प्लास्टिकचा टब

Submitted by बेताब दिल on 31 May, 2020 - 12:39

आपल्या अवतीभवती कितीतरी वस्तु असतात.मात्र त्यातल्या काहीच गोष्टी कितीही साध्या असल्या तरी आपल्या साठी तया विशेष प्रिय असतात.
आमच्या घरात माझ्या जिव्हाळ्याची वस्तु आहे भांड्याच टोपल. खरकटी भांडी ठेवण्यासाठी आम्ही तो वापरतो.
नुकतंच लग्न झालं होत तेव्हा माझ.घरात सामानाची जमवाजमवी करायची म्हणून बाहेर पडलो दोघेही. हिंगण्यातल्या चौकात घरसंसार सेल ने ही आपला संसार थाटला होता..तेव्हा सेल म्हणजे आवडीचा विषय होता. तिथे आकाशी रंगाचा हा टब आवडला .प्लास्टिक म्हटल्यावर कितपत टिकेल ही शंका होतीच .पण मोठ्या साईजचा आणि तो ही फक्त १०० रुला मिळतोय म्हटल्यावर घेतला एकदाचा. सुरुवातीला मला याच्यामुळे फार कौतुक वाटे त्याच !
नव्या घरात जराशा साशंक मनाने वावरत असताना हळुहळु नवा संसार बहरू लागला. अंगणात एक कळी उमलली. सणवार, पै पाहुणा,नोकरी ,मुलीच्या बाललीला अशा धामधुमीत मला ह्या टब ने मोलाची साथ दिली. कधी भरभरून भांडी वाहायची त्यातून पण त्याने कसली कुरकुर केली नाही . मला मात्र याचे आश्चर्य वाटे ,अजून कसा चांगला राहिला हा !

संसारवेली वर अजून एक पाहुणा आला .पुढे मुलांसाठी म्हणून नौकरी सोडली. घर , २ लहान मुले सांभाळताना कधी चिडचिड व्हायची.तर कधी मन खूप सैरभैर होई.मात्र हा अगदी तसाच पहिल्यासारखा ! किती शांतपणे आपल्याला साथ देतोय अस वाटायचं आता मला त्याच्या विषयी प्रेम वाटू लागलं .
काळानुसार माझ्यातही खुप बदल झाले. जबाबदाऱ्या वाढल्या. आपल्या मतावर ठाम राहता येऊ लागलं.
स्व पणाची जाणीव होऊ लागली. पण हा टब मात्र अजून ही तटस्थ आहे.
माझ्यातले किती बदल पाहिलेत याने. पण कधीही स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव त्याने करून नाही दिली.ना कधी कसली अपेक्षा केली ना कसली तक्रार! एखाद्या वडीलधाऱ्या सारखा शांत पणे आपल कर्तव्य पार पाडतो. आता मला त्याच्या विषयी खुप आदर वाटतो.
हे म्हणजे अगदी माणसासारखे आहे ना ! कसलाही बडेजाव पणा न आणता ,संयमाने राहणाऱ्या माणसा विषयी आदरभाव दुणावतो .पण जर एखाद्याकडे हा पोक्त पणा नसेल तर मनात त्याच्याविषयी कडवटपणा राहतो !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chhan.

घर-संसार! Happy
भरपुर वस्तु घेतलेल्या घरसंसार मधुन. मी 7वीत असताना 2007-08 साली हिंगण्यात राहायला आलो.. त्यावेळी कुणालाही पत्ता सांगायचा झाला तर आधी घरसंसार ही खुण सांगायचो.. नंतर 3-4 वर्षात घरसंसार बंद झाले. आजही बसस्टॉपवर जाताना त्या जागेकडे नजर वळते. आणि चुकल्या- चुकल्यासारखे वाटते.

छान लिहिले आहे.
भावना मस्त व्यक्त केल्या आहेत.
मी ज्या वस्तुंसाठी भावुक होतो त्या डोळ्यासमोर तरळल्या.