ट्रोलींग - मराठी टीव्ही मालिका

Submitted by प्रगल्भ on 25 July, 2020 - 04:24

वायफळ प्रस्तावना: काल 'अनभिज्ञ' च्या वाचकांच्या भावना दुखावून आज हा धागा काढण्याच दु:साहस पुर्ण झाले की मी डायरी मध्ये 108 वेळा 'सॉरी वाचकांनो सॉरी' अस लिहीणार आहे. कुणाला ते लिहीलेल्याचा नंतर पुरावा हवा असेल तर ' संदेश ' मध्ये मागवू शकता.. Wink आणी मला संदेश आणी इथे कॉमेंट्स मध्ये यथोचित शाब्दिक हाणामारीने तुडवू शकता ... आय डोंट माइंड ला!!

पाल्हाळ

श्रावणाची साफसफाई आणि काही रोजची कामे करण्यासाठी माझ मायबोली गेला आठवडा दीड आठवडा बंद होतं. माझ्या पालकांना मी एकुलता एक सुपुत्र (सगळे एकुलते एक दिवटे 'सुपुत्र' च असतात.) असल्याने मला आईसोबत भांडी घासण्यापासून - रोजच भाजी आणी आमटी पर्यंत बरीच छोटी मोठी कामे करावी लागली. असो... करणे भाग, त्यातून कोविड मुळे मावशीबाई कामाला येत नाहीत(लोकं येउ देत नाहीत त्यांना, अणि 'मोलकरीण' हा कुत्सित शब्द वापरून मला कुठल्याही मावशीबाईंचा अवमान करायचा नाहीये). कारण आई,बाबा आणि मी अस तिघांचच कुटुंब!

सकाळी उठायच, दात बित (शब्दश: घेऊ नका ओ) घासून आवरून दोन तासांच सकाळच ऑनलाईन लेक्चर अ‍ॅटेन करायचं, मग आईला घराच्या रुम्स झाडायला मदत करायची... खरं तर ती स्वत:ची मदत होती बहुदा... कारण मी जिथे दिवसभर पडीक असतो (सध्या तरी) त्या वरच्या घरात (4 रुम्स) सणावाराला साफसफाई करण्याच काम माझ्याकडेच असतंं. तरंं, रोज एक खोली झाडायची, पुसायची आणी 12 - 12:30 ला अंघोळीला खालच्या घरी (4 रुम्स) जायचं. (तोवर काही खायच नाही - दिक्षित.डॉक).... भाजी-आमटी बनवायचं (पोळ्या आणी कुकर आई लावते... कुकर खूप कमी वेळा लावतो आणि पोळ्या करता येत नाहीत Sad ) मग 1:00 - 1:30 वाजता जेवण करून परत वरच्या घरात यायच... एखाद्या दुसर्‍या कोर्स च एखादंं-दुसरं युनिट संपवायच...थोडा वेळ झोपायचं... नाहीतर मग कविता करत बसयचं, गझलेचे प्रयत्न करत बसायचं... दुपारी 4:00 ते 5:30 ची लेक्चर्स करून आईसोबत भांडी घासायची .... परत वर यायचं... टाईमपास(वेब सिरीज चे एपिसोड्स 'वगैरे') .... मग रात्रीचंं जेवण आणि झोप... पुन्हा हेच रुटीन...

मुद्दा

तर, माझा आणि टी.व्ही.चा संबंध फक्त दोन वेळच्या जेवणापुरता...त्यात पण टी.व्ही. वर मराठी सिरीअल्स... आणि नेमकी त्या दिवशी "माझा होशील ना" ही (भंगार- ट्रोलिंग चा पहिला शॉट) सिरीअल सुरू होती... च्यायला त्या आदित्य ला कंपनीचा मालक दाखवलयं... पण तो या बाबतीत 'अनभिज्ञ' असतो... त्याचे चार बिनलग्नाचे मामा (अख्या आईच्या माहेर घराण्यात माझे 2 मामा बिनलग्नाचे आहेत) त्यांच्या वडिलांसोबत आदित्य चा सांभाळ करत असतात... त्यांची स्क्रिप्टेड भांडण (भांडणंं म्हणण्यासारखी खरी 'भांडण' माबो च्या काही धाग्यांवर असतात...मग ती निवळण्यासाठी कोणीतरी गाण्याच्या लिंक्स वगैरे टाकत <तो मूर्ख मीच> ) बघून खूप वाईट वाटतं.

