मुंबई मध्ये झालेली वृक्षतोड कितपत योग्य ?

Submitted by Swamini Chougule on 2 December, 2019 - 03:34

काल मुंबई मधील आरे येथे उच्च न्यायालयात जनहित याचिका फेटाळल्या नंतर सुमारे चारशे झाडांची कत्तल झाली. ती ही पोलीस बंदोबस्तात. का तर मेट्रो प्रकल्प उभारणी साठी . ते ही लोकांच्या विरोधाला न जुमानता ;सोई सुविधा कराव्यात त्याला विरोध नाहीच पण कोणत्या किमती वर? .प्रत्येक शहरात असलेली ही जंगले शहरांची फुपुसे आहेत . याच पर्यावरणाच्या रासा मुळे माणूस किती संकटाना तोंड देतोय .
जगाच राहुद्या देशाचं ही सोडा आपण महाराष्ट्राचा विचार करू .महाराष्ट्रात एकीकडे पुर आला तर दुसरी कडे दुष्काळ आहे कशा मुळे होतंय हे सारं तर वृक्ष तोड आणि त्या मुळे बिघडलेले पर्यावरणाचे संतुलन . तुम्ही पुढच्या पिढीला काय देणार आहात वाळवंटीकरणाचा अभिशाप .मेट्रो मधे फिरायला तुमची येणारी पिढी तर साबुत राहिली पाहिजे ना कारण वृक्ष नाही तर प्राणवायू नाही आणि प्राणवायू नाही तर आपण नाही . एका रात्रीत जितकी झाडे तोडली तितकी झाडे लावून ती मोठी होण्यास किती वर्षे लागतील?पुढे जाऊन आपल्या पुढच्या पिढ्यांना ऑक्सिजन सिलेंडर पाठीला लावून फिरायची वेळ आपण नाही आणली म्हणजे मिळवले !

देख जरा इंन्सान तू क्या कर रहा

अपणी ही हातो से तू आपणी कब्र खोद रहा

आपने हातो से तू अपनी नसल मीटा रहा

तू पेडो पर नही अपने ही गर्दन पर कुल्हाडी चला रहा

देख जरा इंन्सान तू क्या कर रहा

अपणी ही हातो से तू आपणी कब्र खोद रहा

खुद के स्वार्थ के लिये तूने जंगल तोडे

कितने ही प्रणीयो के तुने घरोंदे तोडे

देख जरा इंन्सान तू क्या कर रहा

अपणी ही हातो से तू आपणी कब्र खोद रहा

दीनबदीन तू लालची होता गया

तेरी ही वजह से पर्यावरण बिगड गया

देख जरा इंन्सान तू क्या कर रहा

अपणी ही हातो से तू आपणी कब्र खोद रहा

एक दीन तू बहुत पछतायेगा

जो तू बोयेगा वही तो तू पयेगा

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी पहिला निर्णय आरे येथील मेट्रो कार शेड रद्द केला .म्हणून हा जुनाच लेख नव्याने टाकावासा वाटला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओक

हूश्श.....! आता मला मायबोलीवर मी काही तरी लिहिलंय असे वाटतंय . मी हे सगळं मिस्स करत होते.
( हसरी बाहुली ) मला त्या बाहुल्या टाकता येत नाहीत हो !
बरं तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन लवकरच होईल.
(काय आहे माझ्याकडे आज वेळ नाही)
त्याग भाग ७ लवकरच तुमच्या भेटीला येईल एक ही शुद्ध लेखनाची चूक नसलेला .
धन्यवाद

<काल मुंबई मधील आरे येथे उच्च न्यायालयात जनहित याचिका फेटाळल्या नंतर सुमारे चारशे झाडांची कत्तल झाली>

काल?
मधले दोन महिने कुठे होता तुम्ही?

झाडांवर प्रेमाचे नाटक करणारे लोक भंपक आहेत , जिथे हे रहातात , तिथेही कधीतरी झाडेच होती, ह्यांच्या खापर पणजोबांनी कधीतरी तिथे प्लॉट पाडून तिथले झाड पाडून जागा एन ए केली असणार

आता हे लोक इतरांना झाड पाडायला विरोध करतात.

झाडावर इतके प्रेम आहे , तर तुम्हीही तुमच्या पणजोबाची चूक सुधारा, तुमचेही घर पाडून तिथे झाडे लावा

माझा गैरसमज झाला... दोन डिसेंबरचा लेख आणि ४०० झाडांची कत्तल. मोठा धक्का बसला... मुख्यमंत्री पदावर फडणाविस नाही आहेत याची खातरजमा केली... Happy आणि मग काहीतरी गोंधळ नक्की आहे याची खात्री पटली.