Submitted by Happyanand on 19 December, 2019 - 15:00
फुटली पालवी आठवणींच्या रोपट्यांना
पुन्हा कागदावर शब्द उमटले..
गुंतली नजरेत नजर पुन्हा नी
पुन्हा मैत्रीचे सुर उमटले.....
मी सक्त दिली ताकीद हृदयाला
शांत राहण्याची
रागावूनी मीच जरासे
मीच पुन्हा कुशीत घेतले..
गुंतली नजरेत नजर पुन्हा नी
पुन्हा मैत्रीचे सुर उमटले.....
रात्र गेली सरूनी
नवसुर्या चे तेज अवतरले
रात्रीस खेळ भयाण होता
दिवसा फक्त ते स्वप्न उरले..
गुंतली नजरेत नजर पुन्हा नी
पुन्हा मैत्रीचे सुर उमटले.....
तीच खुणावी डोळ्यांनी
बंधन आता होवु घातले
आयुष्याच्या मातीवरती
पुन्हा मैत्रीचे घर थाटले..
गुंतली नजरेत नजर पुन्हा नी
पुन्हा मैत्रीचे सुर उमटले.....
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
बरी, या पेक्षा छान कविता करा
बरी, या पेक्षा छान कविता करा ,पुलेशू
नक्कीच स्वामीनी..
नक्कीच स्वामीनी.. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
छानेय कविता!
छानेय कविता!
आयुष्याच्या मातीवरती
पुन्हा मैत्रीचे घर थाटले.. हि ओळ तर मस्तच!
छान आहे.
छान आहे.
Dhanywad manya... धन्यवाद
Dhanywad manya... धन्यवाद सामो