Submitted by Helpme on 30 November, 2019 - 09:53
बिपिन सांगळेंची https://www.maayboli.com/node/72530
ही कथा काल वाचली.
अगदी लहान, कोवळ्या मुलींवर अत्याचाराच्या अशा घटना नेहमीच ऐकण्यात असल्या तरी प्रत्येक वेळी प्रचंड त्रास होतो. माझ्या मते याला पॉर्नोग्राफी ९९% जबाबदार आहे. पुर्वी लहान मुले या गोष्टींना बळी पडत नव्हती किंवा अत्यल्प प्रमाण असेल. आता अशा घटना सर्रास घडताहेत. आणि पौगंडावस्थेतील मुले पॉर्नोग्राफीमुळे विनाकारण चेतवली जात आहेत आणि गुन्हा करण्यास प्रवृत्त होत आहेत. आपल्याला काय वाटते?
(पुन्हा एकदा - मी स्त्री आयडीच आहे)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही स्वतःची जेन्युईन व्यथा
तुम्ही स्वतःची जेन्युईन व्यथा मांडण्यासाठी हा आयडी घेतला होता हे समजण्यासारखं आहे. पण आता त्याच आयडीने कोतबो ?
हे ललितलेखनात येऊ शकतं. किंवा चालू घडामोडीत.
अच्छा. धन्यवाद
अच्छा. धन्यवाद
कुंभार मडकी बनवताना कितेयकानी
कुंभार मडकी बनवताना कितेयकानी बघितलं असेल .
तो जस मातीच्या गोळ्याला विविध आकार देतो .
मुल जी मातीच्या गोळ्या सारखीच असतात.
आपण त्यांना आकार देत असतो.
इथे आपण ह्या शब्दाचा अर्थ पालक,शेजारी,समाज,सरकारी व्यवस्था सर्वच जे त्या मुलाच्या संपर्कात येतात.
कोणत्या ही व्यक्तीची मानसिकता हे लहान वयातच तयार होते..
समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्याच कोवळ्या वयात तयार होतो .
Rajesh, माझ्या मते याला
Rajesh, माझ्या मते याला पॉर्नोग्राफी ९९% जबाबदार आहे. आपल्याला काय वाटते?
हो काही प्रमाणात.
हो काही प्रमाणात.
पण पोनोग्रफी पूर्णतः 100%
जबाबदार असते असं म्हणता येणार नाही
तुम्ही पहिला धागा विबासं वर
तुम्ही पहिला धागा विबासं वर काढला. दुसरा पोर्नोग्राफी वर.
कोतबो मधे या विषयावर चर्चा घडवून आणाव्यात असे तुम्हाला का वाटते ? तुमच्या रेग्युलर आयडीने हे विषय मांडा की. नाही तर कोतबो मधे येना-या अशा तत्कालिक आयडीला कुणीही सल्ला देण्याच्या भानगडीत पडणार नाही. बाकी तुमची मर्जी.
ठीक आहे. हा कसा काढून टाकायचा
ठीक आहे. हा कसा काढून टाकायचा?
माझ्यामते पोर्न साइट्सवर
माझ्यामते पोर्न साइट्सवर भारतात बंदी आहे. परंतु संपुर्ण बॅन करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही .
दारूमुळे संसार उध्वस्त झाले
दारूमुळे संसार उध्वस्त झाले त्यात दारूचा दोष नसतो. दुबळ्या मनाच्या गुलामगिरी करणाऱ्या मानसिकतेचा दोष असतो. झेपत नसेल तर पिऊ नये. जबरदस्ती नाही. तेच तत्व इथे आहे. कंट्रोल राहत नाही त्यांनी पोर्न बघू नये. लहान मुलींवर अत्याचाराचे वाढते प्रमाण आहे त्याला ढिसाळ कायदे व्यवस्था जबाबदार आहे. हरामी राजकारण्यांना नेत्यांना बलात्कारातून सुटता यावे म्हणून बलात्काराबाबत बऱ्याच पळवाटा आहेत. मुळात कायद्याच्या भाषेत बलात्काराला व्याख्याच नाही. उदाहरणे बघा...
