऊन पूर्वी. ते पाण्यात मिक्स करुन कसे वापरायचे विचारुन घेतले होते. त्याप्रमाणे आधी मिलीबग्ज ब्रशने काढून टाकून पाने आणि फांद्यांवर मी ते नीमतेल शॅंपू पाणी मिश्रण फवारायचे.

अधूनमधून हळद घातलेले पाणीही फवारायचे आणि हळद झाडाच्या आजूबाजूला पसरुन घातली. याने काही दिवस मुंग्या कमी झाल्या आणि त्यामुळे मिलीबग्जही कमी झाले.

गोमूत्र सुद्धा उपयोगी आहे असं ऐकलय पण मला इथे मिळालं नाही.

Wow! सिंडरेला आणि मेधा फार उपयुक्त माहिती.
हे एगशेल्सचं लक्षात यायला हवं होतं. खूप एगशेल्स असतात घरात अशीच वाया जाणार.

चहाचा चोथा धुवून सुकवून पूर्वी वापरत होते मी. आता सगळंच कंपोस्टर बीनमधे टाकते.

अंड्याची टरफलं सुकवण्यासाठी बारीक तुकडे करुन मायक्रोव्हेव हाय पॉवरवर एखाद मिनिट ठेवून रात्रभर पसरुन ठेवते. मग चुरुन कुंडीत घालते. हे एका व्हिडीओत बघितले होते. त्याचा डायरेक्ट फायदा अजून कळला नाही कारण घरात अंडीच कमी आणली गेली होती या मधल्या काळात.

फळांचा किंवा फुलांचा आकार मोठा करायला पीजीआर वापरतात. हे मला लॅबमुळे माहिती आहे पण स्वतः काहीही केलं नाही. तर त्यात जिब्रेलिक ऍसिड वापरतात किंवा वर म्हंटलं तसं पॅक्लोब्युट्राझोल. तर असे काही ऑरगॅनिक ऑप्शन आहेत का. अर्थात आधी फूल फळं आल्यावर पुढचं आहे हे. पण उगाच चौकशा.

कांद्याच्या सालांंच पाणी मी मिरची च्या रोपाला वापरलं , रोपं चार दिवसात चांगली वाढल्याचं जाणवलं .
मी 1:2 dilute करून वापरलयं एकदाच. आता १० दिवसांनी परत वापरेन.
मी भाजीचा कचरा plastic bag मध्ये भरून ठेवलायं कंपोस्टसाठी.
त्याला पाणी सुटलं. ते एका बाटलीत भरून ठेवले आहे. अधेमधे ते वापरतेय १:४ करून.

तर असे काही ऑरगॅनिक ऑप्शन आहेत का. >> सीवीड पावडर किंवा सी वीड एक्सट्रॅक्ट लिक्विड फॉर्म मधे मिळते. त्याचे एन पी के नंबर्स एकदम कमी आहेत खरं तर. मी घरातल्या कुंड्यांमधे दर ३०-४० दिवसांनी एकदा थोडी थोडी पूड घालते. लिक्विड फॉर्म पानांवरती स्प्रे करतात पण मी कधी वापरले नाही.

@सई केसकर - तुमचे इतके अभ्यासपूर्ण अप्रतिम लेख वाचल्यानंतर तुमचा प्रश्न वाचून मी उडालोच. हे म्हणजे ड्रायव्हरनं 'घाटात कोणता गीअर टाकू ?' असं क्लीनरला विचारल्यासारखं झालं. Lol
इतके प्रतिसाद पाहिल्यावर खूप माहिती यातून नवीनच कळाली. मलाही थोडा शेर माझा टाकावा वाटला.

एक ढोबळ तत्व असं आहे की
N (नत्र) = पानं
P (स्फुरद) = फुलं
K (पालाश) = फळं
ही तीन मुख्य अन्नद्रव्यं. याशिवाय अजून इतर मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यं पण असतात.

आपण खत देतो ते झाडाला देत नाही. मातीला देतो आणि झाड हवं तसं ते शोषून घेतं. आता समजा झाडाला जेवढं मूलद्रव्य हवं आहे, तेवढं मातीत आहेच. म्हणजे झाडाचं पोट अगदी व्यवस्थित भरतंय. मग आपण वरुन कितीही टाकलं तर ते अतिरीक्त होणार. झाड घेणारच नाही आणि वाया जाणार. हे जास्तीचं खत मातीत वेगवेगळ्या रासायनिक संयुगांमध्ये बदलतं आणि मग त्यानंतर त्यातून ते झाडाला ओढून घेता येत नाही. उलट मातीची प्रत खालावते.

