प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं.....

Submitted by पियुष जोशी on 4 June, 2020 - 09:52

पावसात भिजणाऱ्यांच्या सुद्धा
अनेक categories असतात
बरसणाऱ्या सरी कोणाचा happiness
कोणाच्या worries असतात

कोणी शोधतं आडोसा
कोणी स्वतःला न्हाऊन घेतं
कोणी थांबण्याची बघतं वाट
कोणी भिजताना गाऊन घेतं

कोणाला बंधन असतं वेळेचं
कोणाची नसते इच्छा
चिंब भिजतं कोणी
कोणास असते शिक्षा

कोणी स्वतः भिजतो येथे
कोणी पाहून कोणाला बावरतो
कोणी सारतो स्वतःचे केस मागे
कोणी दुसऱ्याची बट सावरतो

पाऊस एकच असला तरी
प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं
आयुष्य तेच असलं तरी
प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं
-पियुष जोशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!! खुप छान.. चित्र पण काढता , कवितापण लिहता..
हुरहुन्नरी आहात...

बाय द वे तुम्ही विटा म्हणजे तासगावजवळच्या विट्याला राहता का??

सुंदर....

कोणी सारतो स्वतःचे केस मागे
कोणी दुसऱ्याची बट सावरतो...
हे विशेष आवडलं..

छान

छान भाव उतरवले आहेत. भिजण्याची आवड असणारे आणि नसणारे दोन्ही पाहिले आहेत.

अरे वा!! खुप छान.. चित्र पण काढता , कवितापण लिहता..
हुरहुन्नरी आहात... >>>>>> धन्यवाद @अजय चव्हाण

बाय द वे तुम्ही विटा म्हणजे तासगावजवळच्या विट्याला राहता का?? >>>>>> हो .........तुम्ही पण याच भागातले आहात का??

खूप खूप धन्यवाद !!!!! निरु, रुपाली विशे-पाटील, सामो, तुषार खांबल, अरिष्टनेमि, राजेंद्र देवी, निर्झरा आणि तेजो :):)

अरे वा!! खुप छान.. चित्र पण काढता , कवितापण लिहता..
हुरहुन्नरी आहात... >>>>>> धन्यवाद @अजय चव्हाण

बाय द वे तुम्ही विटा म्हणजे तासगावजवळच्या विट्याला राहता का?? >>>>>> हो .........तुम्ही पण याच भागातले आहात का??

नाही! आदर्शमध्ये एक दोनदा परीक्षा सुपरवायझर म्हणून काम
केलं होतं म्हणून माहीतेय ..

छान