आई
"आई गं"
"बोल"
शांतता..
"आई गं."
"बोला.."
परत शांतता.
हे असं माझं दिवसभर चालू असतं. नुसतं "आई" हे बोलण्यामधे पण जे सुख आहे ना त्याबद्दल काय लिहिणार आणि सांगणार? तर असं मी माझ्या आईला पिडते. त्रास देते. आणि तिच्यामते जर तिला मी असा त्रास दिला नाहीतर दिवस सफळ संपूर्ण होत नाही. माझा दिवस सफळ सपूर्ण करण्यासाठी मात्र मला तिचा फटका मिळत असतो.
हरतालिकेचं व्रत केल्यावर शंकरासारखा भडकू नवरा मिळतो असं माझी आई मानते, तो तिचा स्वानुभव आहे. मात्र नक्की कुठलं व्रत केल्यावर भडकू नवरा आणि त्याच्या दुप्प्पट संतापाची मुलगी मिळते हे तिला अजून समजलेलें नाहिये. माझे वडील जितके भडकतात तितकीच किंवा त्याहुन जास्त मी चिडते. आणि आमच्या दोघाच्या संतापात सँडविच मात्र आईचं होतं.
पण मला माझ्या आईला भडकवायला जाम आवडतं. अशा वेळेला ती एखादा फटका देते. (मी घरभर पळत असते) आणि मी दमल्यावर मग आई मला मारते. खरंतर मला लागत वगैरे काही नाही पण उगाच "माझी आई मला खूप मारते. ती दुष्ट आहे!!!" वगैरे म्हणून भोकाड पसरलं की. (अजूनही!) ती मग लगेच सॉरी म्हणते. अर्थात प्रत्येक सॉरीची किंमत ठरलेली असतेच.
आईला स्वयंपाकाचा अजिबात कंटाळा येत नाही. पहाटे पाच वाजता उठून ती कामाला लागली तरी सात वाजता सर्व काम संपवून मोकळी होते. मग दिवसभर तिचे नाना उपद्व्याप चालू असतात. आम्ही कुणीच त्यानंतर घरी नसल्यामुळे तिचा दिवस नक्की कसा जातो याची कल्पना नाही. पण ती टीव्ही बघणे हे एक काम सोडून दुसरं काहीतरी शिवण टिपण वगैरे करत असते. नाहीतर फोनवरून सर्व नातेवाईकाची खबर घेतेच घेते. गोव्याला सासूबाईकडे आज घेवडीची भाजी होती इथपासून ते ऑस्ट्रेलियाची भाचेसून घरात घसरून कशी पडली इथपर्यंत सर्व माहिती तिच्याकडे रेडी असते. माझ्यापेक्षा जास्त चांगली पत्रकार ती बनली असती...
स्वतःचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण हे तिचं सगळ्यत मोठं स्वप्न. ते तिने माझ्याकडून पूर्ण करवून घेतलं. लहानपणापासोन आतापर्यंत कधीही "हे काम तू कर" असं कधीच सांगितलं नाही. "आधी अभ्यास कर. घर चालवायला काय अक्कल लागत नाही" हे तिला मला अजूनही म्हणतेच. आजही चहाचा कप माझ्या हातात येतो, भले मी नेटवर गप्पा मारत असू देत किंवा कादंबरी वाचत असू दे. मी तर कायम म्हणते. "मी आळशी आहे याला कारण माझी आई."
माझ्या आईने माझ्यासाठी फार वाईट दिवस पाहिले. एक काळ असा होता की चाळीस पैशाचा ब्रेड मला देणं तिला जमत नव्हतं. माझं लहानपण खडतर गेलं म्हणून आज मी कसेही पसिए उधळले तरी तिची ना नसते. आईला मी पाच वर्षाची असताना मला एक निळा फ्रॉक घ्यायचा होता. पण किंमत तिच्या बजेटबाहेर जात होती. त्या दिवाळीला मला नवेन कपडे घेतले नाहीत म्हणून आई दर दिवाळीला मला पाच (कधी कधी सहापण) ड्रेस घेते. स्वत:ला साडी मात्र कधीच घेत नाही. (ते काम पप्पानी ऑलरेडी केलेलं आहे हे तिला माहीत असतं. पप्पानी साडी कुठे लपवली आहे हेही तिला माहीत असतं.) पाडव्याच्या दिवशी ते तिला साडी गिफ्ट देतात. आईचा मॅचिंग ब्लाऊज परकर तयार असतो. असा हा अजब इब्लिस वेधळेपणाचा सोहळा आमच्याकडे दरवर्षी असतो.
बहुतेक आया मुलीनी काय कपडे घालावेत यावर तावातावाने बोलत असतात. माझी आई सरळ सांगते. तुला जे आवडतय ते तू घाल." गंमत म्हण्जे माझे टॉप बघून ती कायम म्हणते." पोरी तुला लहानपणी पण याच्यापेक्षा मोठी झबली घातली आहेत मी."
माझ्या भावाच्या मुंजीच्या वेळेला मी मस्त स्लीव्हलेस ब्लाऊज घातला होता. माझी मामी आईला म्हणाली "असे कपडे शोभत नाहीत तिला.. लग्नाची झालीये आता"
आईबाई लगेच "अहो छान दिसतो तिला म्हणूनच शिवून घेतलाय मी. तिला तर माहीत पण नव्हतं. हल्ली अशीच फॅशन आहे म्हणे." बिचारी मामी!!
असंच एकदा माझ्या मामाला घरी एक सिगरेटचं पाकीट सापडलं. आळ माझ्यावर आणि मामेभावावरच आला. मामीच्या मते माझंच ते पाकिट होतं. आई त्यावेळेला रत्नागिरीला होती. मामाने फोन करून "मी सिगरेट ओढते" हे सांगितलं. आईने शांतपणे सर्व किस्सा ऐकून घेतला आणि म्हणाली. "मी नंदिनीला पूर्णपणे ओळखते. ती जर सिगरेट ओढत असेल् तर इतकी मूर्ख आणि बावळट नाही की तुझ्या घरी पाकिट विसरून येइल"
माझ्या कुठल्याही कार्यक्रमामधे ती हिरीरीने सहभागी होते. भले मग तो डान्स असो नाटक असो किंवा अजून काही. बॅकस्टेजचे सर्वजण तिची वाट बघतच असतात. ती येताना काही तरी खायला आणेल म्हणून. लोकाना खिलवण्याचा तिला जबरदस्त नाद आहे. काही झालं की "तुला भूक लागलीये का?" हा तिचा पहिला प्रश्न असतो. तिच्यामते मला भूक लागलेली समजत नाही, त्यामुळे मी तणतणायला लागले की माझ्या पुढ्यात काहीतरी खऊ आणून ठेवते. भावाच्या बाबतीत पण हे असंच बरं का...
माझ्या आईचा मी अभिमान आहे. मला कुणी काही बोललेलं तिला अजिबात सहन होत नाही. स्वतः मात्र माझी रोज पूजा बांधतच असते. ते चालतं. दुसरं कुणी बोललं की मग मात्र लगेच आई चिडते.
माझी आई माझी मैत्रीण आहे. दिवसभरात जे काही घडलं असेल ते मी आईला सांगतेच सांगते. मस्त गोष्ट म्हणजे ती मला कधीच सल्ला देत नाही. कारण तो मला पटणार नाही हे तिला माहित आहे.
"आई गं.. तुझ्यावर एक लेख लिहू का गं?"
"कशाला? लोकाना तुझी आई किती अडाणी आहे हे समजायला?"
तर अशी माझी आई. जबरदस्त विनोदबुद्धी. दिसायला एकदम छान (पितृमुखी झाले नसते तर किती बरं झालं असतं)... आणि मी आज जे काही आहे ते या आईमुळेच बरं का... तिने खूप सोसलय आणि अजून सोसतेय. माझ्या हातोन तिचे दु:ख जरा जरी कमी झालं तर जन्माला आल्याचं सार्थक होइल.
आई.... लय भारि
आई....
लय भारि
अरे नका रे अस लिहु... हापिसात
अरे नका रे अस लिहु... हापिसात रडता नाही येत...खुपच हळवं केलतं सगळ्यांनी
छान मस्त...!!!
छान मस्त...!!!
Khup chaan
Khup chaan
मि तर ओफीसात
मि तर ओफीसात रादली..............
एकदम मस्त नंदिनी खरच आत्ताच
एकदम मस्त नंदिनी
खरच आत्ताच घरी आईकडे जावस वाटतय...
खूप सुंदर लिहीले आहेस.
नंदिनी, खूप सुंदर लिहीलं
नंदिनी, खूप सुंदर लिहीलं आहेस.
छान लिहीलंय नंदिनी. हळवं केलं
छान लिहीलंय नंदिनी. हळवं केलं एकदम.
नंदिनी, खूप सुंदर लिहीलं
नंदिनी, खूप सुंदर लिहीलं आहेस.>>>+१
साधं सुलभ सरळ व्यक्तिचित्रण!
साधं सुलभ सरळ व्यक्तिचित्रण! आवडले जामच!
नन्दिनी लेख खुपच आवडला...
नन्दिनी लेख खुपच आवडला...
सुरेख.
सुरेख.
खुप सुंदर लिहिलय्सं गं
खुप सुंदर लिहिलय्सं गं नंदिनी..
Pages