Submitted by Asu on 16 May, 2020 - 07:23
मजुरांचा तांडा
उदार होऊन आयुष्यवर
तांडा मजुरांचा रस्त्यावर
पोहोचे कधी अन् कसा
माहित नाही वस्त्यांवर
पोट भुकेले, नाही पाणी
कुटुंब निघाली अनवाणी
प्रखर उन्हे पाय भाजती
कोरोना-भुते मनी नाचती
किडामुंगीसम कधी मरती
देती जन्म कधी रस्त्याने
जन्म-मृत्यूचे तांडव बघती
जीवन जगती ही सस्त्याने
अंतिम यात्रा या मजुरांची
भाग्यवान तर घरला वापस
ना तर लढता मिळेल स्वर्ग
मरता रस्त्यावर हे बेवारस
-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
यथार्थ शब्दांत मांडणी केलीय
यथार्थ शब्दांत मांडणी केलीय तुम्ही.
there is always more misery among the lower classes than there is humanity in the higher - Victor Hugo from Les Miserables
बाप रे!!! मांडणी दाहक आहे.
बाप रे!!! मांडणी दाहक आहे. भिडली.
विषण्ण करणारे व्हिडिओ आणि
विषण्ण करणारे व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यावर जे उमटतंय मनात ते अचूक शब्दबद्ध केलंत आपण..
आपणा सर्वांच्या अभ्यासपूर्ण
आपणा सर्वांच्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रियांबद्दल आणि अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!
आज परत एकदा ही कविता वाचली.
आज परत एकदा ही कविता वाचली. बातम्यांमध्ये एका बाजूला करोनाबळींची मढी खचाखच स्म्शानात ओतलेली दिसत आहेत, दुसरीकडे लोकडाऊन म्हणा किंवा एकूणच बिघडलेल्या अर्थचक्राने उपाशीपोटी रस्त्यावर जागोजागी बसलेले मजुर दिसत आहेत. मागच्यावेळपेक्षा भयानक चित्र आहे सध्या
नारायण सुर्वेंची आठवण झाली -
दोन दिवस वाट पाहण्यात गेले,दोन दिवस दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला,तारे फुलले,रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली
अशी कविता आणि असे प्रतिसाद !
अशी कविता आणि असे प्रतिसाद !
Asu आपली कविता आणि जिद्दु आपले प्रतिसाद !
जन्म-मृत्यूचे तांडव बघती
जन्म-मृत्यूचे तांडव बघती
जीवन जगती ही सस्त्याने > सध्या सर्वांना तोच प्रत्यय येत आहे
सध्याच्या परिस्थितीचे तंतोतंत
सध्याच्या परिस्थितीचे तंतोतंत वर्णन केले .