१. घरातल्या वयात आलेल्या पोरीने एखाद्या मुलाबरोबर स्वेच्छेने सेक्स केला आणि तसे करताना कुणाला आढळले तर बदनामी होऊ नये म्हणून घरचे त्या मुलीवर "त्याने बलात्कार केला" अशी तक्रार नोंदवायचे दडपण आणतात.
२. मुलीला लग्नाचे वचन देऊन (मिडियातले अर्ध्या डोक्याचे महाभाग "आमिष" शब्द वापरतात. अरे येड्या भोXXच्यानो आमिष लहान मुलाला दाखवतात चॉकलेटचे वगैरे. पळवून नेण्यासाठी वगैरे. त्याला आमिष म्हणतात) मुलीशी संमतीने सेक्स केला आणि नंतर लग्न केले नाही तर ती मुलगी बलात्काराची केस लावू शकते
३. वरील उदाहरण पण नोकरीचे किंवा नोकरीत बढतीचे वचन देऊन सेक्स केला आणि नंतर वचनपूर्ती केली नाही तरीहीर तेच. मुलगी बलात्काराची केस लावू शकते.
४. स्त्रीची इच्छा नसताना वासनांध नवऱ्याने केवळ आपला कंड शमवण्यासाठी मारहाण करत पत्नीशी "बळाने" संभोग केला तरी त्याविरोधात ती स्त्री बलात्कार ची केस करू शकत नाही.
म्हणजे जिथे खरेच "बला"त्कार होत असतो तिथे कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल करता येत नाही आणि जिथे संमतीने सेक्स झालेला असतो तिथे कित्येक वर्षांनी त्या बलात्कार म्हटले जाते. असले खुळचट कायदे जिथे आहेत तिथे तुम्ही अजून कसल्या अपेक्षा करणार?
पूर्वी होत नव्हते म्हणून कुणी सांगितले? वासना दाबल्या गेल्यात तिथे बलात्कार झाले आहेत. भूक दाबली तर अन्नाची चोरी होणार ना? फक्त पूर्वी मिडिया मर्यादित असल्याने बातम्या येत नव्हत्या त्या आता येत आहेत इतकच. दारूला आणि पोर्नला दोष देण्यात अर्थ नाही.
जबरदस्तीने सेक्स केल्याची मुलीने नुसती तक्रार जरी केली तरी तिथल्यातिथे त्या पुरुषाच्या पार्श्भागावर चाबकाचे फटके फोडायची शिक्षा द्या (मग तो तिचा नवरा असला तरी सुद्धा) आणि मग बघा अत्याचाराचे प्रमाण झटक्यात खाली येते. हेच खरे महिलांचे सबलीकरण होईल.
क्रिमिनल वृत्तीचे लोकच गुन्हे
क्रिमिनल वृत्तीचे लोकच गुन्हे करतात.
छोटे छोटे गुन्हे जरी एकदा व्यक्ती सारखा करत असेल तर त्याच्या वर लक्ष ठेवलं गेलं पाहिजे.
अगदी सिग्नल तोडण्यासारख साधं गुन्हा सुधा असेल तरी.
असे लहान लहान गुन्हे करणारे च लोक नंतर मोठे गुन्हे करतात.
ठीक आहे. हा कसा काढून टाकायचा
ठीक आहे. हा कसा काढून टाकायचा? >>> अहो हा आयडी तात्पुरता आहे, म्हणजे तुम्ही नवीन आहात का मायबोलीवर ? ओरिजिनल आयडीला विचारा ना ..
परिचित ,मंगला सामंत यांचे
.
ठीक आहे. हा कसा काढून टाकायचा
ठीक आहे. हा कसा काढून टाकायचा? >>> अहो हा आयडी तात्पुरता आहे, म्हणजे तुम्ही नवीन आहात का मायबोलीवर ? ओरिजिनल आयडीला विचारा ना ..
नवीन Submitted by पुरोगामी गाढव on 1 December, 2019 - 09:49
अहो हा आयडी तात्पुरता आहे,
अहो हा आयडी तात्पुरता आहे, म्हणजे तुम्ही नवीन आहात का मायबोलीवर ? ओरिजिनल आयडीला विचारा ना ..>> ओरीजिनल आयडीला माहित असतं तर कधीच काढला असता. मला खरंच माहीत नाही म्हणून विचारतीये. सांगायचं असेल तर चांगल्या भाषेत सांगून मोकळे व्हा ना.
