Submitted by Asu on 6 February, 2020 - 12:37
भिकारी
मानवतेचा मी पुजारी
भीक मागतो दारोदारी
मानवता हो कुठे बुडाली ?
दिसेना मजला क्षणभरी
मंदिरात जरि असल्या मूर्ती
कोण त्यांना देईल स्फूर्ती
शेंदुर फासुन पावन झाले
गंगेत जसे घोडे न्हाले
शोधित फिरलो शहरो शहरी
घरीदारी नि गिरीकंदरी
मन आतुरले, पडतो खुजा
कशी करू मी मानव - पूजा
वण वण फिरुनी थकलो भारी
तोच भेटला एक भिकारी
घास देऊनि वदला मजला
खाऊन घेई, कृपा करी
हात जोडुनि हो माघारी
मानवतेचा मी पुजारी
- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा