Submitted by ऋन्मेऽऽष on 10 March, 2020 - 17:34
परवाच कपिल शर्मा शो मध्ये देवी या शॉर्ट फिल्मचे प्रमोशन पाहिले तेव्हाच म्ह्टले ही आली की बघूया. आज बायकोने सांगितले की यूट्यूबवर आहे आणि तिने बघितलीही. काय कशी आहे विचारली तर ती काहीच बोलली नाही. फक्त बघ म्हणाली. मी आताच पाहिली. मिनिटाभरात शॉर्ट फिल्म काय आहे आणि क्श्याबद्दल आहे हे समजले. पण १३ मिनिटे खिळवणारी होती. शेवट काय करताहेत याचीही उत्सुकता होती. प्रत्यक्षात जेव्हा शेवट जवळ आला तेव्हा तो काय असणार याचीही कल्पना आली. आणि तरीही....
तरीही डोळ्यातून पाणी आले..
येतच राहिले ..
शॉर्ट फिल्म शॉर्ट परीक्षण
आवर्जून बघा
लिंक खाली देत आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शॉर्ट फिल्म च्या धाग्यावर छान
शॉर्ट फिल्म च्या धाग्यावर छान चर्चा झालीये.. देवी बद्दल..
ओके चेक करतो. मी पाहिली नाही.
ओके चेक करतो. मी पाहिली नाही.
पण चर्चेलायक नवीन पिक्चर वा शॉर्ट फिल्मवर स्वतंत्र धागाच काढायचा की.. सर्वसमावेशक धाग्यातली चर्चा सर्वांच्या नजरेस न येता निसटते. त्यामुळे राहू दे हा धागाही. येथील लिंक पाहून जास्त लोकं बघतीलही ही शॉर्ट फिल्म
ओके चेक करतो. मी पाहिली नाही.
ओके चेक करतो. मी पाहिली नाही.>> चल झुठा.
पाहिली. शेवट रडवतो.
पाहिली. शेवट रडवतो.
शेवट काय आहे , असेल हे आधी
शेवट काय आहे , असेल हे आधी कळौन ही डोळ्यात पाणी येतेच. मुक्ता विशेष आवडली.
नव्हता माहित शेवट. मला तर मी
नव्हता माहित शेवट. मला तर मी आता मोठ्याने रडु लागते की काय असं वाटलं.
ऋन्मेऽऽष... शेवटची ५ मिन तर
ऋन्मेऽऽष... शेवटची ५ मिन तर कहर आहेत !!! मला माझ्या च हृदयाची धडधड स्पष्ट ऐकु येत होती. फार प्रभावीपणे घेतली आहे ही शॉर्ट-फिल्म
पहायलाच हवी.
पहायलाच हवी.
मला जरा अंडरवेल्मिंग म्हणावे
मला जरा अंडरवेल्मिंग म्हणावे तशी वाटली ही फिल्म. इतके एक से एक कलाकार आणि व्हायरल झालेली फिल्म त्यामुळे अपेक्षा जास्त झाल्या असाव्या. पण बघताना पहिल्या काही मिनिटातच प्रेडिक्टेबल झाली. त्यामुळे शेवटाचा पण अंदाज आलाच.
अंडरवेलमिंग असणं बरं वाटतंय
अंडरवेलमिंग असणं बरं वाटतंय
जितका भयंकर कंटेंट तितकं मन लांब पळतं.इथे सगळे ज्या कॅज्युअल पद्धतीनं गोष्टी करत, बोलत आहेत ते जास्त अंगावर येतं.
डिस्टर्बिंग आहे ...खूप छान
डिस्टर्बिंग आहे ...खूप छान बनवली आहे
मुक्ता ने नेहमीसारखी टुकार
मुक्ता ने नेहमीसारखी टुकार ऍक्टिंग केली आहे... चेहऱ्यावर माशी उडत नाहीय.
धुपिया उजवी वाटली तिच्या समोर....
बाकी ती मेडिकल अभ्यास करणारी पोरगी ने मस्त काम केले आहे...
हो अभ्यास वाली ती मुलगी आधी
हो अभ्यास वाली ती मुलगी आधी कुठे पाहिली आहे कुणाला लक्षात असेल तर प्लीज सांगा, माझ्या डॉक्याला भुंगा लागलाय कधीचा
चांगली फिल्म आहे. एक पर्फेक्ट
चांगली फिल्म आहे. एक पर्फेक्ट अॅलगोरी, समाजाला आरसा दाखवणारी. प्रत्येक पात्र प्रातिनिधीक आहे, सगळ्या स्तरावरचं...
अभ्यासवाली पोरगी त्या वेडिंग
अभ्यासवाली पोरगी त्या वेडिंग वाल्या वेब सिरीजमध्ये होती का शोभीताच्या
ओ येस्स! थॅन्क्यू सनव!!
ओ येस्स! थॅन्क्यू सनव!!
मेड इन हेवन मध्ये आहे ती
मेड इन हेवन मध्ये आहे ती पोरगी. तितली मध्ये पण होती का?
आता पुन्हा पाहिली. पहिल्यांदा
आता पुन्हा पाहिली. पहिल्यांदा एखादी शॉर्ट फिल्म दोन वेळा पाहिली. थोडी आणखी डिटेलिंग ऊमजली. देवी हेच नाव का दिले असावे कल्पना नाही. पण शेवटी जेव्हा Devi असे नाव आले ते मला Devil असे भासले..
चांगली आहे.
चांगली आहे.
मुक्ता आणि नीना कुलकर्णी, दोघींचे काम सर्वात जास्त आवडले.
देवी हेच नाव का दिले असावे
देवी हेच नाव का दिले असावे कल्पना नाही.
>>>
लक्ष्मी, सरस्वती, अन्न्पुर्णा, दुर्गा इत्यादी 'देवी' पुजायची परंपरा आपल्याकडे आहे तरीही .......
बघताना पहिल्या काही मिनिटातच
बघताना पहिल्या काही मिनिटातच प्रेडिक्टेबल झाली. >>> +१
एक फिल्म म्हणून, इम्पॅक्ट म्हणून शेवटी लहान मुलगी प्रथम पाठमोरी दाखवतात तिथेच शेवट असायला हवा होता.
त्यानंतर टीव्हीवरचं वाक्य दाखवून त्याचा परिणाम नाहिसा होतो. लोकांना फिल्म कळली नाही तर काय, शेवटी टीव्हीवर रेफरन्स स्पष्ट केलेला बरा, असा फिल्म बनवणार्यांचा आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो.
विषय पहिल्या काही मिनिटात
विषय पहिल्या काही मिनिटात कळतो आपल्याला पण तरी तो अंगावर येतोच.
प्रत्येक फ्रेम खोलवर वार करुन जाते
प्रत्येक संवाद आणि मधला शांत पॉझ विषयाला अधीक परिणामकारकपणे पुढे आणतो
रडावस वाटत पण धड रडू फुटत नाही
ओरडावस वाटत पण नक्की कोणवर? कि कोणाकोणावर ते कळत नाही
एकाचवेळी चीड, संताप, आगतीकता, दु:ख काहीतरी पॉझिटिव्ह व्हाव अशी आतून आलेली उर्मी आणि त्याचवेळी याचा शेवट माहिती असल्याने भरुन आलेली काळोखी
विषय खोल आहे, त्यावर उपाय शोधण्यासाठी हि फिल्म नाहीये. बरं मनाला माहिती नसलेलं धक्कादायक वगैरे त्यात काही नाहीये आणि त्यामुळेच आत दाबून टाकलेली भिती सरफेसवर येते त्याला थांबवायच कस कळत नाही. या फिल्मचा हेतू त्यांच्याही मनातली हि खळबळ हि भिती हे फॅक्ट्स सांगणारे आकडे सरफेसवर आणणे हाच आहे आणि त्यात फिल्म खरी उतरते
विषय संवेदनशील आहे पण हाताळणी अतिशय संयत आहे आणि परिणामकारक आहे.
स्टोरीचा (खरतर स्टोरीपेक्षा ही जास्त काही आहे हि स्टोरी) एंड पॉझिटिव्ह नाहीये पण स्टोरी सांगण्याची पद्धत मात्र अतिशय परफेक्ट जमली आहे. काजोलचा मराठी ॲक्सेंट आता आहे जरा विचित्र पण ठिक आहे. फिल्म म्हणून इंपॅक्ट पॉवरफूल आहे.
फिल्मचे प्लस पॉईंट्स: वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया दाखवण्यामागचे प्रायोजन, त्यांचे त्या जागी असणे, कॅज्युअल वे मधे आपापले उद्योग करत असणे, पुजा करण्यालाही एक कॅज्युअल काम असण्याचा इंडायरेक्टली दिलेला टच - हे इंडायरेक्ट स्टोरी टेलिंग जमलय.