म्हणजे तुम्ही नवीन आहात का
म्हणजे तुम्ही नवीन आहात का मायबोलीवर ? >> प्रतिसाद देण्यापुरतीच परिचित आहे. कधी तरी समोरची व्यक्ती जेन्युईन असू शकते यावर विश्वास का ठेवला जात नाही.
धागा कोतबो मधून चालू घडामोडीत
धागा कोतबो मधून चालू घडामोडीत हलवला आहे, तेव्हा धागा डिलीट करायची गरज नाही.
पुढील जे इतर धागे काढाल ते ओरिजिनल आयडी ने काढा.
तरीही डिलीट करायचाच असेल तर आधी मूळ लेख संपादित करून तिथे फक्त "संपादीत" असे ठेवा, शीर्षक बदलून "कुपया धागा काढून टाका" असे करा.
आणि ऍडमिन / वेमाना विपु करून या धाग्याची लिंक देऊन हा धागा काढून टाकण्यास सांगा.
लोकांचा आग्रह का आहे की,
लोकांचा आग्रह का आहे की, ओरिजीनल आयडी ने काय करावं की तात्पुरत्या आयडीने?
त्यां त्या आयडीला ठरवू द्या ना. असा कायसा फरक पडतोय कोणाला?
असली दादागिरी आधी बंद करावी.
प्रतिसाद देण्यापुरतीच परिचित
प्रतिसाद देण्यापुरतीच परिचित आहे >>>>>
अहो याचा अजून वेगळा अर्थ काढतील लोकं
असली दादागिरी आधी बंद करावी.
असली दादागिरी आधी बंद करावी. >> झंपी, जाऊ दे. वाद घालण्यात अर्थ नाही.
तरीही डिलीट करायचाच असेल तर आधी मूळ लेख संपादित करून तिथे फक्त "संपादीत" असे ठेवा, शीर्षक बदलून "कुपया धागा काढून टाका" असे करा. >>
संपादनचा पर्याय दिसत नाही
अहो याचा अजून वेगळा अर्थ
अहो याचा अजून वेगळा अर्थ काढतील लोकं >> म्हणजे मी लेखन केले नाही कोणतेच ओरीजिनल आयडीने अजूनपर्यंत तरी. चांगलाच वैताग होणार असं दिसतंय मला हा धागा काढून.
कधी तरी समोरची व्यक्ती
कधी तरी समोरची व्यक्ती जेन्युईन असू शकते यावर विश्वास का ठेवला जात नाही. >>> पहिल्या धाग्यात तुम्ही काय सांगितले होत ?
पुरोगामी गाढव, आधी संपादनचा
पुरोगामी गाढव, आधी संपादनचा पर्याय कूठे आहे ते सांगा.
पुरोगामी गाढव, आधी संपादनचा
पुरोगामी गाढव, आधी संपादनचा पर्याय कूठे आहे ते सांगा >> कसले संपादन करायचेय तुम्हाला ?
