Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 3 June, 2020 - 09:04
उगाच पापणी झरू लागली
सवाल बोचरे करू लागली
कुठून काळजा कशी वेदना
कथा जुनी जणू स्मरू लागली
अजून आसवे असे प्यायची
कुणास जाम तू भरू लागली
पडून जायचे कधी पावसा
सुकून रोपटे मरू लागली
वळून पाहतो कुणा चालता
निलेश वाट रे सरू लागली
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- वानरी
(लगालगा लगालगा गालगा)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून आसवे असे प्यायची
अजून आसवे असे प्यायची
कुणास जाम तू भरू लागली>>> आवडला
छान. आवडले शेर.
छान. आवडले शेर.
अजून आसवे असे प्यायची
कुणास जाम तू भरू लागली
मलाही हाच आवडला.
-दिलीप बिरुटे
@अजिंक्यराव @दिलीप सर धन्यवाद
@अजिंक्यराव
@दिलीप सर
धन्यवाद