डान्स इंडीया डान्स...
दुपारचे बारा वाजले होते. मी खिडकीतून बाहेर बघितलं - एकाबाजूला अथांग असा प्रशांत महासागर पसरला होता. दुसऱ्या बाजूला गजबजलेलं सँटा मोनिका अाणि लॅास एंजेलिस. सूर्याची किरणे निळ्याशार सागरपटलावर चमचम करत होती. सँटा मोनिका शहराच्या मध्यभागी असलेल्या एका उंच इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन मी समुद्राकडे भान विसरुन बघत होतो.
"आज इंडीयन जेवायला जाऊया का?" माझ्या अमेरीकन बॅासने - केनने - मला भानावर आणलं.
"काही हरकत नाही" मी अर्थातच इंग्रजीत उत्तरलो.
"खालच्या उपहारगृहात नको. तिथलं जेवण चांगलं नसतं. १६ व्या रस्त्याजवळ ते नवाब आहेना, तिथे जाऊया".
मी पुन्हा म्हणालो - "हरकत नाही."
संगणक लॅाक करुन मी आणि केन निघालो.
"नवाबचा अर्थ काय?"
"मुस्लिम उमरावांना स्वातंत्र्यपूर्व भारतात नवाब म्हणत असंत". मी केनला नवाब ही संकल्पना समजावून द्यायला लागलो.
मी जरा जपूनच जेवलो त्या दिवशी. अॅाफिसमध्ये कामाचा रगाडा पडला होता. केनने मात्र तंदुरी चिकन आणि साग पनीरवर हात मारला. त्यालाही काम होतंच, पण त्याला इंडीयन आवडायचं. मी मात्र साग पनीर, नान आणि छोले खाऊन कंटाळलो होतो. पाऊण तासात अॅाफिसमध्ये परत येऊन कामाला लागलो. त्यानंतरचे सुमारे तीन तास कामात कसे गेले ते कळलंच नाही. एका महत्वाच्या प्रकल्पाचा एक मुख्य टप्पा आम्ही ४ वाजेपर्यंत हातावेगळा केला होता. आमच्या संध्याकाळच्या कॅाफीची वेळ झाली होती. आम्ही दोघं स्टारबक्स मध्ये जायला म्हणून तिसऱ्या रस्त्यावर आलो. सँटा मोनिकामधला हा तिसरा रस्ता अमेरीकेतील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. वाहनांना बंदी असलेला हा रस्ता म्हणजे एक मोठा मॅाल आहे. सदैव गजबजलेल्या या रस्त्यावर नेहमी कुणी ना कुणीतरी आपल्या कलेचं प्रदर्शन करीत असतात. कधी कुणी गिटार वाजवत असतं तर कधी आपल्याकडच्या डोंबाऱ्यासारखे खेळ करुन दाखवतात. अमेरीकेत अशा कलाकारांना आपल्यासारख्या भिकाऱ्याप्रमाणे वागवत नाहीत. हे कलाकारही बऱ्याच वेळेला पैसे मिळवण्याऐवजी आपली कला लोकांपर्यंत पोचावी म्हणून अशी ठिकाणे निवडतात.
आम्ही तिसऱ्या रस्त्याला लागताच माझ्या कानावर कुठूनतरी सतारीचे सूर पडू लागले. जरा पुढे जातोच तर एक भारतीय माणूस चक्क खाली बसून सतार वाजवत होता. त्याच्या भोवती बऱ्यापैकी गर्दी झाली होती. मी आणि केनही त्या गर्दीत सतार ऐकत उभे राहीलो.
"कुठलं वाद्य आहे हे?" केनचे प्रश्न सुरु झाले.
"सतार. नोराह जोन्सचे वडील सतार पंडीत आहेत" त्याला समजावं म्हणून मी म्हणालो.
"रविशंकर ना, माहीती आहेत मला, बीटल्सच्या काही गाण्यात वाजवली आहे सतार त्यांनी" केन उत्तरला.
थोडावेळ सतार ऐकून कॅाफी घेऊन परतत असताना केन अॅबरक्रोम्बी फिश या नावाजलेल्या दुकानापाशी थांबला.
"मला एक शर्ट मिळतो का बघायचाय"
"हरकत नाही" मी म्हणालो.
आम्ही दुकानात गेलो. दुकानात मोठ्यांनी कुठलंसं हिपहॅाप गाणं चालू होतं. केन शर्ट बघत होता आणि मी शर्टं विकणारीकडे! दोन मिनीटात गाणं बदललं आणि सुखविंदरचा ओळखीचा आवाज कानावर पडला. "आजा आजा जिंदे शामियानेके तले आजा ... जय हो". गाणं संपेपर्यंत केनची (आणि माझीही) बघाबघी संपली होती. त्याला हवातो शर्ट काही नव्हता. केनने यावेळी कुठलेच प्रश्न विचारले नाहीत कारण त्याला हे गाणं स्लमडॅाग मधलं आहे हे माहीती होतं आणि या चित्रपटावर आमचं बरंच बोलून झालं होतं. आम्ही अॅाफिसमध्ये परत आलो.
सुमारे साडेसहाच्या सुमारास केन आणि मी घरी जायला निघालो. आम्ही एकमेकांजवळ राहत असल्याने एकाच गाडीतून घरी जात असू. सवयी प्रमाणे मी नॅशनल पब्लिक रेडीयोचं स्थानिक रेडीयो केंद्र गाडीत लावलं. सुप्रसिद्ध कार्यक्रम मार्केटप्लेस लागला होता. काय रिसडाल चक्क इंफोसिसचे अध्यक्ष नंदन नीलकाणी यांची मुलाखत घेत होता. केनला मी इंफोसिसविषयी आधीच सांगून झालं होतं. मी आणि केन कान टवकारुन ऐकू लागलो. नीलकाणी आपल्या "Imagining India - The idea of a renewed nation" या पुस्तकाबद्दल सांगत होते.
"भारताच्या लोकसंख्येला आम्ही ओझं समजत होतो. हिच लोकसंख्या आता भारताच्या प्रगतीला कारणीभूत ठरणार आहे. भारत संपूर्ण जगाला बुद्धीमान मानवी भांडवलाचा पुरवठा करणार आहे". मी आणि केनने मान डोलावली. मी हे पुस्तक अॅमेझॅान डॅाट कॅाम वरुन खरेदी करण्याचा निश्चय केला.
घरी परतल्यावर फ्रिज मधून गारावलेली पोळी काढून तव्यावर भाजत ठेवली आणि मायक्रोवेव्हमध्ये कालची भेंडीची भाजी उरली होती ती गरम करत ठेवली. हे सर्व करताना माझ्या डोक्यात चक्रं सुरु झालं होतं. आजच्या एका दिवसातच आम्ही चार भारतीय अनुभव घेतले होते. मी भारतीय असल्याने मी असे अनुभव घेण्यात काही विशेष नव्हतं पण माझ्या बरोबर माझ्या अमेरीकन बॅासनेही हे सर्व अनुभवलं होतं. आणि मुख्य म्हणजे मी काहीही विशेष न करता. भारतापासून दहा हजार मैल अंतरावर इथे अमेरीकेत भारत आपली नवीन ओळख अमेरीकन माणसांना करुन देत होता.
"जागतिकीकरण हा दुतर्फी रस्ता आहे." अविनाश धर्माधिकारी आपल्या लॅास एंजेलिसमधल्या व्याख्यानात म्हणाले होते ते आठवलं मला.
आठ वाजता बायको घरी आली, मी भाजलेल्या पोळ्या खात खात तिने टिव्ही लावला. झी टिव्हीवरची आपली आवडती मालिका तिने लावली. त्या मालिकेचे शीर्षकगीत माझ्या कानावर पडलं - डान्स इंडीया डान्स...
आवडले.
आवडले.
वा.. मस्त
वा.. मस्त आहे ! आवडले!
www.bhagyashree.co.cc
सही लिहिले
सही लिहिले आहे! आवडले!
अरे मस्त
अरे मस्त लिहीलंय. शेवटचा परिच्छेद जो संदर्भ देतो तो सुरेख!
छानच..
छानच..
वैभव, मस्तच
वैभव,
मस्तच! आणि farend च्या टिप्प्णीशी सहमत कि शेवट एकदम सही केलास. मंडळ सुटल्यापासून छान लिखाण करतो आहेस. लिहीत रहा!
कल्पू
छान लिहिले
छान लिहिले आहेस.
छान लिहिले
छान लिहिले आहे... आवडले.
छान लिहीले
छान लिहीले आहे. आवडलं. खरतर नाव वाचुन उघडणार नव्हतो पण उघडला लेख हे चांगले झाले. नावामुळे कुठल्यातरी हिंदी कार्यक्रमाबद्दलचा लेख वाटला. जर काही करता आलं तर बघा.
गेल्या काही वर्षात भारताला खरोखरीच सगळ्या माध्यामातून बरेच कव्हरेज मिळत आहे. उदा. पुर्वी वॉल स्ट्रीत जर्नल मध्ये कधितरी एखादी बातमी असायची. पण हल्ली भारतासंबंधी रोज एकतरी बातमी असतेच. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मस्त
मस्त लिहिलयं.. आवडलं..
खरतर नाव वाचुन उघडणार नव्हतो >>>>> अगदी अगदी... !
चांगले
चांगले लिहिले आहे... आवडले.
शेवटी
शेवटी आलेल्या संदर्भामुळे डान्स इंडीया डान्स हे नाव ठेवलं आहे. त्याच्यापेक्षा समर्पक नाव सुचत नाही मला. नाहीतर शेवट बदलून बघावा लागेल.
आवडले.
आवडले. मीसुद्धा आधी नाव बघून उघडणार नव्हतो
पण वाचल्यावर हेच नाव योग्य वाटते.
***
Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin
वैभव, छान
वैभव, छान लिहिले आहेस. आपली पुस्तकांची देवाणघेवाण राहिली आहे. या शनीवारी?
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
>>नाहीतर
>>नाहीतर शेवट बदलून बघावा लागेल.
शेवट नका बदलू प्लीज. लेख मस्तच जमला आहे हा.
तसंही, 'नावात काय आहे? '
नाही नाही..
नाही नाही.. शेवट बदलू नका. शेवट आणी कथेचे नाव योग्यच आहे. कथेच्या नावापुढे कंसात "कथा" असे टाकले तर किंवा हा लेख ललित मध्ये हलवला तर जास्त वाचक लाभतील असे वाटते मला.
लेख फारच
लेख फारच छान झाला आहे.
आवडला.
आवडला. विशेषतः पहिला परिच्छेद--वर्णन छान जमलेय.
छान
छान लिहिलंय.
मस्त
मस्त लिहिलयंस रे!! आज सकाळीच समीर म्हणाला नी आत्ता वाचलं मी .. खुपच ओघवतं आहे.
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
मस्त
मस्त लिहिलंय.. आवडेश...
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
खूपच
खूपच छान!
सहज आणि ओघवती भाषा आवडली.
शेवट सही वाटला!
तू लिहीतोस याची कल्पना नव्हती..
लिहीत रहा.
श्रद्धा
छान आहे.
छान आहे. आवडल.
आवडलं....
आवडलं.... लेख आणि लिहिण्याची शैलीही.
-------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
जागतिकीकर
जागतिकीकरण हा दुतर्फी रस्ता आहे>> आवडलं.
Good one
Good one !
परागकण