म्हणी ओळखा : चित्रखेळ

Submitted by कुमार१ on 29 February, 2020 - 02:26

थोडा विरंगुळा.
बघा या चित्रातील म्हणी ओळखता येतात का ?
संयोजक,
चालेल ना हा उपक्रम ? धन्यवाद.

mhnaee pict.png

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत Lol दूध भात कशावरून ?
दही भात सुद्धा असेल ना त्यात

३ - आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय

बोकलत Lol

19वी म्हण नसून दुनियादारी पिक्चर आहे. हाणामारी, सईसारखी मुलगी, डोक्याला लागून हॉस्पिटलमध्ये भरती झालेला मुलगा, एक मुलगा स्वप्नील जोशीसारखा पळतोय, शेवटी स्वजो मारतो म्हणून डोक्यावर ती रिंग.

दूध भात कशावरून ?>>> कुत्र्याला दूध भात आवडतो म्हणून मी अंदाज लावला.

पण हां व्हाट्स अप मधला कुत्रा आहे ना !!
दुधाची बाटली / ग्लास सोबत नाही दाखवलीय त्या चित्रात ? म्हणून इतरही काही असायची शक्यता आहे असे वाटते.

12. एकादशी दुप्पट खाशी.
हे जरा काहीही
नमस्कार म्हणून एकादशी
आणि मधला बोल=खाणे
एकप ट दोनप ट......?

जिंदादिल, नाही.
बोकलत,
तुम्ही सर्व विडंबने एकत्र लिहा बरं , मजा येईल.

23. साठी काहीही
पाहुण्याच्या काठीने साप मारणे

२३, अवनी , नाही.
अगदी सोपी म्हण आहे, खूपदा आपण विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीबद्दल वापरतो.

Pages