©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.
भाग १२
https://www.maayboli.com/node/75209
आठ दिवस...
आठ दिवस कसे गेले कुणालाही कळलं नाही.
पर्वणी हळूहळू सरावली, रुळली.
स्नेहलही मनूने केलेल्या विनंतीमुळे पर्वणीला साथ देत राहिली.
कुणी अपेक्षाही केली नव्हती, या वेगात सगळ्या गोष्टी पूर्वपदावर आल्या.
त्यादिवशीही पर्वणी दमून आली होती. ती येऊन सोफ्यावर बसली.
"थकली असशील ना?" मनू तिच्याजवळ येत म्हणाला.
"हो रे. सवय नव्हती राहिली मला."
"पण तू एन्जॉय करशील परु. इट वॉज युवर ड्रीम." मनू हसला.
"हो मनू. थँक्स."
मनू हसला.
"सगळं ठीक आहे ना परु आता?" त्याने विचारले...
"असं का विचारतोय?"
"सांग ना..."
"हो मनू, सगळं कधीच इतकं छान नव्हतं. फक्त तू नाहीस."
"वेडी... सगळं चांगलं होतंय."
" लवकर परत ये पण." ती म्हणाली.
मनूने तिचा हात हातात घेतला.
"आज शांतपणे माझं एक बोलणं ऐकशील? आणि ते मान्य करशील?"
"काय?"
"हे डिओर्स पेपर्स. मी साईन केलेत. आणि तू मला शांतपणे डिओर्स द्यावास."
"व्हॉट!!!!" पर्वणीला प्रचंड धक्का बसला.
"मनू, आता प्लिज असे काहीही धक्के देऊ नकोस. मी कोलमडून पडेन."
"नाही, परु, नाही होणार काही. आपण फक्त शांतपणे बोलूयात."
"मनू. मी कितीदा सांगू मी चुकलेय."
"आणि मी कितीदा सांगू, तू चुकली नाहीस. तू शांत हो, प्लिज.
पर्वणी, हा निर्णय घेताना मी किती विचार केला असेल, माहिती नाही. सुरुवातीपासूनच आपल्या नात्याचा विचार करत गेलो, तर आपण एकमेकांसाठी बनलोच नव्हतो. मी बदलत गेलो, नातं टिकून राहिलं. प्रत्येक वेळी तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत राहिलो, आणि मी बदलत गेलो. आपल्या नात्यात नेहमी शेवटचा निर्णय तुझा होता. पण मी मुळात कोण होतो, आता कोण आहे, मला नाही कळत."
"मनू अरे..."
"पर्वणी, हा निर्णय घेताना खूप कष्ट पडलेत मला, पण मी स्वतःला हरवत गेलो."
पर्वणी अजून सुन्नच होती.
"तू पुण्याला येताना आपण का बोलत नव्हतो, याचं कारण माहितीये ना तुला?"
"मनू, आपले वाद झाले होते. तुझ्या ओबसेशनमुळे."
"की माझी ट्रीटमेंट चालू होती म्हणून???" मनू हसला.
"मनू..."
"एका वेड्याशी लग्न करून मी माझं आयुष्य बरबाद करून घेणार नाही." मनूने शब्द उच्चरले.
"मनू, प्लिज."
"पर्वणी," मनूने तिचा हात अजून घट्ट दाबला.
"मी फक्त आज बोलणार आहे. मी फक्त आज बोलणार आहे..."
त्याने दीर्घ श्वास घेतला.
"मोठ्या विश्वासाने मी फाईल दाखवली होती. मी वेडा नव्हतो झालो, फक्त मी तुझ्याविना राहू शकत नव्हतो. आणि मी चुकत होतो तेव्हा, म्हटलं चला, ट्रीटमेंट तरी काम करेल. वेडा झालो असेल, तर तुझ्या प्रेमात.
नंतर मात्र माझं एक उद्दिष्ट झालं, फक्त माझं प्रेम मिळवणं. त्यासाठी बदलत गेलो, परफेक्ट बनत गेलो. तुझ्या सुखासाठी झुरत राहिलो. पण खरं सांगू??? त्यातच माझा आनंद होता. तू माझा आनंद होतीस. तू जवळ असणं हाच माझा आनंद होता.
हेमल तुझ्या आयुष्यात परत आला, आणि सगळं बदललं. तू चुकली नाहीस पर्वणी, मात्र माझ्या प्रेमाचा गर्व क्षणार्धात उतरला...
या दिवसात मी कितीदा मूक अश्रू ढाळले असतील, माहिती नाही. कितीदा व्हिलन ठरलो असेल माहिती नाही. पण मला तुला प्रोटेक्ट करायचं होतं. मला तुला वेडेपणा नव्हता करू द्यायचा, ज्याने तुझं आयुष्य खर्ची पडेल...
...आणि मी इतका वेडा, की सगळं कळत असून, तुला कधी थांबवलं नाही.
मी एमडी का झालो? का काढले तुझे अधिकार? कारण पर्वणी, तू तेव्हा भावनेच्या भरात त्याच्या नावावर सगळं केलं असतस ना, संपलं असतं सगळं."
मनू थांबला. त्याला धाप लागली होती.
पर्वणी सुन्न, शांत बसून होती. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते...
"मनू, तुझ्या मनाप्रमाणे जग रे... पण थांब माझ्यासोबत. मला मनू नाही भेटणार" ती कष्टाने म्हणाली.
"आणि तुला तडजोड करायला लावू? नाही ग परू. प्रेम असं नसतं. आणि माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे ना, की कुठलीही तडजोड तू करू नये असं वाटतं.
अगदी नात्याचीही नाही...
मी नवीन नातं शोधेन की नाही, माहीत नाही. पण तू नक्की शोध. आणि तुला सापडेल. कारण माझी परु परफेक्ट आहे. आणि शी निड्स परफेक्ट मॅन. नॉट बेस्ट, पण परफेक्ट. आणि मनू परफेक्ट नाही ग. कधीही परफेक्ट होणार नाही.
मला फक्त मला माझ्या जुन्या स्वतःला शोधायचय आता. म्हणून आता मी निघून जाणार आहे."
"मनू... कुठे जाशील?"
"माहीत नाही ग परु. आपला हा बंगला सोडला आणि गेटच्या बाहेर गेलं ना, एक रस्ता लागतो. जिथे नेईल तिथे जाईल...
मागच्या वर्षी बाबा आले होते. मला साडेआठशे रुपये देऊन गेले. नाही नाही म्हणत होतो. बळजबरी कोंबले हातात. म्हटले, राहूदे, गरज पडेल. मी पुन्हा देणार नाही... आणि नंतर बाबाच राहिले नाहीत. आई आधीच गेली होती. आज तेच पैसे घेऊन जाईन परु. आफ्टर ऑल, मी कायम लहान राहीन. आणि माझ्या लहानपणाला, वेडेपणाला, न बदलण्याला त्यांनीच स्वीकारलं होतं.
हे सगळं घर, सगळं काही तुझ्या नावावर होतं परु, आणि कायम राहील... हे सगळं तुझं आहे. आणि सांभाळ, तू समर्थ आहेस."
"मनू... नको... मला..."
"शांत हो. सगळं ठीक आहे. तुला गरज असेल, मनू असेल, तुझ्या आठवणीत. आणि मला माझी पर्वणी स्ट्रॉंग हविये. कळलं? चल मला निरोप दे."
"मनू... प्लिज परत ये." तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
"मला फक्त जायचंय परु. मी परत येण्याचा विचारच केला नाही. चल, मला बाहेर सोडायला येशील? हसत? माझं शेवटचं ऐकशील. तुझं आवडत गाणं म्हणू??"
'महफ़िल में तेरी
हम न रहें जो,
ग़म तो नहीं है
ग़म तो नहीं है,
क़िस्से हमारे नज़दीकियों के
कम तो नहीं हैं
कम तो नहीं हैं!'
मनूने पर्वणीला हाताला धरून उठवलं.
दोघेही हात धरून चालू लागले.
कितीतरी वेळ ते चालत होते. बाहेर, गेटपर्यंत.
"माझी पर्वणी. काळजी घे..." मनू म्हणाला.
आणि तो हळूहळू चालत तिच्या नजरेसमोरून दूर निघून गेला...
क्रमशः
काय हे...
काय हे...
अस्वस्थ करणारा भाग..
हे असंच काही लिहाल असं वाटलं
हे असंच काही लिहाल असं वाटलं होतंच.. पु भा आतुरतेने प्रतिक्षेत
मागचा भाग वाचत होते तेव्हाच
मागचा भाग वाचत होते तेव्हाच वाटलं होत असा twist देशील.
अनामिक हुरहुर लावली मनूसाठी..
अनामिक हुरहुर लावली मनूसाठी... खूप भावनिक झालायं हा भाग...
खूप भावनिक झालायं हा भाग >>>
खूप भावनिक झालायं हा भाग >>> ++ १११
,मला वाटलं असं संपणार की काय
,मला वाटलं असं संपणार की काय पण क्रमशः दिसले.
माझ्यासाठी हा ट्विस्ट इतकाही
माझ्यासाठी हा ट्विस्ट इतकाही अनपेक्षित नव्हता. पण हाच शेवटचा भाग असं वाचलं होतं.
शेवटच्या भागात सगळ्या गोष्टींना न्याय मिळेल असं वाटतंय...
खूप भावनिक झालायं हा भाग...
खूप भावनिक झालायं हा भाग...+1111
Chaan,mast but happy ending
Chaan,mast but happy ending asavi.Subah ka bhula sham ko ghar aaye to use bhula nhi kehte Manu kehte types.both should equally love each other an start again its never too late
खूप छान
खूप छान