न कमावणारया बायकांना कोणते अधिकार असावेत वा नसावेत?

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 March, 2020 - 06:35

विविध मतप्रवाहांचा खळखळता झरा असणारया मायबोलीवर आज एका धाग्यावर वाचनात आले की न कमावत्या बायकांना घरखरेदीवेळी ते कुठे कसावे, केवढे असावे वगैरे निवडीचा अधिकार नसावा. त्यांच्या कमावणारया नवरयालाच सर्वस्वी हा निर्णय घ्यायचा अधिकार आहे.

यानिमित्ताने न कमावणारया बायकांना कायद्यानुसार वा नैतिकतेनुसार नेमके कोणते अधिकार बहाल करावेत वा कितपत निर्णयस्वातंत्र्य द्यावे हे जाणून घेण्यास ऊत्सुक.

१) घरखरेदी
२) घराचे ईंटरिअर डेकोरेशन
३) गाडी खरेदी
४) वैयक्तिक दागिने आणि कपडे खरेदी
५) किती अपत्ये असावीत/ नसावीत. शिक्षणाचा आणि एकूणच मुलांच्या पालनपोषणाचा वाढता खर्च पाहता हा फार मोठा मुद्दा आहे.
६) मुलांना कोणत्या शाळेत टाकावे वा मुलांसंबंधित एकूणच आर्थिक बाबींशी निगडीत निर्णय.. जसे की डायपर वापरावा की लंगोट? बेबी सोप वापराव की लाईफबॉय? व्गैरे वगैरे एकूणच...

ईथवर पोस्ट लिहून झाल्यावर लक्षात आले की असे शंभर आकडे लिहू शकतो आणि तरीही बरेच काही शिल्लक राहावे. त्यामुळे जनरलच चर्चा करूया.

आमच्या घरात देखील बायको तुर्तास न कमावती आहे. जर मी उगाचच तिला जास्त अधिकार दिले असतील तर धाग्यावरील चर्चेचा रोख पाहून ते कमी करता येतील Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येकालाच आपल्या सिमीत परीघात जुळवुन घ्यावं लागतं आणि तेच बुद्द्धीमत्तेचे व्यवच्छेदक अंग आहे.>>अनुमोदन सामो. आणि हे व्यक्तिसापेक्ष असू शकते.

बरेचदा अश्या नात्यात दोघे कमावणारे असतात>>> आणि एकमेकांना न विचारता खर्च करणारेही असतात...जे अर्थातच परस्परास मान्य असते तोपर्यन्त हे नाते टिकते

जिंदादिल,
घर सांभाळणारया बायकांना काहीच मोबदला मिळत नाही असा जो चुकीचा मुद्दा सतत मांडला जातो त्यालाच मी खोडलेय. आता तो मोबदला कमीत कमी किती असतो हे सांगितल्याने ते बायको आहे की मोलकरीणवाले फिलीण्ग येणे साहजिकच आहे. पण याचा अर्थ प्रेम दिले जात नाही वा ते नात्यात नसते असे नाही.

मूळ बेसिक मध्येच लोच्या आहे.

मानसिकदृष्ट्या बायको एकाच पातळीवर आहे का?

पुरुष प्रधान संस्कृतीचे आपण बहुसंख्य गुलाम आहोत.

बायको कमावू शकत नाही पेक्षा तिला कमावण्याच्या संधी नाकारल्या जातात हे दुर्दैव आहे.

नवरा केवळ शारीरिक उंची किंवा शक्ती जास्त असल्यामुळे श्रेष्ठ समजला गेला तर जो माणूस जास्त उंचीचा आहे किंवा वजनदार तो इतर कमी उंचीच्या/ वजनाच्या पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असायला हवा. आपण आदिमानव काळातील मनोवृत्ती ठेवून आधुनिक काळात जगणार आहोत का हा मूळ मुद्दा आहे.

सोयीसाठी केलेल्या गोष्टी म्हणजे उच्च नीच पण नाही. लग्न झाले तेंव्हा आमचे आई वडील दिघेंही परिस्थिती मुळे केवळ मॅट्रिक होते.

परंतु सुरुवातीला आम्ही लहान असताना वडिलांनी आपले बी ए एल एल बी नंतर जमनालाल बजाज मधून व्यवस्थापन पदवी पूर्ण केली.

