सध्या सगळीकडे कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सर्वांना माहित आहे. माझे सासरे व सासूबाई पुण्यात राहतात आणि आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये. कोरोना परिस्थिती मुळे आम्ही त्यांना मार्चमध्ये आमच्या घरात रहायला या सांगितले पण तुमच्याकडे करमत नाही असे सांगून त्यांनी येणं टाळून ते दोघे एकटे राहतात. पण शेजारच्या लोकांना मुलगा आणि सून किती वाईट आहे हे सांगतात. त्यांना वाटते की दर आठवड्याला त्यांना भेटायला यावे. आमची दोन लहान मुले आहेत.कोरोनामुळे मुलांना खेळायला सुद्धा बाहेर जाता येत नाही. किती ही समजावून सांगितले तरी सासू-सासरे दोघे फिरायला जातात. घराजवळ किती तरी दुकाने आहेत पण तरीही डी मार्ट मध्ये जातात. घरात बोर होतंय म्हणून. मागे KFC मध्ये खायला जायचे आहे म्हणून भांडण झाले कारण आम्ही विरोध केला. लहान मुलांना एकवेळ समजावून सांगणे सोपे आहे पण म्हातार्या लोकांना कसे समजावून सांगावे कळत नाही. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काळजी घ्यायची हेच सांगून सुद्धा ऐकत नाही. काय करावे कळत नाही. इतर नातेवाइकांचे सुद्धा ऐकत नाही. सासरे वय वर्षे 73 आणि सासूबाई वय वर्ष 65 आहेत.
सासू बाईंना उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहे. सासर्याना संधीवात आहे फेब्रुवारी मध्ये 15 दिवस ICU त होते (चक्कर येऊन रस्त्यावर पडले होते आणि मेंदूला मार लागला होता ) त्या मुळेच जास्त काळजी वाटते.
वृद्ध मंडळीना कसे समजावून सांगावे?
Submitted by सियोना on 20 July, 2020 - 14:38
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
घरोघरी हेच आहे. स्वातंत्र्य
घरोघरी हेच आहे. स्वातंत्र्य आहे तोपर्यंत वापरायचे हाच प्रत्येकाचा विचार असतो. एकदा दुसऱ्याकडे सूत्रे गेली की मर्यादा येतात. आता कोरोनामुळे भीती वाटणे रास्त आहे. पण तुम्ही मनावर घेऊ नका. सांगून सोडून द्या.
लहान मुले आणी म्हातारी माणसे
लहान मुले आणी म्हातारी माणसे ऐकण्याच्या बाबतीत सारखीच असतात, जाम वात आणतात. माझ्या चुलत बहिणीच्या साबा ( वय वर्षे ७८ ) अजूनही स्वतःला १० वर्षाची समजतात. ( कोणती व्याधी नाहीये, पण बाष्कळपणा खूप आहे )
आमचे एक सिनीयर नातेवाईक मास्क न लावताच बाहेर जातात, म्हणतात की मला काय होणारे? अरे ! तुम्हाला ते होईलच होईल पण तुमच्या मुलांना पण होईल ना भैताडांनो.
असे लोक समजावुन ऐकत नाहीत, तेव्हा कुठल्या तरी पोलीसाला पकडुन यांना " प्रेमाने " समजावयाला लावा. पोलीसांची भाषा कायदेशीर असल्याने निदान त्यांचे तरी ऐकतील. बाकी लोक काय म्हणतात त्याचा विचार करु नका, तुमच्या कुटुंबाचा व लहान मुलांचा विचार करा, त्यांची काळजी घ्या.
पण पोस्ट मधे त्यांचे विचार व
पण पोस्ट मधे त्यांचे विचार व भूमिका काय आहे हे समजतच नाही. त्यांचीही काही बाजू असेल. भले ती योग्य नसेलही.
त्यांचीही काही बाजू असेल. भले
त्यांचीही काही बाजू असेल. भले ती योग्य नसेलही.>>>> ती जर सध्याच्या काळात योग्य नसेल तर यांच्या कुटुंबाला त्याचा त्रास नाही का होणार? यांच्या दृष्टीतुन विचार करा की.
ती जर सध्याच्या काळात योग्य
ती जर सध्याच्या काळात योग्य नसेल तर यांच्या कुटुंबाला त्याचा त्रास नाही का होणार? यांच्या दृष्टीतुन विचार करा की.>>>>भूमिकाच नीट समजली नाही तर ती योग्य आहे की नाही हे ठरवणार कसे? योग्य आहे नाही हा नंतरचा मुद्दा आहे.
त्यांचे ते स्वतंत्र आहेत ,
त्यांचे ते स्वतंत्र आहेत , त्यांच्यावर जबरदस्ती तर करता येणार नाही ... ते बाहेर जाणं थांबवणार नसतील तर नातवंडांना भेटू देऊ नका .. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी नसली तरी मला माझ्या मुलांना इन्फेक्शनचा धोका नको आहे , म्हणून सांगा .. आणि त्यावर चिडचिड करणार असतील तर इथे राहायला या आणि इथे आम्ही राहतो तसं राहिलं पाहिजे , फिरायला वगैरे न जाता . जर त्यांचा नातवंडांना भेटायचाच आग्रह नसेल तर त्यांना त्यांच्या मर्जीने वागू द्या खुशाल .
जर ते वेगळे राहतात तर
जर ते वेगळे राहतात तर पोरांच्या संपर्कातच नाहीयेत ना. तर त्यांच्यापासून पोरांना कोरोना संक्रमण व्हायची भिती का आहे?
की आता एकत्र राहत आहात तुम्ही?
कि फिरत फिरत येतात भेटायला?
ते WhatsApp वापरत असतील तर
ते WhatsApp वापरत असतील तर त्यांच्या आवडत्या WhatsApp group मधे कुणाला तरी सांगून 'करोना होऊ नये म्हणून घ्यायची काळजी' अशा अर्थाच्या पोस्ट्स पाठवायला सांगा. रग्गड असतात.
त्यांचा अशा पोस्ट्सवर विश्वास नसेल तर ज्या सोर्सवर विश्वास असेल त्या सोर्समधून मिळणारी माहिती त्यांच्यापर्यंत पोचवा.
आणि एवढं करूनही ऐकत नसतील तर खरंच सोडून द्या. कदाचित अचानक तुम्ही सांगायचं थांबलात की त्यांनाच जाणवेल की तुमचं बरोबर होतं.
कारण एकच आहे घरात बसायचे नाही
कारण एकच आहे घरात बसायचे नाही कारण कंटाळवाणे होते. आम्ही सर्व किराणा आणि गरजेचे सामान घरात भरून ठेवले आहे. बाकी दूध आणि भाज्या घरपोच मिळतील अशी व्यवस्था करून ठेवली आहे. त्यांना बाहेर जावे लागू नये म्हणून. आमची मुले रोज video call वर आजी-आजोबांबरोबर गप्पा मारतात. सासू-सासर्याना आमच्या घरी रहायचे नाही कारण कुठेही बाहेर जाता येत नाही.
त्यांचं ते बघतील हे
त्यांचं ते बघतील हे प्रत्यक्षात येऊ शकत नाही. कारण दुर्दैवाने जर ते आजारी झाले तर उपचार करणे, त्यांच्या संपर्कात येणे ह्या गोष्टी अटळ आहेत मुलासाठी. आणि दुर्दैवाने ते बाधित असतील मुलगा / सून दोन्ही घरी जात असल्याने मुलाच्या कुटूंबाला ही खूप धोका राहिलं. तेव्हा त्यानी आमचं काय व्हायचं ते होऊ दे हा विचार त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या मुलासाठी ही सोडून द्यायला हवा.
नाहीतर किती ही वाईटपणा आला ( तो तर तसा ही येतोच आहे) तरी ते कोणत्याही आजाराने पीडित झाले तरी आम्ही जाणार नाही तिकडे हे ठरवून टाका. त्याना ही ह्याची कल्पना द्या आणि डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करा.
ते जर तुमच्याकडे येतो म्हणले तर 14 दिवस क्वारंटाईन ही ठेवा मात्र त्यांना.
जाऊदे कि फिरायला.., चालण्याचा
जाऊदे कि फिरायला.., चालण्याचा व्यायाम उत्तम आहे..
मास्क घालून जात असतील तर कशाला अडवताय..
आणि kfc खाल्ल्याने काय होणार आहे.. खाण्यातून नाही पसरत ना.. . खाण्याआधी पार्सल व्यवस्थित साफ करा..
जाऊदे कि फिरायला.., चालण्याचा
जाऊदे कि फिरायला.., चालण्याचा व्यायाम उत्तम आहे..
मास्क घालून जात असतील तर कशाला अडवताय..
आणि kfc खाल्ल्याने काय होणार आहे.. खाण्यातून नाही पसरत ना.. . खाण्याआधी पार्सल व्यवस्थित साफ करा..>> सहमत.
त्यांना त्यांचं आयुष्य जगु द्या. प्रत्येकाला आपली काळजी असते हो.
अरे किती क्युट सीनीअर कपल आहे
अरे किती क्युट सीनीअर कपल आहे. मी पण घरी डोमिनो पिझा मागवा यचा म्हटले तर लेक मागवू देत नाही. ते के एफ सी घरी मागवतात का दुकान उघडे आहे?
उठता बसता सुनेच्या मायक्रोस्कोप खाली जगणे मलापण जमायचे नाही बाई.
आता ईथे तरुण मंडळींना कसे
आता ईथे तरुण मंडळींना कसे समजावून सांगावे सुरू होईल
मानवी स्वभाव फार विचित्र असतो
मानवी स्वभाव फार विचित्र असतो
या वयात परक्यांनी सल्ले दिलेले पटतात
पण आपल्या पोराबाळांनी सुनेने दिलेले पटत नाहीत.
किंबहुना त्या सल्यांमागे आपली काळजी नसून हे आपल्यावर कंट्रोल तर नाही ना करत अशी भिती मनात असते.
उठता बसता सुनेच्या
उठता बसता सुनेच्या मायक्रोस्कोप खाली जगणे मलापण जमायचे नाही बाई.>>>> अमा पण परावलंबी झाल्यावर काय करणार?
ते त्यांचे जगत आहेत हे उत्तम
ते त्यांचे जगत आहेत हे उत्तम आहे.मला तरी फ्रिडम एन्जॉय करत आहेत ते योग्य वाटते.
मी पण घरी डोमिनो पिझा मागवा
मी पण घरी डोमिनो पिझा मागवा यचा म्हटले तर लेक मागवू देत नाही.
