“I met an unusual man (today). He didn’t walk in with a political agenda. He didn’t walk in with his mind made up. He genuinely wanted to do what he thought was the best….”
व्हाइट हाउस मधला नेहमीसारखाच एक दिवस. डेमोक्रॅट सरकारला विविध खाती व योजना याकरता निधी उपलब्ध करून देणारे एक "अॅप्रोप्रिएशन बिल" पास करण्याकरता आवश्यक तेवढी मते नक्की झालेली नसतात. कॉंग्रेस मधल्या कमिटीवरचे तीन मेम्बर्स हे स्वतंत्र मतांचे "स्विंग वोट्स" आहेत अशी माहिती स्टाफला मिळते. त्यांना पटवण्याकरता व्हाइट हाउस मधे बोलावले जाते.
इथे हा प्रकार थोडा समजून घेण्याकरता - भारतात एखाद्या ठरावावर पार्टी व्हिप ने ठरवलेल्या मताच्या विरूद्ध जाउन मतदान करता येत नाही. तसे केले तर पक्षातून काढून टाकले जाउ शकते. तशी पद्धत अमेरिकन सिस्टीम मधे नाही. जरी बहुतांश लोक आपापल्या पार्टीच्या आदेशाप्रमाणे मतदान करत असले, तरी थोडेफार असे असतात की जे त्यांच्या स्वतःच्या मताने किंवा त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या दबावातून वेगळे मत देतात. काही वर्षानुवर्षे तसे करणारे आहेत. एखाद्या विषयावर त्यांची पार्टीपेक्षा वेगळी असलेली मते सहसा इतरांना माहीत असतात, त्यावरून एखादे बिल पास करण्याची समीकरणे धरली जातात..
यावेळच्या बिल मधे व्हाइट हाउस स्टाफ ने एक महत्त्वाचे कलम घातलेले असते - जनगणना "सॅम्पल्स" वापरून करण्याचे. हा बदल करायला या तीन जणांचा विरोध असतो. कारण त्यांच्या मतानुसार अमेरिकन राज्यघटनेत ही शिरगणती प्रत्यक्ष लोकांपुढे जाउन एकेक व्यक्ती मोजून करावी असे आहे व हे त्याप्रमाणेच झाले पाहिजे.
स्टाफच्या मतानुसार सॅम्पल्स वापरून जनगणना करण्यातून अनेक बिलियन डॉलर्स वाचतील, जे इतरत्र वापरता येतील. शालेय शिक्षकांकरता काही मोठा निधी त्यातून त्यांना उपलब्ध करायचा असतो. दुसरे कारण असे की ही घरोघरी जाउन लोक मोजण्याची जुनी पद्धत कालबाह्य आहे, खर्चिक आहे, त्यात असंख्य चुका होतात. होमलेस लोक, घेटो मधे राहणारे लोक, इंग्रजी न येणारे इमिग्रण्ट्स यांचे मोठे गट या शिरगणतीमधे वगळले जातात. त्यामुळे ज्या लोकांना याची सर्वात जास्त गरज आहे - पब्लिक वेलफेअर च्या योजना ज्या संख्येवरून ठरल्या जातात व निधी दिला जातो - त्यांचीच गणना आवश्यकते पेक्षा बरीच कमी होते. याउल्ट सॅम्पल्स वापरले, तर कमी खर्चात जास्त अचूक माहिती मिळेल हा तो मुद्दा असतो.
या सदस्यांना पटवायला काय काय तडजोडी कराव्या लागतील याचे सर्व राजकीय डावपेच करायच्या तयारीने व्हाइट हाउस चा कम्युनिकेशन डायरेक्टर - टोबी झीग्लर मीटिंग मधे शिरतो. त्या तीन सदस्यांपैकी दोन नेहमीसारखे 'तयार' सदस्य असतात. ते आडमुठेपणाने वाद घालत राहतात. पण तिसरा सदस्य नवखा असतो. तो मि. विलिस ऑफ ओहयो. बायकोच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या हाउस ऑफ रेप्रेझेण्टेटिव्ह च्या जागेवर त्याची तात्पुरती नियुक्ती झालेली असते. तो खरे म्हणजे माध्यमिक शाळेतील इतिहासाचा शिक्षक, तयार राजकारणी नाही.
ही मीटिंग मुद्दाम अशा वेळेला ठरवलेली असते की लोक जास्त वेळ खाणार नाहीत. कारण त्याच संध्याकाळी अनेकांनी लाँग वीकेण्ड करता आपापल्या गावी जाण्याकरता फ्लाइट्स ऑलरेडी बुक केलेल्या असतात. त्यामुळे एका लिमिटच्या पुढे सरकारचे म्हणणे सर्वांना मान्य करावेच लागेल अशा हेतूने ती मीटिंग ठरवलेली असते. इतर दोघांच्या बाबतीत ते लागू असते पण हा अचानक आलेला मि. विलिस त्या वीकेण्डला तेथेच राहणार असल्याने त्याला अजिबात घाई नसते. खाली आलेल्या Expediency कॉमेण्टचा संदर्भ हाच..
आता वाद सुरू होतो. बाकीच्या दोघांना मुद्दे वगैरे ऐकून घेण्यात इंटरेस्ट नसतो. त्यांना आपला अजेंडा रेटायचा असतो. ते म्हणतात की जे घटनेत आहे त्याप्रमाणेच व्हायला हवे. आपण ते बदलू शकत नाही. तर टोबी म्हणत असतो की घटनेत लिहीलेले कालबाह्य आहे. त्यांना यासंदर्भात घटनेतील वाक्य वाचून दाखवले जाते. त्यातील "...by counting whole persons" चा आधार घेउन ते सांगू लागतात की घटनेत स्पष्टपणे लिहीले होते की प्रत्येक व्यक्तीला मोजूनच ही शिरगणती झाली पाहिजे. तेव्हा टोबी त्यांना सांगतो की घटनेत फक्त इतकेच सांगितलेले नव्हते. त्यांना कचाट्यात पकडायला त्याने ते वाक्य अर्धवट वाचायला लावलेले असते. प्रत्यक्षात तेव्हा घटनेत "स्वतंत्र" लोकांना पूर्ण मोजून व बाकीच्या लोकांना "३/५ मोजून" लोकांची संख्या धरावी असे लिहीलेले होते हे तो त्यांना दाखवून देतो.
त्यावेळेस अमेरिकेत गुलाम होते. त्यांना मतदानाचे अधिकार नव्हते. पण ज्या संख्येवरून राज्यातील लोकप्रतिनिधींची संख्या ठरते (House of Representatives), ज्यावरून राज्यांना निधी किती उपलब्ध करून द्यायचा हे ठरते त्यात हे गुलाम लोक पूर्ण का धरले गेले नाहीत? तो इतिहास इण्टरेस्टिंग आहे. वरकरणी आपल्याला वाटेल की दक्षिणेकडची राज्ये - जेथे गुलामी होती- त्या राज्यांनाच गुलामांना मोजायचे नसेल. पण प्रत्यक्षात त्यांना गुलामांची मोजणी पूर्ण संख्येने व्हायला हवी होती. कारण त्यातून त्यांना जास्त निधी मिळाला असता व लोकप्रतिनिधीही जास्त असले असते - ज्यावरून हाउस मधे त्यांचा प्रभाव जास्त राहिला असता. हे सगळे प्रत्यक्ष एका मोठ्या संख्येला कसलाही हक्क न देता केवळ इतरांच्या भल्यासाठी वापरून घेतले गेले असते. याउलट गुलामी मान्य नसणार्या उत्तरेकडच्या राज्यांना गुलामांची मोजणी यात होउच नये असे वाटत होते. कारण दक्षिणेकडच्या राज्यांना त्यातून मिळणारा फायदा त्यांना होउ द्यायचा नव्हता.
यावर बरेच दिवस वाद होउन शेवटी गुलामांची संख्या प्रत्यक्षातील संख्येच्या ३/५ इतकीच धरावी असे ठरले. त्याला Three-fifths compromise असे म्हणतात. त्याबद्दल माहिती इथे आहे. तरीही यातून दक्षिणेकडच्या राज्यांना जास्त प्रतिनिधीत्व मिळालेच. मग पुढे अमेरिकन सिव्हिल वॉर नंतर ज्या तीन घटनादुरूस्ती झाल्या त्यातील एका दुरूस्तीमधे हा क्लॉज काढला गेला व सर्वच लोकांना पूर्ण मोजावे असे ठरले (त्यातही नेटिव्ह इण्डियन्स नव्हतेच धरले. तो वेगळाच मुद्दा आहे).
जेव्हा अमेरिकेत गुलाम होते व एकूणच समानता नव्हती तेव्हाच्या संदर्भाने लिहीलेले वाक्य आता तसेच्या तसे लागू होत नाही. असे टोबी त्यांना दाखवून देतो. हे तरीही मान्य करण्यात त्या इतर दोघांना इण्टरेस्ट नसतो कारण मुळात ते समजून घ्यायला व ओपन चर्चा करायला आलेलेच नसतात. पण तिसरा मि. विलिस तेथे अत्यंत खुल्या मनाने दोन्ही बाजू ऐकत बसलेला असतो व त्याला टोबीचे म्हणणे पटते. त्याचे मत बदलते. तो स्वतः शिक्षक असतो, त्यामुळे त्याला तो ३/५ क्लॉज माहीत असतो व आफ्रिकन अमेरिकन असतो, त्यामुळे त्याला त्याच्यासारखे लोक जनगणनेच्या बाहेर राहण्याचे परिणामही समजतात.
Toby: “If you don’t mind me asking sir, what changed your mind?”
Willis: “What do you mean?”
Toby: “Well I know it wasn’t expediency, so I was wondering what changed your mind”
Willis: “You did. I thought you made a very strong argument”
Toby: “Well thank you. (chuckles) I am smiling because around here the merits of a particular argument generally takes a back seat to political tactics.”
यातला मि. विलीस चा धागा मला इथे मुद्दाम आणावासा वाटला कारण यात राजकीय चर्चांमधे जे दाखवले आहे साधारण तसेच आजकाल कोणत्याही राजकीय/सामाजिक विषयांवरील चर्चांमधे सोशल नेटवर्क्स वर चालते. लोकांची मते आधीच ठरलेली असतात. चर्चेत आलेल्या मुद्द्यांवरून ती बदलल्याचे सहसा दिसत नाही. असला आडमुठेपणा मीही अनेकदा केलेला आहे. पण अशा वातावरणात असे काही बघायला खूप वेगळे वाटते. सोशल नेटवर्क्सवरच्या वादांत किमान काही वाद असे झाले तर कल्पना करा लोकांना किती ते आवडेल वाचायला.
१९९९ पासून ते पुढे ५-६ वर्षे अत्यंत प्रसिद्ध झालेल्या 'द वेस्ट विंग' या सिरीज मधला हा एक एपिसोड आहे. (S1E6). प्रामुख्याने व्हाइट हाउस स्टाफच्या दैनिंदिन कामकाजाशी संबंधित ही सिरीज आहे. रेगन, क्लिंटन व बुश यांच्या स्टाफमधले अनेकजण या मालिकेचे सल्लागार होते. डेमोक्रॅट्स किंवा रिपब्लिकन्स कोणालाही घाउकरीत्या व्हिलन न करणे, सरकारशी संबंधित गोष्टींचे प्रचंड डीटेलिंग, सिरीज मधल्या सीन्स च्या शूटिंगचे विविध नवीन प्रकार, कधी गंभीर नाट्य, तर कधी अत्यंत उच्च दर्जाचे व विषयाशी संबंधित विनोद यातून या मालिकेतील प्रत्येक भाग खिळवून ठेवतो. ही मालिका अनेकदा पाहणारे असंख्य लोक आहेत. किंबहुना केवळ एकदा पाहून यातील एपिसोड्स पूर्णपणे समजणे जवळजवळ अशक्य आहे. अमेरिकन राजकारणाची व पद्धतींची माहिती बरीच नंतर झालेल्या माझ्यासारख्या अनेकांना एकेक भाग पाहून त्यासंबंधी माहिती वेब वरून मिळवल्यावर त्यातील बारकावे समजतात. हा एक तसाच भाग आहे.
या मालिकेतील पहिल्या काही सीझन्स मधे प्रत्येक एपिसोडमधे दोन ते तीन समांतर धागे सुरू असतात. यातही तसेच आहे. एक धागा या मि. विलिस चा, दुसरा बजेट सरप्लस वरच्या चर्चेचा, तिसरा जनगणनेबद्दलच्या माहितीवजा चर्चेचा, तर चौथा प्रेसिडेण्टची मुलगी व स्टाफ एका बार मधे जातात त्याबद्दलचा. जनगणना, बजेट सरप्लस, अॅप्रोप्रिएशन बिल वगैरे प्रकार इतक्या हलक्याफुलक्या पद्धतीने व अनेकदा गंमतशीर संवादांतून आपल्यापर्यंत पोहोचतात आणि बरीच नवीन माहिती आपल्याला देउन जातात. एक उदाहरणः स्टाफपैकी जॉश आणि त्याची सेक्रेटरी डॉना यांच्यातील "वॉक अॅण्ड टॉक" रिकरिंग सीन्स व बजेट सरप्लस चे काय करणार याबद्दलच्या गप्पा. (ही त्या एपिसोड मधले २-३ सीन्स एकत्र केलेली क्लिप आहे).
सध्या ही सिरीज अमेरिकेत नेटफ्लिक्स वर आहे. बहुधा लौकरच एचबीओमॅक्स वर जाईल. जरूर पाहा. अशा असंख्य एपिसोड्सचा खजिना सापडेल.
छान ओळख.
छान ओळख.
भारतात नेटफ्लिक्सवर नाहीय.
मस्त लिहिलं आहेस.
मस्त लिहिलं आहेस.
ह्या सिरिजचे एपिसोड बघुन झाल्यावर रात्री कित्येक वेळा विकीवर हे बिल/ सदर्भ काय होतं ते वाचलेलं आठवतंय. काही बरं सापडलं नाही की अजुनही बघतोच. नेफ्लि वरुन जाईल डोक्यात न्हवतं आलं, बघतो आता परत
सी जे, जॉश, टोबी (आणि कधी कधी सॅम ) चे सीन्स धमाल असतात.
हाऊस ऑफ कार्ड्स अमेरिकन
हाऊस ऑफ कार्ड्स अमेरिकन राजकारण जितकं काळंबेरं दाखवते, तितकं ही सिरीज बरंच चांगलं दाखवते असं मला वाटतं. ऍरन सॉरकीन असल्यानं वॉक अँड टॉक तर आहेच. लेखात म्हटल्याप्रमाणे जॉश आणि डॉनाच्या गप्पा मजेदार आहेतच, पण इतर पात्रंही तितकीच आवडती.
जोई लुकासची भूमिका केलेल्या Marli Marlin चं विशेष कौतुक वाटलं होतं. पोल्स कसे घेतात आणि त्याचं महत्त्व काय हे तर कळलंच, पण ती ज्या मूकबधिर स्त्रीचं पात्र रंगवते, प्रत्यक्ष आयुष्यातही ती तशीच आहे हे जाणून आश्चर्य वाटलं होतं.
आणि हो, नेहमीप्रमाणं छान
आणि हो, नेहमीप्रमाणं छान लिहिलं आहे. हे सांगायचं राह्यलं होतं.
छान लेख. नेटफ्लिक्स वरून
छान लेख. नेटफ्लिक्स वरून जाणार
दि वेस्ट विंग आज वीस वर्षानंतरही अप्रस्तुत (इर्रेलेव्हंट) वाटत नाही हे मालिका लेखकाचे यश समजावे की राजकारणाचे अपयश. वुल्फ क्रॉसिंगचा एक भाग तर इतका खुसखुशीत आहे ....
छान लेख. अर्र चाललं का
छान लेख. अर्र चाललं का नेफिवरून. योग्य सोर्सेसना सांगावं लागेल बीगी बीगी करा म्हून
मी मागच्या तात्याच्या निवडणूकीच्या वेळी पाहिलं होतं. मला वाटतं बेकरीवर मिनी चर्चा पण झाली होती. मला अजूनही काही "ज्यू"लोकांबद्द्लचा विषय आला की टोबी आठवतो. पण बरंच विस्मरणात गेलंय. इतकी मोठी सिरीज पुन्हा पाहेन का माहित नाही? मी फार वेकापणा करते अशा बाबतीत :फिदीफिदी:
>>हाऊस ऑफ कार्ड्स अमेरिकन
>>हाऊस ऑफ कार्ड्स अमेरिकन राजकारण जितकं काळंबेरं दाखवते, तितकं ही सिरीज बरंच चांगलं दाखवते असं मला वाटतं. << +१
काळंबेरं ऐवजी अॅबसोलुट रियॅलिटि हा शब्द अॅप्ट आहे. (बाय्दवे, अॅट टाइम्स आय हॅव एंजॉय्ड सी-स्पॅन ओवर वेस्ट विंग..)
अमेरिकन राजकारणाचा अभ्यास करणार्यांकरता वेस्ट विंग हा एलिमेंटरी/मिडल स्कुलचा धडा असेल तर हाऑका अंडरग्रॅड कोर्स आहे. हायस्कुल ड्रॉपऔट्सना न झेपणारा..
हाऑका, सिरीयसली? महापालिका
हाऑका, सिरीयसली? महापालिका लेव्हलचे पॉलिटिक्स आहे ते. नुसतं खूनम खून लालम लाल दाखवले म्हणजे रिअॅलिटी होत नाही.
हाऊस ऑफ कार्ड्स अमेरिकन
हाऊस ऑफ कार्ड्स अमेरिकन राजकारण जितकं काळंबेरं दाखवते, तितकं ही सिरीज बरंच चांगलं दाखवते असं मला वाटतं. >>> मस्त कलंदर ती वरची कॉमेण्ट तुमच्या पोस्टवर नव्हती. हाऑका आणि वेस्ट विंग एका लीग मधे नाही असे मला तरी वाटते. वेस्ट विंग नक्कीच आयडियलिस्टिक आहे. पण ती आवडण्याचे ते कारण नाही. तसेच हाऑका डार्क वगैरे असण्याशी मला काही प्रॉब्लेम नाही. त्यात राजकारण फार वरवरचे दाखवले आहे. ती बघण्यासारखी झाली ती केव्हिन स्पेसीमुळे. त्या सिरीजच्या लेखनाचा दर्जा वेस्ट विंग इतका चांगला नाही. (त्याच लेखकाचा 'Ides of March' मात्र मस्त आहे).
दुसरे म्हणजे वेस्ट विंगचा बराचसा भाग हा व्हाइट हाउस स्टाफच्या कामाशी, पॉलिसी, प्रोसेस, बिल्स वगैरेंशी संबंधित आहे. त्या दृष्टीने पण ती एकदम वेगळी सिरीज आहे.
मी फार वेकापणा करते अशा
मी फार वेकापणा करते अशा बाबतीत :फिदीफिदी:
->>> + 786
>>हाऑका, सिरीयसली? महापालिका
>>हाऑका, सिरीयसली? महापालिका लेव्हलचे पॉलिटिक्स आहे ते. नुसतं खूनम खून लालम लाल दाखवले म्हणजे रिअॅलिटी होत नाही..<<
आता काय बोलणार यावर? एकतर तुम्ही हाऑका नीट बघितली नाहि, अथवा त्यातले संदर्भ तुम्हाला समजले नाहित. अमेरिकन राजकारणातल्या भूतकाळात घडलेल्या घटना जाउद्या, काहि प्रसंग तर एपिसोडनंतर भविष्यात घडले आहेत...
फा, काल फायनली पहिला सीझन
फा, काल फायनली पहिला सीझन शेवटचे दोन एपिसोड्स सटासट पाहून संपवले. बिलिव मी घरच्या लोकांना मालिक सोल्ड केली. मी हिलरी/ट्र्म्प इलेक्शनच्या वेळेस पाहिली होती आणि अर्थातच आता इसरले आहे
पहिल्या सिझनचा शेवत इतका अॅक्शन पॅक्ड होता हे मी टोटली विसरले होते. ..(जळ्ळं मेलं) म्हणजे पब्लिक लिटरली " आधी नाही सांगायचं ? "वगैरे ...असो.. आता बोळा निघाला असं समजून पहिल्या डिबेटच्या आधी होपफुली आमची गाडी त्या भागांकडे जाईल. गो WW
राज, तुमच्या वरच्या हॉऑका च्या कमेंटचे संदर्भही द्या म्हणजे ती ही मालिका रिपीट करू अर्थात वेस्टविंग संपल्यावरच
वेस्टविंग हे एक स्वप्न आहे
वेस्टविंग हे एक स्वप्न आहे असे मला वाटते. जेव्हा पाहिली होती तो कालखंड वेगळा होता त्यामुळे ते खरे असेल असे वाटले होते. पण मग बराचसा आडमुठेपणा, घोडेबाजार असे सगळे दिसायला लागले. मग अमेरिकेतल्या राजकारणाबद्दल बरेच वाचले गेले ( तरिही इतका इतिहास माहिती नाही)
त्यामुळे आतातर हाऊका पेक्षाही ड्यांजर बातम्या येत असल्याने शेवटचा सिझन पाहिलाच नाही. तसेही हाऊका ही मूळची ब्रिटीश सिरीयल आहे तिला इकडे आणताना थोडे अतिरंजीत केले आहे असे सुरूवातीला वाटले पण आता असे वाटते की ते कमीच पडले की काय ?
>>तुमच्या वरच्या हॉऑका च्या
>>तुमच्या वरच्या हॉऑका च्या कमेंटचे संदर्भही द्या <<
म्हणजे स्पॉयलर टाकु? माबोवर एक धागा आहे, स्पॉयलर सकट. त्यात बरेच रेफरंस मिळतील. क्लिंटनची रेजिम (आणि ट्रंपचा पास्ट) फॉलो केलं असेल तर त्याची हि गरज लागणार नाहि...
स्पॉयलर होईल का माहित नाही.
स्पॉयलर होईल का माहित नाही. मी हॉऑका पण पाहिली आहे. तुम्ही म्हणताय
>>अमेरिकन राजकारणातल्या भूतकाळात घडलेल्या घटना
त्या घटना. पण तो धागा मी पुन्हा पाहिन.इथे जरी तुम्ही त्या घटना (आधीच्या धाग्यात नसतील तर) दिल्यात तरी मला चालेल. क्लिंटनच्या काळात मी अमेरिकेत यायचा पण विचार केला होता का आठवत नाही. तो म्हटला की "ती" घटनाच आठवते. आता निव्वळ काळाची गरज म्हणून या घटना शोधल्या जातात असं वाटतंय पण जाऊदे. उगाच फा च्या शब्दात सांगायचं तर आपली पॅकेजेस कायमची लिहून ठेवायचे धंदे. थि़किंग की चारेक तासांनी एडिट करून जावं. पण अर्थात नाही केलं तर काय इथे लिहिलं म्हणजे काही काळ्या दगडावरची रेष नाही. पुन्हा दुसर्ञा कुठल्या सिरिज आल्या की आम्ही पॅकेज बदलू हाकानाका
>>त्या घटना.<<
>>त्या घटना.<<
गुगल "हाउस ऑफ कार्ड्स अँड रियल लाइफ इवेंट्स"...
या सगळ्या लिंक्स वाचुन हाऑका परत बघा, त्यानंतर वेविं आणि हाऑका यामधे कुठली सिरिज रियॅलिटीच्या जास्त जवळ जाते यावर तुमचं मत इथे लिहा. त्यावरुन तुमचं पॅकेज ठरवता येइल...
हाआकॉ मार खाते ते प्रोसेस
हाआकॉ मार खाते ते प्रोसेस डीटेलिंग, डॉयलॉग्ज आणि एकूणच "विट" मधे. प्रत्यक्षातील घटनांशी जवळीक असणारे प्लॉट्स आहेत त्यात काही आश्चर्य नाही. कोणत्याही रिस्पेक्टेबल राजकीय ड्रामा मधे ते असायलाच हवेत. पण एखादे एज्युकेशन बिल पास करणे वगैरे गोष्टी यात इतक्या गुंडाळतात की हा एखाद्या लोकशाहीतील प्रमुख आहे की डिक्टेटर असे वाटेल. कारण प्रेसिडेन्शियल लेव्हलचे राजकारण काय असते त्यात ही सिरीज पडतच नाही. ड्रामा मधेच जास्त अडकून पडते. अनेकदा तर लोकल लेव्हलचे राजकारण बघत आहोत असे वाटते.
बाकी ते रेल्वे प्लॅटफॉर्मवरून ढकलून देणे, व्हाइटहाउस मधेच कोणाला जिन्यावरून पाडणे वगैरे अचाट प्रकार आहेतच. आम्ही सगळे "ग्रिम" दाखवतो म्हणून जे दाखवतो ते खपवून घ्या असला प्रकार आहे.
वास्तविक याच लेखकाचा/दिग्दर्शकाचा "आइडस ऑफ मार्च" हा चित्रपट खूप चांगला आहे. माझ्या आवडत्या राजकीय चित्रपटांपैके एक.
यातले पॉलिटिकल प्लॉट वेस्ट विंगच्या काळातही होते. खुद्द क्लिंटनची इम्पिचमेण्ट प्रोसीडिंग्ज वगैरे सगळी त्याआधी नुकतीच झालेली होती. पण ते ड्रामे दाखवणे हे वेस्ट विंग च्या प्लॉट मधे नव्हतेच. त्यात दाखवले आहेत तसे सरकारी लोक इतके सरळ नसतील हे उघड आहे - तेव्हाही लोकांना कळत होते. ते दाखवतात प्रोसेस, जशी "द वायर" दाखवते. पण वेस्ट विंग मधे त्याचबरोबर उच्च दर्जाचा राजकीय विनोद आहे- जो अनेकदा "यस मिनिस्टर" च्या जवळ जातो. सेन्सस, बिल पासिंग, रिपब्लिकन्स किंवा डेमोक्रॅट्स च्या पोझिशन्स वगैरेंवर अत्यंत मार्मिक टीका अधूनमधून पेरलेली असते. पण त्याचबरोबर कोणत्याही एका बाजूला व्हिलन न करता ते ओपिनियन्स लोकांना सहज कळतील अशा पद्धतीने लिहीलेले एपिसोड्स पुन्हा पुन्हा बघायला कंटाळा येत नाही. आज २० वर्षांनंतरही अगदी पहिल्या भागापासून ही सिरीज तितकीच बघण्यासारखी आहे.
