दिल बेचारा

Submitted by प्रगल्भ on 9 July, 2020 - 14:51

अत्ताच कोणाचा तरी धागा वाचला सुशांतला श्रद्धांंजली म्हणून होता
सुशांत सिंह राजपूत च्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर

https://www.youtube.com/watch?v=GODAlxW5Pes

"दिल बेचार"

फ्री टू वॉच आहे बहुतेक वाचलय कुठे तरी

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आपल्या या लाडक्या कलाकाराचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' आज hotstar disney वर रिलीज झाला. त्याच्या चाहत्यांनी नक्की पहा. वो नहीं उसकी यादे सही....

सिनेमा एकदम मस्त..खास करून रात्री छान शांततेत बघण्यात मजा.. टायटल ट्रॅकतर अमेझिंग..जाने तू या जाने ना मधल्या “तू बोले मै बोलू“ गाण्याची आठवण झाली.. कधी कधी वाटतं सिनेमातलं बेस्ट गाणं रेहमान स्वत:साठी ठेवत असावा किंवा त्याच्या आवाजानेच ते बेस्ट होत असावं

गाणी आवडली नाहीत

आता तर रेहमान बोलला , माझ्याविरुद्ध कट सुरू आहे

माझे मित्र मला शिव्या दिले तो पिक्चर बघून...
मझ्याकडे अजुन त्याच्या पायरेटेड लिंक्स आहेत
पण मि नाय बघणार
छिछोरे वर खुश आहे मी

अगदीच टिपिकल हिंदी सिनेमा आहे. कॅन्सर पेशंट, त्याच्यावर प्रेम करणारा हिरो/हिरोईन, दिलदार आईबाबा, शेवटच्या पिरियडमध्ये भरभरून जगणं इ इ पूर्वी आपण किती वेळा पाहिलं आहे. या सिनेमाचं IMDB रेटिंग 9.8 म्हणजे काहीच्या काहीच. सुशांत सिंग गेला नसता तर हा सिनेमा चालला असता का किंवा IMDB रेटिंग 5-6 तरी असतं का?

हिरोईन गोड आहे, सुशांत सिंग काही सीन्स सोडले तर ठीकठाक. बाकी कथा बोअर. गाणं - ते अभिमन्यूने अर्धवट सोडलेलं, ते आवडलं.
सहकलाकार - छान कामं, पण टिपिकल हिंदी सिनेमा कॅरेक्टर्स (जीव टाकणारा मित्र, डॉक्टर अंकल, काळजी करणारी आई, दिलदार बाबा. काहीच वेगळं नाही)

"हिरोईन गोड आहे," ---> अ‍ॅडव्हर्टाइजमेंट गर्ल आहे
तिच्या खूप अ‍ॅडव्हर्टाईज पाहिल्यात...

काल प्राईमवर पाहिला.चांगला आहे पण थोडा स्लो वाटला.बहुतेक ज्या पुस्तकावरून बनला ते स्लो असेल.सर्वांची कामं छानच आहेत.
मुळात सांगायला जास्त स्टोरी नाहीये.
आमच्या घरात अशी चर्चा झाली की बायपोलर असताना सुशांत ने इतका इंटेन्स चित्रपट करायला नको होता.
पिक्चर ची रेटिंग जास्त करून एम्पथी आणि श्रद्धांजली आहेत.पण पिक्चर एकदा नक्की बघावा.सुशांत चा आणि संजना चा वावर मस्त आहे.शेवट शेवट चे सीन परत रडवतात.
योगायोगाने लोकांना आवडलेला हा आणि केदारनाथ दोन्ही मध्ये हिरोचा शेवट चांगला नाही(स्पॉयलर नाहीये कारण दिल बेचारा च्या ट्रेलर मध्येच सांगितले आहे).सुशांत असता तर या पिक्चर ला मिळालेला प्रतिसाद पाहून खुश झाला असता.
मला केदारनाथ चं गाणं नमो नमो जी चा व्हिडिओ पाहून जास्त रडू येतं.(खरं तर तो माझा अगदी प्रचंड आवडता वगैरे नव्हता, पण आता त्याचं भाषण ऐकून, गाणी पाहून रडू येतं. मे बी हॉर्मोन्स, यु नो...)

सिनेमाचं IMDB रेटिंग 9.8 म्हणजे काहीच्या काहीच.
>>>>
हे रेटींग कोण आणि कश्याच्या जीवावर देते?
९.८ असेल तर खरेच अशक्य आहे हे...

सुशांत असता तर या पिक्चर ला मिळालेला प्रतिसाद पाहून खुश झाला असता>>> इथेच तर खरी मेख आहे. सुशांत असता तर पिक्चर कधी आला कधी गेला लोकांना समजलाच नसता.

"हे रेटींग कोण आणि कश्याच्या जीवावर देते?" -----> गूगल युजर्स कडून मिळणारे अप व्हॉट्स सर.
तुम्ही नुसतं दिलं बेचारा सर्च करा फिल्म खाली गूगल युजर्स चे अप व्होटस दिसतात.

