Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 March, 2020 - 13:49
तोच तो ब्राह्मण
************
ब्रह्म जाणतो जो
तोच तो ब्राह्मण
बाकी तुम्ही आम्ही
सारे ते समान ॥
आम्हाला बुद्ध ही
गमतो ब्राह्मण
आम्हाला तैसाची
महाविर जैन ॥
चोखा तुका नाम्या
अवघे ब्राह्मण
स्वरूपी राहिले
स्वरूप होऊन ॥
तयाच्या हातात
ब्रम्ह दीप्तीमान
तयाच्या प्रकाशी
चालतात जन ॥
पाप योनीची ती
जुनाट कल्पना
म्हणो कुणी किती
न पटते मना
जन्माने नसते
कुणीच महान
वैश्य कृषी क्षत्रि
पोटाची साधन
नवनाथे स्पष्ट
सांगितली खूण
तेच ते मानतो
विक्रांत म्हणून
**
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली
आवडली
वाह..कीती छान अर्थ सांगितला
वाह..कीती छान अर्थ सांगितला तुम्ही!!!! खुप छान...
सुंदर!!
सुंदर!!
सुंदर...
सुंदर...
छान लिहिले आहे. इंद्रिय
छान लिहिले आहे. इंद्रिय तृप्ती साठी वाटेल तो मार्ग चोखाळणारे बोकाळलेत चहुकडे. ब्रह्म जाणलं असतं तर लोकांनी धर्म बदलला नसता. ब्रह्माचा अर्थ ठाऊक नाही. पण कागदोपत्री ब्राह्मण जिकडे-तिकडे आहेत. छान आरसा दाखवला आपण.