सोनू अणि मराठी
सोनू तुझा मराठीवर भरोसा नाय काय
मराठीचे बोल कसे खणखणीत खडे
शाहिरांचे वीरश्रीचे एक त्यात पोवाडे
ऐक शिवाजीची कथा आणि मावळ्यांची कमाल/
बघ मराठीची कशी पेटते मशाल//1//
सोनू तुझा मराठीवर भरोसा नाय काय/
तुकोबांची वाच गाथा आणि वाच ज्ञाने श्वरी/
अमृता हु नी गोड आहे माय मराठी खरी/
जात्या वर बहिणाई सा र आयुष्याचे सांगते,/
मराठीची शब्दवेल कथे- गाथे तून फुलते//2//
सोनू तुझा मराठीवर भरोसा नाय काय/
खरं सांगू.सोनू चूक नाही तुझीच सारी/
इंग्रजीचे लोण आता आले आहे घरोघरी/
ये रे ये रे पावसा ल आता कोण विचारतो/
लिटिल जोनीचेसोनू तुझा मराठीवर भरोसा नाय काय,/
जर तुला मराठीचे टोचू लागले आकार, उकार,बिंदू/
तर यमक मात्रा समासाला आता जागा कुठे धुंडू/
इंटरनॅशनल झाली शाळा अणि गुरु झालाय गूगल/
इंग्रजी विना आपण आयुष्य करणार कसे ग्लोबल//3//
सोनू तुझा मराठीवर भरोसा नाय काय
असले जरी कौलारू तरी घर ते घरच असते/
रिसॉर्ट,मॉल च्या नादात त्याला कधी विसरायचे नसते/
वैर नाही इंग्र जी शी टेकनोसॅव्ही आहे आपली मावशी/
म्हणून माय मराठीची जागा तिला देणार कशी/
ठेच लागली पायाला तर मुखी येणार आई,/
तिथं कुठल्या मावशीला तू कशी जागा देणार बाई/ /4//
उमा भारतीय
छान जमलीये! अगदी अगदी झाल
छान जमलीये! अगदी अगदी झाल प्रत्येक कडव्याला. पुलेशु!