त्या स्केल वर हाआकॉ ची तुलना होउच शकत नाही. त्यामुळे ती याच्या वरची आहे वगैरे तर एकदम बकवास आहे
ते दाखवतात प्रोसेस, जशी "द
ते दाखवतात प्रोसेस, जशी "द वायर" दाखवते. पण वेस्ट विंग मधे त्याचबरोबर उच्च दर्जाचा राजकीय विनोद आहे- जो अनेकदा "यस मिनिस्टर" च्या जवळ जातो. सेन्सस, बिल पासिंग, रिपब्लिकन्स किंवा डेमोक्रॅट्स च्या पोझिशन्स वगैरेंवर अत्यंत मार्मिक टीका अधूनमधून पेरलेली असते. पण त्याचबरोबर कोणत्याही एका बाजूला व्हिलन न करता ते ओपिनियन्स लोकांना सहज कळतील अशा पद्धतीने लिहीलेले एपिसोड्स पुन्हा पुन्हा बघायला कंटाळा येत नाही. आज २० वर्षांनंतरही अगदी पहिल्या भागापासून ही सिरीज तितकीच बघण्यासारखी आहे.>>>>>>>
प्रेसिडेंट आणि त्यांच्या स्टाफबरोबर असलेली समीकरणं - भावनिक, वैचारीक - आणि वाद, त्यांचा माणुसकीवर, नैतिकतेवर असलेला विश्वास, त्यांचं काही प्रमाणात दाखवलेलं वैयक्तिक आयुष्य, प्रेसिडेंटचा त्याच्या स्टाफवर असलेला विश्वास इत्यादी जवळचं, खरं वाटतं. ही पात्रं खरी खुरी वाटतात. हाऑका मधे सगळेच डार्क दाखवलेत. वैताग येतो सारखी व्हिलनगिरी पहाण्याची.
>> या सगळ्या लिंक्स वाचुन
>> या सगळ्या लिंक्स वाचुन हाऑका परत बघा
>> ते दाखवतात प्रोसेस, जशी "द वायर" दाखवते.
>> जो अनेकदा "यस मिनिस्टर" च्या जवळ जातो
भरपूर होमवर्क आहे म्हणायचं. दिव्याची गरज नव्हती आणि आधी म्हल्याप्रमाणे नवं पॅकेज
अंजली ते खरं वाटण्यावरून मला वाटतं माझ्या बाबतीत निदान मागच्यावेळी मी जेव्हा WW पाहिलं होतं तेव्हा मी तशाच खेळीमेळीच्या टीममध्ये काम करत होते. सो मला ते वेगळ्या अर्थाने क्लीक व्हायचं. मी स्वत: जाॅश-डाॅना सारख्या वाॅकिंग मिटिंग्ज तेव्हा केल्यात. आता मागे वळून पाहिलं तर ते overwork / workaholism वाटतं मला पण ते जाऊदे.
>>दिव्याची गरज नव्हती <<
>>दिव्याची गरज नव्हती <<
एटिकेट्सचा एक भाग आहे तो. पॅकेजच्या बाबतीत मी अजुन अनभिज्ञ असलो कि दिवा वापरतो...
परत एकदा सुचवतो, त्या लिंक्स वाचुन हाऑका बघा. त्यातले डिटेल्स, विटि डायलॉग्ज, मेटफोर्स डोक्यावरुन जाणार नाहित...
वेस्ट विंग च्या बाबतीत
वेस्ट विंग च्या बाबतीत तुम्हालाही हेच सुचवतो
(आणि ही स्पेस इतरांकरता थोडा वेळ सोडतो)
पण वेविं टुकार आहे, त्यातले
पण वेविं टुकार आहे, त्यातले सिन्स, डायलॉग्ज बेक्कार आहेत असं मी कुठेच लिहिलेलं नाहि. फक्त त्यातलं व्हाहाचं ओवरॉल पोट्रेयल, जे युटोपिया* कडे झुकणारं आहे ते मला वास्तववादि वाटत नाहि. म्हणुन त्या संदर्भात किंवा तुलनेत हाऑका सरस आहे...
*परिकथेत कसं सगळं गुडि गुडि दाखवलेलं असतं, प्रसंगी एखादा राक्षस वगैरे या अर्थी.