त्यानंतर आमच्या आईने शिक्षण सुरु केले आणि मी १० होईपर्यंत आईने पण एम ए आणि बी एड पूर्ण केले.
यानंतर ती शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होऊन शेवटी १० वर्षे मुख्याध्यापिका म्हणून सन्मानाने निवृत्त झाली.

लहानपणापासून कोणत्याही टप्प्यावर वडिलांनी आईला कमी लेखलेले आम्ही पाहिले नाही.

वडिलोपार्जित घरामध्ये सुद्धा आमच्या वडिलांनी आत्याचे नाव लावले आणि आजीचे सोने सुना आणि मुलींमध्ये समान वाटप केलेले आम्ही पहिले आहे.

आज मिळणाऱ्या निवृत्ती वेतन आणि गुंतवणुकीमुळे आईचे उत्पन्न वडिलांच्या पेक्षा जास्त आहे. त्यांच्या सर्वच्या सर्व गुंतवणुकी एकत्र नावावर आहेत.
हाच वारसा आम्ही दोघे ( मी आणि माझा भाऊ चालवतो).

स्त्रीपुरुष समानता हि मुळात मेंदूतआणि विचारात असावी लागते.

अन्यथा मॉडर्न दिसण्यासाठी हातात ग्लास घेणारी आणि तोंडावर स्त्री पुरुष समानतेचा घोष करणारी माणसे पैशाला पासरी दिसतात.

यावर बरंच लिहण्यासारखं आहे पण नाईस टी टाइम टॉक म्हणून वाचून सोडून देणाऱ्या लोकांसाठी आपले कष्ट का फुकट घालवावेत.

घर सांभाळणारया बायकांना काहीच मोबदला मिळत नाही असा जो चुकीचा मुद्दा सतत मांडला जातो त्यालाच मी खोडलेय. >> व्वा रे पठ्ठ्या! आणि तरीही त्या न कमावणारया?
कोलांटी उडी, लंगडी, बसफुगडी काहीही घाल. आता त्यांना जर मोबदला दिला जातो तर त्या न कमावणारया कश्या हे मला पुन्हा एकदा सांग.

माझं बाई सुंदर स्वप्न आहे

1. घरजावई होऊन जायचे आणि घरात शिरताना पेल्यात काजू घालून त्याला लाथ हणून घरात जाणे

2. सासर्याच्या दारात बाभळीचे झाड लावून मैं बबूल तेरे आंगन का, असे रोज गाणे म्हणणे

3. कधी भांडण झाल्यास तरातरा आपल्या माहेरी जाणे व बायकोचा फोन आल्यास फोन कॉम्पुटर जवळ ठेऊन यु ट्यूब वर मैं ससुराल नही जाऊनगी हे गाणे फुल्लल वोल्युमवर लावणे व कै. श्रीदेवीसारखे नाचणे.

कुठलीही मिळवती बाई माझे स्वप्न पूर्ण करील तर मी तिचे नाव व आडनाव लावून आनंदाने वावरीन. दक्षिणद्वार काय , मी इग्लु मध्ये सुद्धा राहीन व सरपटत घरात शिरीन. ( नगीनाच्या कै. श्रीदेवीसारखे)

Proud

नैतिकदृष्ट्या बोलायचे तर लग्न म्हणजे सहजीवन! यात 'अ' ने 'ब' ला निर्णयस्वातंत्र्य दिले आहे ही भाषाच हास्यास्पद.>>+१११११
इथे basic मध्येच problem आहे.
+१२३४५६७८९

मी तर म्हणते जेन्डरसुद्धा वजा करा समीकरणातून. घरात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीने घरात कायकाय कामं केली त्याचं आयटमाइज्ड बिल चार्ज करावं महिन्याअखेरीला. त्यात ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीपासून आपण पुढाकर न घेतलेल्या शरीरसंबंधांपर्यंत स-ग-ळं लिहावं. भावनिक आधार वगैरे दिला असेल तर मिनिमम चार्जेस सांगावेत, तो घेणार्‍याला त्याहून मूल्यवान वाटला तर त्याने वरचे पैसे स्वखुशीने द्यावेत. टाइमबाउन्ड कमिटमेन्ट की लाइफलॉन्ग हे आधीच ठरवून त्यानुसार डील करावं. दुसर्‍याच्या आपल्याला वैताग आणणार्‍या सवयीही दंडनीय ठरवाव्यात. जोडीदाराला खोकला आला तर पैसे दिल्याशिवाय हातात पाण्याचा ग्लाससुद्धा देऊ नये. नंतर खोकला थांबल्यावर उलटला तर काय घ्या!

(मला आत्ता इतकंच सुचलंय. अ‍ॅमी यांनी त्यांचं उद्याचं खातं उघडलं की त्यांनी यात आणखी मुद्दे अ‍ॅड करावेत अशी मी त्यांना विनंती करते.)

>> होय. त्यांच्याबद्दलच म्हणतोय. मोबदला म्हणाल तर अन्न वस्त्र निवारा या त्यांच्या मूलभूत गरजा तरी नक्कीच पुर्ण केल्या जातात. घराघरानुसार याऊपर आणखीही बरेच काही मिळते.

असे विचार असल्यास उत्तर सोपय की. घरखरेदीचा निर्णय नवर्यानेच घ्यावा.

चांगल्या कामाची सुरवात आपल्या घरापासून करावी म्हणतात.
- माझी सुरवात,
सध्याचे घर घेतले त्याच्या पुढील आठवड्यात लग्न ठरले. त्यामुळे घर घेण्यात बायकोचे मत नसले तरी संपुर्ण सोयी अन सजावटीत तीचे मत अन सहभाग होता. ती अर्थार्जन करत नाही पण घर सांभाळण्याची अवघड खिंड लढवते. सर्व गोष्टीत तीचे मत विचारात घेतले जाते.

आता माझा धागामालकाला झब्बू आणि मी पाॅपकाॅर्न घेऊन बसणार.

येत्या काळात धागामालक त्यांच्या चवथ्या घरात गृहप्रवेश करणार आहेत. त्यांनी त्यांचे अनुभव येथे शेअर करावेत ही नम्र विनंती.

मी तर म्हणते जेन्डरसुद्धा वजा करा समीकरणातून. घरात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीने घरात कायकाय कामं केली त्याचं आयटमाइज्ड बिल चार्ज करावं महिन्याअखेरीला. त्यात ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीपासून आपण पुढाकर न घेतलेल्या शरीरसंबंधांपर्यंत स-ग-ळं लिहावं. भावनिक आधार वगैरे दिला असेल तर मिनिमम चार्जेस सांगावेत, तो घेणार्‍याला त्याहून मूल्यवान वाटला तर त्याने वरचे पैसे स्वखुशीने द्यावेत. टाइमबाउन्ड कमिटमेन्ट की लाइफलॉन्ग हे आधीच ठरवून त्यानुसार डील करावं. दुसर्‍याच्या आपल्याला वैताग आणणार्‍या सवयीही दंडनीय ठरवाव्यात. जोडीदाराला खोकला आला तर पैसे दिल्याशिवाय हातात पाण्याचा ग्लाससुद्धा देऊ नये. नंतर खोकला थांबल्यावर उलटला तर काय घ्या!

शुष्क व्यवहारच करायचा असेल तर प्रश्न मिटला पण मग
यात कमावत्या व्यक्तीने तुमची सेवा माझ्या मर्जीप्रमाणे नाही म्हणून मी "दुसरा" सेवादार "ठेवतो" म्हटले तर त्याला हि मान्यता द्यावी लागेल

>> यात कमावत्या व्यक्तीने तुमची सेवा माझ्या मर्जीप्रमाणे नाही म्हणून मी "दुसरा" सेवादार "ठेवतो" म्हटले तर त्याला हि मान्यता द्यावी लागेल
ते सुरुवातीला 'डील' काय केलं होतं त्यानुसार ठरेल खरेकाका. Happy

एकंदर कुटुंबव्यवस्थेचा मुळातूनच विचार करायला मला उद्युक्त केल्याबद्दल मी अ‍ॅमी यांचे आभार मानते. वारंवार 'न कमावणार्‍या बायकां'च्या लबाडीबद्दल मायबोलीवर लिहून त्यांनी माझे डोळे उघडले!

अगदी कमावणार्‍या स्त्रियांनही बरेचदा किंमत नसते. फक्त आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य असून चालत नाही, मानसिक दॄष्ट्या कणखर पाहीजे व्यक्ती. असो.