त्या दिवशी तर कोविड च्या गॅप मुळे चित्रीकरण नव्याने सुरू झाल्यावरचा पहिला अ‍ॅपिसोड टेलिकास्ट झाला होता बहुतेक...
तर त्या भागात आदित्य ला त्याचा साहेबाने ओव्हर वर्क दिलेलंं असतं आणि त्याची हिरॉईन (नाव नाय माहीत!!) तिच्या मॉम-डॅडू ला मॅरेज अ‍ॅनिव्हर्सरी च्या सेलिब्रेशन साठी एका हॉटेलात घेऊन जाते...मग या हिरॉईन ला आकाशातला 'चंद्र' बघून 'आदित्य' ची आठवण येते...
ते दोघे चॅट सुरू करतात (तिकडे हिचे मॉम-डॅडू काय ऑर्डर करायच यावर विश्लेषण करत असतात) ...

हे सिरीयल्स मधे हीरो-हिरॉईन ची 'चॅटिंग्स' दाखवण्यासारखी किळसवाणी गोष्ट दुसरी कोणतिही नाही!! ते पण कसलंं थर्ड ग्रेड चॅटिंग (या पेक्षा माझंं आणि सोनिया च चाटिंग खूप चांगल होतं...तरीही दोन वेळा 'रिजेक्टेड' झालो आणि 'फ्रेंडझोन' मध्ये राहीलो )...
मुळात कोणतीही मुलंं-मुली किशोरवयापासून ज्या ज्या मुली-मुलांशी चॅट करतात ते सगळ या सिरीयल्स च्या चॅट पेक्षा कैक पटीने चांगल-बरं-सहनशील असतं...

चॅटिंंग मधे हा आदीत्य तीला काम करतानाच्या टेबलावरचे फोटो टाकतो...ती चंद्राचा फोटो टाकते(यातनंं सांगण काय नक्की - नाय माहीत) ... आदित्य च पण ऑफीस कसलंं 'दळभद्री' प्रकारात मोडणारं... मी लहानपणी बाबांसोबत एस.टी. स्टॅंड वर त्यांचे ऑफिस सॅंपल्स आणायला जायचो. तर ती सॅम्पल्स ठेवायची जी खोली होती ना...अगदी तसंं या आदीत्य च 'ऑफिस' दाखवलयं...
मला एक कळात नाही या मराठी सिरीअल्स मध्ये बाहेरुन दाखवण्यात येणारं ऑफिस हे एकच का असतं?? त्या 'का रे दुरावा' मधे 'जय' आणि 'आदिती' च बाहेरून दाखवण्यात येणारं ऑफिस(बिल्डींग) होतं ना ....(टीसीएस किंवा इन्फोसिस ची इमारत आहे) तेच सगळ्या सिरीअल्स मध्ये फिरवून फिरवून दाखवतात...

मूळ काय- तर 'माझा होशील ना' (नावातच गेम केलाय ...) ही सिरीअल अतिशय थर्ड ग्रेड आहे...
आदित्य या व्यक्तिरेखेची भूमिका करणार्‍याने (मृणाल कुलकर्णी यांचे चिरंजीव) अ‍भिनयाचा बट्ट्याबोळ केलाय... त्याच मोठ कपाळ(टक्कल) बघवत नाही... त्याची हिरॉईन पण .... (तसलीच- फक्त टक्कल नाय तीला)

आदीत्य आणि त्याची हिरॉईन 'नेपोटिझम' मुळे आलेले असतील-नसतील...पण त्यांना अभिनय येत नाय... हे मी नाय बोलत ओ... दुसरी बाजू मधे आलेल्या एका कलाकाराने बोलून दाखवलय... मराठी टि.व्ही. क्षेत्राची अवस्था अतिशय विद्रुप आहे...