उठता बसता सुनेच्या मायक्रोस्कोप खाली जगणे मलापण जमायचे नाही बाई. >> अमा, लेकीच्या मायक्रोस्कोप मध्ये आणि सुनेच्या मायक्रोस्कोपमध्ये फक्त तुम्ही लावलेल्या लेन्सचा फरक आहे आहे क्यूट कपल पण मुलगा-सुनेचे पण मत जरा ऐकले तर काय क्यूटनेस झिजणार काय त्यांचा?
आणि सियोना, जमलं तर फार चिंता करू नका. काळाजी केल्याने आपल्याच इम्यून सिस्टीमवर परिणाम होतो. जगू दे त्यांना जसं हवं तसं ...
सियोना ताई, फार काळाजी करु
सियोना ताई, फार काळाजी करु नका. सासु सासरे पुण्यातले आहेत म्हटल्यावर त्यांना जास्त समजाऊन काडीचाही फरक पडणार नाही याची खात्री बाळगा. बाहेर कोरोना आहेच तोच काय ते अखेरचं समजाऊ शकेल..! आणि उरलं त्यांनी तुमची शेजारी-पाजारी केलेल्या निंदा नालस्ती बद्दल... सर्वांना सर्व कळते त्यामुळे कुणीही तुम्हाला दोष देणार नाही.
त्यांना काही आजार आहेत का?
त्यांना काही आजार आहेत का? मधुमेह, बीपी, हृदयविकार, दमा, जाडेपणा यापैकी काहीही असेल तर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
त्यांच्या आरोग्य विम्याची मर्यादा काय आहे? विमा नसेल तर कोव्हिडच्या उपचारासाठी पैसे आहेत का? Have a very open discussion about all these hard to talk about questions. Have they made a will? All bad what if situations are more likely to occur if enough precautions are not taken. कदाचित आजी आजोबांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही.
जर तुमचे ऐकत नसतील तर आजी आजोबांचे कोणी मित्र किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत का जे समजाऊन सांगू शकतील?
बाहेर रिकाम्या रस्त्यावर मोकळ्यावर अर्धा तास फिरायला हरकत नाही अर्थात मास्क लावून. मात्र वेळ जात नाही म्हणून डिमार्टमध्ये फिरणं धोकादायक आहे.
घरी स्वयंपाक कोण करतं? कदाचित त्याच चवीचे/स्वतःच्या हातचे खाऊन कंटाळा येऊ शकतो. महीना पंधरा दिवसांतून एकदा बाहेरून काही जंक फूड मागवायला देखील हरकत नाही. कधीतरी डबाही मागवता येईल. फक्त जे अन्न मागवाल ते गरम करून घ्यायला सांगा. (५०/५५ डिग्री सेल्सिअस तरी). जो पदार्थ गरम करता येत नाही तो मागवू नका.
आजी आजोबांना तुमच्याकडे येऊन राहण्याचा आग्रह धरू नका. ज्ये नांनी स्वतंत्र राहणं कमी रिस्की आहे.
तुमचे प्रश्न आणि काळजी खूप रास्त आहे. यातून लवकरच मार्ग सापडो!
माझे वडीलही सध्या मुंबईला
माझे वडीलही सध्या मुंबईला एकटेच राहतात. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य हवेय. आणि मुंबई सुटत नाही. या कोरोनाकाळातही ते तिथेच एकटे राहणे कम्फर्ट्बल समजतात. तिथे टाईमपासला त्यांची मित्रमंडळी आहेत.
मी तरुण आहे, माझी पोरं लहान अहेत, आमच्यासमोर आयुष्य पडलेय. मला जीव मोलाचा आहे. मी वर्षभर स्वातंत्र्यावर गदा आणून राहू शकतो. पुढे आयुष्य पडलेय जगायला.
वृद्धांचे विचार मात्र या उलट असू शकतात. आता जे उरलेय ते जमेल तितके जगावे. आज ना उद्या आता मरायचेच आहे. घरात कुढून मरण्यात काय मजा आहे.
त्यामुळे मी देखील वडिलांना काळजी घ्या सांगतो. पण शेवटी त्यांना हवे तसे जगू देतोय. फक्त ते कधी ईथे आले भेटायला तर मात्र काळजी घेतो. ते देखील ते समजून मुलांपासून दूर राहतात.
बाकी यातही कोणी ऐकले तर त्यांना वाटते की या काळात याने वडिलांना एकटे कसे ठेवले.
वाटू दे
आई वडील
आई वडील
मुलगा,सून, नातू
हे सर्व एकाच कुटुंबाचा हिस्सा आहेत.
प्रेमाचे बंधन असेल तर चर्चे तून मार्ग निघतात.
आई ,वडील हे कुटुंबाचा हिस्सा नाहीत.
किंवा उलट मुलगा ,सून कुटुंबाचा हिस्सा नाही असे विचार असतील तर त्रयस्थ व्यक्ती ला दिलेल्या सल्ल्या सारखे सल्ले दिले जातात.
आई ,वडील हे कुटुंबाचा हिस्सा
आई ,वडील हे कुटुंबाचा हिस्सा नाहीत.
किंवा उलट मुलगा ,सून कुटुंबाचा हिस्सा नाही असे विचार असतील तर त्रयस्थ व्यक्ती ला दिलेल्या सल्ल्या सारखे सल्ले दिले जातात.>>>> तसे नाहीये हो हेमंत. ही वृद्ध मंडळी अजीबात ऐकत नाहीत. ही काल आलेली मुलगी आम्हाला काय सल्ले देणार? आम्ही हिच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहीलेत असा विचार बर्याच वयस्कर लोकांचा असतो. स्वानूभव आहे हो ! माणुस कळकळीने काळजीने बोलायला जातो, तेव्हा त्याचे किंवा तिचे ऐकले जात नाही.
कुणाचं बरोबर , कुणाचं चूक हा
कुणाचं बरोबर , कुणाचं चूक हा प्रश्न इथं दुय्यम आहे. तुमचा व्यक्तिगत अनुभव तुम्ही सर्वच 'वृद्ध मंडळी'ला लागू करताय, हें मात्र नि:संशय चूकीचं वाटतं !
सासु सासरे पुण्यातले आहेत
सासु सासरे पुण्यातले आहेत म्हटल्यावर त्यांना जास्त समजाऊन काडीचाही फरक पडणार नाही याची खात्री बाळगा. >>
<<< भूमिकाच नीट समजली नाही तर
<<< भूमिकाच नीट समजली नाही तर ती योग्य आहे की नाही हे ठरवणार कसे? योग्य आहे नाही हा नंतरचा मुद्दा आहे.
Submitted by प्रकाश घाटपांडे on 21 July, 2020 - 10:16>>> याला अनुमोदन. कधी कधी ज्ये ना च्या अश्या वागण्याला एखादी काळी किनार असू शकते ज्याला कळत नकळत घरातील इतर व्यक्ती कारणीभूत असू शकतात अन बरेचदा ही बाब समोरच्याच्या लक्षात येत नाही.
सासू-सासरे दोघे फिरायला जातात
सासू-सासरे दोघे फिरायला जातात>> अर्धा तास मास्क लावुन चालायला आता परवान गी आहे. अगदी हार्ड लॉक डाउन मध्ये सुद्धा. म्हणजे त्या २२ मार्च ताली थाली डे ला सुद्धा मी २० मिनिट सकाळी २० मिनिट दुपारी असे कुत्र्याला फिरवून आणले आहे. मास्क लावूनच जाते कुठे पण. मे जून तर ओफिसातुन काम पण केले आहे. अर्थात मी धाग्यातल्या जोडप्याइतकी म्हातारी नाही आहे. पण जर ते अॅक्टिव्ह असतील तर आता व्यायामापुरते बाहेर जायला उद्धव काकांनी परवानगी दिली आहे. पुण्यातले लोकल रूल ट्विटर वर मिळतील. मी डीएम पुणे ला फॉलो करते.
. घराजवळ किती तरी दुकाने आहेत पण तरीही डी मार्ट मध्ये जातात. >> असे मुद्दाम करत नसतील . काही काही बाबी खास दुकानातच मिळतात. मी स्वतः बिग बास्केट होम डिलिव्हरी, अमेझॉन, लोकल भाजी अंडा पाव वाला, व शेजार् चे टेस्को ह्यात विभागून तीन महिने खरेदी केली आहे. टेस्को मध्ये काही खास आवडीच्या वस्तू मिळतात. त्या घेउन येते. दर शुक्रवारी फरसाण वाला बेस मेंट मध्ये येतो पण तो गुज्जु लोकांचे फेवरिट चीजे आणतो. ते आम्ही खात नाही. आता ऑफिसजवळचे फरसाण दुकान पण उघडले आहे. असे त्यांचे होत असेल.
फार लहान मुले दिवस भर कटकट करत राहतात आवाज, रडारड पसारा हे काही काळानंतर वैताग वाणे होते. कारण एम्प्टी नेस्ट ची पण सवय होते. स्वतंचे शांत स्लो पेस्ड रूटीन बरे वाट्ते. स्वयंपाक कमी करावा लागतो दोनच जणे असली की. एकूण दोघांनीच राहण्यात फार सुख ते अनुभवत असतील असा माझा अंदाज आहे. शिवाय दे आर अॅड्ल्ट्स दे कॅन मेक देअर ओन रूल्स
ते राहायला आले तर तुमचे स्वातंत्र्य जाईल ना.
अमा+१.
अमा+१.
सासू बाईंना उच्च रक्तदाब आणि
सासू बाईंना उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहे. सासर्याना संधीवात आहे फेब्रुवारी मध्ये 15 दिवस ICU त होते (चक्कर येऊन रस्त्यावर पडले होते आणि मेंदूला मार लागला होता ) त्या मुळेच जास्त काळजी वाटते. फिरणे हा उत्तम व्यायाम आहे मान्य पण मित्रमैत्रिणी घोळका करून एकत्र फिरत असतात. Social distancing गेले खड्ड्यात अशी वागणूक. KFC मधील पार्सल मागवण्यात काही अवघड नाही पण त्यांना KFC SHOP मध्ये बसून खायचे आहे.
अमा , आमच्या बरोबर राहिले तर
अमा , आमच्या बरोबर राहिले तर त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात येते आमचे नाही कारण कुठेही बाहेर जाता येत नाही त्यांना कोरोनामुळे. आधी आमच्याकडे रहात होते दर वीकेंडला.
मीं जेष्ठ नागरिक आहे व माझ्या
मीं जेष्ठ नागरिक आहे व माझ्या वयोगटातील आनेक जण माझ्याच परिसरात रहातात. कोरोनाचा धोका आपल्यालाच सर्वाधिक आहे या जाणीवेने ते सर्व जण काळजीपूर्वक व जबाबदारीने वागतात, हें मीं प्रत्यक्ष पाहिलं आहे. तरीही मीं सर्वच जेनांबददल असं सांगू शकत नाहीं. मग, आपण केवळ सवत:च्या अनुभवावरूनच असं generalization करणं योग्य आहे का ?
