न कमावणारया बायकांना कोणते अधिकार असावेत वा नसावेत?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 March, 2020 - 06:35

विविध मतप्रवाहांचा खळखळता झरा असणारया मायबोलीवर आज एका धाग्यावर वाचनात आले की न कमावत्या बायकांना घरखरेदीवेळी ते कुठे कसावे, केवढे असावे वगैरे निवडीचा अधिकार नसावा. त्यांच्या कमावणारया नवरयालाच सर्वस्वी हा निर्णय घ्यायचा अधिकार आहे.

यानिमित्ताने न कमावणारया बायकांना कायद्यानुसार वा नैतिकतेनुसार नेमके कोणते अधिकार बहाल करावेत वा कितपत निर्णयस्वातंत्र्य द्यावे हे जाणून घेण्यास ऊत्सुक.

१) घरखरेदी
२) घराचे ईंटरिअर डेकोरेशन
३) गाडी खरेदी
४) वैयक्तिक दागिने आणि कपडे खरेदी
५) किती अपत्ये असावीत/ नसावीत. शिक्षणाचा आणि एकूणच मुलांच्या पालनपोषणाचा वाढता खर्च पाहता हा फार मोठा मुद्दा आहे.
६) मुलांना कोणत्या शाळेत टाकावे वा मुलांसंबंधित एकूणच आर्थिक बाबींशी निगडीत निर्णय.. जसे की डायपर वापरावा की लंगोट? बेबी सोप वापराव की लाईफबॉय? व्गैरे वगैरे एकूणच...

ईथवर पोस्ट लिहून झाल्यावर लक्षात आले की असे शंभर आकडे लिहू शकतो आणि तरीही बरेच काही शिल्लक राहावे. त्यामुळे जनरलच चर्चा करूया.

आमच्या घरात देखील बायको तुर्तास न कमावती आहे. जर मी उगाचच तिला जास्त अधिकार दिले असतील तर धाग्यावरील चर्चेचा रोख पाहून ते कमी करता येतील Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या दुकानाबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार मालकाला असतो की नोकराला?
एखाद्या कंपनीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना असतो की ऑफिसस्टाफला?
जर बायकोला मोबदला नवरा देणार असेल तर तो घराचा मालक आणि ती नोकर झाली ना? मग घरासंबंधीचे निर्णय घेण्याचा अधिकार नवरयाला आला की बायकोला?>>>
अरे बाळू, बोळ्याने दुध का पितोस?
तुला तिसरा प्रतिसाद मी याच धाग्यावर दिला ,... कारण तू त्या गृहिणींना गृहीत धरलंस ज्यांनी जिवाच काबाडकष्ट करून, सर्व व्यवहार सांभाळून....

अरे बाळू, बोळ्याने दुध का पितोस?
@
या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
गृहीत धरतो म्हणजे नक्की काय?

असो. मला वाटते
बायको आपल्या मर्जीने घरी राहिली आहे की हा कुटुंबासाठी दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे हे मॅटर करते.
जर बायकोही नवरयाईतकीच कर्तुत्ववान किंवा कमावण्यालायक असूनही घराकडे लक्ष म्हणून घरी राहायचा निर्णय घेतला असेल तर हिशोब बदलतात.

असो, ईतक्या वर्षांनी धागा वर आला आता चर्चा मागे पडली डोक्यातून..

असो, ईतक्या वर्षांनी धागा वर आला आता चर्चा मागे पडली डोक्यातून..>>>>
तु खरंच डोक्यावर पडलेला आहेस.
मला माहित आहे तु माझ्या प्रामाणिक प्रश्नाचा, प्रामाणिकपणे उत्तर देणं शक्य नाही. कुवत असावी लागते ना बाळू.
म्हणून तुला...... आता पुढचं पुराण चालू दे.

दिलं की ऊत्तर
त्यावर तुम्ही पटले नाही दाखवत अवांतर बोलत आहात. Happy

न कमावणारया बायकांना कोणते अधिकार असावेत वा नसावेत?>>> हेच शिर्षक आहे ना धाग्याचे.
आता या धाग्यावरील माझा तिसरा प्रतिसाद, आणि तुझी सारवासारव बघ.
मुळ प्रश्न अजुनही अबाधित, "न कमावणारया बायका" म्हणजे कोण?
मखलाशी सोड, आणि तुझे धाग्याचे शिर्षक चुकले आहे हे मान्य आहे का?

शिर्षक कसे चुकणार? पहिले म्हणजे त्यात न कमावण्याची व्याख्या लिहिलीच नाही. दुसरे म्हणजे ती काय आहे यावर आपल्यात चर्चा अजून चालू आहे. माझ्यामतानुसार अजूनही नवरयाकडून मोबदला मिळवणारया बायका या न कमावणारयाच आहेत तर तुम्ही त्या मोबदल्याला कमावणे म्हणत आहात. त्यामुळे शीर्षक चुकीचे अजून तुम्हाला ठरवायचे आहे Happy

१०० Happy

शेवट पाहिला महिलादिनाला या शॉर्ट फिल्मचा. आधी काय टिपिकल दाखवले असणार याचा अंदाज आला. मात्र नात्यातील ओलाव्याला भावनेला इमोशन्सना किंमत नसते ते अनमोल असतात हे शंभर टक्के खरे !

बायको कमावू शकत नाही पेक्षा तिला कमावण्याच्या संधी नाकारल्या जातात हे दुर्दैव आहे.

स्त्रीपुरुष समानता हि मुळात मेंदूतआणि विचारात असावी लागते.

Well said सुबोध खरे सर

स्त्रीपुरुष समानता यासंदर्भात ऋन्मेऽऽषच्या या धाग्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला न्हवता, म्हणून धागा वर काढत आहे. कृपया टी.आर.पी. वाढवायला मदत करावी. _/|\_

बायका कमवत असतातच

कायद्यानुसार नवर्याच्या किमान 30% पगारावर बाईचा अधिकार असतोच

त्यात २०% सरकारचाही अधिकार असतो, कररूपाने. म्हणून काय तो पगार 'सरकार कमावते' असं म्हणता येणार नाही. पुरुषाचाही अधिकार नक्की असतो का? कुणीसं म्हटलंय, 'कर्मण्येवाधिकारस्ते मा पगारेषु कदाचन ।'

करेक्ट. जबरा फॅनचे कामच असते शिव्या पडण्याची व्यवस्था करण्याचे.
ऋसर शाखाचे ड्युआयडी आहेत का ही शंका कुणाला आली नाही का अजून ?

वरील सर्व मुद्दे यांचे अधिकार हे कमावणाऱ्या किंवा न कमावणारे यावर अवलंबून नसावा.
तर केवळ बुद्धी आणि अनुभवांची व्याप्ती यावर असावा.
न कमावणाऱ्या स्त्रिया म्हणजे बुद्धिहीन or useless असं थोडंच असतं

Pages