सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग आठवा

Submitted by मुक्ता.... on 19 February, 2020 - 13:06

सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग आठवा

देवकी डॉक्टर टंडन च्या क्लीनिक मध्ये परस्पर जाऊन पोचली. बाकी हे तिघे घरून पोचले. नवीनला कळत नव्हतं आपण इथं का आलोय परत आपण तर आता बरे आहोत मग? डॉक्टर यायला वेळ होता.देवकीने हीच वेळ साधली. आणि नवीनला हिप्नॉटिसम च्या ट्रीटमेंट विषयी सांगितलं...नवीन एकदम शांत झाला....." अगं देवकी आता या सगळ्याची काय गरज आहे? मला एक कळात नाही कि सगळं नीट झालेलं असताना मग हे कशाला? मला तुम्ही जॉब पण शोधू देत नाही आहात....कमाल आहे...." नवीन एकदम सगळं बोलून गेला...देवकी चकित होऊन त्याच्या तजेलदार चेहऱ्याकडे बघू लागली...." देवकी, यार अशी बघू नकॉस ना....बोल काहीतरी....काय बघतेस अशी? मी काय नवीन आहे का तुला?"

"हा नवीन ,नवीनच आहे बरं ,बदलेला...." देवकी म्हणाली...

नवीन मनापासून हसला....." एक ऐक नवीन...आई म्हणतात कि काही गोष्टी त्या आपल्याला सध्या नाही सांगू शकत आपल्याला त्रास होईल म्हणून. आपण ना काहीही प्रश्न न विचारता त्या म्हणतील तस करूया. आणि डॉक्टर टंडन खूप कर्तबगार आणि कुशल मानसतज्ञ् आहेत..ते चुकीचा सल्ला देणारच नाहीत.तू सहकार्य करशील ना?"

नवीनने एकवार सावळ्याश्या देवकीच्या काळ्याभोर
डोळ्यांत पहिले. क्षणभर वाटले गोकुळचा कृष्णच.......नवीनने होकारार्थी मान हलवली.....वत्सल आशेने पाहत होती, देवकी आणि नवीन चे चेहेरे पाहताच ती काय ते समजली...मनोमन हसली... हा मूक संवाद गंगा पाहत होती....गंगू च्या मनात त्या क्षणी एकाच विचार आला " इतकं प्रेम आणि विश्वास.....यांना कोण काय इजा करणार? आणि वत्सला आत्याचं प्रेम आणि आशीर्वाद
असताना तर नाहीच नाही.."

"मिस्टर अँड मिसेस नवीन डॉक्टर ने आपको बुलाया है आप अंदर जा सकते हैं ........"गंगू आपल्या विचारातून बाहेर आली. तिची उत्सुकता, भीती, सगळंच शिगेला पोचलं होतं.काय होईल, नवीन दादा काय नवीन रहस्य सांगेल, त्याचा खरोखर काही फायदा होईल का? असे काहिसे विचार तिच्या मनात सुरू झाले...

डॉक्टर टंडन यांचं क्लिनिक म्हणजे क्लिनिक वाटतच नसे. त्याला रेग्युलर दवाखाने कसे असतात तसे इंटिरियर नव्हते.काहीसा हलका जांभळा रंग जस्ट लाईक स्वीट पर्पल असतो तसा आणि त्याला सनसेट यलो रंगाचे क्रॉस कॉम्बिनेशन होते. बसायला काहीशा आरामदायी खुर्च्या म्हणजे ब्राऊन रंगाचे काऊच होते. एल शेप मध्ये त्याची रचना आणि समोर टीपोय काही फँटसी बुक्स आणि लेटेस्ट मॅगझिंस त्यावर ठेवलेली अगदी व्यवस्थित. आणि काऊच च्या दोन बाजूना दोन मोठे फ्लॉवर पॉट आणि त्यात मोठी आर्टिफिशिअल फुल ,ती मात्र डार्क लाल आणि पिवळ्या रंगाची. हे अरेंजमेंट एखाद्या क्लिनिकच्या मनाने खूप वेगळे होते. दवाखाना खूप हाय फाय होता ए सी होता. जमिनीवर एक मोठे सुंदर कार्पेट होते. सिलिंग ही साधे पण स्वच्छ पांढऱ्या रंगाचे होते. एकूण कुणालाही वाटेल की हे डॉक्टर महागडे असतील. खूप लुटत असतील. पण डॉक्टर टंडन याला अपवाद होते. ते गरजू लोकांकडून अवाच्या सव्वा फी कधीच घेत नसत. त्यांची वृत्ती सेवाभावी असल्याने त्यांच्या अपॉइंटमेंट फुल असत. पण आज मात्र क्लिनिक रिकामे होते ते केवळ त्यांच्या स्पेशल इंटरेस्ट साठी...नवीन साठी...

