Submitted by पियुष जोशी on 20 May, 2020 - 23:15
कधी हसणं राहून जातं
कधी रडणं राहून जातं
कधी मरता मरता थोडं
हे जगणं राहून जातं
कधी रांगणं राहून जातं
कधी पळणं राहून जातं
कधी चालता चालता ठेच लागून
पडणं राहून जातं
कधी असणं राहून जातं
कधी नसणं राहून जातं
या असण्या-नसण्याच्या पायी
ते शोधणं राहून जातं
कधी भोगणं राहून जातं
कधी सांगणं राहून जातं
कधी लिहिता लिहिता बरंच काही
लिहिणं राहून जातं
-पियुष जोशी....
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान !
छान !
वाह!
वाह!
असण्या-नसण्या पायी, शोधणं
असण्या-नसण्या पायी, शोधणं राहून जातं ...
क्या बात!!
छान
छान