जाळं (भाग२)

Submitted by मोरपिस on 8 June, 2020 - 05:35

जाळं (भाग १) - https://www.maayboli.com/node/74986

          जेव्हा विराज त्याच्या रूममध्ये गेला तेव्हा नीरजा झोपेतून उठून सर्व आवरून तयार झाली होती. निरजाने घातलेला ब्लु ड्रेस बघून अचानक विराजच्या डोळ्यासमोर ब्लु स्वीमसुट घातलेली तनिष्का येऊन गेली. तो कुठल्यातरी विचारात हरवल्यासारखा दिसल्यामुळे निरजाने विचारलं,"काय झालं डियर? अशा कुठल्या विचारात हरवलास तू?"
विराज भानावर येत म्हणाला,"अगं, तुलाच बघत होतो बेबी! यु लूक सो ब्युटीफुल!"
नीरजा लाजत विराजचा हात पकडून म्हणाली,"खरंच विराज! मी आज किती आनंदात आहे हे मी तुला सांगूच शकत नाही. मी कधी विचारच केला मव्हता की तू मला कुठेतरी वॅकेशनला घेऊन जाशील. रियली, थँक यु सो मच".
विराज तिला मिठीत घेत म्हणाला,"बेबी,उद्या बघच तू…तुझा बर्थडे कसा सेलिब्रेट करतो ते! आणि तुला माहितेय का? गौतमची वाईफ रुहीचासुद्धा उद्या बर्थडे आहे".
"दॅट्स वंडरफुल! उद्या खूपच मजा येणार आहे. बट चल ना, आपण गौतम आणि रुहीला भेटून येऊया. शेवटी आपले होस्ट आहेत ते!"
"थोड्या वेळाने आपण सगळेजण डायनिंग हॉलमध्ये एकत्र भेटणार आहोत. गौतमच नाही तर संतोष आणि विनीतसुद्धा त्यांच्या त्यांच्या वाईफसोबत तिथे येणार आहेत".
          जेव्हा विराज आणि नीरजा डायनिंग हॉलमध्ये पोहोचले तेव्हा तिथे आधीपासूनच आलेल्या विराजच्या फ्रेंड्सनी त्यांच्या पत्नीसोबत दोघांचं वेलकम केलं. त्यानंतर विराजने नीरजाचं इन्ट्रोडक्शन केलं. गौतमच्या पत्नीने पैठणी साडी आणि केसात गजरा माळला होता. त्यात ती खूप सुंदर दिसत होती. पण निरजाला राहवलं नाही. तिने शेवटी विचारलंच,"गोव्यामध्ये पैठणी साडी आणि गजऱ्याची तर मी कल्पनाच करू शकत नाही. तुमची आवड खरंच खूप वेगळी आहे".
रुही स्मितहास्य करत म्हणाली,"गोव्यामध्ये राहूनसुद्धा आपण आपली संस्कृती तर विसरू शकत नाही ना!"
स्वतःच्या शोल्डर कट केसांना मागे करत संतोषची पत्नी नुपूर म्हणाली,"बरोबर म्हणतेयस तू! मलासुद्धा इंडियन ट्रॅडिशनल आउटफिट आवडतात. पण गोव्यामध्ये तर सगळे वेस्टर्न ड्रेसच घालतात. म्हणूनच तर गौतमने मला या ट्रीपला फक्त वेस्टर्न ड्रेसच घ्यायला सांगितले". तिच्याकडे सर्वांचं लक्ष गेलं. नुपुरने ब्लॅक टॉप आणि यल्लो स्कर्ट घातला होता आणि कानात होते मोठे मोठे झुलणारे इअररिंग्स…!
विराज आणि नीरजा बसणार इतक्यात विनीतची वाईफ तनिष्का म्हणाली,"वॅकेशनला येताना या संस्कृती आणि कल्चरसारख्या गोष्टी घरीच ठेऊन यायला पाहिजे. अरे, आपण इथे एन्जॉय करायला अलोयत. भजन-कीर्तनाला नाही!"
गौतम लगेच होकारार्थी मान हलवत म्हणाला,"वा! किती समजूतदार आहात तुम्ही! हीच गोष्ट मी रुहीला समजावून थकलो. बट…"
तनिष्का आपला व्हाईट ड्रेस ठीक करत म्हणाली,'गौतम जी, उद्याच्या बड्डे पार्टीला तुम्ही भजन-कीर्तन तर नाही ना ठेवलय". एवढं बोलून ती जोरात हसायला लागली.