टिक टॉक ला खाली आणण्या करता जसे प्रयत्न भारतीयांनी केले रात्रंदिवस तसेच इथे अप व्होटस् साठी सुशांत च्या फॅन्स नी केले बघा

सुशांत मला पण एवढा आवडत नव्हता
पण मी पाहिलेला एकमेव अॅक्टर आहे
जो कायम हसमुख असायचा.
मीडिया समोर , शो मध्ये , रियल लाईफ मध्ये रस्त्यावरचे चालताना वगैरे चे त्याचे फोटो देखील कायम चेहऱ्यावर smile
असलेले आहेत

एक प्रामाणिक फ्री सल्ला- तुम्ही किंवा तुमच्या जवळचे कोणी क्रोनिक डिप्रेशन ने त्रस्त असाल तर हा सिनेमा सध्या तरी न पाहिलेलाच चांगला. आधीच लोकडाउन आणि करोनामुळे त्रासलेले असाल आणि त्यात असा सिनेमा भर घालु शकतो. नात्यातील मुलीची केस पाहतोय. फॅमिली ग्रुपवर तिच्या अजब पोस्ट पाहून लगेच शन्का आली सर्वांना. नंतर आम्ही स्वतः सकाळी हा सिनेमा पाहिल्यावर खात्री झाली. सिनेमा चांगलाच आहे पण नैराश्याने ग्रासलेली लोकं आधीच volatile असल्याने त्यांनी टाळलेलाच बरा

हा चित्रपट मला अत्यंत वाईट प्रकारे एडिट केलेला वाटला. एका प्रसंगाची दुसऱ्याशी गुंफण नाहीये. त्यांच्यातल्या मैत्रीलाही सुरुवातीला पुरेसा वेळ दिलेला नाहीये. माझ्यामते आता सुशांत गेल्यावर may be री- एडिट केला असावा. कहाणी टिपिकल आहेच. पण मला गाणी आवडली, ट्रॅक्स वेगळे आणि फ्रेश वाटतात. मी पूर्ण चित्रपट सुशांतच्या आठवणीत पाहिला, त्यामुळे त्याचा वावर आवडलाच. हिरोईन पण चांगली वाटली. मुळात स्टोरी घिसीपीटी असली तरी पटकथेत थोडे नावीन्य हवे होते. मीही खूप रडले शेवटी शेवटी.
सुशांत ने त्याला पहिली संधी देणाऱ्या कास्टिंग डिरेक्टर साठी स्क्रिप्ट पण न वाचता साईन केलेला चित्रपट आहे हा.
IMDB रेटिंग तर निव्वळ सुशांत वरचं प्रेम आहे... त्यामुळे ते खटकलं नाही मला तितकंसं.

ज्यांनी दिल बेचारा पहिलाय त्यांच्याकरता उगाच एक ( हलकट ) प्रश्न माझ्या डोक्यात आलाय :))

ते मी ट्रेलर आणि काही गाणी पाहिली आहेत... मला प्लिज सांगाल का की परदेशात उगाच या पिक्चर च शुटिंग केल...
अस कुठे वाटत का हा पिक्चर बघताना :)) :)) :))
( लंडन मधल शुटिंग असेल बहुतेक )

"प्राईम वर आहे?"---> नो ड्युड
ओन्ली हॉटस्टार Wink
पायरेटेड हवी असल्यास आहे माझ्याकडे 480पी, 720पी, 1080पी
पण वर म्हणालो तसं , ज्या मित्रांंना लिंक दिली त्या सगळ्यांनी शिव्या दिल्यात आईभैन काढून (मला हसायचय खरं पण मला इमोजी कसे टाकू नाय माहीत आणि 'हा' असं म्हणून हसलो तर ते वाईट दिसत आहे. )

हे घ्या
स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत
https://www.maayboli.com/node/1818

हा हा साठी Lol
विसर्ग आणि इंग्रजी कळफलक निवडून कॅपिटल D

स्वारी
मी प्राईम लिहिलं पण हॉट स्टार वर पाहिला(मी कामं करत होते तेव्हा पब्लिक ने लावलेला होता.त्यामुळे कश्यावर आहे लक्ष नाही दिलं.)

हा, मी आणि अनु यांची पोस्ट वाचून प्राईम वर शोधत बसलो
युतुयब ला आहे पण तो फेक आहे असे वाटत आहे

मला नाही बघायचा, मला असले डिप्रेशन वाले मुव्ही नाही फारसे आवडत, घरच्यांना बघायचा होता म्हणून शोधत होतो

Hotstar पण घायला पाहिजे आता

लोकहो तटस्थपणे विचार करता पिक्चर कसा आहे?
मला आवडतात रडवणारे चित्रपट. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. डोले साफ होतात.

Fault in our stars वरुन घेतलाय ना? तो बघितलाय मी.
प्रचंड रडले. हा बघून पण येइल रडू. म्हणून अत्ता नाही बघणार.

>>>मला आवडतात रडवणारे चित्रपट. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. डोले साफ होतात.>>>> पण दिल हेवी हो जाता है ना!

Please don't share pirated links . Protect copyright of the film. Free

Please don't share pirated links . Protect copyright of the film. Free release is available.

पण दिल हेवी हो जाता है ना!
>>>

होऊ द्यायचे. इमोशन्सच नसतील तर माझ्यासाठी तरी आयुष्य जगण्याला काही अर्थ नाही. रडवणारे पिक्चरही बघायचे आणि जिथे रडू येते तिथे बिनधास्त रडायचेही. तसेही मी कर्क राशीचा असल्याने डोळ्यात पाणी चटकन येते Happy

Pages