आपण म्हणता त्याप्रमाणे खरंच निव्वळ हट्टीपणामुळे तुमचे नातेवाईक असे वागत असतील, तर तें वागणं अपवादात्मकच असावं. त्याला कारणं आहेत का, याचा शोध घेणं उचित.
त्यांचे ते स्वतंत्र आहेत ,
त्यांचे ते स्वतंत्र आहेत , त्यांच्यावर जबरदस्ती तर करता येणार नाही ... ते बाहेर जाणं थांबवणार नसतील तर नातवंडांना भेटू देऊ नका .. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी नसली तरी मला माझ्या मुलांना इन्फेक्शनचा धोका नको आहे , म्हणून सांगा .. आणि त्यावर चिडचिड करणार असतील तर इथे राहायला या आणि इथे आम्ही राहतो तसं राहिलं पाहिजे , फिरायला वगैरे न जाता . जर त्यांचा नातवंडांना भेटायचाच आग्रह नसेल तर त्यांना त्यांच्या मर्जीने वागू द्या खुशाल . >> खरय.
तसच मनीमोहोर च्या पोस्टलाही अनुमोदेन.
इतक सगळं हो ऊनही वेळ आल्यावर आपण कसलाही विचार न करता जाणार हे त्यांनी लक्षात घेऊन वागले पाहिजे.
आमच्याकडे सासू सासरे पाळताहेत , आम्ही एकत्रही आहोत.
आईबाबा गावाला एकटे आहेत, ते पाळतायत का नाही हे कळत नाहीये. छोटे गाव असल्याने सगळ्यांचे संबंध जवळचे असतात.
आमच्या सोसायटीत पण अनेक जे ष्ठ्य नागरिकांना सगळ्यांनी मिळून सांगितले तरी ते एकत्र गप्पा मारत बसत होते.
त्यांची बाजू समजली तरी
त्यांची बाजू समजली तरी त्यांचे काळजी न घेता फिरणे हे या काळात त्यांच्यासाठी धोकादायक नाही का? मुलांनी गरज नसताना भेटायला जावे ही मागणी मुलं आणि त्यांच्या कुटुंबासाठी धोकादायक नाही का?
त्यांना कसे समजवावे हा प्रश्न व्हॅलिड आहेच.
मला वाटतं की एखाद्या समवयस्क आणि समजूतदार (ज्येष्ठ किंवा त्यांना विशेष प्रिय) नातेवाईकाची मदत घेता येईल. त्यांना बोलता-बोलता काही विषय काढून समजवावे, असे सांगता येईल.
करोनाच्या रुग्णांना हाॅस्पिटलमधे कसे एकटे रहावे लागते आणि हे रुग्णाच्या मानसिक स्थितीसाठी किती वाईट अश्या (ठरवून सहज) गप्पा मारता येतील. झालंच तर ईमॅजिनरी उदाहरणं देता येतील. पण हे सर्व उपदेशात्मक नको.
व्हाॅटस्अप वर फॅमिली ग्रुपमधे करोना झाल्यानंतर परीस्थिती अशा (विशेषत: खर्चाची तरतूद, घरात जास्त लोकांना लागण झाल्यास इन्शुरन्स अपूरा पडणे, करोना बरा झाल्यावरही होणारे शरीराचे लाॅंग टर्म नुकसान ई. भिती घालणार्या ) पोस्टस् फाॅरवर्ड करवणे वगैरे प्रकार करता येऊ शकतात.
त्यांना "आम्ही येणार नाही" हे
त्यांना "आम्ही येणार नाही" हे योग्य व्यक्तिद्वारे स्प्षटपणे सांगायची व्यवस्था करा. नवर्याने त्याच्या वडिलांना वा बायकोने तिच्या वडिलांना रागावलेले चालते. तो एक प्रकारे लाडाचाच कधी कधी हवा हवा वाटणारा भाग असतो. .
त्यांच्यातला एकाला फोडा व समजावून सांगा. बघा.
किंवा व्हाटसप फॉरवर्डसचा योग्य व्यक्तितर्फे भडीमार करा.
पण एकंदरीत ज्येष्ठ व्यक्तिंना समजाउन सांगणे हा करमणुकीचा एन्जॉयेबल प्रकार असतो.
आमच्या सोसायटीत पण अनेक जेष्ठ
आमच्या सोसायटीत पण अनेक जेष्ठ नागरिकांना सगळ्यांनी मिळून सांगितले तरी ते एकत्र गप्पा मारत बसत होते. >>>> हो माझ्या सोसायटीमध्ये पण आजी आजोबा ग्रुप अजूनही क्लब हाऊसजवळ गप्पा मारताना दिसतो. सोसायटीच्या व्हाट्सअप्प ग्रुपवर बरेच जण टीका करतात आणि तणतणत असतात. पण आजीआजोबांच्या बाजूने एकदा विचार करून पहायला हवा. खालील कारणांमुळे त्यांना धोका पत्करून सुध्दा एकत्र यावं असं वाटतं का?
1. फिरायला जाता येत नाही, मंदिरात जाता येत नाही, एकमेकांना भेटून गप्पा मारायच्या नाहीत, तर मग करायचं काय? संध्याकाळ कशी सम्पवायची?
