' तिखलं हा एक मालवणी पदार्थ. पण पावसाळ्यात मिळणाऱ्या ताज्या-ताज्या माश्याच तिखलं कोकणात अगदी घरोघरी केल जात. प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते. आंबट, तिखट असा हा अगदी चमचमीत मासळीचा प्रकार... नुसत्या नावानेच जिभेला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही.‘
मॅरिनेट करण्यासाठी लागणारी सामुग्री -
हाताच्या आकाराचे १ पॉम्फ्रेट स्वच्छ धुवून साफ करून घावे, त्यावर सुरीने आडवे दोन कट द्यावे. यावर प्रत्येकी अर्धा छोटा चमचा हळद, लाल तिखट, कोकम रस/ आगळ आणि १ चमचा मीठ हे सर्व व्यवस्थित लावून झाकून १५-२० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. (छोटा चमचा घ्यावा, त्याचा आकार साहित्य चित्रामध्ये दाखवला आहे.)
तिखलं मसाला साहित्य-
लसणीच्या २-३ पाकळ्या बारीक चिरून, मूठभर स्वच्छ धुतलेली कोथींबीर, १-२ हिरवी मिरच्या (कमी तिखटाच्या), १ कोकम साल. लाल तिखट चविला+रंगाला प्रत्येकी १-१ चमचा, गरम मसाला १ चमचा, कांदा-लसूण मसाला असेल तर १ मोठा चमचा. थोडेसे पाणी.
कृती- मॅरिनेट केलेल्या पॉम्फ्रेटला एका कढईमध्ये घ्या. त्यावर वरील सर्व साहित्य लावा. थोडे शिजण्यापुरते पाणी घालून वरती एक झाकण ठेवून पलटी न करता तसेच ५ मिनिटे तसेच दुसर्या बाजुनेही ५ मिनिटे शिजवुन गॅस बंद करावा. थोडी कोथींबीर वरुन भुरभुरवी व चमचमित पॉम्फ्रेट तिखलं भाकरी बरोबर सर्व करा.
थोडे पाणी घातल्याने पॉम्फ्रेट दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजते, जास्त शिजवण्याची गरज लागत नाही. या प्रकारे ओला बांगडा आणि हलवा वगेरे मासे छान होतात.
विशेष - या प्रकारामध्ये आपण अजिबात तेल वापरले नाही. माश्याला स्वतःचे तेल असतेच तेवढे पुरे आहे. ज्यांना डॉक्टरने जेवणातील तेल कमी करण्याचा सल्ला दिला असेल तर त्यांच्यासाठी हा उत्तम प्रकार.
{https://siddhic.blogspot.com}
छान आहे रेसीपी आणि सोपी.
छान आहे रेसीपी आणि सोपी. फिश आले की करून बघेन
लव्हली ! मी व्हेज आहे पण नवर्
लव्हली ! मी व्हेज आहे पण नवर्याकरता माश्यांच्या पाकृ नेहेमीच बघते. आता जागुबरोबर तुझा पण समावेश !
फोटो कातिल आहेत बरं का !
sadhi sopi N chaan ahe
sadhi sopi N chaan ahe pakkruti...aata shravanat pomfret bharpur yetat.. malad marketmadhe.. karun baghen
surmai pan ashi karta yeil ka
surmai pan ashi karta yeil ka ?
लाळगाळू फोटो व रेसिपी..
लाळगाळू फोटो व रेसिपी..
खतरनाक फोटो
खतरनाक फोटो
अमा, रश्मी.. , श्रवु्,
अमा, रश्मी.. , श्रवु्, Chaitrali, धनुडी - थॅन्क्स टु ऑल.
आता जागुबरोबर तुझा पण समावेश !
- ओह्ह्ह रश्मी.. thank you so much. जागुताई तर माझी फेवरेटच आहे. आता जास्त पोस्ट टाकत नाही, पण तिच्या आधीच्या पुश्कळ रेसिपी अगदी तोपासु.
surmai pan ashi karta yeil ka ?
-श्रवु्, होय. सुरमईचे पीस देखील या पद्धतीने करतात आणि होतेही छान. मला पर्सनली सुरमई अजिबात आवडत नाही. म्हणुन मी करत नाही पण माझी आई करते. तुम्ही करु शकता.
Siddhi mala pan Surmai avdat
Siddhi mala pan Surmai avdat nahi.. hubby la avdate..
लाळगाळू फोटो व रेसिपी.. =
लाळगाळू फोटो व रेसिपी.. = खरच...
Lock down मध्ये fish .... , missed lot...
अधाशासारखा बघतोय फोटो मी
अधाशासारखा बघतोय फोटो मी कितीतरी वेळा... अगदी हावरट नजर झालीय माझी!!! कधी एकदा कोकणात जातोय असं झालंय त्यात असले कातिल फोटो..
मी खात नाही पण मस्त दिसते आहे
मी खात नाही पण मस्त दिसते आहे डिश!
तिखलं मसाला अख्खाच ठेवायचा का
तिखलं मसाला अख्खाच ठेवायचा का? की वाटून घेतला तर चालेल?
Siddhi mala pan Surmai avdat
Siddhi mala pan Surmai avdat nahi.. hubby la avdate..
श्रवु् - सेम, पण केव्हातरी ट्राय करातला हरकत नाही.
सतीश, अजिंक्यराव पाटील, sneha1 - tnx
मी चिन्मयी - मसाला वाटून घायला हरकत नाही, पण चविमध्ये काहीही बदल होत नाही. मग कशाला एवढी मेहनत घ्यायची ना.
आणि ही रेसिपी अशीच गावरान आणि ओबड-धोबड टेस्टी लागते.
करून बघायला हवं एकदा हा
करून बघायला हवं एकदा हा प्रकार, पण इतकी सारी अन न चिरलेली कोथिंबीर बघून कसेसेच झाले सो कोथिंबीर वगळून करेन
फिश, चिकन..... तुम्ही
फिश, चिकन..... तुम्ही disinfect...कसे केले? अनुभव share केले तर अवडेल....
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो.
टेम्प्टींग आहेत !
आमच्याकडे सहसा पापलेट कोणाला आवडत नाही. त्याची चव फिकी वाटते. पण तिखलं आवडीचा प्रकार आहे सर्वांच्या. तो बांगड्याचा करतात सहसा. मला तर बांगडाही फार आवडत नाही. पापलेट फिकी चव तर बांगडा त्याउलट जास्त उग्र वाटतो. त्यामुळे आपले हलवा सुरमई रावस झिंदाबाद
VB - इतकी सारी आणि न चिरलेला
VB - इतकी सारी आणि न चिरलेला असली तरी स्वच्छ धुवून हाताने तोडलेली कोथिंबीर आहे. माझ्या प्रत्येक जेवनात मुबलक प्रमाणात कोथिंबीर असतेच. त्याचे खुप फायदे आहेत.
कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक सापडतात.
भरपुर प्रमाणात vitamin -A आहे. त्यामुळे मी तर त्याचे कोवळे देठही सोडत नाही.
सतिश disinfect साठी मी तरी
सतिश disinfect साठी मी तरी स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावर लिंबू आणि मिठ घालून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवून देते. मग त्यानंतर पुन्हा एकदा धुवून बाकीचे मसाले वगैरे लावते. मग ते चिकन असो अथवा फिश. याला अजुन दुसरा ऑप्शन मला माहित नाही. तुम्ही तुमची पद्धत शेअर करू शकता.
ऋन्मेऽऽष- tnx .
बांगडा खरोखरच उग्र आणि उष्ण देखिल आहे. पण मला पापलेट आवडते. आणि तिखल या प्रकारात रावस, हलवा, सुरमई, पापलेट हे सगळेच मासे चविष्ट होतात. मसाल्याची चव यात पुरेपूर उतरते. अगदी ओला बोंबील सुध्दा टेस्टी होतो. पण लगेच शिजल्याने पार खिमा होण्याची भिती असते म्हणून आम्ही तो प्रकार सहसा टाळतो.
ओला बोंबील म्हंटले तर कुरकुरीत फ्राय बरी.
यम्मी दिसतंय...करणार!!
यम्मी दिसतंय...करणार!!
पण सिद्धी चमचाभर तेलाशिवायही
पण सिद्धी चमचाभर तेलाशिवायही चव बरी येते का? दिसतय मस्त पण .... साशंक आहे म्हणुन विचारले.
disinfect साठी मी तरी स्वच्छ
disinfect साठी मी तरी स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावर लिंबू आणि मिठ घालून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवून देते. ===>
ओके..... ह्या प्रकारे होणार....हे नही लक्षात आले ..... आता try करतो....
सिद्धि thanks...
छान पाकृ!
छान पाकृ!
धन्यवाद रायगड, सामो, सतिश,
धन्यवाद रायगड, सामो, सतिश, स्वाती
सामो एकदा तेल वापरुन ही रेसिपी ट्राय कर.
आणि एकदा बिन तेलाची... बघ चवी मध्ये काही फरक जाणवतो का. मी दोन्ही पध्दतीने करुन पाहिले आहे. काहीच वेगळे वाटले नाही.
नक्की सिद्धी. मी ट्राय करेन
नक्की सिद्धी.
____
साबा तेलात आमसूल व ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकत वर ताट ठेवत ज्यामुळे ती धुरी कोंडून कालवणाला तिचा वास लागे. ते फक्त तेलाशिवाय करता येणार नाही.
मी दोन्ही प्रकारे, ट्राय करेन
फोटो छान आलाय फक्त बचकभर(
फोटो छान आलाय फक्त बचकभर( बारिक) न चिरलेली कोथिबिर खुपतेय त्यात,
कोथिबिर सजावटीत असो कि वाटणात छान बारिक, किमान मध्यम चिरलेलीच हवि.