आपल्याकडे वागण्यात काही दोष
आढळलेल्या व्यक्तीला
किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला
अगदी सहज जनावर असं
संबोधलं जातं
म्हणजे मग हे संबोधणाऱ्यांना
असं सूचित करायचं आहे का की
जनावर
एखाद्याचं सत्य किंवा सज्जनता
खटकली म्हणून
त्याची हत्या करू शकते?
किंवा एखाद्याच्या अमानुष अत्याचाराला
कंटाळून आत्महत्या करू शकते?
जनावर एखाद्याच्या तत्व आणि निष्ठेवर
प्रहार करू शकते? किंवा
जनावर सामुहिक बलात्कार करू शकते?
जनावर अपमान करू शकते? किंवा
खोटा सन्मान करू शकते?
जनावर गरजेच्या गोष्टी
गरजेपेक्षा जास्त साठवू शकते?
धर्मभेद, जातीभेदाच्या आगी पेटवू शकते?
जनावर प्रगती खुपतेय म्हणून
एखाद्याचा पाय ओढू शकते?
स्वार्थासाठी एखाद्या समोर
हात जोडू शकते?
चोरी, दरोडा किंवा फसवणूक करू शकते?
वारंवार जाणूनबुजून एकच चूक करू शकते?
जनावर बनावट प्रेम, बनावट भाव
बनावट हावभाव करू शकते?
एखाद्याच्या मनावर कधीही न
भरून येणारा घाव करू शकते?
या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर "हो"
असेल तर
वागण्यात काही दोष
आढळलेल्या व्यक्तीला
किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला
जनावर म्हणणं अगदी योग्य आहे....
खूप छान
खूप छान