©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.
भाग १० - https://www.maayboli.com/node/75164
ती रात्र काळरात्र होती.
पर्वणीचा डोळ्याला डोळा नव्हता.
'मनूने अविचाराने काही पाऊल उचललं तर?'
आजपर्यंत ती तिच्या विचारांवर ठाम होती. पण आज हळूहळू तिचाच विश्वास डळमळीत होत होता.
'काय खरं? काय खोट?
मी जे वागले ते चुकीचं की बरोबर?'
तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा वाजला. तिने डोळे घट्ट मिटून घेतले.
मनू आत आला होता.
'आज प्लिज याने माझ्याजवळ असू नये. बिलकुल नाही.'
त्याने एक उशी घेतली. नाईट लॅम्प बंद केला, व तो बाहेर निघून गेला.
पर्वणीच्या मनावरचा ताण एकदम कमी झाला.
'आयुष्य कायम त्याच्या कुशीत घालवण्याचा विचार करणारी मी, आज का तो जवळसुद्धा नको वाटतोय?
की, त्यालाच मी नकोय?
दोन आठवड्यापूर्वी, फक्त दोन आठवड्यापूर्वी ही सुरुवात झाली.
...मात्र स्नेहल कधीचीच त्याच्या आयुष्यात होती.
मी चुकतेय,कारण मी वेडी आहे. आणि तो चुकतोय कारण तो खूप हुशार आहे.
त्याला मी बनवलंय... त्याला मी साच्यात टाकलंय. त्याचा प्रत्येक अवगुण मी माझ्या पद्धतीने बाहेर काढलाय.
त्याच्या रागाची जागा थंडपणाने घेतली, याला कारणीभूत मी आहे.
तो प्रेमाऐवजी बिजनेसला जास्त महत्व देतोय, याला कारणीभूत मी आहे.
आपल्या नात्यात ती उत्कटता राहिली नाही, याला कारणीभूत मी आहे.
तो चुकूच शकत नाही, याला कारणीभूत मी आहे.
मला आयुष्यात एक परफेक्ट माणूस हवा होता, परफेक्ट मॅन. पण एक परफेक्ट माणूस बनवताना त्याच्यातील माणूसपण हरवेन, हे मला का कळलं नाही?'
अनेक विचारांच्या तंद्रीत तिला केव्हा झोप लागली हे तिलाच कळलं नाही.
सकाळी ती उठली. मनू जवळ नव्हताच. आळसावलेल्या अंगानेच ती उठली, आणि ती खाली आली.
"गुड मॉर्निंग परु."मनु तिच्याकडे बघून हसला.
"गुड मॉर्निंग."
"आज मी ऑफिसला सुट्टी टाकलीय, सो, ऍट युवर सर्विस मॅम." तो मिश्कीलपणे म्हणाला. कॉफी?
"मनू, गरज नाहीये हे सगळं करण्याची."
"मला आहे परु. जस्ट वॉन्ट टू लिव द मोमेंट. आणि ते खूप कमी उरलेत."
मनूने दुसरीकडे मान वळवली.
त्याने कॉफीचा कप पर्वणीकडे दिला.
"कशी झालीये?"
"मस्तच."
"लाईक सलीम कॉफीवाला?"
त्याही परिस्थितीत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
"मनू, हट्ट सोडशील प्लिज?'
"कुठला हट्ट?"
"त्याच्याकडे जाण्याचा."
"हट्ट नाहीये, ती गरज आहे माझी."
"का, माझ्यावर विश्वास नाही, मी त्याच्यासोबत झोपले नाही असं? त्याच्याकडूनही कन्फर्मेशन हवंय?"
"पर्वणी, नॉट टुडे."
"ओके. "
तिने कॉफीचा कप खाली ठेवला, व ती आत निघून गेली.
दिवसभर ती शून्यात बघत होती.
दुपारची वेळ आली, तसं तिच्या छातीत धडधडू लागलं.
"पर्वणी. खाली येशील प्लिज?"
"मनूने आवाज दिला."
ती मनूकडे बघतच राहिली. एखाद्या अतिशय महत्वाच्या मीटिंगला जाण्यासाठी तयार व्हावं असा तो तयार झाला होता.
"सो, आय एम रेडी. मी निघतोय आता. बट..."
त्याने टिवीचं रिमोट हातात घेऊन टीवी चालू केला.
"मी येईपर्यंत टीवी बघत बस. तुझ्या हौसेसाठी इतका मोठा टीवी घेतला, पण तू बघतही नाहीस.,"
"नक्की मनू. एवढं तर मला करावंच लागेल."
मनू हसला, आणि बाहेर पडला.
◆◆◆◆◆
आजही त्या वस्तीसमोर गाडी थांबली. लोकांना गाडी नवीन नव्हती...
मात्र तिच्यातून पर्वणीऐवजी मनूला उतरताना बघून बरेच लोक आश्चर्यचकीत झाले.
त्याने फोन काढला, व पर्वणीला लावला. "पर्वणी मी पोहोचलोय."
"ओके."
त्याने फोन ठेवला.
मनू हळूहळू त्या वस्तीचं निरीक्षण करत आत गेला, व त्या चाळीतल्या खोलीत शिरला.
त्या खोलीची अवस्था बघून क्षणभर त्यालाच कसनुस झालं.
"पर्वणी, आलीस? तू येणार हे माहीत होतं मला." एक चिरका आवाज घुमला.
मनू आत गेला.
मनूला बघून तो थबकला.
"मनू, द ग्रेट. आज साक्षात माझ्याकडे." हेमल कुत्सितपणे म्हणाला.
तो अतिशय कष्टाने उठला, आणि बाहेर गेला. त्याने बाहेर डोकावून बघितले. बाहेर पर्वणी उभी नाही, हे बघून त्याचा जीव भांड्यात पडला.
मनूने तिथलाच एक स्टूल स्वतःकडे ओढला.
"तुझा एवढा मोठा बंगला, कंपनी सोडून तू आज माझ्याकडे? मला मारून तर टाकणार नाही ना?" तो खोटं घाबरत आत येत म्हणाला.
"तू काल जे केलंस, त्यासाठी मी मारायलाच हवं. पण मी पर्वणीला प्रॉमिस केलंय. ती जीव आहे माझा. माझं आयुष्य मी तिच्यासाठी बनवलय, आणि तिने ते तुझ्याकडे वाया घालवू नये, म्हणून मी आज आलोय."
"तू हरलाय मनू, तू हरलाय..."
"हो. तू मला तुझ्या लेवलला आणलंस, तिथेच मी हरलोय. फक्त एक सांग, तुलातरी पर्वणी हवीय का मनापासून, म्हणजे मला ते तरी समाधान मिळेल."
हेमल उठला. अतिशय हळूहळू. त्याच्या चेहऱ्यावर विजयाची चमक होती.
"मला पर्वणी हवीय असं तुला कुणी सांगितलं?" "मला फक्त तुला संपवायचंय. आणि हळूहळू तू संपशील."
"काय?"
"तुला हे सांगून तुझा आत्मा आता मी पिटवळून टाकेन. तुला वैफल्य येईल आणि तुला जगणं निरर्थक वाटेल, की तुझ्या प्रेमाची किंमत तिने काय लावली,शून्य!!!"
"ऐक आता, ती मला पहिल्यांदा भेटली ना, तेव्हा सुद्धा मी तिच्यावर प्रेम केलं नाही, पण फक्त ती मूर्ख म्हणून माझ्यावर प्रेम करत राहिली. तेव्हासुद्धा मी तिच्याकडून पैसे घेऊन बाकीच्या मुलींवर खर्च करायचो. बघितलंस, कसं फसवलं?
या असल्या अतिहुशार मुली असतात ना, त्या अशाच फसतात. प्रेम त्याग वगैरे. त्यांना त्यांचं प्रेम अत्युच्च वाटत असतं, त्यांना वाटतं आम्ही प्रेमाने जग जिंकू वगैरे, बदलवू जगाला, पण याचाच मला फायदा झाला.
आणि तिने सांगितलं असेल तुला, मी जेलमध्ये होतो वगैरे, तसं काहीही नाही. पोलिसांनी मला लगेच ताकीद देऊन सोडून दिलं, पण जर तिने पुन्हा तक्रार केली असती, तर मला सोललाच असता, म्हणून भीतीपोटी मी गप्प राहिलो.
तसंही मला दुसरं सावज मिळालं होतं रे त्याआधीच, एक श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी... पण आता पर्वणीशी नातं कसं तोडाव? म्हणून मी तिच्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला. जर ती तयार झाली असती, तर मी तिला यथेच्छ भोगूनच मी सोडलं असतं."
मनू मोठ्या कष्टाने त्याचा राग आवरत होता.
"पण ते वेगळंच घडलं. आणि काही महिन्यांनी त्या दुसऱ्या पोरीच्या बापाने मला होत्याचं नव्हतं करून टाकलं.
तुला सांगू, मला वेश्यांचा खूप नाद आहे, म्हणून तुझी बायको येते ना, मला तिला माझी पर्सनल वेश्या बनवायचीय."
मनू उठला, त्याने स्टूल हातात घेतला...
आणि वेगाने भिंतीवर आदळला. ते बघून हेमलचा थरकाप उडाला.
"तू स्टूल मलाही मारू शकतो, पण मग तुझी बायकोच तुला पोलिसात देईल, इतका तू हरलाय," तो म्हणाला.
मनू खाली बसला.
"त्या दिवशी मी योगायोगाने तिच्या गाडीसमोर आलो नव्हतो, तर ठरवून आलो होतो. तिच्या मनात मी असं काही निर्माण केलं, की तिच्यामुळे माझी अशी अवस्था झाली, आणि शेवटी, तिचा सॉफ्ट कॉर्नर बाहेर आलाच. मग काय, ध्येय म्हणजे हेमलचे शेवटचे दिवस सुखात घालवणं. मग यायला लागली ती.
तुझ्या बायकोला मी यथेच्छ भोगतो. ती मला भोगू देते. कशीही. आता एखाद्या दिवशी थोडे अश्रू ढाळत मला श्रीमंती अनुभवायचिय, असं म्हटलं, तर सगळी प्रॉपर्टीसुद्धा माझी होईल.
आणि हो, अजून एक सांगू? मला कोणता आजार आहे, हेसुद्धा तिला माहिती नाही. पण फक्त आजारी आहे, एवढंच तिचं म्हणणं...
...आणि मला एड्स आहे मनू, त्याचा प्रसाद दररोज मी तुझ्या बायकोला देतो. पण मला तिला संपवायचंय त्यापेक्षाही...
...मला तुला संपवायचंय. कारण तू तिला जवळ केलंस मी दूर लोटल्यावर..."
मनूच्या अंगावर वज्रघात झाला, तो सुन्न बसून राहिला...
आणि पुढच्याच क्षणी विजयी आनंदानं तो उठून उभा राहिला.
"थँक्स हेमल. मी कधीच चुकलो नव्हतो."
त्याने कोटात अटकवलेला पेन काढला, आणि जवळ घेऊन म्हणाला.
"पर्वणी, मी कधीच चुकलो नव्हतो. कधीच नाही. कळलं???"
...टीवीसमोर बसलेल्या पर्वणीच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या...
"पर्वणी? कुठे आहे पर्वणी, काय केलंस तू?" हेमल ओरडला.
एका नवीन आत्मविश्वासाने, वेगळ्याच उर्मीने मनू बाहेर पडला.
त्याला आज प्रचंड हलकं वाटत होतं. काळाच्या जबड्यातून सुटल्यासारखं...
क्रमशः
हायला.....स्टिंग ऑपरेशन!!!
हायला.....स्टिंग ऑपरेशन!!! भारीच.