पॉर्न मुळे बलात्कार वाढले
पॉर्न मुळे बलात्कार वाढले
सिनेमामुळे हिंसाचार वाढले
ही सगळी वरवरची करणे आहेत
मुळात माणसात हिंसा, विकृती ठासून भरली आहे
माणूस मग त्यात स्त्री पुरुष दोन्हीही आले
आणि त्यावर आजवर अनेक प्रयोग देखील झाले आहेत
दोन तीन वर्षांपूर्वी एका मॉडेल ने सोशल प्रयोग म्हणून याला प्रसिद्धी दिली होती आणि त्याचे परिणाम भयानक होते
असे जाहीर करण्यात आले की सहा तास ही मॉडेल लोकांना विरोध करणार नाही, त्यांनी काय वाटेल ते येऊन करावं
अर्थात परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पूर्ण टीम होती
कॅमेरे होते (गुप्तपणे लावलेले)
सुरुवातीला अनेक लोकं आली पण ती बिचकत होती
पण जेव्हा त्यांना खात्री दिली गेली की त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना जबाबदार धरले जाणार नाही, कायदेशीर कारवाई होणार नाही
आणि त्यानंतर त्या सो कॉल्ड पांढरपेशा समाजातून जनावर बाहेर पडले
त्यांनी अक्षरशः विकृतीची परिसीमा गाठली हे सगळे लोक उच्चभ्रू वर्गातले होते, अशिक्षित ट्रक ड्रायव्हर वगैरे नव्हेत
ते सहा तास त्यांनी जो विकृतपणा केला तो अतिशय धक्कादायक होता असे मत शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे
आपल्यला शिक्षा होऊ शकते याच भीतीने माणसातला विकृतपणा बाहेर येत नाही
मग ती शिक्षा देवाकडून, आईवडील, समाजाकडून किंवा कायद्याकडून
त्यामुळे या गोष्टीमुळे हे प्रकार होत नसून शिक्षेची भीती, मनावरचा ताबा आणि दुसऱ्याला व्यक्ती म्हणून आदर देण्याचे संस्कार याचा अभाव असल्याने होत आहेत
या डीनायल मोड मधून कधी बाहेर येणार आहेत की सगळं काही आलबेल आहे
पुरोगामी गाढव, विपू बघा
पुरोगामी गाढव, विपू बघा
आशुचॅंप >>
आशुचॅंप >>
खरय
खरय
>> पुर्वी लहान मुले या
>> पुर्वी लहान मुले या गोष्टींना बळी पडत नव्हती
लहान मुलींची ३०-५० र्वषाच्या माणसांशी लग्न व्हायची कधी काळी
>>>>>>> लहान मुलींची ३०-५०
>>>>>>> लहान मुलींची ३०-५० र्वषाच्या माणसांशी लग्न व्हायची कधी काळी>>>>>>>> लग्न वेगळं, रेप आनि मॉलेस्टेशन वेगळं. याचा बालविवाहास माझी संमती आहे, असा मात्र नाही.
पूर्वी देखील हे होत असणार -
पूर्वी देखील हे होत असणार - आता सोमी आहे म्हणून पटापट कळते ..
पूर्वी देखील लहान मुलामुलींवर
पूर्वी देखील लहान मुलामुलींवर अत्याचर व्हायचे. एकत्र कुटुंबात असणारे नातेवाईक, येणारे पाव्हणे रावळे, शेजारी असे कुणीही शोषक असायचे. मात्र तेव्हा एकतर मुलांनी काही विश्वासाने सांगावे आणि त्यावर आईवडीलांनी अॅक्शन घ्यावी अशी परीस्थिती फार कमी होती. विश्वासाने सांगितलेच तर आधार देणे नसे, गप्प बसवले जाई. आपल्या अपत्यासाठी उभे रहावे असे बळ मुलांच्या आईत फारसे नसे. एकदा प्रसंग घडला तर पुन्हा असे होवू नये म्हणून काळजी घेण्याची धडपड करणे एव्हढेच हातात असे.
बर्याच जणांनी असेही चित्र अनुभवलेही असेल - 'सुट्टीला एकत्र कुटुंबात एखादी पोक्त किंवा वयस्क स्त्रीने सतत तुमच्या सुरक्षितेतेची वेड्यासारखी काळजी करणे, 'अबक' च्या आवारात खेळायला बंदी करणे, किंवा आपल्याला चॉकलेट देवू करणार्या एखाद्या पुरुषाला हटकून फटकारणे.' 'मोठं' झाल्यावर कधीतरी आई -काकी -मामी वगैरेंकडून 'का?' चा उलगडा होई.
माझ्या माहितीप्रमाणे बालविवाह
माझ्या माहितीप्रमाणे बालविवाह झालेल्या मुलीला मासिक धर्म सुरू होईपर्यंत संबंधांना परवानगी नसायची.
मुलीला कंसेंट म्हणजे काय हे
मुलीला कंसेंट म्हणजे काय हे देखील कळत नसताना तिचे लग्न लावणे आणि मासिक पाळी सुरु झाल्यावर , मग ती भले १२ व्या वर्षी का सुरु होईना , लगेच शरीर संबंध हे एक प्रकारे अत्याचारच. तेव्हाच्या रिती अन्यायकारक होत्या हेच खरे!
