सध्या माहीत नाही का ते, पण मायबोली वर बरच लिखाण हे आंबट शौकीन होत चाललंय. कदाचित हे फक्त मला वाटत असेल. गेल्या ८-९ वर्षांपासून मी मायबोली वर वाचतेय, गेल्या काही महिन्यांपासून लिहतेय, पण अगदी गेल्या काही दिवसांपासून बरच लिखाण हे अश्लिलते कडे झुकल्यासारख वाटायला लागलं आहे. एक दोन ठिकाणी मी प्रतिक्रियांमध्ये टाकलं हे. पण आता जरा जास्त व्हायला लागलं आहे.
ज्यांना कोणाला "bold" लिखाणाच्या अंतर्गत मायबोलीला शोभणार नाही असं लिहायचं असेल त्यांनी इतर ठिकाणी लिहावं अशी माफक अपेक्षा आहे. तुम्हाला तुमचं लिखाण मांडायचा पूर्ण हक्क आहे पण मायबोली वर हे लिखाण नको असं माझं स्पष्ट मत आहे.
बाकी ज्यांना हे लिखाण लिहायचं असेल त्यांनी ते इतर बऱ्याच website आहेत तिथे लिहावं, ज्यांना वाचण्यात रस असेल त्यांनी तिथे जाऊन वाचावं...
कोणाला राग आला, वाईट वाटलं तरी मी क्ष नाही...
mayboli has vast group of
mayboli has vast group of readers spread worldwide. Most of them do not participate in commenting sections but do read every story with every single comment u all post.
It's very ridiculous that in spite of knowing the fact you people play childish.
We r living in a Era of internet, whr people can share everything lik thought, messages etc within a fraction of seconds.
whatever you people write or comment about someone is published everywhere with just a single click so think before you comment.
ur personal opinion should not damage respect of anyone atlst on social platforms.
also please DO NOT use the
also please DO NOT use the words like "aambat shaukins" & all for criticizing someone. It literally does not suit you. readers come here to read your writing and to know & learn something new always. Don't start creating new threads & start criticism war there.
It shows lack of maturity & social responsibility.
Please be careful next time.
त्या आयडी ने वाईट प्रतिक्रिया
त्या आयडी ने वाईट प्रतिक्रिया बघून धागा एडिट केलेला नसून तुम्ही असा सेपरेट धागा काढून त्यांचा आंबट शौकीन असा उल्लेख केला त्यामुळे एडिट केलेला स्पष्ट दिसत आहे.
तो नवीन आयडी नसून त्यांनी बरेच लिखाण केलेले आहे.
जेंव्हा असा सेपरेट धागा काढून एखाद्या व्यक्ती ला टार्गेट केले जाते त्याला त्रास होणे साहजिक आहे.
कथेला वाईट म्हणा पण लेखकाला नको... +१११
तुमच्या श्लील अश्लीलतेच्या
तुमच्या श्लील अश्लीलतेच्या कल्पना वेगळ्या असतील.
आंबट शौकीन असं लेबल लावलेलं पटलं नाही.
https://www.maayboli.com/node/8398
दहा अकरा वर्षांपूर्वीची चर्चा
पण जर त्याचा हेतू वाचकाच्या
पण जर त्याचा हेतू वाचकाच्या लैंगिक भावना चाळवणे हा असेल तर मायबोली ही जागा नाही. + १
(यांच्याशी सहमती अनेक वेळा होते, पण काही मुद्द्यात मात्र विवाद ठरलेले )
मागे एक चर्चा होती त्यानुसार
मागे एक चर्चा होती त्यानुसार मायबोलीचे सरसरी वय ४०+ आहे... मग अश्या प्रगल्भ वयाच्या वाचकांच्या भावना चाळवल्या जाण्यासाठी इथे रीडर्स कोण टिन एजर्स आहेत का ?
मी आधीच म्हटल्याप्रमाणे ―
आपल्याला प्रवासात तहान लागली की अनेक पर्यायाने पाणी उपलब्ध असते जसे की रोड साइड गलिच्छ ठेला, वडापावची गाड़ी आणि तत्सम छोटे प्रकार आणि बिसलरी देणारे लहान किंवा मोठे रेस्टोरंट ... पाणपोई कुठली निवडावी हे आपले स्वातंत्र्य !!
चारही कथा मी वाचलेल्या होत्या
चारही कथा मी वाचलेल्या होत्या. लेखकाने अश्लिल लिहील असेलही पण ते लेखनच मुळात कथेची गरज होती. म्हणुन प्रत्यक्षात माणसाला आंबट शौकीन म्हणणे हे चुकच ठरते. कथेकडे फक्त एक कथा या दृष्टीकोनातुन बघितले तर अश्लिलतेचा प्रश्नच येत नाही.
तुमच्या या धाग्यामुळे त्यांनी
तुमच्या या धाग्यामुळे त्यांनी आपले लेखन उडवलेले दिसले.
तुमचा निषेध.
>>>>वरवर वाचून कुणी पुराणांना
>>>>वरवर वाचून कुणी पुराणांना देखील अश्लील म्हणू शकतात!! Happy>>>>>
https://www.maayboli.com/node/71750 ................. रामविजय ग्रंथातील, शृंगीची कथा.
याच सारखा नियम लावायचा झाला
याच सारखा नियम लावायचा झाला तर मग मालवून टाक दीप चेतवून अंग-अंग ! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग ! (सुरेश भट) हे देखील अश्लील कॅटेगोरीत मोडेल. परंतु जर या गाण्याचा मागची कथा माहीत असेल तर सगळंच बदलतं. मला वाटतं एखाद्या लेखावर टीका व्हावी लेखकावर नाही. तसेच कुणा एकाच्या मताने सगळेच लेख उडवणे हा देखील पोरकटपणा झाला.
लेखकाने अश्लिल लिहील असेलही
लेखकाने अश्लिल लिहील असेलही पण ते लेखनच मुळात कथेची गरज होती. म्हणुन प्रत्यक्षात माणसाला आंबट शौकीन म्हणणे हे चुकच ठरते.>> सहमत.
त्या कथेची लिंक मिळू शकेल का
त्या कथेची लिंक मिळू शकेल का . मी त्या कथा वाचलेल्या नाहीत परंतु इथे प्रतिसादामध्ये जयश्री यांच्यावर जो हल्ला होत आहे तो देखील चुकीचा आहे असे नाही का वाटत तुम्हाला .
जयश्री ताई, मायबोली हे मुक्त
जयश्री ताई, मायबोली हे मुक्त लेखन स्थळ आहे. लोकांना हवे ते लिहिण्याची येथे मुभा आहे. एखादे लिखाण अश्लील किंवा बीभत्स असेल तर अॅडमीन ना ते काढुन टाकता येते. तुम्ही म्हणत आहात त्या धाग्या वरील लेखन अॅडमीनेने उडवलेले नाही. आधीही अशा बर्याच श्रुंगारकथा येथे येऊन गेल्या आहेत आणि भारतात अनेक मासिकांमधे इतपत श्रुंगार बर्याचदा असतो. त्यामुळे माझे वैयक्तिक मत सांगायचे, तर मलातरी एवढे आक्षेपार्ह वाटले नाही. तुम्हाला ह्या लेखकाचे लिखाण आवडत नसेल तर तुम्हाला ते न वाचण्याचा मार्ग उपलब्ध आहेच. मलाही अनेक लेख / कथा मालिका आवडत नाहीत आणि मग मी त्या वाचतही नाही. लेखनाचा पहिलाच प्रयत्न म्हणुन कितीतरी लेखन इथे येते ज्याचा दर्जा खरच सुमार असतो परंतु लेखक / लेखिकेला स्पष्ट मत अभिप्राय दिला जातो किंवा काहिच प्रतिसाद आले नाही कि लेखक / लेखिकेला काय ते समजते. तसेच काहिसे ह्या लेखांबद्दलही मी म्हणेन.
उद्या, समजा, तुमचे लिखाण दर्जाहीन आहे व त्यामुळे मायबोली वर असे लेख येऊ देऊ नयेत असे कोणी म्हणाल्यास ते बरोबर होईल का? त्याच लॉजिकने, तुम्हाला काही लिखाण आवडत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे हा चांगला मार्ग आहे. (माझे मत)
मला सामो यांचा खाली कॉपी करत
मला सामो यांचा खाली कॉपी करत आहे तो प्रतिसाद आवडला व पटला.
>>
प्रत्येक संस्थळाचा एक बाज असतो. त्या त्या संस्थळाची बलस्थाने असतात. मला वाटतं माबोचे बलस्थान हे 'होमली', घरगुती, अनौपचारीक वातावरण आहे. त्याला धक्का लागेल असे लिखाण खरे तर टाळावे असे माझेदेखील मत आहे.
शृंगाररस ठीके पण उत्तानरसाची मायबोलीवर गरज नाही. एखादी अशी कथा आली तर वेगळे पण पुन्हा त्याचेही पिक आले तर ते आम्हाला नकोय.
म्हणुन प्रत्यक्षात माणसाला
म्हणुन प्रत्यक्षात माणसाला आंबट शौकीन म्हणणे हे चुकच ठरते
>>>>
असे कुठे म्हटलेय त्यांनी?
लिखाणाच्या दर्ज्यावर टिका केली आहे, व्यक्तीवर नाही...
मी काही मिस करतोय का?
@ऋन्मेष +१००१
@ऋन्मेष +१००१
या लेखाचं शीर्षक काय आहे?
या लेखाचं शीर्षक काय आहे?
लिखाणाच्या दर्जावर टीका?
विषय आणि आशयावर आहे.
अगदी सात्विक , सोज्ज्वळ लेखनही सुमार दर्जाचं असू शकतं.
(माझ्या मते अधिकतर असतंच)
इथल्या सगळ्या मतांशी सहमत
इथल्या सगळ्या मतांशी सहमत नसलो, तरी प्रत्येकाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहेच,
पण धागालेखिकेने इन जनरल लिहिलेलं असताना आणि कुणावरही वैयक्तिक चिखलफेक केलेली नसताना त्यांच्यावर वैयक्तिक शेरेबाजी करणं बरोबर नाही हे प्रकर्षाने वाटतं.
लिखाणाच्या दर्जावर टीका?
लिखाणाच्या दर्जावर टीका?
>>>>
तेच हो म्हणजे कॅटेगरी आशय वाशय..
माझे मराठी कच्चेय पण लॉजिक पक्केय..
थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की लेखकावर नाही तर त्याच्या लिखाणातील कंटेंटवरच टिका केली आहे..
लेखकाला आंबटशौकीन म्हटलेय हा मला बुद्धीभेद वाटत आहे..
मी काही मिसत असेल तर अजूनही दखवा
मराठी कच्चे असल्यानेच कदाचित.
मराठी कच्चे असल्यानेच कदाचित.. आंबट शौकीन म्हणजे ज्याला आंबट शौक आहेत तो. विशेषण म्हणतात त्याला, आणि हे विशेषण विशेषतः व्यक्तींसाठी वापरतात. लिखाणाच्या दर्जासाठी नाही.
तसा मी सविस्तर प्रतिसाद दिला आहेच वर, तो वाचा म्हणजे माझ्यापुरता नेमका आक्षेप कळेल. थोडक्यात सांगायचे तर "या ठिकाणी लिहू नका" या अधिकारवाणीला माझा विरोध आहे.
मी वरती तोच मुद्दा मांडलेला
मी वरती तोच मुद्दा मांडलेला आहे ऋन्मेष . आता परत तुम्ही तेच लिहीत आहात .आपण ड्यू आयडी आहोत हे लोकांना समजेल असे करत जाऊ नका बरे . हे गुपित गुपितच राहू दे .
माझ्या माहितीप्रमाणे ज्यांना
माझ्या माहितीप्रमाणे ज्यांना चिंचा, कोकम आवडतात त्यांना आंबट शौकीन म्हणतात.
आंबट शौकीन म्हणजे ज्याला आंबट
आंबट शौकीन म्हणजे ज्याला आंबट शौक आहेत तो. विशेषण म्हणतात त्याला, आणि हे विशेषण विशेषतः व्यक्तींसाठी वापरतात.
>>>>
असे काही गरजेचे नाही.
आता या धाग्यालाही आंबटशौकीन धागा म्हणू शकतो.
आणि या केसमध्ये हे आंबटशौकीन हे विशेषण नसून विशेषनाम झाले.
अवांतर - मराठीतून दहावी केलीय मी. चौथीपासून मराठी पोरींना मराठीतच प्रपोज करून पटवायचा अनुभव आहे मला.
तसेच मी ॲक्चुअली आंबटशौकीन आहे. तो देखील ईतका की धाग्याचे आंबटशौकीन हे नाव बघूनही सारखे सारखे ईथे डोकावायचा मोह होतो.
जोक्स द अपार्ट,
प्रामाणिक हात वर करा ईथे किती जण आहेत ज्यांना कधीही आंबट चाखायचा मोह झाला नाही? ज्यांनी कधी पॉर्न पाहिले नाही, कधी हैदोस वाचले नाही, रस्त्याने जाताना तोकड्या कपड्यातली मुलगी बघून पुन्हा मुद्दामहून तिरप्या डोळ्यांनी बघितले नाही...
