Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 9 May, 2020 - 05:31
जखमा मनाला करतात काही
स्मरताच नाती छळतात काही
हसणे जरा ते फसवेच होते
जळले असावे उदरात काही
ठरती न अश्रू अजिबात डोळा
लपतात काही ढळतात काही
सरलेच नाही वनवास माझे
नशिबात दुःखे उरतात काही
मजला न आता कसला अचंबा
अदमास जेव्हा चुकतात काही
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- केकिरव
(ललगालगागा ललगालगागा)
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा