Submitted by Asu on 30 January, 2020 - 12:17
केळीचे झाड
केळीचे झाड किती लहान
मूर्ती लहान कीर्ती महान
केळीचे पान दिसते छान
जैसे हलती हत्तीचे कान
छोट्यामोठ्या थोरा सान
हिरव्या पत्री अमृत पान
केळीचे खोड हत्तीचे पाय
उपयोग सांगू कित्ती काय?
चटया दोर जेवणाचे ताट
विघटन होण्या वेगळी वाट
पिशव्या रंगीत पर्सचा थाट
ऐटीत करू बाजार हाट
पौष्टिक स्वस्त केळी मस्त
ऊर्जा झटपट करूया फस्त
फुलांची भाजी करते आजी
गरम खावी ताजी ताजी
केळीच्या या उपकार केवढे
आईच्या थोर उपकारा एवढे
नमस्कार करू केळीला बाळा
देह त्याचा उपयोगी सगळा
- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
खूप छान कविता आहे. केळीचे
खूप छान कविता आहे. केळीचे अनेक फायदे छान वर्णन केले आहे.
छान कविता!
छान कविता!
केळीचं झाड लहान नसतं असं मला
केळीचं झाड लहान नसतं असं मला वाटतं.
कविता छान आहे पण माझ्या
कविता छान आहे पण माझ्या माहिती नुसार केळिचे झाड नसते. लहान रोपाला खुंट म्हणले जाते, मोठे झाल्यावर खोड म्हणले जाते.