हे ऐकताच रुहीचा चेहरा पडला. ती गपचूप  तिच्या चेअरवर जाऊन बसली. तेवढ्यात विराज उभं राहून म्हणाला,"अटेन्शन प्लिज! उद्या फक्त रुही जींचाच बड्डे नाही तर माझी लाडकी पत्नी निरजाचासुद्धा बड्डे आहे".
"वा! दॅट्स ग्रेट!" सगळे आनंदात म्हणू लागले.
          नंतर सगळ्यांनी लंच करता करता संध्याकाळचं प्लॅनिंग केलं. सगळ्यांना क्रूझमध्ये संध्याकाळ घालवावी अस वाटत होतं. करण गोव्याच्या क्रूझ पार्टीची मजाच काही वेगळी असते.
गौतम म्हणाला,'आपण सगळ्यांनी संध्याकाळी पाच वाजताच रिसॉर्टमधून बाहेर पडायचं. रिसॉर्टची गाडी तयार राहील ठीक पाच वाजता".
नीरजा म्हणाली,"बट, एवढ्या लवकर का? काळोख झाला की जाऊया सावकाश! तेव्हाच तर लाईट्स बघायला मजा येईल".
गौतम म्हणाला,"आपण आधी बीचवर फिरायचं. आणि नंतर क्रूझवर जायचं".
"ओके" सगळ्यांनी सहमती दिली. आणि लंच फिनिश करून आपल्या आपल्या रूमकडे जायला निघाले. तेवढ्यात तिथे रिसॉर्ट मॅनेजर रेहान आला. त्याने सगळ्यांना एक एक पेपर दिला आणि म्हणाला,"याच्यात उद्याच्या पार्टीचा प्लॅन आहे. जर तुम्हाला या प्लॅनमध्ये काही ऍड करायचं असेल किंवा काही चेंज करायचं असेल तर तसं खालच्या रिकाम्या जागेत लिहून ठेवा. मी त्या हिशोबाने सगळं सेट करून ठेवेन".
          विराजने रेहानवर एक नजर टाकली. रेहान एक उंचापुरा तरुण होता. त्याची अंगकाठी एखाद्या क्लबच्या बाऊन्सरसारखी होती. सगळ्यांनी लक्षपूर्वक त्या पेपरमधलं प्लॅनिंग वाचलं.  मग प्रत्येकाने त्यात काय हवं काय नको ते सांगून तो पेपर परत रेहानकडे दिला.
गौतम म्हणाला,"ओके गाईज! संध्याकाळी पाच वाजता सगळे रेडी होऊन या".
सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले. रूममध्ये गेल्यावर नीरजा म्हणाली,"विराज! रुही जींना बघून मला असं वाटतंय की गोव्याच्या या खुल्या वातावरणात त्यांना खूप अनफिट वाटतंय".
विराजसुद्धा मनात हाच विचार करत होता की बहुतेक गौतम याच कारणामुळे तनिष्का जींच्या मोहक सौन्दर्याकडे आकर्षित होत चालला होता. तो निरजाला म्हणाला,"तू अगदी बरोबर बोलतेयस नीरजा! माझ्या मते तू त्यांना एकांतात भेटून समजाव की संस्कृती आणि संस्कार चांगलेच आहेत पण कधी कधी आपल्या पतीच्या आवडीनुसार वेगळे कपडे घातले तर त्यात काहीच चुकीचं नाही".
"श्योर! मी नक्की रुही जींना समजावेन. आज संध्याकाळीच वेळ साधून बोलेन".
          संध्याकाळी बरोबर पाच वाजता गाडी रिसॉर्टच्या गेटवर आली. मॅनेजर रेहानने ड्रायव्हरला सगळं समजावलं आणि गौतमला म्हणाला,"सर, मी ड्रायव्हरला सगळं सांगून ठेवलंय. तुमचे गेस्ट ही संध्याकाळ कायम लक्षात ठेवतील".
