वैधानिक इशारा:
सदरील कथा वाचकास टीपीकल, बोअर किंवा माया साराभाईच्या भाषेत middle class, down market वाटु शकते.
Read at your own risk.
--------------------------------------------------------------------------------------------------
"नाही जमणार"
"काय?
हे बघ, लग्नाच्या आधी ह्या विषयावर आपलं बोलणं झालेलं तेव्हा असंच ठरलं होतं ना, म्हणजे तुला आठवत असेल तर ही माझी एक महत्वाची अट होती. आता तू नाही जमणार असं कसं म्हणू शकतोस?"
"तू म्हणतेस तसंच ठरलं होतं आधी. पण नाईलाज आहे."
“मी प्रयत्न करून पाहते. After-all आता मी तुझी बायको आहे., माझा पूर्ण हक्क आहे.“
“जशी तुझी इच्छा”
“Hello, आई, तुम्ही आपल्या पुण्याच्या घरी राहायला कधी येताय? “
.........
“तुमच्याशिवाय आमच्या संसाराला काही अस्तित्व किंवा अर्थ नाही. आम्ही वाट पाहतोय.”
मुलाच्या संसारात आपली अडचण होणार हा गैरसमज सुनेच्या प्रेमळ शब्दांनी दूर झाला आणि ती मनोमन आनंदली.
----------------------------------------------------------------
**किल्ली**
----------------------------------------------------------------
हम्म ! आशावादी आहे. छान वाटली
हम्म ! आशावादी आहे. छान वाटली.
मस्त किल्लीताई, आशा सुना फक्त
मस्त किल्लीताई, आशा सुना फक्त कथेत न मिळता प्रत्यक्ष जीवनात सगळ्या सासवाना मिळाव्यात ही ईश्वरचरणी प्रार्थना.
छानेय!
छानेय!
अरेच्चा, माझा पण गैरसमज झाला
अरेच्चा, माझा पण गैरसमज झाला,मला वाटले मूल होणार म्हणून सासूला राहायला बोलवत आहेत,आधी सासू घरात राहणार नाही हे ठरलं असून सुद्धा
अति वाचनाचा परिणाम,दुसरे काय 
छान आहे . पॉझिटिव्ह कथा
छान आहे . पॉझिटिव्ह कथा
किल्ली
किल्ली
आत्ताच्या जमान्यात हे खूप आश्वासक आहे !
छान आहे
धन्यवाद रश्मी.., बिपिनसांगळे
धन्यवाद रश्मी.., बिपिनसांगळे, जाई. , आदू, मन्या ऽ, बोकलत
चांगला गैरसमज असं म्हणता येईल
चांगला गैरसमज असं म्हणता येईल, किल्ली.
लग्नाळु मुलांनी ह्या कथेची
लग्नाळु मुलांनी ह्या कथेची लिंक व्हाट्सऐप स्टेट्सला ठेवायला हरकत नाही
म्हणजे होणाऱ्या जोड़ीदाराची मते आधीच क्लिअर होतील.
गैरसमजातून अनेक गैरसमज दूर करणारी छानै कथा
खूप मस्त किल्ली
खूप मस्त किल्ली
छानच कि...
छानच कि...
जमलेय,
जमलेय,
पण अनुभव मात्र बरोबर अपोझीट जातो.
नवरा जमणार नाही असे का म्हणतो
नवरा जमणार नाही असे का म्हणतो ते कळले नाही... शशक आवडली...
धन्यवाद वेडोबा, 'सिद्धि',आसा,
धन्यवाद वेडोबा, 'सिद्धि',आसा, विनिता, भिकाजी, प्राचीन
छान आहे कथा. वरचा वैधानिक
छान आहे कथा. वरचा वैधानिक इशारा पण मस्त
सेम अनुभव.
सेम अनुभव.
भयानक झालीये कथा
भयानक झालीये कथा