एखाद्याला कसं खुश करावं.. ?

Submitted by पाचपाटील on 2 July, 2020 - 04:00

एखाद्याला कसं खुश करावं??

१. त्याला रोज गुदगुल्या करून
२. त्यानं तिकडून फोनवर नुसतं 'मी बोलतोय' असं म्हटलं की इकडं तुम्ही लगेच लोटांगण वगैरे घालून
३. त्याच्या फुसक्या जोक्सना हसून
४. त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे देवापुढचं फूल असल्याप्रमाणे तुमच्या मस्तकी लावून
५. तो जर 'बैठकीतला' कार्यकर्ता असेल तर त्याची पिण्याची बिलं प्रत्येक वेळी तुम्हीच भागवून
६. त्यानं काल्पनिक प्रेमप्रकरणांमध्ये केलेल्या, काल्पनिक पराक्रमांच्या सभा ऐकताना, डोळे विस्फारून
७. (तरीही) त्याची बायको असेल तर तिच्यापुढं "वैनी, माणूस मनानं लय चांगलाय हो.. असा राजा माणूस मला आजवर भेटला नाही" असलं काहीतरी म्हणून
८. त्याला काही छंद वगैरे असतील तर, चान्स मिळेल तेव्हा त्या छंदांचा चारचौघांत जाहीर जल्लोष करून
९. तो जर वरीष्ठ असेल आणि त्यानं बोलता बोलता
स्वत:च्या वयाचा उल्लेख केला की लगेच 'पण एवढं वय असेलसं वाटत नाय हो सर तुमचं'.. असं निरागस चेहऱ्यानं म्हणून
१०. त्याची कुठं इज्जत निघत असेल तर, आपलं लक्षच नाही असं दाखवून
११. तो जर वरीष्ठ असेल आणि त्यानं तुम्हाला गंडवून एखादं काम तुमच्या गळ्यात घातलं, तर ते तुमच्या लक्षातच आलं नाही, असं दाखवून
१२. बैठकीत कधी त्याचा गॉसिपिंगचा मूड व्हायला लागला की लगेच त्याच्या बाजूनं रणमैदानात उतरून, त्याला त्रास देणाऱ्या काल्पनिक लोकांवर साळसूदपणे चिखल
उडवायला सुरुवात करून...
१३. आंतरराष्ट्रीय राजकारणावरचं त्याचं विश्लेषण एकदम परफेक्ट असल्याचं त्याला पटवून देऊन (पण त्याचवेळी त्याच्या घराखालचा दुकानदारही त्याला ओळखत नाही, हे तुमच्यापुरतंच ठेवून)

अशी ही यादी बरीच वाढवता येईल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol !

त्यानं काल्पनिक प्रेमप्रकरणांमध्ये केलेल्या, काल्पनिक पराक्रमांच्या सभा ऐकताना, डोळे विस्फारून
७. (तरीही) त्याची बायको असेल तर तिच्यापुढं "वैनी, माणूस मनानं लय चांगलाय हो.. असा राजा माणूस मला आजवर भेटला नाही" असलं काहीतरी म्हणून>>>‌‌‌‌>>> Proud Proud

भारीच लिहिलंय.. Lol