          गौतमने त्याला थँक यु म्हटलं आणि  तो सगळ्या मित्रांसोबत त्या आलिशान लक्झरीअस ट्रॅव्हलरमध्ये बसला. गाडी बिचच्या दिशेने निघाली. आज तनिष्काने ब्लॅक स्लीवलेस वनपीस ड्रेस घातला होता. ज्याच्यात ती खूप सुंदर दिसत होती. पण रुही…! रुहीने आजसुद्धा बनारसी साडी नेसली होती. आणि मोठ्या केसात सजलेल्या गजऱ्यामुळे ती पूर्ण ग्रुपमध्ये एकदम अनफिट आणि वेगळी दिसत होती. लवकरच गाडी बीचवर पोहोचली. बीचवरचं संध्याकाळच्या सोनेरी किरणांनी भरलेलं वातावरण अत्यंत आकर्षक आणि मनमोहक होतं. चारी बाजूनी पर्यटक हास्य-विनोद करत गोव्याच्या निसर्गसौन्दर्याचा आनंद घेत होते. विराज आणि निरजासुद्धा त्यांच्या ग्रुपसोबत फिरत आणि लाटांशी खेळत फोटो काढत होते. जेव्हा सगळेजण क्रूझवर चढले तेव्हा तिथला जल्लोष आणि खुलेपणा बघून सगळ्यांचं तन-मन प्रफुल्लित झालं. रंगीबेरंगी लाईट्स, मोठ्या आवाजात चालू असलेल्या म्युझिकवर नाचणारे लोक आणि लाटांवर सवार झालेला क्रूझ…! या स्वप्नासारख्या वाटणाऱ्या वातावरणात सर्व काही विसरून सगळेजण हरवून गेले होते. अर्ध्या रात्री ते क्रूझ किनाऱ्यावर आलं. आणि सगळे फ्रेंड्स परत एकदा गाडीत बसून रिसॉर्टवर आले. थकलेले असूनसुद्धा सगळ्यांची मनं एकदम ताजीतवानी झाली होती. सगळ्यांनी रुही आणि निरजाला बड्डे विश केलं. आणि आपापल्या रूममध्ये गेले.
रूममध्ये पोहोचताच नीरजा म्हणाली,"मी रुही जींना एकांतात भेटून त्यांना कंन्वीन्स केलंय की त्यांनीसुद्धा उद्याच्या बर्थडे पार्टीमध्ये वेस्टर्न स्टाईल ईव्हीनिंग गाऊन घालावा".
विराज खुश होत म्हणाला,"बेबी! तू तर कमालच केलीस. व्हेरी गुड!"
"थँक यु डियर" म्हणून नीरजा उद्याच्या पार्टीचा विचार करू लागली.
         थोड्याच वेळात सगळेजण गाढ झोपले. विराजसुद्धा गाढ झोपला होता. झोपल्यावर थोड्याच वेळात कुठूनतरी कोणाच्यातरी किंचाळण्याचा आवाज आला. तो दचकून उठून बसला. नीरजा झोपलेल्या दिशेने त्याने बघितलं. बेडवर नीरजा नव्हतीच!
"एवढ्या रात्रीची नीरजा गेली तरी कुठे!" विराज तिला शोधत-शोधत वॉशरूमकडे गेला. पण तिथे कोणीच नव्हतं! तो बाहेर जाऊन शोधण्याचा विचारच करत होता तेवढ्यात कुणीतरी दार उघडलं. आणि  नीरजा हळूच आत जाऊन बेडच्या दिशेने जाऊ लागली. विराजकडे बघताच तिला थोडं आश्चर्य वाटलं.
"अरे विराज, झोपला नाहीस तू?"
विराजने मध्येच विचारलं," रात्रीच्या या वेळी कुठे गेली होतीस नीरजा?"
नीरजा हसत म्हणाली,"विराज प्लिज! वॅकेशनच्या वेळी तरी तुझा पोलिसी अवतार बाजूला ठेव. अरे मी तर असंच बाहेर शतपावली करायला गेले होते. चल, आता झोप शांतपणे".
विराज गुपचूप झोपला. पण त्याचं मन मात्र खूप बैचेन झालं होतं.

          तो किंचाळण्याचा आवाज होता कोणाचा? एवढ्या रात्री नीरजा नक्की शतपावलीलाच गेलेली की…!

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आता next पार्ट कधी येईल याची वाट बघते आहे...मस्त!!

मस्तच !!

फक्त ते जी़जी टाळा... रूहीजी, नीरजाजी. Wink

हो, कथा चांगली चालू आहे. पण ते मध्ये इंग्लिश वर्डस कमी पेरा. Proud कथेचा वेग मंदावतो. वाईफ ( पत्नी ), इंट्रोडक्शन ( ओळख / परीचय ) वगैरे वगैरे ..