ताई (भाग १ )

Submitted by मिरिंडा on 27 June, 2020 - 01:58

ताई (भाग १ )
-----------------

माझी आणि दीपाची ओळख जुनीच होती. कॉलेजची चार वर्षं ती माझी वर्गमैत्रिण असल्याने आम्ही खूपच जवळ आलो होतो. शेवटच्या वर्षी मी तिला प्रपोज केलं आणि तिनेही ते मान्य केले.फक्त तिची एकच अट होती की मी तिला घरी येऊन मागणी घालावी.अर्थात कोर्स पूर्ण झाला तरी कमवायला सुरुवात न झाल्याने सध्यातरी आमची इच्छा दोघातच राहिली.तिच्या घरी मी दोनचारवेळा जाऊन आलो होतो. तिची आई लहानपणीच गेल्याने तिचा सांभाळ तिच्या पप्पांपेक्षा तिच्या ताईनेच केला होता. त्यामुळे तिला ताईचं कौतुक जास्त होतं.तिच्या घरात ताईची जरब जाणवायची, त्यामानाने तिचे पप्पा फारच फ्री होते.,,,,ताई दिसायला काळीसावळीच होती. तिचे खांदे थोडे रुंद ,नाक टोकदार ,ओठ जाडसर, डोळे मात्र स्वच्छ आणि टपोरे होते. घाटदार छाती, जिथे प्रथम लक्ष जात असे.आवाजात थोडी धार होती. पण मला पप्पांमुळे अजिबात टेन्शन नव्हतं.मी दीपा करता घरी येतो याची तिलाही कल्पना होती. ...
माझे आईवडील गावी होते. पण मला वडिलांनी वन बीएचके फ्लँट घेऊन दिला होता. त्यामुळे मला जागा घेण्याची गरज नव्हती.मी माझ्या विषयात डॉक्टरेट मिळवली. लवकरच मला एका कॉलेज मधे प्रोफेसरशिप मिळाली. दीपाला सांगितल्यावर ती म्हणाली , " तू तर लकीच आहेस बाबा. यात जवळजवळ चार वर्षांचा काळ लोटला होता. एक दिवस आम्ही चौपाटीवर बसलो असताना मी दीपाला विचारलं, " तुला विचारल़ तर राग येणार नाही ना . " तिने मानेनेच नाही म्हंटलं. मी चांचरतच विचारलं, " ताई लग्न अजून कसं झालं नाही..,,? " मला बरंच काही विचारायचं होतं. पण तिला आवडणार नाही असं वाटून मी थांबलो.
थोडा वेळ जाऊन देऊन दीपा म्हणाली, " ताई करिता चारपाच स्थळं पाहिली होती पण ती कुणालाच पसंत पडत नव्हती. का ते माहीत नाही. मुलगा पाहून गेल्यावर दोन चार दिवसातच उत्तर यायचं, आपलं जमेल असं वाटत नाही,किंवा पत्रिका जमत नाही अशी ठाशीव उत्तरं यायची. एकाच मुलानी ताई थोराड दिसते असं कळवलं होतं . ते ताईला लागलं. मग तिनी मुलं पाहण्याचं बंद केलं. ". .... मला प्रोफेसरशिप मिळाल्याने एक दिवस पेढे घेऊन मी दीपाच्या घरी गेलो. रविवार असल्याने पप्पा घरीच होते. दीपानी दार उघडलं. आश्चर्यानी ती म्हणाली, " हे काय ? अचानक ? बोलला नाहीस येणार आहेस ते. " त्यावर माझ्या खंवचट स्वभावानुसार मी म्हंटलं, " का पंचारती घेऊन आली असतीस की काय ? " तिला राग आला होता ,हे माझ्या लक्षात आलं. मी पप्पांकडे जाऊन त्यांना नमस्कार करीत म्हंटलं, " पेढे घ्या , मला सिद्धेश्वर कॉलेजमधे प्रोफेसरशिप मिळाली. " ते खूष होत म्हणाले, " वा ! सिद्णधेश्ववर म्हणजे प्रसिद्ध कॉलेज आहे. चला म्हणजे लग्नाचा मार्ग मोकळा झाला...