Just cut my hair short

Submitted by 'सिद्धि' on 27 November, 2019 - 02:49

का छोटेखानी पण प्रोफेशनल पार्लर मध्ये ' ती ' वाट बघत बसलेली आहे . काही तरुणी , मध्यम वयाच्या स्त्रिया , अगदी नववधू देखिल, असा बर्यापैकी लावाजमा अवती-भोवती पहायला मिळतो . कोणी नुसतीच चेहर्यावर रंगरंगोटी चढवत आहे. तर कोणी भारीतले स्पेशल फेशियल, कोणी ब्लिच आणि काय-काय ते सगळ मेकपचेकप करण्यात दंग आहेत. मध्येच हसण्या-खिदळण्याचा आवाज . यात भर म्हणुन काही-बाही बायकांच्या रंगलेल्या गप्पाठप्पा सुरू आहेत. पण तीचा चेहरा मात्र भावभावनांचा लवलेशही नसलेला, अगदी पांढरा फट, निर्विकार...
"टिंग...टिंग.....नेक्स्ट कस्टमर प्लिज ! " नंबर आल्याच समजल्यावर ती आतमध्ये चेअरवर जाऊन बसते. 
हेअरड्रेसर : येस मॅम ?
ती : कट माय हेअर.
हेअरड्रेसर तीच्या काळ्याभोर, मुलायम कमरेपर्यंतच्या लांब केसावर हात फिरवत विचारते,
"mam can i do layers. You have really nice hair."
ती : just cut my hair short. ( तोच धीरगंभीर, निर्विकार स्वर )

५-१० मिनीटामध्ये तीचे बर्यापैकी कापलेले केस फ्लोअर वरती पडलेले आहेत.
हेअरड्रेसर : see mam... it looks good.
" no....Cut it Short Please. " अगदी शोल्डरच्या थोडेसेच खाली असे रुळणारे, छानशा स्ट्रेटकट मध्ये तीला मस्त शोभुन दिसणारे आपले केस क्षणभर पहात तीने सांगीतले.

जुन थोडे, अजुन थोडे असे करता-करता आता बरेचसे केस कापुन झालेले आहेत . ते निर्जीव केस तीच्यापासुन अलीप्त होऊन खाली असाह्यतेने विखुरलेले. छानसा डुलणारा Choppy Bob cut आरश्यात पाहुन एका क्षणासाठी स्तब्ध झालेली तीची नजर.... थोडीशी साशंक आणि आश्चर्याने तीच्याकडे पाहणारी पार्लरवाली आणि इतर कस्टमर्स...दोन मिनीट....एक भयान शांतता.
हेअरड्रेसर : now is it ok mam ? 
ती : no. Make it even shorter.

गदी शेवटी ती तीचे केस दोन्ही हातानी घट्ट पकडून ओढुन बघते.... अजुनही केस सहजपणे हातामध्ये येत आहेत ते पाहुन हताश झालेल्या "ती"चे शेवटचे वाक्य....." cut it short, so that no one can hold me by my hair...no one can hold it like this again. "
(the real reason why she wants her hair cut. because it’s been used by an abuser to hurt her.)

*****
https://www.youtube.com/watch?v=Ckr4zzUyd64 - International Women's Day. जुई  ही एक बेंगॉली शॉर्ट अ‍ॅड आहे. बघताना सुन्न झाल, अगदी स्पिचलेस.

'ती' ही जी कोण 'ती' आहे, ती तुझ्या-माझ्या मधलीच एक आहे. केस म्हणजे स्त्रिच सौंदर्य... तीला पाहीजेत तर ती केस मोठे ठेवते. तीला पाहीजेत तर ती ते वाढवते, कीवा अगदी छोटे करते . पण हे सगळ तीच्या आवडी-निवडी नुसार आहे. आपल्या केसांना पकडुन-ओढून आपल्याला वेदना देतात. त्रास देतात आणि मारहान करतात. म्हणुन तु तुझे केस कापलेस, पण जर कोणी तुझा हात पकडुन तो तूझी छेडछाड करत असेल , किवा हात पिरघळत असेल, तर तु काय तूझा हात कापणार आहेस ? का तर कोणीही हाताला धरुन आपल्याला ईजा करु नये म्हणुन ? उद्या कोणीही तुझा गळा पकडला, म्हणुन तु गळा कापुन आत्महत्या करणार ! नाही ना ? नाहीतर तुच तुझे अस्तित्व संपवण्यासाठी जबाबदार ठरणार आहेस. हे तुझ्या अस्तित्वावर उठलेले हात मग कोणाचेही असोत. तुझ्या केसापर्यंत आलेले तुझ्या गळ्यापर्यंत येण्याच्या आतच त्याना त्यांची जागा दाखवून देण्याची सद्ध्या गरज आहे .

माझी एक मैत्रिण, जी अगदी साधी-भोळी. एवढी की नेहमी साधा ओढणीचा ड्रेस घालणारी. तीला दुसर्या स्टायलीश कपड्यामध्ये याआधी पाहील्याचे मला कधी आठवत नाही.....मागे तीला जिन्स-कुर्त्यामध्ये पाहुन मला फार आश्चर्य वाटले. 'suddenly changed ?' म्हंटल्यावर ती सांगत होती. ' ट्रेनने प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन कोणितरी तीची ओढणी खेचत होते.... ती अक्षरश्या गर्दीमध्येच खाली पडली. कोसळली. गर्दीमध्ये चुकून असे झाले यातलाही हा प्रकार नाही. कारण तीच्या बरोबर प्रवास करणार्या एका माणसाने तीला सांगीतले की, बाजुने जाणार्या एकाने तीची पर्स ओढण्याच्या नादात ओढणी खेचली होती. आता जॉब सोडू शकत नाही. कीवा ट्रेनचा प्रवासही टाळू शकत नाही. मग काय ? तर ती ओढणीच काढुन तीने खुंटीला लावली.

परिस्थिती नुसार स्वतःमध्ये बदल घडवण्याची गरज आहे, पण आपल्या अस्तित्वाला तडा जाऊ न देता. आणि आपल्या मधल्या प्रत्येक 'ती' ने याची सुरुवात केली पाहिजे. us women need to be brave. break the silence and fight for yourself.
images.jpg

* माझे कोणतेही लिखाण इतरस्त्र कोठेही पोस्ट करताना या नावासकट टाकावे ही विनंती.
- सिद्धि चव्हाण https://siddhic.blogspot.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

तुझ्या केसापर्यंत आलेले तुझ्या गळ्यापर्यंत येण्याच्या आतच त्याना त्यांची जागा दाखवून देण्याची सद्ध्या गरज आहे . >> १११

us women need to be brave. break the silence and fight for yourself. ++१११

सिद्धी सुंदर लिहिल आहे गं. आवडल.

.