शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग २

Submitted by जिज्ञासा on 26 June, 2020 - 05:47

पहिल्या भागाचा दुवा: https://www.maayboli.com/node/75247

भाग २ आपल्याला कोठे जायचे आहे?

यामध्ये एकूण चार उद्दिष्ट मांडावीशी वाटतात.

१. मानवी भूभार कमी करणे - आधी आपण बघितले तसं माणसाने बरीच जमीन हडप केली आहे. ती जमीन निसर्गाला परत करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे नक्की काय करायचे तर सध्या जी औद्योगिक शेती केली जाते ती बहुतांशी रासायनिक असते. या औद्योगिक शेतीच्या प्रारूपाकडून नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याकडे वळणे. यात एका पिकाऐवजी अनेक पिके एकाच वेळी घेणे रासायनिक खते न वापरणे, आणि मांसाहार कमी करणे अथवा बंद करणे या गोष्टी येतात. समजा, आपण शंभर एकर जमीनीवर फक्त मका पिकवत असू तर त्या ऐवजी पाच ते दहा एकर जमीनीवर किमान 4 ते 5 विविध प्रकारच्या धान्य अथवा भाज्या लावणे. फिरती शेती, असे करता येईल. उरलेल्या जमिनीवर तिथल्या मूळ वनस्पती उगवतील असे पोषक वातावरण निर्माण करता येईल. मात्र केवळ झाडे लावून जंगल तयार करणे म्हणजे निसर्ग नव्हे. निसर्गाच्या अनेक परिसंस्था असतात - गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, रेतीचे मैदान, वाळवंट ह्या सगळ्या नैसर्गिक परिसंस्था आहेत. आपल्या भौगोलिक प्रदेशानुसार तिथली जी नैसर्गिक परिसंस्था आहे तिच्या परीघात राहून तेथील स्थानिक बियाणे वापरून शेती करणे हे शाश्वत विकासाचे एक महत्वाचे ध्येय आहे. या प्रकारे केलेली शेती ही भरपूर उत्पन्न देणारी, शेतकऱ्याला जगवणारी आहे हे अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. यातून मांसाहार व दुग्धजन्य पदार्थ यासाठी खर्च होणारे पाणी व उर्जा यांची बचत झाल्याने पृथ्वीवरील भार कमी होईल.

२. संसाधनांचे विकेन्द्रिकरण - सध्याची आपली अर्थव्यवस्था केंद्रिकरणावर भर देणारी आहे. चीनमध्ये माल उत्पादन करणे हे आर्थिकदृष्टय़ा स्वस्त पडते म्हणून तिथे सर्व जगातील वस्तूंचे उत्पादन केले जाते. अन्नधान्य, दूध, कपडे, पाणी, उर्जा या आपल्या दैनंदिन जीवनात गरजेच्या वस्तू देखील कधी कधी सातासमुद्रापार तयार झालेल्या असतात. मग त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विपणनाची एक मोठी साखळी तयार करावी लागते. या साऱ्याची नैसर्गिक किंमत आपण मोजत नसल्याने आर्थिकदृष्टय़ा आपल्याला ते परवडते. मात्र या साखळीतील एखाद्या गोष्टीवर बंदी आली तर काय भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते याची अगदी छोटी चुणूक आपल्याला कोरोना मुळे दिसली आहे. किमान अन्न आणि उर्जा या दोन बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या छोट्या छोट्या मानवी वसाहती निर्माण करणे हे शाश्वत विकासाचे एक महत्वाचे ध्येय आहे. आज भारतातल्या कुठल्याही शहरात पाणी दूरच्या धरणातून येते, धान्य भाजीपाला दूध आसपासच्या खेड्यातून येते, वीज दूरच्या कोणत्या तरी वीज केंद्रात तयार होते. या साऱ्या गोष्टी शहरात येतात पण शहरात काय तयार होते तर प्रदुषण, सांडपाणी आणि कचरा. पुन्हा या सर्व गोष्टी शहराबाहेर नेऊन प्रक्रिया करून सोडण्याची व्यवस्था निर्माण करावी लागते. या उलट शाश्वत प्रारूपात शहरातील प्रत्येक प्रभागात दैनंदिन गरजेचा भाजीपाला फळे पिकवता येईल, कदाचित एखादा गोठा असेल. सर्व प्रभागातील सांडपाण्यावर आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या पासून बायोगॅस तयार करता येईल. त्यातून तिथल्या लोकांची उर्जेची गरज काही प्रमाणात भागू शकेल. गावाकडे हेच मॉडेल राबवले तर शहराकडे येणारे माणसांचे लोंढे कमी होतील. गावातील लोकांना गावातच अधिक चांगल्या प्रकारे जगता येईल. शेतीच्या जोडीला छोटे कुटीर उद्योग चालवता येतील. ही एक शोषण न करणारी शाश्वत अर्थव्यवस्था असेल.

३. चक्राकार अर्थव्यवस्था - या शाश्वत विकासाच्या स्वप्नांमध्ये उद्योग धंदे कसे चालतील? तर त्यासाठी circular economy चे प्रारूप मांडले आहे. यामध्ये कोणत्याही उत्पादनात कचरा निर्माण होणार नाही. कारण एका उत्पादनात तयार झालेला कचरा हा दुसऱ्या उद्योगाचा कच्चा माल असेल. हे उद्योग अर्थात जास्तीत जास्त विकेन्द्रीत आणि उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असतील. उदाहरणार्थ, आज आपण बिस्किटाचा पुडा घेऊन येतो. त्याच्या वेष्टनाची जबाबदारी कोणाची असते? शाश्वत उद्योग end to end responsibility घेणारा असेल. यालाच cradle to cradle approach अशी संज्ञा आहे. मग अशा परिस्थितीत कदाचित single use plastic चे वेष्टण बिस्किट कंपनीला परवडणार नाही! याच धर्तीवर जर आपली इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्पादन करणाऱ्या कंपनीला परत घेण्याचा कायदा आला तर कदाचित मोबाईल कंपन्या इतक्या वेगाने नवीन मॉडेल्स आणणार नाहीत. कारण कंपनीला केवळ एका नवीन चीप साठी अख्खा फोन परत घेणे परवडणार नाही मग कदाचित ती एक चीप बदलून तोच फोन अधिक काळ वापरता येईल.

४. अपारंपरिक ऊर्जा स्रोत - मूळ उर्जेची गरज भागवण्यासाठी सौरऊर्जा आणि जलविद्युत हे दोन सर्वात चांगले पर्याय आहेत. मात्र त्यासाठी मोठी धरणे बांधण्यापेक्षा छोट्या छोट्या प्रमाणात विकेंद्रीत उर्जा निर्माण करणे आणि गरज पडल्यास ती ग्रिडने जोडणे अधिक शाश्वत आहे. सौर ऊर्जा सोलार पॅनेलच्या माध्यमातून वापरणे जरी सोयीचे असले तरी तो सर्वात चांगला पर्याय नाही. जशी मिळते त्या स्वरूपात सौर ऊर्जा वापरणे सर्वात सोपे आणि चांगले. यात गवत आणि शेतात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून तयार होणारा बायोगॅस हा एक शाश्वत पर्याय असू शकतो. मूलतः उर्जेची गरज कमी भासेल असे जीवनशैलीत बदल करणे हा एक मोठा बदल आध्यारूत आहे. उदाहरणार्थ, चालत, सायकलने, किंवा सार्वजनिक वाहनाने प्रवास, भरपूर सूर्यप्रकाश आणि उत्तम वायुवीजन व insulation असलेली शाश्वत पद्धतीने बांधलेली घरे इत्यादी मुळे उर्जेची गरज कमी होऊ शकते.

हे सगळं कसं शक्य आहे? हे अति आदर्श जवळपास युटोपिअन स्वप्नरंजन आहे असं वाटू शकतं. पण विचार केला तर या सर्व गोष्टी शक्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी कोणी तुम्हाला असं सांगितलं असतं की एका महिन्याहून अधिक काळ अख्खा भारत घरी बसून राहणार आहे तर आपल्याला कदाचित पटलं नसतं पण असं प्रत्यक्ष घडलं आहे! कोणतीही गोष्ट सत्यात आणायची असेल तर इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती या दोनच गोष्टी लागतात. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे! आता या युटोपियाला प्रत्यक्षात आणण्यासाठी काय केले पाहिजे हे आपण तिसऱ्या भागात पाहू.

अधिक विस्ताराने माहितीसाठी उपयुक्त लिंक्स

१. Permaculture/polyculture
https://youtu.be/oCZ-t30aCeQ

२. शेतीचे कारखाने आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम
https://youtu.be/7TRI7yeeYQQ

३. चक्राकार अर्थव्यवस्था म्हणजे काय?

https://youtu.be/zCRKvDyyHmI

https://youtu.be/7b9R82vrA40

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२ - शहरे अन्य भागातली संसाधने वापरतात आणि त्याबदलात प्रदूषण, कचरा देतात. हेच अख्ख्या जगाच्या बाबतीतही होते ना? वसाहतवादी देश विकसनशी ल देशांतून कच्चा माल घेत आले . आता प्रग त देश आपला कचरा अविक सित देशांत पाठवतात. आपल्याकडे अगदी वर्तमानपत्रांची रद्दीसुद्धा आयात होऊ लागल्याची बातमी वाचली.
---
गांधींची स्वयंपूर्ण खेड्यांची कल्पना या सगळ्याशी किती जवळ जाणारी आहे? कितपत व्यवहार्य आहे?

<मांसाहार व दुग्धजन्य पदार्थ यासाठी खर्च होणारे पाणी व उर्जा यांची बचत झाल्याने पृथ्वीवरील भार कमी होईल.> या दोहोंचा वापर माणसाच्या इतिहासात भरपूर जुना आहे. मग आताच त्यासाठी लागणारे जमीन्,पाणी , ऊर्जा यांचे प्रमाण इतके प्रचंड कसे वाढले?

३. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत नव्या वस्तू म्हणायला अधिक प्रगत असतात पण त्यांचं आयुष्यमान कमी असतं. त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि मेंटेनन्ससाठी लागणारे सुटे भाग उपलब्ध नसतात. हे सगळं वृद्धीचं प्रारूप जुनं फेका आणि नवं घ्या असं आहे. तुम्ही म्हणता तसं वस्तू मोडीत काढण्यावरही किंमत लावायची गरज आहे. फोन्स, गॅजेट्स, मोटारी जुने चालत नाहीत म्हणून नव्हे तर त्यापेक्षा अधिक चांगली उत्पादने आलीत म्हणून विकत घेण्याचे प्रमाण अधिक असावं.

आवडला लेख.
मांस आणि दूध, दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन प्रचंड प्रमाणात होऊ लागल्याने त्यावरचा ऊर्जा आणि पाण्याचा खर्च वाढला असेल.

https://www.cnbctv18.com/buzz/we-are-living-in-the-age-of-the-chicken-16...

हे कधीतरी वाचलं होतं.

माणूस हा निश्चीतच ऑम्नीव्होर आहे, त्याचा विकास तसाच झाला आहे. त्यामुळे त्याला संपूर्ण शाकाहारी करुन आणि प्रोटिन्सचा सोर्स बंद करुन काय हशील? केवळ आणि केवळ पृथ्वी वाचवायची हा एकमेव उद्देश ठेवून काम केलं तर त्याला फळ धरेल का? मानव का उत्क्रांत प्राणी आहे, त्याचा आशा आकांक्षा, स्वार्थ, प्रगती, हे अलाईन करणे किती कठिण आहे? आणि हे करण्यात किती उर्जा जाईल?
कोरोनामुळे सगळं जग थांबलं हे उदाहरण म्हणून चपखल आहे का? अशक्य ते शक्य झालं, हो! पण त्याची किती किम्मत मोजली ते लवकरच कळेल. अर्थात सध्याचा विकास/ जीडीपी महत्त्वाचा नसून पृथ्वी वाचवायची आहे या एकाक्षरी मंत्राला मला तरी अलाईन होता येत नाहीये. माणूस हा मला पृथ्वीपेक्षा जास्त महत्त्वाचा वाटतो. हे बेगडी/ भंपक आहे याची जाणिव आहे. पण अशीच माणसं जर जास्त असणार असतील तर त्यातुन काय करता येईल यावर विचार व्हावा. युटोपिअन गाव करावं पेक्षा बेबी स्टेप्स घ्याव्या. अर्थात त्याची वेळ गेली असेल तर हा विचार आहेच.
एनर्शिआ!!!

हो Happy

भरपूर उत्पन्न देणारी, शेतकऱ्याला जगवणारी आहे हे अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. यातून मांसाहार व दुग्धजन्य पदार्थ यासाठी खर्च होणारे पाणी व उर्जा यांची बचत झाल्याने पृथ्वीवरील भार कमी होईल.

माझे आता वय 50 वर्ष असल्या मुळे पारंपरिक शेती करण्याची पद्धत आणि आताची व्यापारी पद्धत दोन्ही पद्धती जवळून बघितल्या आहेत.
बियाणे हे स्थानिक वान असलेले च असायचे.
आलटून पालटून पीक घेतली जायची म्हणजे एकाद्या जमिनीत ह्या वर्षी ज्वारी पिकवला तर पुढल्या वर्षी भुईमुग पिकवला जायचं.
शेणखताचा च वापर केला जायचा.
मिश्र पीक घेतली जायची,आणि वर्षातून काही महिने जमीन मोकळी ठेवली जायची त्या वर कोणतेच पीक घेतले जायचे नाही.
आणि ही पद्धत शास्त्रीय दृष्ट्या एकदम योग्य होती .
ह्या मध्ये जमिनीचा कसं कमी व्हायचा नाही आणि मोकळी जमीन ठेवल्या मुळे हवेतील कार्बन जमिनीत शोषला पण जात असावा.
पण तेव्हा पावूस पण जास्त असल्या पाणी कमतरता नव्हती.
मग ही शास्त्रीय पारंपरिक अनुभव वरून मिळालेल्या ज्ञान ह्या वरून तयार झालेली पद्धत बदलली कोणी.
सरकार,संशोधक ज्यांनी अपुऱ्या अभ्यासा वर चुकीची मांडणी करून अशास्त्रीय चुकीचे विचार पसरवले आणि आताची व्यापारी पद्धत अस्तित्वात आली .
त्या वेळी हायब्रीड बियाणे ची जाहिरात सरकार करत होते.लोकांनी रासायनिक खते वापरणे कसे योग्य आहे ह्याचा रतीब लावला होता.
पण त्याचे दुष्परिणाम आता दिसायला लागले.
जमिनी नापीक होण्याचे प्रमाण वाढले,पारंपरिक बियाणे नष्ट झाले जे पर्यावरण स अनुकूल होते.
इथे जसे संशोधक ना हाताशी धरून चुकीची गोष्ट योग्य असे सुचवले गेले त्या प्रमाणेच आता सुधा मांसाहार आणि दुग्ध जन्य पदार्थ ह्यांच्या वापरामुळे ऊर्जा वापरली जाते आणि त्या मुळे वातावरण दूषित होत आहे असा समज पसरवला जात आहे.
असा समज होणे नैसर्गिक आहे

गांधींची स्वयंपूर्ण खेड्यांची कल्पना या सगळ्याशी किती जवळ जाणारी आहे? कितपत व्यवहार्य आहे? >> गांधीच्या खेड्याकडे चला ही शाश्वत विकासाच्या खूपच जवळ जाणारी संकल्पना आहे. आजच्या काळात ही उलट अधिक व्यवहार्य असेल कारण तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे त्यामुळे अनेक गोष्टी या केवळ शहरांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत.

अमितव, अरे उदाहरण आहे फक्त कोरोनाचं! की जेव्हा जीवन मरणाचा प्रश्न उभा राहतो तेव्हा माणूस काय वाट्टेल ते करायला तयार होतो. जेव्हा पर्यावरणाचे रक्षण हा जीवन मरणाचा प्रश्न होईल तेव्हा फार काही हातात उरलेले नसेल करण्यासारखं Sad त्यापेक्षा आत्ताच काही करू शकलो तर?
रच्याकाने, दुर्दैवाने कोरोनाचा आणि पर्यावरण बदल याचा फार जवळचा संबंध आहे. Loss of natural habitats, meat markets etc are being considered as potential reasons for recent zoonotic epidemics and all these are certainly not eco-friendly activities!

माणूस हा निश्चीतच ऑम्नीव्होर आहे, त्याचा विकास तसाच झाला आहे. >>Not really. आपण मांसाहारी असतो तर वाघ सिंहाप्रमाणे कच्च मांस पचवू शकलो असतो. पण आपण शिजलेलं मांस खातो जे माणूस आगीच्या शोधानंतर शिकला. but that is besides the point. I do respect food choices. इथे कोणी कोणाला उद्यापासून व्हिगन होण्याचा सल्ला देत नाहीये. पण मांसाहाराचा कार्बन फूटप्रिंट अति प्रचंड आहे.
Here are some facts and figures
Research shows that the five largest meat and dairy corporations combined (JBS, Tyson, Cargill, Dairy Farmers of America and Fonterra) are responsible for annual greenhouse gas emissions of an estimated 578.3 Mt – more than major oil companies such as ExxonMobil (577 Mt), Shell (508 Mt) or BP (448 Mt). The combined emissions of the top 20 meat and dairy companies (933 Mt) even surpass the emissions from entire nations, such as Germany (902 Mt), Canada (722 Mt) or the UK (507 Mt).
Nearly 60% of the world’s agricultural land is used for beef production, yet beef accounts for less than 2% of the calories that are consumed throughout the world. Beef makes up 24% of the world's meat consumption, yet requires 30 million square kilometres of land to produce. In contrast, poultry accounts for 34% of global meat consumption and pork accounts for 40%. Poultry and pork production each use less than two million square kilometres of land.
A 2,000 kcal high meat diet produces 2.5 times as many greenhouse gas emissions as a vegan diet, and twice as many as a vegetarian diet. Moving from a high meat to a low meat diet would reduce a person's carbon footprint by 920kg CO2e every year - equivalent to a return flight from London to New York. Moving from a high meat diet to a vegetarian diet would save 1,230kg CO2e per year.
The production of one kilogram of beef requires 15,414 litres of water on average. The water footprint of meat from sheep and goat (8,763 litres) is larger than that of pork (5,988 litres) or chicken (4,325 litres). The production of one kilogram of vegetables, on the contrary, requires 322 litres of water.
Source: https://www.globalagriculture.org/report-topics/meat-and-animal-feed.htm...'s%20largest,surface%20is%20used%20for%20grazing.

जर आपण मांसाहार आणि दुधाचे पदार्थ वापरणं कमी करू शकलो तर खूप फरक पडणार आहे. I will recommend watching "The game changers" on Netflix. It's a documentary and do take it with a pinch of salt. But the underlying message is crystal clear. We will benefit from cutting down our meat and dairy consumption.

Most methane emissions come, directly or indirectly, from humans. Some methane is natural — it’s released by decaying vegetation and by the bacteria in wetlands and swamps. But most sources of methane are of human origin — livestock and farming, decay in landfills, leakage from the oil and gas industry. Since 1750, the amount of methane in the atmosphere has doubled because of human activity. The oil and gas industry is the top contributor, creating one-third of all methane emissions. As companies extract and transport oil and natural gas, methane leaks from their pumps, pipelines and wells at a rapid rate. In June 2018, the journal Science published a paper by EDF and other researchers that showed US oil and gas operations are leaking 60 percent more of the harmful gas than government estimates had predicted.

Another strange source of methane (and another reason to consider banning them): plastic bags. In a study published in August 2018, researchers from the University of Hawaii at Manoa were curious about what would happen when different plastics were heated by sunlight or soaked in seawater. They discovered that many kinds of plastic — especially polyethylene, the material used in grocery bags — emitted methane when exposed to light, and continued to release it even in the dark. When submerged in salt water for 152 days, the plastics also secreted methane. These results occurred in a laboratory, but it raises the question: is all the plastic trash we’ve dumped in landfills and the ocean

The production of one kilogram of beef requires 15,414 litres of water on average.

रोज दहा लिटर जरी तो प्राणी पित असेल आणि 10 लिटर पाणी खाद्य निर्मिती साठी वापरले जात असेल
तरी वर्षाला 7200 लिटर च पाणी लागेल.
आणि एका वर्षात तो प्राणी कमीत कमी 10 किलो चा तरी होईल.
मग एक किलो साठी 720 लिटर च पाणी लागेल.
15414 लिटर पाणी एक किलो मांस निर्मिती साठी लागेल हे कसे काय.

आहारासाठी (मांस , दूध) प्राण्यांची जोपासना करण्या साठी अधिक जमीन, पाणी वापरली जाते या अनुषंगाने
हा अधिक वापर विकसित देशांत आणि कमी लोकसंख्या घनता असलेल्या देशांत आहे का? - ऑस्ट्रेलिया, अमेरिका
भारतातही या गोष्टींची निर्मिती होते पण त्यासाठी वेगळी पिके काढली जात नाहीत.

हाच भेद पुढे नेऊन - विकसित देश आणि विकासशील देशांतील कर्ब उत्सर्जनाची तुलना करता विकसित देशांवर असलेली जबाबदारी ते उचलतात का?
साधारण दहा वर्षांपू र्वी बीबीसीवर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. त्यात भारतात पर्यावरण संरक्षणाबद्दल किती कमी जागृती आहे असा मुद्दा होता. इथल्या लोकांनी परदेश सहली करू नयेत असं सुचवलं होतं.

भरत, विकसित देशांनी अधिक काळ प्रदूषण करून स्वतःचा विकास घडवला आहे त्यामुळे हे कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी त्यांनीच अधिक जबाबदारी उचलली पाहिजे. याउलट विकसनशील देशांना त्यांच्या नागरिकांना अधिक चांगले भौतिक जीवनमान मिळावे यासाठी या कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टामध्ये सूट मिळावी असा एक विचार मांडला जातो. त्यामुळे विकसनशील देशांना काही अधिक कार्बन क्रेडिट मिळतील अशी एक सोय होती पण तिचा फायदा झाला नाही असे काही तरी अंधुक आठवते. माझा या विषयावर फार अभ्यास नाही. I'll read up on it and get back to you.

विकसित देशांमध्ये ही कार्बन उत्सर्जन सारखे नाही. उदा. अमेरिकेतील पर कॅपिटा emissions Europe पेक्षा प्रचंड जास्त आहेत.

हा विषय फारसा कुठे च प्राधान्यावर नाही. त्यामुळे जास्ती कोणी देशांनी या विषयाबाबत गांभीर्याने कमिटमेंट दिलेली च नाहीये.. असे असूनही जी कमिटमेंट दिली आहे ती पाळली जात नाहीये..

ट्रम्प ने तर अमेरिकेने जी तोंड देखली कमिटमेंट दिली होती ती देखील officially मागे घेतली आहे. यामागे बहुदा अमेरिकन पॉवर / कोल इंडस्ट्री चे लॉबिंग कारणीभूत असावे.

हे जग स्वार्थी लोकांनी भरलेले आहे.
जो पर्यंत जीवन मरणाचा प्रश्न येत नाही तो पर्यंत सुधारणार नाही.
खरे सूत्रधार निसटून जातील दुसऱ्या ग्रहावर जेव्हा येथील स्थिती जगण्याच्या लायकीची राहणार नाही.
आणि प्यादे म्हणजे राहिलेली जनता तडफडून मृत्यु kavataltil