बापरे ... हीच पहिली reaction
बापरे ... हीच पहिली reaction आली .. हा आणि मागचा भाग विशेष आवडला ... waiting for next one
(No subject)
त्याच्याजवळ कॅमेरा असणार आणि
त्याच्याजवळ कॅमेरा असणार आणि ते पण पेन मध्येच असच वाटले होते..
@चिन्मयी - धन्यवाद
@चिन्मयी - धन्यवाद
@श्रद्धा - धन्यवाद
@मन्या - धन्यवाद
@नौटंकी - धन्यवाद!
नेहमीप्रमाणे छानच झाला आहे हा
नेहमीप्रमाणे छानच झाला आहे हा भाग... उत्कंठा वाढली आता पुढच्या भागाची...
आवडला हा भाग. फक्त एकच प्रश्न
आवडला हा भाग. फक्त एकच प्रश्न पडतो, एका कंपनीची एमडी असणारी, व्यवहारज्ञान असणारी परू एवढी मूर्ख कशी असेल?
Ahhh...!! What a relief..
Ahhh...!! What a relief..
@रुपाली - धन्यवाद।
@रुपाली - धन्यवाद।
@cuty - धन्यवाद!
@मनिम्याऊ - धन्यवाद!
छान लिहलयं...मस्तच आज जरा
छान लिहलयं...मस्तच आज जरा जास्तच मजा आली वाचताना..
अज्ञा छान पलटी मारलीस कथेला.
अज्ञा छान पलटी मारलीस कथेला.
रच्याकने तो सलीम चहावाला असतो.
@अजय - धन्यवाद
@अजय - धन्यवाद
@पाफा - धन्यवाद. कॉपीराईट क्लेम नको ना यायला म्हणून
अप्रतिम...... हातही न लावता
अप्रतिम...... हातही न लावता अलगदपणे हेमलच खरं रूप पर्वणी समोर आणून तिला त्याच्या त्रासातून मुक्त केले... मनूच्या या दूरदृष्टी वागण्याला खरोखरच दाद द्यावी लागेल.... शेवट देखील उत्कंठावर्धक..... अप्रतिम अप्रतिम
छान, तरी गुंता जास्तच सहजपणे
छान, तरी गुंता जास्तच सहजपणे सुटला असं वाटलं.
Mastach twist. Ekdum awadla
Mastach twist.
Ekdum awadla
@तुषारजी - धन्यवाद. पण अजूनही
@तुषारजी - धन्यवाद. पण अजूनही पर्वणीला समजून घेणं बाकी आहे. हा शेवट नाही, शेवटाची सुरुवात म्हणू शकतात.
@वीरू - अजून बरच बाकी आहे. धन्यवाद
@snehalata - धन्यवाद!
Khup chhan zalay ha bhag
Khup chhan zalay ha bhag
Mast.Online camera ne
Mast.Online camera ne parvanila dakvun dile.ThankGod atta happy ending honar Good Manu.
कहानीमे ट्वीस्ट आवडला.
कहानीमे ट्वीस्ट आवडला.
@रुपालीजी - धन्यवाद
@रुपालीजी - धन्यवाद
@nisha07 - धन्यवाद. गुड मनू ऐकून अजून छान वाटलं. फिलिंग गुड
@माझेमन - धन्यवाद
नेहमीप्रमाणे छानच झाला आहे हा
नेहमीप्रमाणे छानच झाला आहे हा भाग... लगे रहो
धन्यवाद उनाडटप्पू.
धन्यवाद उनाडटप्पू.
पुढील भाग टाकला आहे.
कथेला जबरदस्त ट्विस्ट दिलंस
कथेला जबरदस्त ट्विस्ट दिलंस अज्ञा... पण राहून राहून असं वाटतंय की अजूनही काहीतरी बाकी आहे.
पुढील भाग वाचते.
मस्त ...
मस्त ...
लै भारी...
लै भारी...
खूप छान लेख आहेत सगळे नेहमी
खूप छान लेख आहेत सगळे नेहमी प्रमाणे