नवीन आणि देवकी दोघेही आत गेले...कसल्याश्या फॉर्म वर त्या दोघांच्या सह्या घेऊन नवीनला त्या रूम मध्ये घेण्यात आले. जिथे त्याच्यावर हिप्नॉटिसम चा प्रयोग होणार होता.....या सगळ्याचे लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्डिंग डॉक्टरांच्या केबिन मध्ये बसून सगळ्यांना बघायला मिळणार होते...फक्त गंगेला त्या स्पेशल खोलीत जाण्याची परवानगी मिळाली कारण ती मानसतज्ञ होती पण व्यावसायिक नाही तर हौशी अभ्यासक म्हणून. गंगा सगळ्याची वेगळी नोंद ठेवणार होती. आज पहिलं सेशान म्हणून डॉक्टर खूप खोलात गेले नाहीत. त्यांनी अगदी सहा वर्ष मागे नेले देवकीशी भेट आठवली...सुखाचे क्षण आठवले...आणि विमानातील प्रवासही....त्या हिरव्या कणांविषयीचा अनुभव पुन्हा समोर आला....आता की मोठा धोका होता.....कसला? नवीन अचानक अस्वस्थ झाला....त्याला पुन्हा थोडा आकडीसारदृश झटका आला.इकडे बाहेर देवकी घाबरली, उठून आत जायला निघाली....पण वत्सलने तिला थांबवले.....आत नवीन व्हायब्रेट व्हायला लागला. पण डॉक्टरनी त्याला आपल्या अस्तित्त्वाची आणि वत्सलची आठवण सूचनेच्या माध्यमातून दिली.....मिस्टर नवीन पुढे सरका आणि सांगा तुम्हाला काय दिसतंय ते...ते ते ते येताहेत.....तिच्या बरोबर ती काठी आपतेय.....गगगगग गाणं म्हणतेय......मला ते हिरवया रंगात बबबबब बुडवतील .....आ आ......जा जा...ते दार ठोठावताहेत......म्म्म्म मी नाही घरात घेणार...ह्ह्ह्ह हे माझंझ शरीर आहे......आह.......मी कोठे आलोय.....मला आकाशात नेतात त्या हिरव्या देवळात.....ह्यूम, ह्याव...ह्यइव्ह .....डॉक्टर हे विचित्र बोलणे, ऐकत होते.....वत्सल आत्या शांत होत्या...म्हणजे निदान दाखवत तरी होत्या.....
म्म्मम मला नाही जायचं डॉक्टर..माय मला वाचव...
"डॉक्टर नि नविनला पुन्हा सूचना देत शांत केले...मिस्टर नवीन आप बिलकुल सुरक्षित है. आपकी पत्नी, माता आपके साथ हैं. आपण मेरे डॉक्टर टंडन के क्लिनिक मे हैं. आप शांत हो जाये. आपको कोई हानी नही होगी यंहा.आप थोडी देर गेहरी निंद मे सो जाये. आप आधे घंटे बाद जाग जाये तो हलका म्हसुस करोगे. और आप सारा दर्द और डर भूल जाओगे...अब आप आराम किजीए, मै यही हुं.."

डॉक्टर नि नविनला एकदम शांत केले. आणि केबिन मध्ये परत आले. त्यांच्या केबिन मधील पेंटिंगस खूप सुंदर होती. गंगा त्या पेंटिंगस मध्ये हरवली आणि काहीतरी निरखून बघत होती.
वत्सलच्या खांद्यावर डोकं ठेवून देवकी डोळे बंद करून बसली होती. बहुतेक तिचा डोळा लागला असावा.
"अहं अहं...सब लोग कहां खो गये?"
ते तिघेही भानावर आले....
"सेशन इज ओव्हर...नवीन सो गया है...अहा ,मिसेस नवीन, इतना सिरियस होने की जरूरत नहीं है...मैं तो आपसे पुछने
वाला था की आपने क्या किया? नवीन के हालत मे काफी सुधार आया है..मैं तो नवीन को बहोत ही अन्स्टेबल एक्स्पेक्ट कर रहा था, पण तो , त्याची रेअकॅशन खूप कंट्रोल मध्ये होती.."
वत्सल आणि देवकी एकमेकांकडे पाहून हसल्या आणि देवकी डॉक्टर ना म्हणाली," डॉक्टर वत्सला आईने नवीन और मुझे योगाभ्यास सिखाना शुरू किया है..."
"ओह आय सी, हे लै चांगलं केलं वत्सल चाची, चाची आपसे फिरसे एक गुजरिष है, मुझे नविनका केस थोडा अलग लगता है, उसे हरे रोशनी से और आकाश के गहाराई से डर लगता है...उसने आज जो भी रेअकॅशन्स दिये है उससे तो ये स्पेक्टरोफोबिया बोल सकते हैं किंवा स्कायोफोबिया...असलं कधी आलं नाही माझ्या केस च्या इतक्या वर्षाच्या अनुभवात...पण हा हे निराळं आहे. माणसाच्या मनाच्या कक्षा कोण समजून घेऊ शकलाय का? त्याला धिस टाइम मी मेडिकेशन देणार नाही. लास्ट टाइम मिसेस नवीन याद है आपको? कुछ अलग अनुभव था, नवीन काफी व्हायोलन्ट हुए थे...पर आज नहीं..."

गंगा त्या खोलीतून आल्यापासून विचारात गर्क होती..तिने टिपण काढले होते..".गंगा आपको क्या लगता है?" डॉक्टर नि विचारले...
आपल्या सारख्या तरुण मुलीला जिला काहीच अनुभव नाही तिला हे एव्हढे अनुभवी डॉक्टर विचारत आहेत म्हटल्यावर ती जरा अवघडली पण तरीही नीटस उत्तर देत म्हणाली, "सर मी आत्ताच कस सांगू, दादाची केस कॉम्प्लिकेट आहे. मी मला काय वाटत त्या पेक्षा तुमचं या सेशन नंतर काय रिपोर्ट आहे ते जाणून घेण्यास उत्सुक आहे."

वत्सलआत्या सगळं शांत पणे ऐकत होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच भाव होते, संमिश्र....

किंचित गोरटेले, धारदार नाकाचे आणि बारीक तरीही उठावदार डोळे, किंचित स्थूल शरीरयष्टी असलेले डॉक्टर वत्सला सारख्या गावात राहिलेल्या, खेडवळ भाषा आणि खेडवळ पोशाख, करारी, तरीही चेहऱ्यावर ममत्व असलेल्या महिलेविषयी खूप आदर वाटत होता. त्याचे कारण नवीन आणि देवकी मध्ये त्या आल्यापासून झालेला बदल....
नंतर या सर्वांमध्ये केबिन मध्ये दहा पंधरा मिनिटे पुढील सेशन्स आणि त्याची प्लॅनिंग याविषयी चर्चा झाली. डॉक्टरना अजून मिशन नवीन मध्ये सामील केले गेले नव्हते. नविनच्या घरात घडणाऱ्या विचित्र घटना त्यांना माहीत नव्हत्या. पण नशीब लवकरच त्यांना यात सामील करणार होते.....

बरं का मिशन हा शब्द आपल्या या डॉक्टर साहेबानी पहिल्यांदा वापरला होता. अव्या आणि विजयसर मुंबईत आल्यावर मग हे होणं आहे. हे सिक्रेट मात्र आपल्यालाच माहीत आहे................

नवीन जागा झाला पाऊण तासाने. त्याने डोळे उघडले...वेगळेच वाटले त्याला...आपले डार्क ब्राऊन रंगाचे डोळे चोळत चोळत तो बेड वरून उठला....डॉक्टर नि सी सी टीव्ही मधून सगळे बघितले........पण ते उठले नाहीत, नवीन ला स्वतःहहून केबिन मध्ये येऊ दिले. नवीन त्या अंधुक खोलीत चहूकडे नजर फिरवत होता. डॉक्टरनि देवकीला आत जायची खूण केली. झटक्यात देवकी उठली. हळूच तो दरवाजा ढकलून आत गेली. आता नवीनच्या रिअक्शन कडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. नवीन परत बेड वर बसला. त्याचे डोके त्याने दोन्ही हातानी दाबून धरले होते.....मान खाली घातली.....

" नवीन......ए....मी....."

" देवकी...."......काही क्षण शांततेत गेले....." देवकी, आताच विमानात भेटलो असं वाटतंय...तुला आठवतंय का वववव विमानांत माझ्याबरोबर काय झालं होत ते?.....म्म्म्मम्म मला ते...."

" एक ऐक , राजा तुला खूप मोठी लढाई लढायची आहे....मी तुला सविस्तर सांगते....पण जेव्हा पूर्ण भयगंडातून बाहेर येशील तेव्हा. आता फक्त एक लक्षात ठेव.....आपण आपल्याला पाहिलं जिंकायचं आहे.....आपणच आपल्याला जिंकलं तर कोण काय हरवणार आपल्याला? लहानपणची काठीच्या जुडग्याची गोष्ट आठवते ना तुला? मग आता आपण घट्ट राहील पाहिजे नवीन....तुझ्या मनातून दडलेली सुप्त माहिती आपल्याला या रहस्य उलगडण्याचा मार्गाकडे नेणार आहे.सो तू आणि मी तयारीत राहीले पाहिजे आणि आईना साथ दिली पाहिजे.....कितीही काही झालं तर आता माघार नाही नवीन....."