2. बरेच ज्येना (विशेषतः आज्या) , भाजी खरेदी एंजॉय करतात, पण सोसायटी कमिटीने ज्येनाना भाजी खरेदीला यायला बंदी घातली आहे, कमिटी मेंबर्स सगळं घरी पोचवतात, पण बऱ्याचदा ही मदत नाही तर त्यांची कुचंबणा होत असेल. मला हव्या त्या भाज्या मला बघून पारखून घ्यायला आंनद मिळत असेल तर? मग ती चांगल्या मनाने केलेली मदत सुध्दा जाचक वाटू शकते.
3. ज्येनाचा फेवरीट टाईमपास, tv सिरियल्स सध्या बंद आहेत ( म्हणे )
4. ठराविक वयानन्तर थोडा एकांत, शांतता हवीशी वाटते, पण आता सगळेच घरी. त्याबरोबर घरातले आवाज वाढले, पदार्थ बनवणे, ऍक्टिव्हिटीज करणे, जास्तीचे घरकाम करणे याबाबतीत उत्साह उतू जायला लागला, मुलांना शाळा नाहीत म्हणून दंगा वाढला, मग जरा मोकळीक शांतता मिळावी म्हणून समवयस्कंची कम्पनी बरी वाटत असेल.
5. आणि शेवटचा दुर्दैवी पण शक्य असणारा असाही एक विचार असू शकतो, की बस्स झालं की आता जगून. आता संभाळून राहून आणि मन मारून जगण्यापेक्षा, योग्य काळजी घेऊन भेटू, फिरू. त्यातूनही काही झालं तर मग आता नाही तरी आयुष्य जगून झालं आहेच.
5. आणि शेवटचा दुर्दैवी पण
5. आणि शेवटचा दुर्दैवी पण शक्य असणारा असाही एक विचार असू शकतो, की बस्स झालं की आता जगून. आता संभाळून राहून आणि मन मारून जगण्यापेक्षा, योग्य काळजी घेऊन भेटू, फिरू. त्यातूनही काही झालं तर मग आता नाही तरी आयुष्य जगून झालं आहेच.
हा मुद्द थोडा पटतो. पण करोना असा रोग आहे की जो एकाला झाला तर त्याच्या पुरता मर्यादित न राहता सोबत नेमका किती जणांना बाधित करतो हे सांगता येत नाही. वरिल विचार केवळ त्यांच्यापुरता ग्राह्य धरला तरी आताच्या वेळी तो बाकिच्यांन्साठी मात्र धोकादायक ठरू शकतो.
माझी आई जिचे वय आत्ता ७२ आहे. तिला देखिल घराब बसुन कंटाळा आलाय. पण तीला एकदाच माझ्या बहिणिने सांगितले की करोना झाला तर आपल्या लोकांना सुध्धा जवळ येउ दिले जात नाही. तु बाहेर फिरायला गेलीस आणि काही झाले तर अम्हाला कोणालाच तुझे काही करता येणार नाही . तुझी काळजी तुलाच घ्यावी लागेल. त्यातच माझी मावशी , आईची लहान बहीण त्यांन्च्या कडे लॉकडॉउन संपल्यावर बरेच दिवस बाहेर पडलो नाही म्हणून देवळात दिवा लावायला म्हणून गेली(कुठला तरी सणाचा दिवस होता हे निमित्त). देऊळ तिचे स्वताचे होते. घरी येताना रस्तातल्या दगडात पाय अडकून पडली आणि खुब्यातिल हाड मोडले. एकुलती एक मुलगी तीही लग्नानंतर तिच्या गावी होती. गावातिल कोणीही हॉस्पिटल मधे अॅडमिट करून घेण्यास तयार न्हवते ( करण ते सर्वानी बंद ठेवले होते). दिनानाथला आणण्याची परिस्थिती न्हवती. जवळ नवरा सोडला तर ईतर कोणीही मदतिला न्हवते. मुलिच्या ओळखिने जवळच्या गावात हॉस्पिटल मधे भरती झाली. मुलिला तिच्या गावातुन ईकडे येण्यासाठीचा पास मिळवण्यासाठी बराच वेळ गेला. तिलाही लहान मुलगी सोडून यावे लागले. पहिले चार दिवस घरातच काढले. नन्तर १५ दिवस दवाखान्यात. तेही फक्त डॉ. येउन एकदा तब्येत बघुन जायचे. नर्स मदतिला न्हवती. खुब्यात एक पार्ट बसवायचा होता. तोदेखिल सगळी परमिशन काढून यायला वेळ लागला त्या नंतर ऑपरेशन झाले. हा सगळा प्रकार आणि ही सर्व परिस्थिती आईने बघितली आणि स्वताच आपण बाहेर पडून कुठले निमित्त घडू नये याची काळजी म्हणून स्वताच घरात बसणे पसंत केले.
पण या उलट माझा मामा... वय आता ७८. जो अगदी वर म्हणल्याप्रमाणेच वागतो. अनेक वेळा सांगून झाले की घरात लहान मुले आहेत. पण तरिही काही फरक नाही.
थोडक्यात काय....... तर आपण समजवायचे पण पुढील परिस्थिती त्यांच्यावर सोडून द्यायची. सर्वच जण ऐकणारे अथवा समजुन घेणारे नसतात. आपण याचा त्रास करुन घ्यायचा नाही.
त्यांची बाजू समजली तरी
त्यांची बाजू समजली तरी त्यांचे काळजी न घेता फिरणे हे या काळात त्यांच्यासाठी धोकादायक नाही का? मुलांनी गरज नसताना भेटायला जावे ही मागणी मुलं आणि त्यांच्या कुटुंबासाठी धोकादायक नाही का?
त्यांना कसे समजवावे हा प्रश्न व्हॅलिड आहेच. +१
त्यांची कारणं कितीही खरी असली तरी हे धोकादायकच आहे.
आपले नातेवाईक काळजी घेत आहेत हे माहिती असूनही त्यांच्याबद्दल काळजी वाटते. इथे सरळसरळ दिसत असेल की काळजी घेतली जात नाहीये, तर मुलाने-सुनेने अस्वस्थ होणं स्वाभाविकच आहे.
माझे वडीलही सध्या मुंबईला
माझे वडीलही सध्या मुंबईला एकटेच राहतात. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य हवेय. आणि मुंबई सुटत नाही. या कोरोनाकाळातही ते तिथेच एकटे राहणे कम्फर्ट्बल समजतात. तिथे टाईमपासला त्यांची मित्रमंडळी आहेत. > +_१
ऋन्मेऽऽष आणि मीरा.. याचे विचार पटले.
तरुण असू नाही तर वयस्कर
तरुण असू नाही तर वयस्कर सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
फक्त वयस्कर लोक च सर्व नियम धुडकावून लावत आहेत असे विचित्र चित्र उभे राहत आहे.
मी कधी कधी बाहेर जातो काही कामानिमित्त तेव्हा सर्व वयाची मंडळी नावाला फक्त मास्क लावून फिरत असतात.
काही घरात वयस्कर मंडळी ठीक राहतात
आणि तरुण मंडळी नियम मोडत असतात.
असे पण चित्र असते.
कसले आणि काय उपचार करतात
कसले आणि काय उपचार करतात कोरोनावर? असे काही असले तर सगळे बरे झाले नसते का?
यावर काहीही उपचार नाहीत. फक्त नाटकं आहेत.
---------------
सध्या चार महिने सर्वजण घरातच आहेत. म्हणजे किती कोल्डवॉर चालू असेल त्याचा विचार करा. ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडावे पण एका ठिकाणी बाकड्यावर गुपचूप बसावे.
सियोना, तुमचे कायदेशीर
सियोना, तुमचे कायदेशीर नातेवाईक ऐकत नाहीत ही खरंच काळजीची गोष्ट आहे... सांगत रहा.... किंवा आपल्या अमानी सांगितलं ना त्या त्यांच्या मुलीच ऐकून पिझा मागवत नाहीत तसं तुमच्या का नां ना कन्यारत्न असल्यास त्यांच्या मार्फत त्यांना प्रेमाने समजावून सांगा (मुलीचं ते प्रेम सुनेचा तो मायक्रोस्कोप :हाहा:)
त्यातूनही काही झालं तर मग आता
त्यातूनही काही झालं तर मग आता नाही तरी आयुष्य जगून झालं आहेच.>> हा विचार घातक आहे.
करोनाचे दूरगामी परिणाम आपल्याला अजिबात माहिती नाहीत. गोवरची लस आहे, गोवरातून बरी झालेली अनेक मुले आहेत. पण गोवराचे दूरगामी परिणाम आता-आताशा समजून येत आहेत. नुकताच एक रिसर्च पेपर वाचला त्यात गोवरातून उठलेल्या मुलांची प्रतिकारशक्ती पुढील ३ वर्ष बेतास बात रहाते असे परिणाम आढळले. इतकी की एच.आय.व्ही ग्रस्त मुलांच्या पेशी र्हासाशी तुलना होवू शकेल. त्यांना जपले पाहिजे.
करोनाबद्दल अशी माहिती हा पल्ला फार लांबचा आहे. "फियर माँगरिंग" नाही पण दूरगामी परिणाम माहिती नाहीत तेव्हा करोना होवून मेलो तर सुटलो असे म्हणायची वेळ येवू शकते. व्यक्ती, तिचे आजार, तिचे वय इ अनेक घटकांवर हे दूरगामी परिणाम बदलणार. एक मतप्रवाह असा आहे की येत्या २-४ वर्षात प्रत्येकाला कधी ना कधी कोव्हीड होणारच. पण तो जितक्या उशीरा झाला तितके आपण त्याचे परिणाम व्यवस्थित हाताळणार. हे लक्षात आलं ज्येष्ठ नागरिक व इतरांच्याही तर बरं आहे....
(बाकी जि, इतर सर्व मुद्द्यांसाठी +१०० पण ते 'विल' प्रकार आत्ता नको. आवश्यक आहे पण काही न करता/क्षुल्लक कारणावरून शेजार्यांना "वाईट वागतात मुले" सांगणारे ज्ये.ना. असतील तर त्यांना ते भावनिक दृष्ट्या झेपणार नाही.)
सर्व मायबोलीकरांचे आभार.
सर्व मायबोलीकरांचे आभार. यापुढे जास्त काळजी करणार नाही. शेवटी जमेल तेवढीच मदत करणार . मनावर कुठलेही दडपण ठेवणार नाही. अति काळजी करणेही वाईटच.
ते येत नाही तर तुम्ही जा
ते येत नाही तर तुम्ही जा त्यांच्या कडे राहायला म्हणजे प्रश्नच संपले ....
