देवी - एक शॉर्ट फिल्म

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 March, 2020 - 17:34

परवाच कपिल शर्मा शो मध्ये देवी या शॉर्ट फिल्मचे प्रमोशन पाहिले तेव्हाच म्ह्टले ही आली की बघूया. आज बायकोने सांगितले की यूट्यूबवर आहे आणि तिने बघितलीही. काय कशी आहे विचारली तर ती काहीच बोलली नाही. फक्त बघ म्हणाली. मी आताच पाहिली. मिनिटाभरात शॉर्ट फिल्म काय आहे आणि क्श्याबद्दल आहे हे समजले. पण १३ मिनिटे खिळवणारी होती. शेवट काय करताहेत याचीही उत्सुकता होती. प्रत्यक्षात जेव्हा शेवट जवळ आला तेव्हा तो काय असणार याचीही कल्पना आली. आणि तरीही....
तरीही डोळ्यातून पाणी आले..
येतच राहिले ..

शॉर्ट फिल्म शॉर्ट परीक्षण
आवर्जून बघा
लिंक खाली देत आहे

https://youtu.be/2KP0aDTVtFI

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोर सुद्धा चांगली आहे. पण त्यावर देवी बनवली हे छान झाले.

च्रप्स,
कठुआ रेप आठवा ... लोकेशन आठवा ...
>>>
हा तर्क काहीच्या काही वाटतोय.
स्त्री - देवी हे टिपिकल आहे. पण मला मुळातच हे गंडलेले वाटते. देवतांमध्येही स्त्री असते म्हणून पुरुष प्रत्येक स्त्रीला देवी म्हणून बघेल ही अपेक्षाच मुळात भाबडी वाटते. चांगला माणूस
ईतरांशी चांगला वागतो वाईट माणूस वाईट..अन्यथा आस्तिकांमध्ये माणूसकी असते आणि नास्तिकांमध्ये असेलच असे नाही म्हणावे लागेल.

हो अभ्यास वाली ती मुलगी आधी कुठे पाहिली आहे कुणाला लक्षात असेल तर प्लीज सांगा, माझ्या डॉक्याला भुंगा लागलाय कधीचा >>>>> मला हिची जुत्ती ना वाची शोर्ट फिल्म आठवली.

Pages