मासिक पाळी सुरु झाल्यावर , मग
मासिक पाळी सुरु झाल्यावर , मग ती भले १२ व्या वर्षी का सुरु होईना , लगेच शरीर संबंध हे एक प्रकारे अत्याचारच. >>+११
हेल्प मी , मी तर तुम्हाला
हेल्प मी , मी तर तुम्हाला संपादन करा म्हटले नव्हते. तुम्ही मला का विचारताय ? मला कसं माहीत असणार संपादन कसं करतात ? माझा हा आयडी नवीन आहे.
हेल्पमी ,
हेल्पमी ,
लेखन संपादित करायला ४ तासाची मुदत असते. त्यानंतर लेखन संपादित करायचे असेल, धागा काढून टाकायचा असेल तर अॅडमिनना विनंती करा.
आज व्हाट्सअप्पवर मला
आज व्हाट्सअप्पवर मला फॉरवर्डमध्ये विडिओ आला. 112 india app बद्दल माहिती देणारा. हे अँप डालो करायचे, त्वरित पोलीस मदत मिळते, पोलीस लोकेशन ट्रेस करून येतात.
मी डालो केले, रेजिस्ट्रेशन केले. Otp व्हेरिफिकेशन झाल्यावर पुढच्या स्क्रीनवर माझे लोकेशन दिसायला लागले व पोलीस,फायर, मेडिकल व अन्य ही बटन्स दिसली. मी टेस्ट करायचे म्हणून पोलीस बटन दाबले. माझ्या मोबाईलवरून कॉल गेल्याचे दिसले, पण बहुतेक मिस्ड कॉल असणार. I m safe हे अजून एक बटन दिसले. मी तेही प्रेस केले, उगीच पोलिसांना कामाला लावायला नको म्हणून.
पुढच्या 2 क्षणात मला फोन आला. मॅडम, तुम्ही 112 इंडिया हेल्प मागितली, पोलीस हेल्प हवी का? मी नको म्हणून आभार मानले. रात्री 12.14 ला फोन आला हे विशेष.
कृपया, 112 INDIA हे अँप डालो करा, इतरांना सांगा व आपल्याला शक्य तितके सुरक्षित करा
साधना. उपयुक्त माहिती.
साधना. उपयुक्त माहिती. धन्यवाद.
धन्यवाद साधना. भारतातील
धन्यवाद साधना. भारतातील नातेवाईकांना कळवेन या अॅप बद्द्ल.
लोकांचा आग्रह का आहे की,
लोकांचा आग्रह का आहे की, ओरिजीनल आयडी ने काय करावं की तात्पुरत्या आयडीने?
त्यां त्या आयडीला ठरवू द्या ना. असा कायसा फरक पडतोय कोणाला?
असली दादागिरी आधी बंद करावी. >>>>
झंपी तै , कुणी कसली दादागिरी केली ? त्या आयडीला समजलेले आहे कोण काय सांगतेय. तुम्हाला कसले झटके आलेत ? कसला आग्रह आणि कसली दादागिरी केलीय कुणी ? दादागिरी म्हणजे काय ते समजत असावं अशी तुमच्याकडून अपेक्षा ठेवावी का ?
लेखन संपादित करायला ४ तासाची
लेखन संपादित करायला ४ तासाची मुदत असते. >>>
प्रतिसाद संपादीत करायला चार तास आणि लेखन संपादीत करायला बहुतेक १ महिना.
helpme : तुम्ही धागा कोतबो मधून चालू घडामोडीत कसा हलवला? संपादन करूनच ना?
असो. स्वाती२ यांनी सांगितलेच आहे - संपादीत न करताही ऍडमिन/वेंमांना विपु करून विनंती करू शकता धागा काढून टाकण्यास.
#सेफ्टी_फर्स्ट!!
.
मला अगदी लहान मुलींबद्दल
मला अगदी लहान मुलींबद्दल बोलायचं आहे. ४ - ५ वर्षांच्या. ज्या अशा घटनांना बळी पडतात.
साधना. उपयुक्त माहिती.