असो, सांगायचा मुद्दा असा की जसे निसर्गचक्र अविरत चालत राहायला सेक्स ही क्रिया नैसर्गिकपणे घडते तसे प्रत्येक मनुष्य हा कमी अधिक प्रमाणात आंबटशौकीन असतोच. त्यामुळे एखाद्याला अनवधानाने आंबटशौकीन म्हटले गेले तर लगेच फार व्यथित व्हायचेही गरज नाही. चर्चा करा, गैरसमज दूर् करा. ते जे काही विशेषण होते ते लेखालाच होते.
आता ईथे मुद्दा असा आहे की जसे प्रत्येक जण सेक्स करत असला तरी तो उघड्यावर करत नाही, समाजाचे नैतिकतेचे नियम पाळले जातात .तसेच भले आपण सारेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात आंबटशौकीन असलो तरी मायबोलीवर लिखाण करताना काही नियम पाळले जाणे गरजेचे. तर ते नियम काय असावेत? एवढा साधा प्रश्न आहे...
khartar asa swatantr dhaga
khartar asa swatantr dhaga banvun generalize Karan chukich aahe.
tumhala lekhan aawdle nasel tar tyach likhana khali pratikriya dyavi kinva saral lekhakashi sanvad sadhava. As vegla dhaga banvun, charchaughat tya lekhakala /likhanala visheshan det chikhalfek Karan aaplyala shobhel ka he hi pahav. Halli lahan sahan mulehi social networking khup jababdari ne vapartat. it's time to learn something from them.
kunach kahi chukal hi asel tar te tyala sangaychi hi ek padhhat aste. mature lok ya goshti atyant prabhavipane hataltat. te aapan hi shiku shakto, u just hv to welcome it.
tasech aaj-kaal TV Malika &
tasech aaj-kaal TV Malika & chitrapata madhye hi barech bold scenes astat. pan sensor board la kuni as objectional patr pathvun takrar kelyach mi tari aikal nahi. Te tumhala chalat mag ithe kay problem aahe?
kathechi garaj kinva vatavaran nirmiti mhanun lekhakani kahi lihile asel tar te samjun ghyaychi maturity thevayla kahi harakat nahi.
ki as aahe ka ki, tithe (sensor board) tumhala bolata yet nahi mhanun gapp basaych & ithe vyakt hota yet mhanun muktafal udhalaychi?
aapan nakalat kunachi apkirti kinva badnami tari karat nahi aahot na itak pahaychi tari changulpan & sad-sad vivekbudhi thevavi.
सगळ्या प्रतिक्रियांचे पुन्हा
सगळ्या प्रतिक्रियांचे पुन्हा आभार...
आता मी स्पष्ट कोणावरही टीका केलेली नव्हती... बऱ्याच लोकांना माझा धागा वाचून मी "ओझं" ह्या कथेवर टीका केली असं देखील वाटलं, पण म्हणून त्या लेखकाने स्वतःचा धागा संपादित नाही केला, कारण त्यांना खात्री होती की त्यांच्या लेखनात वाईट काहीही नाहीय.
राहिला प्रश्न कोणी काय लिहावं याचा... तर मी आधी देखील म्हणाले आहे की कोणीही काहीही लिहावं, माझा त्यांच्या लिखाणाला आक्षेप नाही. पण माझं अजूनही स्पष्ट मत हेच आहे की "ही ती जागा नाही".
माझं स्पष्ट मत आहे, मायबोलीवर
माझं स्पष्ट मत आहे, मायबोलीवर श्लील अश्लीलतेच्या कसोटीवर कोणत्याही लेखनाला बंदी नाही.
ज्यांना हे पटत नाही, त्यांच्यासाठी ही जागा नाही.
ज्यांना हे पटत नाही,
ज्यांना हे पटत नाही, त्यांच्यासाठी ही जागा नाही. +१२३
कुठल्याही लिखाणाबाबत योग्य अयोग्य ठरवत कारवाई करायला प्रशासक मंडळ समर्थ आहेच त्यामुळे विनाकारण
लेखकानीवाचकानी त्यात हस्तक्षेप करुच नयेवाचकांनी
वाचकांनी
माझं स्पष्ट मत आहे, मायबोलीवर
माझं स्पष्ट मत आहे, मायबोलीवर श्लील अश्लीलतेच्या कसोटीवर कोणत्याही लेखनाला बंदी नाही.
Submitted by भरत. on 9 April, 2020 - 11:39
>>>>>
आर यू शुअर? प्रशासनाची याबाबत काहीच पॉलिसी नाही? कोणी ईथे हैदोस कथाही बिनधास्त लिहू शकतो??
Pages