छे हो . दीपाला जॉब लागला की मगच. " दीपा थोडी नाराज दिसली. पण मी लक्ष दिलं नाही. आतून ताई आल्या अणि त्यानी चहा बिस्किटं आणली. त्या मात्र बसल्या नाहीत. लगेचंच आत गेल्या. मी दीपाला खुणेनी ती आत का गेली असं विचारल्यावर लक्ष देऊ नकोस असे हातवारे केले. असो पप्पांनी विचारलं ," मला वाटतं मी आता तुमच्या घरी जाऊन लग्नाबद्दल विचारायला हरकत नाही . " अर्थातच मी त्याला नकार दिला. मी मागणी घालायची होती ना. इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन मी उठलो. तेवढ्यात आतून ताई येऊन म्हणाल्या, " परवा आमच्याकडे जेवायला यायला हरकत नाही तुम्हाला . " ते ऐकून पप्पा म्हणाले , " पाहिलत, ताईला खूपच जाणीव आहे. खरंच याच तुम्ही परवा रात्री. " त्यावर ताईच्या घाटदार छातीकडे पाहात मी पाहू म्हंटलं आणि निघालो. माझ्या डोळ्यांकडे पाहत दीपा माझ्या बरोबर खाली आली. मला झापत ती म्हणाली " तुला अगाऊपणानी बोलायला बरं जमतंय रे. काही जेवायला येण्याची गरज नाही ". मी मुकाट्यानी निघून गेलो.........
या घटनेला महिना दोन महिने झाले.मध्यंतरी दीपा भेटत राहिली. मी फारसा घरी जात नव्हतो . पण तिला त्याची पर्वा नव्हती.मी तिचाच आहे याबद्दल तिची खात्री झाली होती. मलाही तिच्याबद्दल तेवढंच आकर्षण होतं. दीपा भेठत राहिली तरी ताई बद्दल बोलणं टाळताना दिसली. मी ताईचा विषय काढल्यावर ती वैतागून म्हणाली, " तू हल्ली ताईची आठवण फार काढतोस. का बरं ? " ...." अगं सहजच. " ......"आपल्यामधे ताईला आणीत जाऊ नकोस.तिचं सगळंच वागणं चांगलं आहे असं नाही. " त्पावर मी विचारलं " नीट सांग ना . " तिने ते बोलणं सोडून दिलं. मीही जास्त जोर दिला नाही. पप्पाही ताईबद्दल जास्त बोलत नसत.एक दोन वेळा दीपा आणि मी फारच जवळ आलो..पण दीपाने सावरल्याने फारसा प्रॉब्लेम आला नाही. मी तर आता लग्नासाठी अधीर झालो होतो.
एक दिवस तिचा फोन आला . तिला जॉब मिळाला होता. सरकारी काम आउटसोर्स केलेल्या कंपनीकडून तिची निवड झाली होती. पण त्यासाठी तिला दूरच्या खेड्यात जावं लागणार होतं. अजून तरी केव्हा ते कळलेलं नव्हतं. दीपा आता जाणार या जाणिवेने तिचा सहवास मिळावा म्हणून तिला विचारल्याशिवाय सरप्राइज म्हणून शनिवारची सिनेमाची दोन तिकिटं काढली होती . एक दिवस तिचा फोन आला " मला तुझ्याशी काही बोलायचंय " मी तिला उत्साहाने शनिवारची शेवटच्या शोची दोन तिकिटं काढली असल्याचं सांगितल.... त्यावर ती फोन करून सांगते असं म्हणाली. तिचा फोन आला नाही. याचा अर्थ ती घरीच आहे असा मी घेतला. शनिवारी अचानक पाऊस पडला. थंड वाऱ्याबरोबर मातीचा गंध आणि ओलसरपणा वातावरणातील मादकता वाढवीत होता. आता मी तिकिटं काढल्याचा शहाणपणाच केला असं वाटू लागलं......... रात्रीचा शो आणि बरोबर दीपासारखी रूपगर्विता. ती रस्त्याने जाताना तिच्याकडे एकदा पाहणारा माणूस पुन्हा