साधना. उपयुक्त माहिती. धन्यवाद. >>> + १२३
त्यांनी धागा काढला आहे
त्यांनी धागा काढला आहे पोर्नविषयी ,चर्चा वेगळीच चालू आहे. मला तरी असे वाटते पोर्न पुर्ण बंद करावे .
पॉर्नोग्राफीचे २ परिणाम आहेत
पॉर्नोग्राफीचे २ परिणाम आहेत -
१. काही लोक म्हणतात त्याप्रमाणे लैंगिक भावना उद्दिपीत होतात आणि अनेक चुकीच्या समजुती निर्माण होऊ शकतात. त्यातून एक तर काहींना लैंगिक न्यूनगंड तरी येतो, किंवा जोडीदाराकडून भलत्याच अपेक्षा केल्या जातात. काही जणांच्या मनात लहान मुलांशी संबंध ठेवण्याची इच्छा चाळवली जाते, आणि त्यांचा मनावर ताबा नसेल तर ते कधीतरी ती कृती करण्यास धजावतात. तात्पर्य, पॉर्नमुळे काही प्रमाणात अत्याचारास हातभार लागतो.
२. अनेकांना अनेक कारणामुळे लैंगिक उपवास घडत असतो - कारणे काहीही असतील; जोडीदार मिळाला नाही, आरोग्य चांगले नाही इत्यादि. परंतु निसर्गनियमानुसार लैंगिक भावना तर निर्माण होतच असते. तिचा निचरा करायला आउटलेट मिळत नाही. अशा परिस्थितीत काही जण नैतिक किंवा अनैतिक संबंध हे परस्पर सहमतीने ठेवतात; काहीजण जबरदस्ती करतात, तर काही जण हस्तमैथून करून ते बाहेर काढतात. हस्तमैथून करताना अनेक जण पॉर्न बघतात. कदाचित पॉर्न नसेल तर त्यातले काही जण हवालदिल होतील आणि ते अनैतिक संबंध ठेवण्याकडे किंवा लैंगिक अत्याचार करण्यास उद्युक्त होतील. त्यामुळे अश्या लोकांसाठी पॉर्न हे समाजाला अत्याचारांपासून दूर ठेवण्यासाठी एक साधन आहे.
वरील दोन्ही मुद्द्यांचा विचार व्हावा.
ही कथा प्रतिलिपि वर आहे का?
ही कथा प्रतिलिपि वर आहे का?
- this is forward. credits
- this is forward. credits mentioned. Mr. Utpal VB
जगन रेप कर.असं जगनला कुणी सांगत नाही.
जगन आपणहूनच रेप करतो.
शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न केलेला, फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत.
त्यातले सगळेच रेप करू शकतात.जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल.
पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप घालतो.
आणि नंतर तिला अमानुषपणे मारूनही टाकतो.
जगन वाईट आहे. भयानक वाईट.
पण वाईट जगनपैकी एकाची एक केस आहे.
या केसमधल्या जगनला इतर जगनसारखंच पंधरा-सोळाव्या वर्षी इरेक्शन आलं.
कमलला न्हाण आलं त्याच्या एक-दोन वर्षांनंतर.
इरेक्शन आल्यावर काय करायचं हे त्याला आई-बाबांनी सांगितलं नाही.
कारण त्यांना त्याचा संकोच वाटायचा.
कमलला पाळी आली की आई तिला काय करायचं ते सांगते.
पण जगनला इरेक्शन आलं की काय करायचं हे बाबा त्याला सांगत नाही.
कारण बाबालाही ते कुणी सांगितलं नव्हतं.
बाबाच्या बाबाने त्याला एकदा नग्न बायकांची चित्रं असलेलं पुस्तक वाचताना पकडलं होतं आणि मारलं होतं.
पण इरेक्शनचं काय करायचं हे सांगितलं नव्हतं.
बाबाने तीसएक वर्षांपूर्वी हेलनला नाचताना बघून हस्तमैथुन केलं होतं.
आता तर नाचाची खूप प्रगती झालीय. जगनपुढे आता खूप बायका नाचतात. मल्लिका, मुन्नी, शीला वगैरे सगळया.
शिवाय कॅमेरा त्यांच्या शरीरावर फिरतो.
कारण कॅमेऱ्याला हे माहीत आहे की जगनला ते आवडेल.