मला वाटतं, त्या दुसऱ्या धाग्यावर एक प्रतिसादखेचक विषय मिळाला म्हणून इथे हा धागा आनंदाने/हपापून काढण्यात आला.
पण लिंक न दिल्यामुळे मूळ विषय पुढे आला नाही आणि त्याला इच्छित वळण न मिळता भलतंच वळण लागलं.
आता मूळ विषय स्पष्ट केला तर विशिष्ट प्रतिसादकाकडे बोट दाखवल्यासारखं होतं आणि नाही दिला तरी हे भलतंच लागलेलं वळण जास्त टीआरपी खेचणारं आहे हे चाणाक्ष चतुर धागाकर्त्याना कळल्यावर ती संधी सोडण्याचा प्रश्नच नव्हता..
शिवाय त्यात so called वकिली प्रतिसाद, इतरांना पटणारं/न पटणारं वाक्चातुर्य वापरण्याची संधी अशा अनेक आवडत्या बाबी सहजी हाती लागत असतील तर सोनेपे सुहागा..
यामुळे हे वळण कायम राखण्यात आलं..
आणि कोणीतरी लिंक/संदर्भ देईलच तोपर्यंत बॅटींग करुन घेऊ हा ही विचार कदाचित मनामध्ये असावा..
संदर्भ दिल्यावर गाडी रुळावर आणायला किती उशीर लागणार..?
(अर्थात असा संदर्भ येईपर्यन्त वाट पहाण्याचा संयम वाखाणण्याजोगा... आणि चुकीच्या वळणावरही जाणूनबूजून चिवट बॅटींग करण्याचं कौशल्यही प्रशंसनीय..)
शिवाय तोपर्यंतचे प्रतिसाद हा बोनसच..
आणि मुळ विषयावर प्रतिसाद पुढे पुढे कमी झाले तर Derail विषयाला हवा घालून पुन्हा प्रतिसाद वाढवायला किती वेळ लागतो..?

आमच्याकडे कुटुंबात निर्णय घेताना काही बाबतीत तज्ञांचा सल्ला घेवून , नात्यातील, ओळखीतील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेवून, चर्चा करुन , सारासार विचार करुन निर्णय घेतात. प्रसंगी न कमावणार्‍या, कायद्याने सज्ञान नसलेल्या मुलांचाही निर्णय प्रक्रियेत सहभाग असतो. मी कमावता आहे तेव्हा माझा निर्णय अंतिम असला यडचाप प्रकार माझ्या आजोबांच्या काळातही नव्हता.

Are we Serious ???
आपण खरंच हा धागा वाचलाय आणि त्यावर चर्चा करतोय???
हे विचार करणाऱ्या आणि हा असा धागा काढणाऱ्यांना कोपरापासून दंडवत!!!! ( sarcastically of course)

निरु, वा!!! आजवरचे सगळे धागे असेच हपापून काढण्यात आलेले आहेत. आपल्या नावावर कित्ती धागे आहेत हा आनंद त्यातूनच मिळतो मग विषय किती बिनडोक का असेना. असो, ह्या धाग्यांची वाट बघणारे आणि त्यावर कौतुकाने लिहिणारे लोकंही आहेत इथे.

Are we Serious ???
आपण खरंच हा धागा वाचलाय आणि त्यावर चर्चा करतोय???
>>
अगदी हाच विचार मनात आला गंभीर प्रतिसाद वाचून.

प्रतिसाद काय द्यावा हे कळण्याइतपत जगाचा अनुभव नाही पण धाग्यातील प्रश्न वाचून काहीतरी फार भयंकर वाचल्यासारखं वाटत आहे .

घरकाम करायला काही टॅलेंट लागत नाही.... भारतीय नवर्यांना भाजी पोळी करणे म्हणजे फार अवघड काम वाटते... जे की चुकीचे आहे... चूक बायकांची देखील आहे... पसारा करून ठेवाल मलाच करू द्या अशी कारणे देऊन नवऱ्याना घरकामापासून लांब ठेवतात...
पसारा एकदा करेल.. दोनदा करेल... सुधरेल कि नंतर...

आपण 'नको' म्हटलं की मुलं 'हवंच' म्हणून हट्ट करतात. आपण 'हो' म्हटलं की मुलं 'नाही' च धरून बसतात. मग काय होतं, काही चतुर पालक आधी आपल्या खऱ्या मताच्या उलटं मत व्यक्त करतात, जेणेकरून मुलं बरोबर आपल्याला मुळात जे हवंय तसं वागतील.
ऋन्मेषने इथे तसं केलंय याची मला शंका येत आहे Wink

Pages