नवीन लहान बाळासारखा देवकीला बिलगला आणि ओकसा बॉक्शि रडू लागला......कुणीच आत आलं नाही , नवीनने आता मोकळं होणं गरजेचं होत त्यातूनच पुढची दिशा मिळणार होती. " देवकी, काहीतरी वेगळं घडतंय हे नक्की......"

व्हेरी गुड.....वत्सला चाची....नवीन रीस्पॉण्ड कर राहा है......डॉक्टर म्हणाले......

काहीतरी मिळवून सगळे, अगदी नवीन प्रश्न आणि जुन्या प्रश्नांच्या उत्तरासहित सगळे क्लिनिक च्या बाहेर आले. नवीनची एनर्जी खूप कमी झाली.....कदाचित त्या हिरव्या प्रकाशमान शक्तींकडून काही हल्ल्याचा धोका होता म्हणून वत्सल सावध होती....पण तस काहीच झालं नाही....वत्सलला आस्चर्य वाटले......

एक महिना .......जवळ जवळ सात सेशन देण्याचे ठरले......आणि एका सेशन मध्ये नवीनला जाणीव झालं ती हिरवी शक्ती.....अत्यंत महत्वाची जाणीव.....सातव्या सेशन मध्ये जे काही समोर आलं ते ............................

नविनकडून बरीच विस्मयकारक माहिती समोर आली.गंगाने सर्व टिपणे नीट लिहून ठेवली.....
रोज रात्री चर्चा, अव्याला आणि विजय सरांना रिपोर्ट होत होते. आता गरज होती ती नवीन आणि देवकी यांच्यातील कथनाच्या तफावतीतील रहस्याची!!
काय घडतंय नविनच्या सेशन्स मध्ये? बरीच माहिती आपल्याला वत्सल आत्या, देवकी, नवीन, गंगा, यांच्या कडून मिळाली....नवीन च्या मनातील रहस्याचा उलगडा डॉक्टर टंडन करू शकतील का? आत्मा ,भूत यावर त्यांचा विश्वास नव्हता, ते टीम मध्ये आल्यावर त्यांचा विश्वास बसेल का, हा एक प्रश्नच होता.

देवकी आता बिनधास्त बाहेर जात होती. तसाही तिला त्या शक्ती इजा करु शकत नव्हत्या..फक्त दिसत होत्या...का कुणास ठाऊक...लाल प्रकाशाचा देवकीवर थोडा परिणाम होत होता पण तो हि आता कमी झाला होता. देवकीला अधिप्रमाणेच घाबरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होत्या. कधी नवीनच्या फोन च्या स्वरूपात तर कधी आणि कुठल्या प्रकारे....देवकी लगेच खात्री करत असे....एकूण सध्या ते सगळे बॅकफूट वर जात होते. पण गंगावर झालेला हल्ला पाहता ते शांत नव्हते...त्यांचा काही ना काही डाव. तयारी सुरु होतीच..हि शांतता वादळापूर्वीची होती....

हे नॉर्मल होणं......कुणाला तरी आवडलं होतं आणि कुणाला तरी नाही............

स्वयंपाक घरातून पाटावर बसून कुणीतरी समाधानी झालं होतं........

आणि दुसरीकडे......

एक गर्द अंधारी गुहा....काठी आपटत कुणीतरी येरझारा घालत होतं..............

क्रमश :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

स्वयंपाक घरातून पाटावर बसून कुणीतरी समाधानी झालं होतं - नविनची आई ?
एक गर्द अंधारी गुहा....काठी आपटत कुणीतरी येरझारा घालत होतं - बकुळा ? ति नविनच्या वडीलान्च प्रकरन?

मस्त

स्वयंपाक घरातून पाटावर बसून कुणीतरी समाधानी झालं होतं - नविनची आई ?
एक गर्द अंधारी गुहा....काठी आपटत कुणीतरी येरझारा घालत होतं - बकुळा ? ति नविनच्या वडीलान्च प्रकरन?

पुढच्या एक दोन भागात हे कोडे उलगडले असेल

मित्रा , मनापासून आभार, कथा मनापासून वाचताय

<<स्वयंपाक घरातून पाटावर बसून कुणीतरी समाधानी झालं होतं - नविनची आई ?
एक गर्द अंधारी गुहा....काठी आपटत कुणीतरी येरझारा घालत होतं - बकुळा ? ति नविनच्या वडीलान्च प्रकरन?>>>
देवकीला गावापासून दूर पडक्या वाड्यात नवीन ची आई म्हणून जी बाई भेटली ती.. तीच घुंगरू वाजवत असते