आणि कॅमेऱ्याच्या मागच्या माणसांना खूप पैसे मिळतील.
असे खूप जगन तयार करणं हे कॅमेऱ्याचं ध्येय आहे.
पण ते असो.चूक जगनची आहे.
जगनही मग हस्तमैथुन करतो.
ते करताना एकदा आईने पाहिलं तर तिने भंजाळून जाऊन बाबाला सांगितलं.
बाबाने मार खाल्ला होता, म्हणून त्याने जगनला पण मार दिला.
पण मार खाऊन इरेक्शन थांबत नाही.
म्हणून मग जगन पुन्हा नाच बघतो, संभोगचित्रांची पुस्तकं वाचतो, ब्ल्यू-फिल्म बघतो.
आणि हस्तमैथुन करतो.
आपली परंपरा फार थोर आहे.तिचा विजय असो.
आपल्या परंपरेनं शिकवलं आहे की लग्नाआधी संभोग वाईट.
त्यामुळे लग्नापर्यंत थांबून नंतर सगळी कसर भरून काढली तरी चालेल.
म्हणजे पहिल्या रात्री बायकोला त्रास झाला तर चालेल.
पण लग्नापर्यंत स्त्रीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे.
त्यामुळे जगन नग्न बाईचे फोटो बघत थांबतो.
शिवाय अशा नग्न बायकांना वाईट समजलं जातं.
कारण त्या जगनला बिघडवतात.पण जगनला त्या आवडतात.
कारण ज्याच्यामुळे इरेक्शनपासून सुटका मिळते ते जगनला चांगलं वाटतं.
पण इरेक्शन कायमचं कधीच संपत नाही.
जगनला आता 'बाई' हवीच असते.तो कमलकडे आता बाई म्हणूनच बघू लागतो.
आणि एके दिवशी तिच्यावर झडप घालतो.जगनचं जनावर होतं.
दुर्दैवाने जगन पुरूष आहे.
संस्कृती प्रगत झाली तरी संस्कृतीकडे अजूनही इरेक्शनला उत्तर नाही.
शिवाय इरेक्शनबरोबरच जगनला अजून एक महत्त्वाचं शिक्षण मिळतं.
पुरूषसत्ताकतेचं.
म्हणजे बाबा कुटुंबप्रमुख.
आई त्यानंतर.
जगन, तू मुलगा आहेस.मुलींसारखा रडतोस काय?
जगन, तू मुलांच्यात बस बघू.मुलींबरोबर कसला बसतोस?
जगन, मुली फक्त क्रिकेटमध्ये नाचण्यासाठी असतात.
क्रिकेट खेळायचा असतो मुलांनी.जगन, स्वयंपाक तू नाही करायचास.
पण तुला प्लंबिंग आलं तर चांगलं आहे.जगन, बायकांना डोकं जरा कमीच असतं.
त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच बसावं.जगन, तू मर्द आहेस.
बाईला जिंकणं यात मर्दानगी असते.
वगैरे.
आधीच इरेक्शन आणि त्यात पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन.
जगन पार बिघडून गेलाय.
त्याच्यातला हिंस्त्रपणा जनारांनी लाजावं इतका वाढलाय.
कमलच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणी, आई-बाबा आणि परंपरा सगळ्यांनाच जगनचा प्रचंड राग येतो.
त्याला फाशी द्यावी असं वाटतं.जगनला फाशी जरूरच द्यावी.
त्याने जगन नक्की मरेल.पण नर उरेल.
कारण नर आणि मादी कधीच कायम मेलेले नाहीत. अजूनही मरत नाहीत.
नर पुन्हा हस्तमैथुन करत वाढेल आणि पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन त्याला दिलं जाईल.
आणि मादी पुन्हा अनंतकाळ पहात असलेली वाट पहात राहील.
शुभंकर संभोगाची.
- Mr. Utpal VB
आजकाल सगळेच स्त्री पुरुष
आजकाल सगळेच स्त्री पुरुष पॉर्न बघतात. सगळेच वाईट वागतात का बाहेर? पॉर्न न बघितलेला कोणी असेल असे वाटत नाही.
मग काय उपाय या सगळ्यांवर
मग काय उपाय या सगळ्यांवर
Pages