***
साहित्य -
२ वाटी मैदा किवा गव्हाचे पीठ, ३ टेबलस्पून पिठीसाखर, १ टिस्पून बेकिँग पावडर, अर्धा टिस्पून बेकिँग सोडा, ३ टिस्पून तूप, १ ते दिड वाटी दूध (लागेल तसे घ्यावे). १ टिस्पून vanilla essence.
कृती-
मैदा, पिठीसाखर, बेकिँग पावडर आणि बेकिँग सोडा, vanilla, मेल्टेड तुप हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. यानंतर यामध्ये थोडे-थोडे दुध घालून मिश्रण थोडे सैलसर करावे. इडलीच्या मिश्रणाप्रमाणे हे मिश्रण तयार झाले पाहीजे. जास्त पातळ करु नये.
आता हे मिश्रण पाच मिनिटासाठी झाकून ठेवावे. यानंतर (अगदी बारीक आचेवर) नॉनस्टीक पॅन वरती थोडेसे तुप लावून घ्यावे, व त्यावर पळीने थोडे-थोडेसे मिश्रण घालावे (फुलक्या एवढेच लहानसे पसरावे). एका बाजुने भाजून दुसया बाजूनेही सोनेरी सर भाजून घ्यावे.
ही अगदी साधीसोपी एगलेस पॅन केकेची रेसिपी आहे.
* बेकिँग सोडा आणि बेकिँग पावडर या दोघांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे दोन्ही वापरले जाते.
* जर या मिश्रणामध्ये बेकिँग सोडा ऐवजी एक अंडे फेटून घातले तर तो पॅनकेक ही चविष्ट लागतो.
* हे केक जर मधाबरोबर खाल्ले तर ३ मध्यम आकाराचे चमचे साखर सुध्दा पुरे होते. अजुन एक असे की, तुम्ही किती गोड खाता यानुसार मिश्रण तयार झाले की, थोडं हातावर घेऊन टेस्ट करून घ्या. गोडाचे प्रत्येक घरातील प्रमाण कमी-अधीक असते.
मस्तच झालेत
मस्तच झालेत
ह्यात ट्रूटी फ्रूटी घातले तर चालेल का ? बहुतेक अजुन छान दिसेल आणि चवीला बच्चे कंपनीलाही आवडेल.
कसले तोंपासू दिसतायत पॅनकेक.
कसले तोंपासू दिसतायत पॅनकेक. उचलून लगेच गट्टम करावेसे वाटले.
कसले तोंपासू दिसतायत पॅनकेक.<
कसले तोंपासू दिसतायत पॅनकेक.<<<+१
Wow.. easy to make..
Wow.. easy to make..
Will try this now..
अररारारारा ( तरडे मोड ऑन ,
अररारारारा ( तरडे मोड ऑन , दवे नाही ) .
मी पण एकदोन वेळा असेच केले आहेत , पण रंग असा नाही आला . गव्हाळ रंगाचेच झाले .
हे एक्दम खतनाक दिसतात .
सुपर्ब दिसताहेत. टेस्टी.
सुपर्ब दिसताहेत. टेस्टी.
यावर मधाचे गार्निश हवे होते.
यावर मधाचे गार्निश हवे होते.
Yummy distayt! nakki karun
Yummy distayt! nakki karun baghen!
तोंपासू.
तोंपासू.
Baking powder nasel tar
Baking powder nasel tar paryay mhnun kay takta yeil yaat?
तोंपासू!
तोंपासू!
Ek no.
Ek no.
लुसलुशीत दिसत आहेत..मी नेहमी
लुसलुशीत दिसत आहेत..मी नेहमी रेडी मिक्स चे करते..एकदा असे करून बघेन. खाताना सिरप टाकून खाल्ले का.....धन्यवाद सिद्धी.
फ्लफी (हलके) झालेले दिसतायत.
फ्लफी (हलके) झालेले दिसतायत.
छान आहे रेस्पि
छान आहे रेस्पि
अज्ञानी - ट्रूटी फ्रूटी ,
अज्ञानी - ट्रूटी फ्रूटी , ड्राय फ्रुट्स वगैरे घालु शकता.
स्वस्ति - गव्हाचे पीठ वापरत असाल तर जास्त गव्हाळ होतील. किवा गव्हाळ होऊ नये म्हणुन केक चे मिश्रण पॅनवर घातले की दोन्ही बाजु अगदी कमी आचेवर भाजा. केव्हा केव्हा जास्त भाजल्याने ही कलर बदलतो.
एक केक तयार झाला की लगेचच दुसरा केक न करता पॅन जास्त तापला असेल तर मध्ये मध्ये गॅस चालु-बंद करत जा.
तैमूर - होय. मधाचे, फ्रुट जॅम्स चे गार्निश करता येते.
mango pulp बरोबर तर खायला अप्रतिम लागतो.
वेडोबा - झटपट केकसाठी Baking powder ला ऑप्शन नाही. मला तरी माहित नाही.
* अज्ञानी, किट्टु२१, खसकूराम, Piku, स्वस्ति, सामो, तैमूर, TI, सुची जी, वेडोबा, मंजूताई, मोल, आदिश्री, ऋतुराज.