वळून पाहातच असे. ओव्हल शेप चेहरा , चकचकीत डोळे , थोडंसं अपरं नाक , नाजूक शिडशिडित बांधा , टोकदार पण नाजूक छाती आणि लाल गोरेपण तिला शोभून दिसत होतं. खरंतर आकर्षक वर्णन करायला मी काही लेखक नाही. यातच तुम्ही समजून जा. तिला जवळ घेतल्यावर तिचे ऊष्ण श्वास मला फार आवडायचे. मी फारच अधीर झालो होतो. हाफ डे असल्याने वेळ झाल्यास दीपाकडे राहण्याचा माझा मानस होता. मी दीपाला फोन लावूंन पाहिला. तीनचार वेळा लावल्यावरही " ये नंबर मौजूद नही है किंवा धिस नं. इज नौट रीचेबल " असली उत्तरं आल्याने माझा विरस झाला. घाईघाईने गाडी काढली. पावसाची रिपरिप चालूच होती . मला थंडीपेक्षा पावसाळा आवडतो. त्यात मादकता जास्त असते. आजूज्बाजूला फिरणाऱ्या स्त्रिया व मुली खूपच आकर्षक आणि मादक वाटतात. वातावरणाचा परिणाम दुसरं काय ....? दीपाच्या सोसायटीत एक चांगली गोष्ट होती, ती म्हणजे दोन पार्किंग्ज. तिचं घर माझ्या घरापासून सहासात किलोमिटर लांब होतं. तुम्हाला वाटत असेल की माझ्या आईवडिलांचा काहीच रोल नाही की काय . मी प्रत्येक खबर आईपर्यंत पोचवीत असे. अगदी दीपाचे फोटो आणि व्हीडीओ सुद्धा. आई खूष होती. इतकी सुंदर मुलगी आपल्या घरात येणार म्हंटल्यावर तिचे सारखे फोन यायचे. कधी कधी दीपा पण आईशी चॅटिंग करीत असे. मी जवळ जवळ अर्ध्या तासाने दीपाच्या सोसायटीत शिरलो. जाताना गजरा न्यायला विसरलो नव्हतो. कारण आमचा तो एक कार्यक्रम असायचा. थेटरच्या अंधारात तिच्या केसात गजरा माळणं आणि हक्काचं चुंबन घेणं‍ . याची तिलाही नशा येत असे. मी अजूनपर्यंत तरी स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करीत नसे. पण दीपाचे पप्पा मात्र करीत आणि मला ऑफरही करीत. पण माझा नकार पक्का असे. आठ वाजत होते . मी दीपाच्या घरावरची बेल वाजवली. पप्पांनी दार उघडलं. आत शिरत मी दीपाबद्दल विचारलं आणि सिनेमाला जाणार असल्याचंही बोल्लो . पण पप्पांनी मात्र दीपाने जॉब जॉइन केल्याचं सांगितलं.. विरस आणि राग या दोन्ही भावना माझ्या चेहऱ्यावर दिसत असाव्यात. पप्पा म्हणाले, " आत्ताच तर सात वाजता गेली ती. तुम्हाला फोन करायचा खूप प्रयत्न केला तिनी. पण तुमचा फोन नॉट रीचेबल येत होता. " माझ्या खिशातला गजरा सुकत चालल्याचा मला भास झाला. माझे खांदे निराशेने पडले असावेत. पप्पा माझ्याजवळ येऊन खांद्यावर हात ठेवीत म्हणाले " टेक इट ईझी, अविनशराव. आपण तिला परत फोन लावू. " मी कपाळावरचा घाम पुसला. सगळी मादकता आणि आकर्षण एका क्षणात उतरलं..........
(क्र म शः )

Group content visibility: 
Use group defaults

वेलकम बॅक !!!

परिच्छेद पाडून लिहायला हव होतं.

बादवे, संतराम पुर्ण करा कि प्लीज

कसे आहांत काका? परत लिहायला लागलात हे पाहून आनंद वाटला. Happy

हा भाग छान झालाय.
चिरुमाला लवकर पुर्ण करा बरे !