निर्वाणीचा इशारा

Submitted by रूपाली विशे - पाटील on 28 April, 2020 - 10:51

निर्वाणीचा इशारा

निसर्ग म्हणेआम्हांस तुम्हा साठी
रचिले मी सृष्टीचे मनमोहक चित्र.
परंतु मानवा तू नाही बनू
शकलास माझा सच्चा मित्र...

वेद- पुराणात शिकलास तू
वसुंधरा असे आमची माय.
परंतु तिला कुरुप बनविण्यास
रोविलेस तू तूझे पाय...

कारुण्याची झालर लेवूनी
जीवन कंठती अन्य सजीव.
भूतदयेचा धर्म विसरलास जर
तर तूच होशिल रे निर्जिव...

चंद्रावरती पाऊल तुझे पडे
किती असे तुझं त्याचा अभिमान.
पण... पण... आज तुझ्या त्याच
पावलांना उंबरठा ना देई मान...

आपल्या बेगडी सामर्थ्यावरती
खेळशी तू सारे मतलबी खेळ.
पण आज हया घडीला
उरला नाही जीवनी तुझ्या ताळमेळ..

विस्कटू नको सृष्टीची ही सुंदर घडी
हा असे तुला माझा निर्वाणीचा इशारा.
नाही तर...नाही तर..आवरू शकणार नाही
विस्कळीत झालेला तुझ्या जीवनाचा पसारा...

...सौ .रूपाली गणेश विशे

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults