चुलीवरचे जेवण ,गुळाचा चहा,घाण्याचे तेल ई. जुन्या गोष्टी पुन्हा का प्रसिद्ध होत आहेत ?

Submitted by केशव तुलसी on 24 June, 2020 - 07:55

चुलीवरचे जेवण ,गुळाचा चहा,घाण्याचे तेल वगैरे गोष्टी पुन्हा एकदा लोकांना आवडू लागल्या आहेत.जुन्या गोष्टींना प्रसिद्ध होताना पाहून काहींना ,खासकरुन जुन्या लोकांना आनंद होत आहे. परंतु यापाठीमागे काय मानसशास्त्र आहे? जुनं ते सोनं हा विचार आहे की लोकांना खरंच आपली जुनी खाद्य संस्कृती ,जीवनपद्धती जपायची आहे ,पुन्हा वर आणायची आहे.मला तरी यात फारसे नाविन्य दिसत नाही.आपले मत काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज चुलीवर कोण स्वयंपाक करायला सांगतंय???? इथे विषय चुलीवर फॅड म्हणून पर्यटन स्टाईल सठी सामाशी जेवण करून त्याला पैसे देऊन फेबुवर फोटो डकवणे असा मर्यादित आहे. चुलीवर केलेलं विकाच... म्हणून कोणावर कंपलशन केलेलं नाही. किंबहुना ते फॅड आहे सो त्यासाठी जास्त मोबदला मिळेल. (व्यवसाय म्हटलं की त्यांना रोज करावा लागेलच... पण तो त्यांचा व्यवसाय आहे. पैसे मिळतात म्हणून सुरू केलेला. त्यात इथिकल सुधारणा करता येतील)

लाकूड फाटा गोळा करायला महिला होत्या का? व्हेंतीलेशन ची सोय कशी होती? इत्यादी प्रश्न रास्त आहेत. त्यावर विचार करता आला तर नक्की करावा आणि पुरुषांनी गोळा केलेल्या लाकूड फाट्यावर धूर विरहित (मर्यादित) वातावरणात केलेलं चुलीवर चं जेवण अशी जाहिरात करावी. आणखी दोन पैसे जास्त मिळतील.
बाकी मी जे कपडे वापरतो ते कुठल्या वातावरणात आणि सोयी सुविधांच्या अभावात बनवलेले असतात बघून मला वाईट वाटतं. पण काय काय चेक करणार आणि किती! दृष्टी आड सृष्टी!

प्रियदर्शिनी कर्वे (आणि आनंद कर्वे) यांच्या आरती या संस्थेने धूर विरहित चूल बनवली होती बऱ्याच पूर्वी. शेतात जाळून टाकाव्या लागणाऱ्या बुडखयांचे कंट्रोल्ड ज्वलन करून बनवलेल्या कार्बन चिप्स चुलीत वापरण्याचे तंत्रज्ञान होते बहुधा. पण त्याचा फारसा प्रसार झाला नसावा.
लोकांच्या मनावर जे बिंबेल, त्यांना जे आवडेल, परवडेल, उपयुक्त वाटेल ते विकले जाईल. पोकळ लाट असेल तर हळू हळू विरेल. किंवा जोरदार आणि कल्पक प्रसिद्धीच्या बळावर टिकेलही. फार काळजी का करावी?

मला वाटतं लाकूड जाळून उत्पन्न होणाऱ्या वायू पेक्षा कारखाने,गाड्या ह्या पासून घातक घटक असलेला वायू जास्त प्रमाणात हवेत सोडला जातो.
आणि वातावरण वर त्याचे घातक परिणाम होवून पावसाचे चक्र बदलते.
प्रदूषण मुळे जगात किती तरी लोक विविध रोगांना बळी पडतात.
चुली वरचे जेवण हे फक्त हॉटेल मध्ये वेगळे पण देण्यासाठी बनवत असतील.
ज्यांच्या कडे गॅस आहे ते कशाला चुलीवर बनवतील आणि ते शक्य पण नाही.
शहरात तर बिलकुल शक्य नाही .
वेगळे बंगले असलेली वस्ती शहरात नगण्य आहे आहे त्या बिल्डिंग तिथे स्वतःच्या मर्जी नी काही ही करू शकणार नाही बाकी लोक आक्षेप घेवून तुम्हाला कोर्टात सुद्धा खेचू शकतील.
मोजकेच दोन चार देश असतील ह्यांची लोकसंख्या कामी आहे त्यांची शहर सू नियोजित असतील बाकी शहरांची काय अवस्था आहे जग जाहीर आहे.
40% पेक्षा जास्त लोक झोपड्या,चाळीत 200 वर्ग फूट च्या घरात राहत असतील दाटीवाटी नी.
आणि बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या मध्ये कसलीच मोकळी जागा नसलेल्या बिल्डिंग च खूप आहेत.
त्यांची अवस्था काही वेगळी नाही.
थोडक्यात घाणी चे तेल, गुळाचा चहा आणि बाकी गोष्टी आरोग्य साठी चांगले आहे असे सिद्ध झालेले आहे त्या मुळे ज्यांना निरोगी आयुष्य जगायचे आहे ते आहारात नक्कीच बदल करतील.
जे अजुन पण (मधुमेह,रक्तदाब, लठ्ठ पना,Etc he आजार वयाच्या तीसी च्या आताच घेवून जगत असतील) काही ही होत नाही ह्या भूमिकेत असतील ते आहार बदलणार नाहीत.

गुळाचा चहा चांगला हे सिद्ध झालं वाटतं.
आणि वाहनाचा कारखान्याचा धूर डायरेक्ट ट्यूब ने नाकात सोडताना मी तरी पाहिलं नाही. चुलीतून ते होतं.

आणि वाहनाचा कारखान्याचा धूर डायरेक्ट ट्यूब ने नाकात सोडताना मी तरी पाहिलं नाही. चुलीतून ते होतं. >> that's another दृष्टीआड सृष्टी अमितव!
In an ideal scenario, locally-sourced fuel is far more sustainable than getting natural gas by fracking and transporting it thousands of miles under pressure. पण सध्याची सिस्टीम एका दिवसात बदलू शकत नाही आणि पारंपारिक चुलीचे तोटे भरपूर आहेत. भारतात स्वदेशी इंधन या कल्पनेचा खूप विस्तार व्हायला हवा. उज्ज्वला योजना हा तात्पुरते उपाय आहे शाश्वत उपाय हा स्थानिक पातळीवर इंधन स्वयंपूर्णता आणणे हा आहे.

पुरुषांनी गोळा केलेल्या लाकूड फाट्यावर धूर विरहित (मर्यादित) वातावरणात केलेलं चुलीवर चं जेवण अशी जाहिरात करावी. आणखी दोन पैसे जास्त मिळतील. >>> Happy कॉन्फ्लिक्ट फ्री डायमण्ड्स सारखा प्रकार Happy

चुलीचा धूर फुफुसात गेल्याने माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच त्याची नजर चांगली राहते. याच कारणामुळे खेड्यातील लोकांना जास्त कोरोना झाला नाही आणि चष्मे पण नाही लागले.

उज्ज्वला योजना हा तात्पुरते उपाय आहे शाश्वत उपाय हा स्थानिक पातळीवर इंधन स्वयंपूर्णता आणणे हा आहे
ह्या मध्ये गोबर गॅस चा चांगला प्रचार केला होता आणि सरकारी अनुदान देवून त्याला प्रोत्साहन पण दिले गेले.
पण ती योजना जास्त यशस्वी झाली नाही.
आणि पाळीव जनावरे पण कमी झाली आहेत.
Lpg tya पेक्षा सुटसुटीत आणि कमी किमतीत मिळत होता हे पण कारण आहे गोबर गॅस ची योजना निकामी होण्याचे.
आता पाणी गरम करण्या साठी सोलर energy cha upyog बर्या पैकी होत आहे.
Lpg पेक्षा सोलर energy chi hi clean ch.
Lakde जाळून प्रदूषण नक्कीच होते आणि झाडांची कत्तल होवून पर्यावरण धोक्यात येते ते वेगळे.
त्या मुळे चूल नकोच.

सलोन मधून आल्यावर तशीही अंघोळ होतेच.
>>>>
पण सलूनमध्येच कोरोना नाकात शिरला तर...
मी तरी अजून चार सहा आठ महिने सलूनात जायची रिस्क घेत नाही असे वाटते.

जिज्ञासा
ह्यांचा प्रतिसाद परफेक्ट वाटला

आता जगभरात सर्व देशातील भाज्या,फळ,मिळतात.
पण स्थानिक पातळीवर जी फळ होतात ,भाज्या होतात त्याचाच आहारात वापर असावा असा पण एक विचार प्रवाह आहे.
आता विज्ञान नी कोणत्या ही भाज्या कोणत्या ही ‌‌ऋतू मध्ये येतील असे जेनेटिक बदल केले आहेत पण ज्या ऋतू मध्ये ज्या भाज्या नैसर्गिक पने येतात त्याच त्या वेळी आहारात असाव्यात..
फुलकोबी आणि ब्रोकली चे गुणधर्म एकाच असतील तर विदेशी ब्रोकाली पेक्षा स्थानिक फुलकोबी नक्कीच आरोग्य दायक असणार.

अशमयुगीन कालखंडाची सुरवात झाल्याचे संकेत मला मिळत आहेत. लोकांना मिक्सरच्या वाटणापेक्षा पाट्यावर वाटलेलं जास्त आवडत आहे.

बोकलत
तुम्ही आताच एकादी चांगली गुहा शोधून ठेवा .
मोक्याच्या जागेवर ची.
नंतर मिळणार नाही.

that's another दृष्टीआड सृष्टी अमितव! >> फ्रॅकिंग सस्टेनेबल नाहीच आहे. पण हायड्रॉलिक फ्रॅकिंग सध्या प्रगत देशांत केलं जातंय (Canada.
New Zealand, South Africa, Ukraine, United Kingdom, United States) आणि ते करताना कामगारांना नियम पाळून वागवलं जातं. भारताला सस्टेनेबल/ रिन्युएबल इंधन वाटा वाढवायला अनेक वर्षे लागणार आहेत. त्या दरम्यान चुलीत लोकली सोर्स्ड लाकडं घालायची का फ्रॅकिंगने मिळवलेला नॅचरल गॅस त्याचं उत्तर माझ्यासाठीतरी नोब्रेनर आहे आणि म्हणुनच मला तो स्टॉमन वाटतोय.

बाय द वे,इथे चूल म्हणजे काय अभिप्रेत आहे? पूर्वी घरोघरी असत त्या बैठ्या दोन तोंडे दोन वाइलेवाल्या चुली की पोर्टेबल आणि शेगडीसारख्या जाळी वगैरे असलेल्या ? की पक्क्या भाजलेल्या आणि एकच तोंड असलेल्या ?(त्यांना कुंभारीण म्हणत. त्या कुंभाराने तयार केलेल्या असत हे एक , आणि मातीच्या असल्याने इथे तिथे हलवताना भंगू शकतील; म्हणून दुश्चिन्ह टाळण्यासाठी चूल हे नाव न उच्चारता आदराने कुंभारीण म्हणत.) हे विचारायचा उद्देश हा की त्यावरून उभा ओटा की बैठा? पाठदुखीला किती स्कोप ,श्वसनाच्या रोगांना किती स्कोप, ते नक्की करता येईल

मग रोज बारबेक्यू करून खावा.

कमोड च्या भांडयात बारबेक्यू करता येते म्हणे
भांडयात कोलसे घालायचे व वर जाली बसवायची

कमोड नवीन घ्यावे

images.jpeg

कमोड च्या भांडयात बारबेक्यू करता येते म्हणे
>>>
वर्षूदीचा एक धागा आठवला.
चीन की अश्याच कुठल्या अतरंगी देशात एक हॉटेल आहे.
तिथे कमोडमधून सूप आमरस वगैरे सर्व्ह केले जाते. प्यायचे पाणी टमरेलातून येते. आजूबाजूला प्लंबिंग पाईपांचे ईण्टरीअर करून एकूणच हॉटेलला सुलभचा लूक दिला होता.

Lpg पेक्षा सोलर energy chi hi clean ch. >> इतकं सोपं नाही हे. मी तुम्हाला असं सुचवेन की तुम्ही The planet of the humans नावाची डॉक्युमेंटरी युट्यूबवर शोधून बघा. मी तुम्हाला लिंक दिली असती पण ती डॉक्युमेंटरी वारंवार युट्यूबवरून काढली जात आहे कारण त्यात फार बोचरे सत्य मांडले आहे सोलार आणि इतर ग्रीन एनर्जी सोर्सेस विषयी.

त्या दरम्यान चुलीत लोकली सोर्स्ड लाकडं घालायची का फ्रॅकिंगने मिळवलेला नॅचरल गॅस त्याचं उत्तर माझ्यासाठीतरी नोब्रेनर आहे आणि म्हणुनच मला तो स्टॉमन वाटतोय. >> I would highly recommend you to not consider your choice as a no brainer. Whether you get the gas by hydraulic fracking or by using ethical practices it does not offset its carbon footprint. Do read up on the IPCC's guidelines on climate change (https://www.ipcc.ch/sr15/) . The situation is pretty dire and we are just not acting enough to make any changes in the overall carbon emissions Sad
It is critical for us humans to keep the global warming under 1.5°C else we are pretty much going ruin the chance of our own survival as a species.

For anyone interested here's what the 2018 IPCC report is telling (11 minute video)
https://youtu.be/1CZL3JZGLKY

And a big Yay! Michael Moore's documentary is back on YouTube!
Please watch it from here. (1 hour 40 minutes video)
https://youtu.be/Zk11vI-7czE

आपण शहामृगासारखे वाळूत डोके खूपसून बसू शकत नाही. आपण खूप मोठ्या संकटात आहोत आणि सुटकेचा मार्ग सोपा नाही Sad

मोठ्या हॉटेल/रेस्टोरंट मधून जी तंदूर भट्टी असते ती पण एक प्रकारची चूलच झाली की...तीमध्ये लाकडांऐवजी निखारे वापरतात ..इतकेच.
तंदूर रोटी/नान सारखी भाकरीला डिमांड मिळाली की आपल्या लाकडं जळणाऱ्या चुलीचेही विथ चिमणी टाईप्स कमर्शिअल व्हर्जन निघेल.
डिमांड असली की इम्प्रोव्हाझेशन आपोआप होते.

Corona mule ji जागतिक टाळा बंदी झाली त्या मुळे .
खूप माहिती मिळाली असणार तो डेटा भविष्यात पॉलिसी ठरवताना खूप महत्त्वाचा असेल.
सर्व वाहन,इंडस्ट्री बंद झाल्यावर हवेच्या दर्जा मध्ये झालेला फरक तर स्पष्ट च झाला असेल.
तापमान वाढ ही हळू हळू होते त्या मुळे किंचित झालेल्या बदलाचा गणिती सूत्र नी दीर्घकालीन काय परिणाम होईल ह्याचा अंदाज नक्की येईल.
तापमान वाढ होण्यास माणूस जबाबदार आहे की ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे समजण्यास corona sathi chi thodi मदत नक्कीच मिळेल.

तापमान वाढ होण्यास माणूस जबाबदार आहे की ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे समजण्यास corona sathi chi thodi मदत नक्कीच मिळेल. >> सर, ते उत्तर मिळून जमाना झाला. हे म्हणजे रामायण घडल्यावर रामाची सीता कोण असे विचारणे झाले. आता उत्तर रामायण सुरू आहे.

जिज्ञास, वरचा रिपोर्ट वाचला आणि १.४० तासाची डॉक्युमेंटरी वेळ काढून संपूर्ण बघितली. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. Happy
ती कॉन्ट्रोव्हर्शिअल असल्याने युट्युब वरुन वारंवर काढली जाते असं तू लिहिलेलंस असं सकाळी वाचलेलं आठवतं. (मी चुकीचं वाचलं असेल तर सॉरी. कारण कनफर्म करायला ते सध्या वर दिसलं नाही. कदाचित डॉक्युमेंटरीची लिंक मिळाल्यावर काढलं असेल) ते थोडं मिसलिडिंग आहे. ती 25 May 2020 ला कॉपिराईट इनफ्रिंजमेंट क्लेम मुळे काढलेली जी १२ दिवसांनी युट्युबने क्लेम रिजेक्ट करुन क्लिअर केली असं वाचलं. त्यानंतर परत काढलेली का?

डॉक्युमेंटरी मला अनेक ठिकाणी मिसलिडिंग आणि शेवटी पदरात काहीच नवी माहिती न पडणारी फोल? वाटली. बरं मग पुढे काय? हा प्रश्न कायम होता. काही उत्तरे सुचवायचा साधा प्रयत्न ही दिसला नाही. हे असं का वाटलं यावर सविस्तर लिहायची इच्छा आहे. येत्या १-२ दिवसांत वेळ मिळेल तसं लिहितो. हा धागा कदाचित चुकीचा असेल तर वेगळी कडे लिहितो.

अमितव, कॉपीराईट हे वरवरचे कारण होते असे बहुतेक लोकांचे म्हणणे होते. Based on the YouTube comments and what I read about the documentary on the internet. I am glad that they (producers) have been able to resolve all the issues and the documentary is back on YouTube.
Documentary चा उद्देश उत्तरे मांडणे असा नसल्याने त्यात आता यापुढे काय स्वरूपाचे काहीही नाही. परंतु ग्रीन एनर्जीच्या नावाने पुन्हा मुठभर धनाढ्यांची तीच लॉबी आपलं उखळं पांढरं करते आहे आणि मूळ प्रश्न काही सुटलेला नाही हे या डॉक्युमेंटरी मधून नीट लक्षात येतं.
IPCC ची 2040 पर्यंत net carbon neutral जग निर्माण करण्याची सूचना पाहिली आणि आजचे कोणत्याही देशाचे वर्तन पाहीले तर त्याचा मेळ बसत नाही. तुझी मते तू जरूर एखादा वेगळा लेख काढून लिही. मला वाचायला आवडेल.

२०५० ना? देशांची वर्तने आणि ग्लोबल वॉर्मिंग टार्गेट याबद्द्ल काहीच दुमत नाही. मला डॉक्युमेंटरी पाहुन मला निराश का वाटलं आणि राग का आला त्याबद्द्ल लिहितो जरा वेळात.

2040 is the ideal case scenario. 2055 is the upper limit. The earlier you peak the less steeper the slope. Also, we need to understand that these measures are to mitigate the problem. We have crossed the point of no return so there will be consequences no matter what. We may just have a slightly better chance of survival if we stick to the ideal case scenario.

ही डॉक्युमेंटरी कसे सगळे रिन्युएबल एनर्जी रिसोर्स फॉसिल फ्युएल पेक्षाही बेकार आहेत हे वारंवार मनावर ठसवायचा प्रयत्न करते आणि कसे सगळे जण आपापला फायदा बघायला या क्षेत्रात उतरले आहेत हे ही सांगते. या जगात संत को-णी-ही नाही (झिरो एक्सेप्शन्स) यावर माझा ठाम विश्वास असल्याने मला कोणी फायदा बघितला तर चांगलंच वाटतं त्यातुन कमीत कमी हार्म होऊन नेट पॉझिटिव्ह काही होत असेल की झालं. तर ते एक असो.
यातील खटकलेल्या गोष्टी पुढील प्रमाणे:
१. हायड्रो इलेक्ट्रिसिटी जगात जवळ जवळ १७% वापरली जाते. त्याबद्द्ल चकार शब्द यात नाही. ती संपूर्ण क्लीन असावी सो त्यातील तोटे दाखवता आले नाहीत असं क्षणभर वाटून गेलं. अमेरिकेच्या पुनर्वापरयोग्य इंधनाच्या ५२% वाटा हा हायड्रोचा आहे. डॉक्युमेंटरी मुख्यतः अमेरिकेबद्दल आहे सो हे का वगळलं हे अजिबात आवडलं नाही. कोलोरॅडो नदी समुद्राला मिळत नाही असा एक उल्लेख विथ हुवर डॅम फोटो इतकंच आठवतंय मला.
२. सोलर एनर्जी: पॅनल्स तयार करायला सिलिकॉन आणि कोळसा लागतो. अर्थात कुठलाही इकेक्टॉनिक पार्ट तयार करायला हे लागतंच. आणि ते मिळवताना कार्बन फुटप्रिंट वाढतं. यात ओरेगॉन मधले साठे परत परत ब्लास्ट करताना दाखवण्या इतकं काही सनसनाटी होतं का? बरं पॅनल्सची एफिशियंसी वीस पंचवीस वर्षांपूर्वी जेवढी होती आणि आता जितकी आहे त्याची तुलना केली तर होणार्‍या प्रगतीची कल्पना येईल. (डोक्यु. ती ८% आहे सांगतं. विकीवर वाचल्यावर ती २० वर्षे जुनी माहिती आहे आणी आज ती १५ % आहे असं समजलं). फिअर मॉंगरिंग!
३. सौर उर्जा सूर्य असतानाच जास्त मिळते, तेव्हाच साधारण डीमांड जास्त असते. पण ढग आले इ. कारणाने पीक आवर मध्ये ती कमी होते. आणि लोड बॅलन्स करायला न्युक्लिअर/ थर्मल/ फॉफ्यु. प्लांट चालवावे लागतात. ते डायल ऑन/ ऑफ करण्यात थोडी उर्जा जास्त खर्च होते. पूर्ण आयडल ठेवता येत नाहीत. हे अत्यंत बेसिक कॉमन सेन्स ज्ञान आहे. हे रिव्हीलेशन झाल्यासारखं (मायनस एकता कपूर म्युझिक) दाखवलं. १००% फॉफ्यु जनरेट केली असती पेक्षा ढग आल्यावर करायला लागते आहे यात नेट निगेटिव्ह काही तरी करतोय. असं सतत फील देत सांगितलं गेलं. मगाशी एकता कपूर म्युझिक नाही म्हटलं.... पण बॅकग्राउंड स्कोरही माझ्या डोक्यात गेला.
४. बॅटरी स्टोरेज कपॅसिटी वाढवली तर सोलार स्टोअर करता येईल आणि लोड बॅल्न्सला वापरता येईल. त्यात नॅरेटर १/१० ऑफ १% फक्त बॅटरी आहे म्हणतो. हे ड्रॅमॅटिक म्हणून मस्त वाटतं. पण कशाचं % आहे हे गुलदस्त्यातच राहतं. जे डॉक्यु. कडुन तरी अपेक्षित नाही.
५. सोलार पॅनल्स खराब होतात, विंड टर्बाईन फ्यु डेकेड्सने बदलावे लागतात. ह्यात फ्यु डेकेड्स असे लूज शब्द प्रयोग वारंवार आहेत. ठोस माहिती समजत नाही. आणि कॉन्स्पिरसी वास येऊ लागतो. बरं विंड टर्बाईन करायला स्ट्रील इतर धातू लागणारच ना? काही तरी खर्च केल्याशिवाय काही मिळत नाही हा बेसिक नियम नाही का? मिळणं हे खर्चापेक्षा अधिक कसं करता येईल यावर प्रयत्न करायचा का काहीच खर्च न करता काय करता येईल यापासून सुरुवात करायची?
६. अ‍ॅपल १००% रिन्युएबल उर्जा वापरते. पण ती वापरायला जंगले तोडली. अरे!!!! जागा मिळवायला जंगले नाही तोडणार तर काय? या जगात कोण जंगले न तोडलेल्या जमिनीवर राहतो? आणि कोण पूर्वी जंगल नसलेल्या जमिनीत उगवलेले अन्न खातो??
७. वाळवंटात सोलार फार्म केली आहेत तर जॉश्वा ट्री तोडली. इ. इ. अरे पण जमीन मिळवायला काय केलेलं तुम्हाला चालणारे ? तर काहीच केलेलं नाही.
८. कॉमन अ‍ॅक्टिव्हिस्टची टर उडवणे. त्यांना बायोमास बद्दल काहीच कसं माहित नाही, किंवा काहीच व्हू कसा नाही याची टर उडवणे ही खटकले. हे पॉझिटिव्ह अंगाने आलं असतं तर आवडलं असतं.
९. बाकी दोन तीन क्लायमॅट इव्हेंट्सना सोलार पॅनल बरोबर बॅकप म्हणून फॉफ्यु. असणं हे ही असंच एकदम शोध पत्रकारिता स्टाईल पर्दाफार्श. हो! सोलार १००% रिलायबल नाही. जागा/ # पॅनल्स जास्त लागतात. हे मला वाटतं सगळे जाणतात.
१०. लाकुड जाळणे, फॉफ्यु. जाळणे, सोलार वापरणे, विंड वापरणे, (न्युक्लिअर आणि हायड्रो बद्दल चकार शब्द नाही) बायोमास वापरणे हे सगळं बेक्कार आहे. मग वापरायचं काय?? तर बियाँड सस्टेनेबिलिटी बघा. टेक कंट्रोल ऑव मूव्हमेंट, CO2 प्रॉब्लेम नाहीये तर मानव जात प्रॉब्लेम आहे इ. इ. हे आपलं बुवाबाजी प्रवचन वाटू लागलं ना मला!
११. फोर्ड (का शेवी?) च्या इव्ही लाँचच्या वेळेला मिशिगन मध्ये इलेक्ट्रिसिटी मोस्टली (त्यातही टक्केवारी भयानक चुकलेली आहे हे नंतर वाचुन समजलं) फॉफ्यु. मधुन येते हे त्या मॅनेजरला माहित न्हवतं हे दाखवुन काय साधलं? त्या गाड्या काय फक्त मिशिगन मध्ये चालतात का? ओंटारिओ किंवा कॅली मध्ये विकायला बंदी आहे का? अत्यंत आजतक स्टाईल प्रश्न आणि कन्विनियंट तेवढेच स्निपेट दाखवणे!

लोकसंख्या दर कमी करा, हा एक उपाय सुचवलेला दिसला. हो तत्त्वतः मान्यच. पण हा एक आणि एकच उपाय डोळ्यासमोर धरुन चाललं तर संपलंच मग सगळं.
बाकी काहीच बोलत नाही डॉक्यु.. मला तरी यावर काय उपाय (अगदी उपाय नको पण ढोबळ दिशा तरी) यावर काही तरी भाष्य अपेक्षित होतं. पण एक दुर्दैवी माकडाचा अंत दाखवण्यात फुटेज वापरलं. असे अनेक क्लिशे प्रसंग, टिपिकल इमेजेस ह्या अनेकोनेक दिसतात. त्या टाळायला हव्या होत्या.

बरीचशी उर्जा अल गोर, ओबामा, कोक बदर्स, ३६०, आणि अनेक अ‍ॅक्टिव्हिस्ट कंपन्या कशा मार्केट कंट्रोल करत आहेत. कसे पैसे मिळवायला धंदा करत आहेत यावरच फोकस. बिल गेट्स च्या रिवर्स कार्बन जनरेशन वर काही दिसलं नाही.
माझी निराशा झाली. फार नवीन काहीच हाती लागलं नाही, आणि सगळंच कसं बेक्कार आहे हेच दिसलं. वेळ टळुन गेली आहे हे खरंच. पण मग नुसतं अवेअर करायचं असेल तर मग ते आहेच. असो.

आत्ता तरी जे आठवलं/ मनात राहिलं ते लिहिलंय. आणखी आठवलं तर मग लिहितो.

In an ideal scenario, locally-sourced fuel is far more sustainable than getting natural gas by fracking and transporting it thousands of miles under pressure. पण सध्याची सिस्टीम एका दिवसात बदलू शकत नाही आणि पारंपारिक चुलीचे तोटे भरपूर आहेत. भारतात स्वदेशी इंधन या कल्पनेचा खूप विस्तार व्हायला हवा. उज्ज्वला योजना हा तात्पुरते उपाय आहे शाश्वत उपाय हा स्थानिक पातळीवर इंधन स्वयंपूर्णता आणणे हा आहे.>>>>
अगदी पर्फेक्ट लिहिलत तुम्ही जिज्ञासा.

वरती बरेचजणांनी लिहिलय कि चुलं हे नाईलाजास्तव खेड्यात वगैरे केल जात. असच काही नाही आहे. रिसायकलिंग हा एक महत्वाचा फॅक्टर इथे विसरला जातो आहे. शेतकरी घरामध्ये चिप्पाड, वाळलेला कडबा (जनावरांना घलून उरलेला) , शेंगा वगैरेची साल,इत्यादी भरपुर शिल्लक असते. अगदी सोलाण्याचा शेंगाची टरफल, उडदाच्या शेंगाची टरफल, मिरच्यांची देठ वगैरे सुद्धा टाकली जात नाहीत. फक्त उस उत्पादक शेतकरी सुद्धा एक एकरभर उसाच्या वाळलेल्या मुळ वापरून बरेच माहिने स्वयंपाक करू शकतात.
बरेचदा हे संपविण्यासाठी गॅस असुनही चुलीचा वापर केला जातो. थोडक्यात हे बाय प्रोडक्टस वाया न जाऊ देण्याची धडपड असते अगदी सधन शेतकर्‍याच्या घरातही. त्यामुळ चुल म्हणजे नाईलाजास्त्वच केली जाणारी गोष्ट आहे अस नाही.
रिसायक्लिंग , प्रदुषण यात आता नेमक काय योग्य हे ठरवण कठिण आहे.

Pages