न जमलेल्या बाजू: शेवटी त्या मुलीला आत घेऊन येण आणि इतरांच्या चेहऱ्यावरचे भाव वगैरे अनावश्यक होतं. ललीने लिहीलय तस ती मुलगी पाठमोरी असते तिथेच गोष्ट सांगून संपतेय खरतर.
आणि ती मुलगी पाठमोरी दारात आहे दाराच्या या बाजूला काजोल आत अंधार बाहेर अंधार एक क्षण फक्त उजेड पाठमोऱ्या मुलीवर आणि काजोलच्या खांद्यावर. असा शेवट फिल्म म्हणून मला बघायला
आवडला असता
लोकांना फिल्म कळली नाही तर
लोकांना फिल्म कळली नाही तर काय, शेवटी टीव्हीवर रेफरन्स स्पष्ट केलेला बरा,
>>>>
मला नाही वाटत की ते लोकांना फिल्म कळायला दाखवले असावे.. आधीच्या संवांदांवरून फिल्मचा आशय स्पष्ट झालेलाच. आणि फिल्म मुलीसोबतच संपली होती. फक्त त्या शेवटाने लोकांना व्यथित केले असल्यास ते त्या अव्स्थेत असतानाच त्यांना पुन्हा एकदा हे आकडे हे फॅक्ट दाखवावे असा हेतू असावा. जेणेकरून ते आकडे डोक्यात रेंगाळतील. अन्यथा लोकं चहाचा घोट घेताना जेव्हा पेपरात वाचतात की भारतात दर अमुकतमुक मिनिटाला ईतके बलात्कार होतात तेव्हा ते वाचून पुढे जातात.
'देवी' अजून पाहिली नाही पण
'देवी' अजून पाहिली नाही पण 'कपिल शर्मा शो' मध्ये देवीची टिम आली होती ते बघितलय.
https://www.sonyliv.com/details/episodes/6139443578001/Ep.-121---Women%E...
देवी ओरिजिनल नाहीय --- एका
देवी ओरिजिनल नाहीय --- एका दुसऱ्या शॉर्ट फिल्म ची कॉपी आहे...
देवी नाव का आहे खरच कळले नाही
देवी नाव का आहे खरच कळले नाही का तुम्हाला? ती लहान मुलगी आसिफा आहे... कठुआ रेप आठवा ... लोकेशन आठवा ...
कपिल शर्मा शो मध्ये ते
कपिल शर्मा शो मध्ये ते म्हणालेले की त्यांना ही कथा दुसरीकडूनच मिळाली आणि यावर मोठे कलाकार घेत फिल्म बनवायचे ठरवले.
शेअर कराल का ती फिल्म.. बघायला आवडेल
फोर मध्ये थेट असिफा चा
फोर मध्ये थेट असिफा चा रेफरन्स आहे.
देवी मध्ये बहुधा जनरल लहान निरागस मुलगी इतकाच कंटेक्स्ट अपेक्षित असावा.
बाकी यत्र नार्युस्तु पुज्यते असं म्हणणाऱ्या देशात नारीवर बलात्कार... वगैरे वाक्य खरं असलं तरी आता चावून चिकट झालं आहे.देवी याच जनरल मुद्द्यावर असावी.एका विशिष्ट केसवर नाही.
देवी ओरिजिनल नाहीय --- एका
देवी ओरिजिनल नाहीय --- एका दुसऱ्या शॉर्ट फिल्म ची कॉपी आहे...>> FOUR या नावाच्या फिल्मची कॉपी आहे हे वाचलेय मी पण.म्हणून ती फिल्म देखील बघितली. Basic Concept मधे आहेच साम्य. जर त्यावरून या फिल्मची कल्पना क्लिक झाली असेल तर क्रेडीट द्यायला काही हरकत नव्हती.
पण तरी स्वतंत्र फिल्म म्हणूनही मला देवी आवडली. अस्वस्थ दोन्हीने झाले पण देवीमधे बरेच छोटे unsaid घटक टच केलेत. विषय आणि बेसिक कंसेप्ट जरी कॉमन असली तरी देवी अजून काही गोष्टीकडे लक्ष वेधून घेते अस माझं मत
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=jsF6VSBCq-o
ही ती (ओरिजिनल?) फिल्म. यात असिफा, निर्भया असे डायरेक्ट म्हटलेय. देवी मधे तसे काही म्हटलेले नाही. अर्थात नावाने आयडेन्टिफाय न केल्यामुळे विषयाची गंभीरता डायल्यूट होते असे काहीच नाही.
Pages