विचार पाहिजे ..

Submitted by मनोजकुमार देशमुख on 3 May, 2020 - 12:13

बोल नको तसा अचार पाहिजे
जगण्यात सटीक विचार पाहिजे

झुकवून मान अशी का जगावे
नजरेला धार कट्यार पाहिजे

हातात हृदय मी उभा घेऊनी
फक्त तिचा तो होकार पाहिजे

भांडण पुन्हा ते झाले तिच्याशी
परत माझीच माघार पाहिजे

बेभान पाखरू यावे फिरुनी
बागेत अशीच बहार पाहिजे

घसरेल त्या दे हात मदतीचा
मातीचा हाच संस्कार पाहिजे

कृतज्ञता आठव मनोज जगाची
गमन इथूनी साभार पाहिजे

Group content visibility: 
Use group defaults