गेले वर्षभर मला अनेक शारिरीक तक्रारी होत्या. व्यायाम करत होतो तरी बैठे जीवन आणि खाणे जास्त यामुळे शरिरात वात वाढत असावा.
फेबृवारी २०२० पासून सकाळी दहा आणि रात्री ८ ला जेवण सुरु केल्यापासून तक्रारी संपल्या. उत्साह वाढला आहे.
सुरवातीला नाष्टा स्कीप करणे कटीण झाले. मी नाष्टा जेवण जेवल्यासारखा खायचो. पोहे असतील तर दोन डीश भरुन खायचो. परिणामी दुपारी फारशी भुक लागत नसे, दुपारी जेवलो की रात्रीचे जेवण वेळ झाली म्हणून जेवायचे.
मग शरिरात वात वाढू लागला. पचन ठीक नसेल तर व्हीटेमीन्स ची कमतरता पडू लागली. व्हिटीमीन्स जसे डी आणि बी १२ कमी झाले की उत्साह कमी झाला. वात विकारामुळे इतरही प्रश्न निर्माण झाले.
शेवटी निश्चय करुन मी दिक्षीत डाएट सुरु केले. सर्व म्हणू लागले की दिक्षीत डाएट चा फायदा डायबेटीस असताना जास्त फायदेशीर असते. तुला तर डायबेटीस नाही. मग कशाला हे सुरु केले. तरी मी निश्चयाने गेले ४ + महिने हे करत आहे.
सकाळी ८ ऐवजी १० वाजता जेवताना आजही उशीर झाला की भुकेने जीव कासावीस होतो. सुरवातीला दुपारी काही खावे वाटे. अधून मधून ४ वाजता चहा सोबत २-४ बिस्कीटे कधीतरी खातो. पण दिक्षीत डाएट पध्द्तीने दुपारी चहा न पिणे त्या ऐवजी पातळ ताक पिणे अजूनही जमलेले नाही.
माझ्या मते याने बिघडत नाही . वजन, पोटाचा घेर कमी झाला आहे. सर्वात महत्वाचे वाढलेला उत्साह,
सर्वांना याचा फायदा व्हावा, मोटीव्हेशन वाढावे म्हणून अनेक शहरात एक डॉक्टर व एक व्हॉलेंटीयर यांच्या मदतीने गृप तयार झाले आहेत. कल्याण मधे सुहेल शेख हा माझा जवळचा मित्र हे काम करतो. मी रहात असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात असे सेंटर झाले तर मला काम करायला आवडेल.
परंतु पहीले काही आठवडे (१-२)
परंतु पहीले काही आठवडे (१-२) जड गेले का? तेव्हा स्वतःला कसे डिस्ट्रॅक्ट केलेत? ऐकायला आवडेल.
सविस्तर अनुभव आणि आपण केलेले
सविस्तर अनुभव आणि आपण केलेले बदल शक्य असल्यास लिहावेत
@ Sparkle @ सामो सुधारणा
@ Sparkle @ सामो सुधारणा केली आहे
४ महिन्यात किती किलो वजन कमी
४ महिन्यात किती किलो वजन कमी झालं ? वजन कमी होण्याचा वेग काय होता / असतो ?
जोडीला कोणता व्यायाम केलेलात ?
खाणं रोजच होत की काही बदल केलेत
खरं आहे.
खरं आहे.
मी तसा चवीचा गुलाम. पोट भरतं मन भरत नाही या प्रकारातला. सकाळी नाष्टा जेवणासारखाच करायचा. २-३ डिश. दुपारी-संध्याकाळी जेवण सोडायचं नाही.
पण मागे अनेक महीने काही कारणानं मला दुपारी जेवण करणं शक्य नव्हतं. जे काही खायचं ते एकच वेळ, सकाळी ९ पूर्वीच. नंतर पाणी सोडलं तर बाकी काही नाही.
त्यानंतर सकाळी ९-९:३० ला जेवणाची सवयच झाली. नंतर दिवसभर काहीही नाही. थेट रात्रीच जेवण.
आता मुख्य मुद्दा असा की नंतर भूक लागल्यावर काय?
@ सामो - काम असलं की भूक जाणवत नाही असा माझा अनुभव आहे. आणि भुकेची एक वेळ असते. एखादा तास. ती वेळ निभावून न्यायची निग्रहानं, मग नाही लागत भूक.
@जाई, माझी उंची १८२ से.मी.
@जाई, माझी उंची १८२ से.मी. आहे. या तुलनेने वजन ७८ किलो नियंत्रणात होते जे घटून ७५ झाले. माझा उद्देश हा नाही की वजन कमी करणे. उत्साह वाढणे व शारिरीक / पचनाच्या तक्रारी कमी करणे आहे.