कुठे गेल्या त्या सिरीअल्स ज्यांवर प्रेक्षकांंनी मनापासून प्रेम केलंं आणि आवडीने बघत होते - चॉईस म्हणून नाय!!
'असंभव', 'आभाळमाया' , 'अग्निहोत्र' इ.

सद्यस्थितीत 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' सोडल्यास सगळ्याच टीव्ही सिरीअल्स 'भंगार' आहेत!!

आज जे मनात साठलं ते बोलून गेलो...
तुम्हाला ही घरी कोणासमोर या सिरीअल्स ना, सिरीअल्स मधील व्यक्तिरेखांना नावे ठेवता येत नसतीलच...
म्हणून हा घागा! ... वाचल्या वाचल्या सुरू व्हा Happy

" ट्रोलिंग हे व्हायलाच हवं!! "

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे प्रत्येक मालिकेवर वेगळा धागा काढून पिसं काढली जातात ऑलरेडी Lol .छान लिहिले आहे. माझे पण सेम मत त्या serial बद्दल.

या मालिकांना TRP मिळतोच कसा, काही मालिकांना तगडी starcast मिळाली आहे जसं अग बाई सासू बाई पण पण पण परत तेच unbelievable scenes आहेत कोण आई आपल्या एवढ्या सांड मुलाला जो अतिशय उद्धट आहे आपल्या वडील जागी असलेल्या माणसावर ओरडतो, त्याचे लाड करेल..सिरिअसली..

मालिकांची पिसे काढण्यात मायबोलीकर माहीर ? आहेत, तुम्हीही त्या वर्गात सामील झालात. अभिनंदन Happy
येथे खूप धागे आहेत मालिका wise
इथले references समजावेत म्हणून मालिका पळवत का होईना2 पाहणारे लोकं आहेत Proud माझ्यासारखे

सिरियल पाहत नाही , झी वरच्या मालिका पहायच्या केव्हाच बंद केल्या आहेत , अपवाद दिल दोस्ती दुनियादारी सिजन 1 . पण विराजस छान आहे दिसायला .. अभिनय सध्याच्या इतर मराठी अभिनेत्यांएवढाच ठिकठाक आहे , वाईट नक्कीच नाही .. थोड्या क्लिप्स पाहिल्या युट्यूब वर .. जसं पात्र लिहिलं आहे किंवा दिग्दर्शकाला अपेक्षित आहे तसं तो देतो आहे .. दर्जेदार कथानक , दिग्दर्शन असलेल्या मालिका यायच्या बंद झाल्यात तेव्हा मिळतील त्यात काम करण्याशिवाय नवकलाकारांकडे पर्याय नाही ... थोडं सेटल झालं , थोडा अनुभव गाठीशी आला की वेबसिरिज , चित्रपट वगैरे मार्ग खुले होऊ शकतात ...

@Sadha manus मी खरं सांगू का , जे उत्स्फुर्त येतं आतून तेच मी लिहीतो... आता कधी कधी प्रयत्न फसतात Wink
पण इट्स फाईन... कौतुकाचे चार शब्द चार पानं लिहीण्यासाठी मदत करतात
मनभर धन्यवाद !! Happy

@डोडो मला सुद्धा हे टीआरपी च गणित नाही माहीत...ते राधिका मसालीण बाईला टॉप वर ठेवलय (लोणची-पापड-मसल्यांच्या बदल्यात असेल Happy )

@किल्ली माझा पहिलाच प्रयत्न होता ट्रोलिंग चा Happy

@radhanisha प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy