"देणंघेणं"

Submitted by am_Ruta on 14 June, 2020 - 10:55

एका हाताने देणं आणि त्याच हाताने क्रुरतेने घेणं हि गोष्ट पचवायला खूप अवघड जाते...
काळ हे जरी औषध असलं तरी प्रत्येक घटनेने, मनावर उमटलेले ओरखडे काळ मिटवू नाही शकत...
अल्वावरच्या पानावर जस पाणी मोत्यासारखं चमकून जातं तसच आयुष्यातला आनंदाचा क्षण क्षणार्धात येतो आणि जातो... त्यामगून दुःखाचे काळे ढग डोकावतच असतात, आणि मग सुरु होतो तोह पाठशिवणीचा न संपणारा खेळ.....
आनंद यतो न यतो तोच दुःख खो घालतच...
मग चालू होतो तो त्या दुःखा मागच्या कारणांचा शोध....
मन सैरभैर होत असतंच, पण आजूबाजूच्या किलकिलाटाचा त्यावर जास्त पडसाद पडत जातो....
भोगणारा भोगत जातो...सांगणारा सांगत जातो...
कधी कधी दुःख कमी होत पण निम्म्याहून जास्त वेळा दुःखाची बोचणीच जास्त होते....
सावरणाऱ्यालाच मग प्रश्न पडतो, दुःख झालयं त्याला सावरू, कि दुःखाची जाणीव करून देणाऱ्याला....

- am_Ruta

Group content visibility: 
Public - accessible to all site users