उडानटप्पू त्यांचे घर लहान आहे
उडानटप्पू त्यांचे घर लहान आहे. जुने 1bhk आहे. आम्ही दोघे, ते दोघे आणि आमची दोन मुले अशा सगळ्यांना अडचण होते. आमचा 3bhk आहे म्हणून आमच्या घरी येण्यासाठी आग्रह करत आहोत.पण त्यांना आमच्या घरात करमत नाही. जुन्या घरात ते 35 वर्षे झाली राहत आहेत .
बोलण्या वागण्यात "त्यांचं
बोलण्या वागण्यात "त्यांचं पुण्यातलं / आमचं पिंपरीतलं" ऐवजी. आपलं तिथलं (महणजे पुण्यातलं) अन आपलं इथलं (म्हणजे पिंपरीतलं) असा बदल करुन बघा एकदा काही फायदा होतो का ते.
जरा आत्मकथन
जरा आत्मकथन
माझे वय 69 व पत्नी 65 , आम्ही दोघेही बाहेर जात नाही कारण नेट्वर वाचून काय करू नये याची मरीच माहिती काढली आहे.... अत्यंत सुनसान जागी सकाळी 7 च्या आत 50 मिनिटे न चुकता मास्क घालू वॉकिंगला जातो. नंतर आठवड्यातून फक्त 1 दा 20 मिनिटाहून कमी काळ खर्च करून अत्यावश्यक वस्तू (भाज्या, फळे,औषधे एवढीच.... इ नाही) विकत आणतो. सोशल डिस्टन्सिंग पाळून.
करमणूक: नेटफ्लिक्स, इ. + आम्हाला लेखन व अनुवादाची ऑन लाईन कामे असतात.
कोविड झाला तर आम्हाला कोणीही पाहणार नाही हे ठाऊक आहे, आम्हाला देखील आधीसारखे करमणूकीचे कार्यक्रम. हॉटेलिंग , हिला किट्टी /भजन मंडळ इ. करावेसे वाटते पण आम्ही संयम ठेवतो.
लॉक डाऊन मध्ये गच्चीवर वॉकिंगला जात असू. बाकी व्हिडियो कॉल्स वर मुलींच्या संपर्कात असतो.
बोअर होणे हे आपल्या करमणूकीसाठी इतर साधने शोधणे व जुनी काही काळ (माहीत नाही किती काळ?) बाजूला ठेवणे या वर अवलंबून आहे.....
कुठल्याही गोष्टींची घाई करत नाही त्या मुळे वेळ सावकाश जात नाही.
हे दिवस एकंदर जीवनचक्राच्या वर्षाचे केवळ 2 टक्के आहेत असे आम्ही गृहित धरले आहेत त्या मुळे आणखी लांबले तर आम्हाला त्रास होणार नाही.
इतर छंद नेटमुळे खूप आहेत... अनेक वेबिनार, अनेक खूप प्रतिथयश गायक यांचे सुंदर कार्यक्रम नि:शुल्क उपलब्ध आहेत त्या मुळे बाहेर जायची गरज भासत नाही.
मी या काळात अनेक प्रदेशांच्या खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रयोग करतो.
खबरदारी, सकारात्मकता, माफक पण सुरक्षित राहून व्यायाम, तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग आणि इतर छंद या गोष्टींनी ही परिस्थिती सुसह्य बनवून घेतली आहे.
खूप छान रेव्यु, सकारात्मक!
खूप छान रेव्यु, सकारात्मक!
बोलण्या वागण्यात "त्यांचं
बोलण्या वागण्यात "त्यांचं पुण्यातलं / आमचं पिंपरीतलं" ऐवजी. आपलं तिथलं (महणजे पुण्यातलं) अन आपलं इथलं (म्हणजे पिंपरीतलं) असा बदल करुन बघा एकदा काही फायदा होतो का ते.>>>>
अहो बोलताना सर्वसाधारण लोकांचे असे होतेच.... पण तुम्ही मांडलाय तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बोलणाऱ्याच्या लक्षात येत नाही आपण बोलतोय त्याचा समोरचा काय अर्थ काढेल. पण समोरच्याला साधे शब्द खटकू शकतात, त्याची भावना वेगळी होऊ शकते.
सध्या घरात माझ्यासोबत माझी आई व मुलगी आहे. मुलीला सैपाक करायचा उत्साह दांडगा, आईचेही तेच. पण प्रॉब्लेम हा आहे की नात काय करते ते आजी बघत बसते आणि प्रत्येक स्टेपला 'आम्ही असे करतो, आम्ही असे करत नाही' हे उद्गार काढत राहते. मुलीचा 'आम्ही' ह्या शब्दाला प्रचंड आक्षेप. 'आम्ही असे करतो' म्हणजे मी तुमच्यातली नाही का?मी परकी आहे का हा तिचा प्रश्न.
तिचे प्रश्न ती मला खासगीत विचारते आणि मी आईला खासगीत सांगते की तू आम्हीच्या जागी मी हा शब्द वापरत जा. म्हणजे तुला जे काय म्हणायचे ते तुझे व्यक्तिगत होईल आणि 'आम्ही' ह्या शब्दात जो ग्रुपईझम डोकावतो तो डोकावणार नाही. रक्ताच्या नात्यांमध्ये काही शब्द इतके खटकू शकत असतील तर कायदेशीर नात्यांमध्ये किती खटकतील...
रेव्यु, खूप सुंदर विचार.
रेव्यु, खूप सुंदर विचार.
Pages