म्हणून मातीत किती पोषक तत्वं आहेत हे तपासणं हितकारक असतं. ही पोषक तत्वं पुन्हा दोन स्वरुपात असतात – उपलब्ध आणि अनुपलब्ध (अविद्राव्य रासायनिक संयुग स्वरुपात). म्हणून आता मातीत किती पोषक तत्व ‘उपलब्ध’ स्वरुपात आहे हे पाहणं आलं.

आता घरच्या ४-८ कुंड्यांसाठी हा डोक्याला ताप करणार कोण? हौस असेल तर हे घरच्याघरी तपासण्यासाठी काही तयार किट्स मिळतात. चमचाभर माती घ्या, किटमधलं पाणी त्यात टाका, ते गाळून घ्या, किटमध्यल्या रसायनाचे लिहिलं असेल तितके थेंब त्यात टाकून येणारा रंग दिलेल्या रंगपट्टीवर जुळवून पहा. अशा स्वरुपाचं साधारण हे किट असतं.

तरीही यात चूकभूल देणे घेणे हा प्रकार असतो.

बरं नुसत्या अशा पोषक तत्वांमुळं झाडाला फुलं आलीच पाहिजेत असंही काही नाही. फुलांच्या कळ्या याव्यात यासाठी झाडाला आतून काहीतरी व्हावं लागतं. विशिष्ट संप्रेरकं तयार व्हावी लागतात. त्यासाठी अनुकूल परिस्थिती असावी लागते.

आता आपण जर संत्रा, मोसंबी, डाळींब अशा फळबागा पाहिल्या तर जास्त फळं यावीत म्हणून बागेला जास्त फुलं लागणं आवश्यक आहे. बागायतदार हे बरोबर साधून हवा तो बहार धरतात. यासाठी बागेचं पाणी तोडतात. पानगळ सुरु होते. झाडाला आतून ‘ते काहीतरी’ व्हायला सुरुवात होते. संप्रेरकं निर्माण होतात आणि झाडाला कळ्या येऊ लागतात. अशा वेळी पाणी परत सुरु केलं की कळ्या पोसतात.

घरच्या झाडांनासुद्धा अति पाणी देणं चुकीचंच. हरब-यासारख्या झाडांना पाणी जास्त झालं की ती पिवळी पडतात. लवकर बुरशी (Fungal wilt) लागते. अन्नद्रव्यं शोषण्यासाठी झाडाच्या मुळांना ओलावा पाहिजे असतो, चिखल नाही. आपण दिलेलं पाणी कुंडीमधून पाझरतं, ठिबकतं आणि मातीतली जी पोषक द्रव्य उपलब्ध स्वरुपात असतात, ती या पाण्याबरोबर वाहून जातात. मागं नुसती निर्जीव माती राहते.

सर्वात उत्तम काय सांगू? गांडूळखत. घरच्या घरीच रोजच्या भाजीच्या कच-यात, पाचोळ्यात शेण मिसळून खत तयार करायचं. अर्धवट तयार झालं की यात गांडूळं सोडायची. कल्चर विकत मिळतं. Eisenia foetida जातीच्या गांडूळांचा अनुभव मला चांगला वाटला. अगदी चहा पावडरसारखं गांडूळ खत होतं. यासाठीचे शेकडो व्हिडीओ मिळतील. गांडूळखताला टाकलेलं पाणी खाली वाहून जातं. हे व्हर्मीवॉश. हे उत्तम द्रव खत.

नसेल घरी एवढा कुटाणा करायचा, तर विकत आणायचं. यामुळं झाडं छान होतात. मी गाजरगवतापासूनसुद्धा उत्तम गांडूळ खत तयार केलं होतं.

आमच्या इकडे एकजण आहेत, त्यांच्या गुलाबाला बारा महिने गुलाब. मी विचारलं हे कसं बुवा? तर ते कट्टर मांसाहारी आहेत. मटणाचं पाणी गुलाबात टाकतात.

आता रासायनिक खतं - या खताचे प्रामुख्यानं प्रकार -
सरळ (straight) - N, P आणि K यांपैकी एकच काहीतरी
संयुक्त (Complex) - N, P, आणि K यांपैकी दोन किंवा तीनही घटकांचं रासायनिक मिश्रण
मिश्र (Mixed) - N, P, आणि K यांपैकी दोन किंवा तीनही घटकांचं भौतिक मिश्रण

यात सरळ खतं उत्तम, संयुक्त खतं मध्यम आणि मिश्र खतं कनिष्ठ

यात liquid fertilizers पण मिळतात.

ही खतं वापरताना १९:१९:१९ ऐवजी १०:१०:१० वापरायचं असेल तर दुप्पट प्रमाण घेऊ शकता. यात १८:४६:०, ०:२०:२०, १८:१८:१०, ४६:०:० वगैरे भरपूर प्रकार असतात. तुम्हाला N, P किंवा K पैकी काय आणि किती द्यायचं आहे, त्यावर अवलंबून आहे.

पण काहीही असो, रासायनिक खतं (fertilizers) वापरणं हानीकारकच. माती बिघडते, मातीतले उपयुक्त जीव मरतात.
त्यापेक्षा गांडूळखत, शेणखत अशी सेंद्रिय खतं (manures) उत्तम. प्रमाण कमी जास्त झालं तरी झाड आणि माती दोघांनाही अपाय नाही.

रासायनिक खते प्लीज वापरू नका.

कांद्याचं पाणी 10 दिवसांतून एकदा ठीक आहे. कांद्याची सालपटे फक्त, 3 दिवस पाण्यामध्ये ठेवून, त्यावर झाकण ठेवावे. पाणी घालताना मुळांत घालायचे, घालताना 1 भाग कांडापाणी असेल तर सहा ते सात भाग साध्या पाण्यात घालून डायल्यूट करून घाला. हे पाणी झाडांवर फवारूही शकता.

मिलिबग घालवायला द्रवरूपी जीवामृत पाण्यात मिसळून + 2 चमचे हळद असं करून झाडांवर भरपूर फवारलं तर खूप फायदा होतो. मिलिबग्ज जातात. हा उपाय मला बराच उपयोगी पडलाय.

फळांच्या सालींचं एंझाईम करून वापरू शकता.

@अरिष्ट
LOL. मी बागकामात नर्सरीमध्ये आहे असं म्हणता येईल.
इतके वर्षं माझं बागकाम म्हणजे अमॅझॉन वरचे कंपोस्ट केलेले पॉटेड मातीचे मिश्रण आणून त्यात झाडे लावणे एवढेच होते. सुरुवातीला मी फक्त भारतात ज्या हर्ब्स सहज मिळत नाहीत आणि मला स्वयंपाकात लागतात त्याच लावायचे. म्हणता ते सगळे साधारण माहिती होते. अव्हेलेबल नायट्रोजन वगैरे. पण ते काय आहे हे माहिती असणं आणि त्यांची झाडांमधली फिजिओलॉजी माहिती असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे इथल्या माहितीचा उपयोग होतोय.
बेझल, पार्सले, ओरेगॅनो उगवणे आणि फुलं यात खूप फरक आहे हे जाणवलं. म्हणून इथल्या तज्ज्ञांचं मत घ्यावसं वाटलं. तुम्ही दिलेली माहिती फारच रोचक आहे.तुम्ही म्हणता तसं टोमॅटोला थोडं पाणी कमी करावं का?
माझी एकच छोटोशी बाल्कनी आहे जिथे मला संपूर्ण फुलांचे वेल चढवून ती रंगीबेरंगी करायची आहे. बाकीच्या बाल्कनीमध्ये उरलेली झाडं आहेत. उन्हाचा काहीही प्रॉबलेम नाही कारण सगळ्या बाल्कन्या पूर्वेकडे आहेत.
वर सिंडरेलाने म्हंटल्याप्रमाणे डोस बरोबर असेल ना वगैरे खूप प्रश्न पडतात म्हणून खत वापरण्याबद्दल अनेक प्रश्न आहेत.
मी घरी कंपोस्टिंग करायचे 2-3 अयशस्वी प्रयत्न केले. पुन्हा सुरुवात करायला हवी.
एकूणच बागकाम करणे अतिशय मन लावून आणि प्रेमानं करायचं काम आहे.

@मेधा
माझ्याकडे सीवीड आहे. त्यांनी अप्लिकेशन पानांवर स्प्रेने करायला सांगितले आहे. तसे एकदा केले आहे.
@शैलजा
अजून माझे एन पी के आलं नाही. इथले उपाय यशस्वी होतायत असं वाटलं तर नाही वापरणार रासायनिक खत.

Pages