Submitted by मनोजकुमार देशमुख on 14 May, 2020 - 03:42
ढग एकही काळा भरून आला नाही
कसा गेला पाऊस फिरून आला नाही
का पाहून तिला चुकला हृदयाचा ठोका?
आजुन चिठ्ठीचा त्या निरोप आला नाही
तो सीमेवर लावतो जीवाची बाजी
सण असे दिवाळी तरीही आला नाही
वाटली अनेकांस त्याने असे उधारी
तो मेला तेंव्हा एकही आला नाही
वृद्धाश्रमातून तो निरोप ती गेल्याचा
ती आई होती तरीही आला नाही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान