Submitted by पियुष जोशी on 5 May, 2020 - 00:03
कधीतरी एकदा
रात्र होईन म्हणतो
पुनवेच्या रातीचा
चंद्र होईन म्हणतो
भिरभिरणारा तो
एकदा वारा होईन म्हणतो
काळोखात बुडालेल्या आकाशात
लुकलूकणारा
एखादा तारा होईन म्हणतो
होईन म्हणतो एकदा
शांत निजलेली पाने
कधी मधुर आवाजातील एखादे
गाणे होईन म्हणतो
दिवसाला या तरी
नाम मात्र करीन म्हणतो
शांत, निर्मळ अशी एकदा
रात्र होईन म्हणतो
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोलीवर स्वागत!
मायबोलीवर स्वागत!
मस्त लिहिलीये कविता!
दोन ओळींमधे स्पेस दिलीत तर कविता सुटसुटीत दिसेल.
मस्त आहे
मस्त आहे
छान
छान
रात्र, चंद्र, वारा, तारा,
रात्र, चंद्र, वारा, तारा, पाने, गाणे .... सुंदर