प्रतिसादासाठी आणि ही साधीसोपी रेसिपी आवडली त्यासाठी सगळ्यांचेच मनापासून आभार.
https://youtu.be/gk4Do47MAG4
https://youtu.be/gk4Do47MAG4 Pancake recipe... Just as above
वेडोबा - लिंकबद्दल थॅक्स.
वेडोबा - लिंकबद्दल थॅक्स.
सेम रेसिपी फक्त मी vanilla essence वापरते. तिथे वापरल नाहिये.
आकार व रंग वेगवेगळा आहे.
सिद्धी , जबरी फोटो आहे एकदम.
सिद्धी , जबरी फोटो आहे एकदम. छान कृती.
तुम्ही जे पीठ तयार केलेल आहे ते तुप न घालता कोरड्या बरणीत ठेवलेत तर बरेच दिवस राहील. इथे जे पॅनकेक मिक्स विकत मिळते ते तसेच असते.
आजच नाश्त्याला बनवून पाहिले.
आजच नाश्त्याला बनवून पाहिले. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं प्रमाण घेतलं होतं. पण 3 चमचे साखर घातली तर खूपच अगोड झाले होते. माझ्या मते साखरेचे प्रमाण चुकलंय का? बाकी सगळं चॅन झालं होतं, रंग, सॉफ्टनेस, जाळी पण मस्त आली होती. मी नंतर साखर वाढवली मग छान झाले
मस्त. मी काल बनवले एकदम यम्मी
मस्त. मी काल बनवले एकदम यम्मी झाले होते. खूपच सोपी आणि टेस्टी पाककृ. धन्यवाद .
सीमा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सीमा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पीठ तयार केलेल आहे ते तुप न घालता कोरड्या बरणीत ठेवलेत तर बरेच दिवस राहील देखील पण यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरली आहे. ती ऐत्यावेळीच टाकावी लागते.
सान्वी - साखरेचे प्रमाण बरोबर आहे. पण साखरेचा चमचा लहान- मोठा असु शकतो. इथे ३ टेबलस्पून साखर वापरावी लागते. मी ते नमुद करायला विसरले. आता अपडेट केलं आहे. आणि तुम्ही हे केक जर मधाबरोबर खाल्ले तर ३ चमचे साखर सुध्दा पुरे होते. अजुन एक असे की, तुम्ही किती गोड खाता यानुसार मिश्रण तयार झाले की, थोडं हातावर घेऊन टेस्ट करून घ्या. गोडाचे प्रत्येक घरातील प्रमाण कमी-अधीक असते.
पाककृती करुन पाहिली आणि प्रतिसाद दिला त्या बद्दल धन्यवाद ! खुप बरं वाटलं.
भाग्यश्री १२३ - प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद ! खुप बरं वाटलं.
धन्यवाद सिद्धी, मी पुढच्या
धन्यवाद सिद्धी, मी पुढच्या वेळी कणिक आणि अंडे असे कॉम्बो वापरून करून बघेन.
फोटो पाहून डोळ्यांत बदाम. २
फोटो पाहून डोळ्यांत बदाम. २ वाटी मैदा म्हणजे नेमके किती ग्रॅम/प्रमाण?
गव्हाच्या पीठामुळे चवीत खुप
गव्हाच्या पीठामुळे चवीत खुप फरक पडतो का ? त्या व्हिडीओ मध्ये मीठ पण घातलयं तर ते आवश्यक आहे का? धन्यवाद.
स्वादिष्ट दिसतोय पॅन केक!!
स्वादिष्ट दिसतोय पॅन केक!!
ही रेस्पी अ ड झाली आवडत्या
ही रेस्पी add झाली आवडत्या रेस्पी मधे..धन्यवाद
Filmy - २ वाटी मैदा म्हणजे
Filmy - २ वाटी मैदा म्हणजे साधारण २०० grm होईल.
मोहीनी१२३ - गव्हाच्या पीठामुळे चवीत खुप असा फरक पडत नाही. पण मैद्याच्या पीठापेक्षा गहू पौष्टिक आहे.
मीठ वापरले किंवा नाही वापरले तरीही टेस्ट तिचं रहाते.
कृष्णा, वेडोबा , सान्वी , Filmy, मोहीनी१२३ प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
सिद्धी, आमच्याही घरातील आवडता
सिद्धी, आमच्याही घरातील आवडता नाश्ता आहे हा. पण पद्धत थोडी वेगळी.
मी 1 कप कणीक + 1 कप बारीक रवा+ पाऊण कप साखर + खायचा सोडा + चमचाभर तूप एकत्र करून दोन कप दुधात कालवून पीठ तयार करते. तूप लावलेल्या पॅनमधे डावभर पीठ पसरून झाकण घालायचे, उलटून भाजायचे. वरून मध/ स्ट्रॉबेरी क्रश वगैरे. वरील साहित्यात छोटे छोटे सहा पॅनकेक होतात.
धन्यवाद सिध्दी.आता करून बघतेच
धन्यवाद सिध्दी.आता करून बघतेच.
Pages